तक्रार क्र. CC/ 13/ 12 दाखल दि. 08.03.2013
आदेश दि. 08.08.2014
तक्रारकर्ता :- श्री भोजराज रामकृष्ण सोनकुसरे
वय – 40 वर्षे, धंदा—खाजगी
रा.मोहाडी, ता.मोहाडी, जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. कनिष्ठ अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल.
मोहाडी सब डिव्हीजन, कुशारी रोड,
ता.मोहाडी जि.भंडारा
2. एक्झयुकेटिव्ह इंजिनियर(ए.डी.एम.)
एम.एस.ई.डी.सी.एल.,विदयुत भवन,
नागपुर रोड,भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.सौरभ गुप्ता
वि.प.तर्फे अॅड.डी.आर.निर्वाण
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 08 ऑगस्ट 2014)
1. तक्रारकर्त्याने विदयुत बिलामध्ये दुरुस्ती करुन देण्या संबंधी व त्याच्या विजेचा विदयुत भार तपासून अचुक बील देण्यासंबंधी विरुध्द पक्षाकडे वारंवार विनंती अर्ज केले. तसेच तक्रारकर्त्याचा विदयुत पुरवठा विदयुत देयक भरण्याच्या तारखे आधीच कुठलीही पुर्वसुचना न देता खंडीत केल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्ता हा मोहाडी येथील रहिवासी असून तो विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे. विरुध्द पक्ष क्र.1 हे तक्रारकर्त्यास विदयुत पुरवठा करतात व विरुध्द पक्ष क्र.2 हे विरुध्द पक्ष यांचे वरीष्ठ कार्यालय आहे. तक्रारकर्ता हा दर महिल्याला नियमित विदयुत बील भरणा करीत आलेला आहे.
3. तक्रारकर्ल्याला ऑगस्ट 2011 ते नोव्हे.2012 पर्यंतचे विदयुत बील Faulty (फॉल्टी) दाखवून दर महिन्यात 85 युनिट सरासरी रिडींग दाखवून बील देण्यात आले होते. तक्रारकर्त्याला देण्यात आलेल्या बीलावर रिडींगचे फोटो मध्ये मीटरचे रिडींग स्पष्ट दिसत असून सुध्दा विरुध्द पक्षाने Faulty म्हणुन सरासरी बील दिले. तक्रारकर्त्याने वीज बिलामध्ये सुधारणा करुन वापरलेल्या युनिटचे बील देण्यात यावे अशी विनंती विरुध्द पक्षाकडे केली. परंतु विरुध्द पक्षाने बिलामध्ये कुठलही सुधारणा केली नाही किंवा मीटरची सखोल तपासणी केलेली नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 14/1/2013 ला व 21/1/2013 ला विदयुत बीलात सुधारणा करावी यासाठी पत्र दिले होते. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने मागील 16 महिन्याचे चुकीचे मीटर रिडींगमध्ये सुधारणा करुन नवे मीटर डिसेंबर 2012 मध्ये लावून दिले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मार्च 2013 ला 8370/- रुपयाचे बील दिले व ते बील भरण्याची अंतीम तारीख 2/4/2013 ही होती. परंतु विरुध्द पक्षाने कायदेशीररित्या विदयुत बील भरण्याच्या अंतीम तारखे अगोदर तक्रारकर्त्याचा विदयुत पुरवठा खंडीत केला. तक्रारकर्त्याने विदयुत पुरवठा चालु करण्यासाठी मंचामध्ये दिनांक 8/4/2013 ला अंतरिम अर्ज दाखल केला व न्याय मंचाचे आदेशानुसार दिनांक 12/4/2013 ला ‘Under protest’ थकीत बिलाचे पैसे जमा केले व त्यानंतर तक्रारकर्त्याचा विदयुत पुरवठा दिनांक 14/4/2013 ला रात्री 8 वाजता चालु केला.
4. तक्रारकर्त्याने वारंवार Faulty बील देण्याबद्दल व विदयुत मीटरचे निरीक्षण करण्यासाठी दिलेल्या तक्रारीचे निराकरण न करता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रारकर्त्याचा विदयुत पुरवठा हा अंतीम तारखेच्या अगोदर खंडीत केल्यामुळे तक्रारकर्त्याने 57,860/-रुपयाची नुकसान भरपाई मिळावी म्हणुन तक्रार दाखल केली आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षास दिनांक 8/3/2013 ला नोटीस पाठविण्यात आली.
6. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आपला जबाब दिनांक 12/4/2013 ला दाखल केला.
7. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी त्यांचे जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले तसेच तक्रारकर्ता हा विदयुत ग्राहक असल्याचे नमुद केले आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास Faulty मीटरचे 3799 युनिट मधून 1359 युनिट वजा करुन 2440 युनिटचे 28,889/- रुपयाचे देयक तयार करुन दरमहा 85 युनिट 14 महिन्याचे 1190 युनिटचे रुपये 23,000/- ची रक्कम कमी करुन 5890/- रु.चे सुधारित देयक जे अचुक देयक आहे ते तक्रारकर्त्यास दिले. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निराकरण झाल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. विरुध्द पक्षाने डिसेंबर 2012 च्या बीलामध्ये तक्रारकर्त्यास 23,000/- रुपयाच्या रक्क्मेची सुट दिल्यामुळे तक्रारकर्त्याचे विदयुत देयक दुरुस्त करुन दिलेले आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला Less Billing म्हणजे प्रत्यक्ष वीजवापर जास्त असतांना कमी युनिटचे बील आणि कमी रक्कमचे बील तांत्रिक चुकीमुळे देण्यात आले. तक्रारकर्त्यास दिलेले, दुरुस्त केलेले बील हे योग्य दिले असून तक्रारकर्त्याची तक्रार रुपये 6,000/- खर्च बसवून खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
8. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत सप्टेंबर 2011 चे बील पान नं. 16 वर दाखल केले आहे तसेच ऑक्टोबर 2011 ते फेब्रुवारी 2013 चे बील पान नं.33 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास दिनांक 14/1/2013 रोजी पाठविलेल्या तक्रारीची प्रत पान नं.34 वर दाखल केली आहे. तसेच दिनांक 21/1/2013 चे स्मरणपत्र पान नं.36 वर दाखल केले आहे. Electricity Consumer Rights Statement पान नं.38 वर, महाराष्ट्र शासन राजपत्र व महाराष्ट्र स्टेट रेगुलेटरी कमीशनचे अधिनियम 2005 पान नं.47 वर, Electricity Supply Code and Other Regulations & Conditions पान नं. 57 वर दाखल केले आहेत. तसेच तक्रारकर्त्याने Maharashtra Electricity Commission Regulation 2010 पान नं. 63 वर दाखल केले आहे.
9. तक्रारकर्त्याचे वकील अॅड.सौरभ गुप्ता यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याला ऑगस्ट 2011 ते ऑगस्ट 2012 या 1 वर्ष 2 महिने या कालावधीमध्ये विरुध्द पक्षाने Faulty मीटरचे बील दिले. विरुध्द पक्षाचे Faulty Meter Reader हे दर महिन्याला मीटर रिडींग घेण्यास येत होते. तक्रारकर्त्याच्या मीटरवर मीटर रिडींग हे स्पष्ट दिसत असतांना सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास 1 वर्ष 2 महिने या कालावधीचे Faulty बील दिले. Electricity Act प्रमाणे तक्रारकर्त्याने Faulty मीटर बद्दल दिनांक 14/1/2013 व 21/1/2013 ला मीटर दुरुस्ती बद्दल तक्रार देवून सुध्दा विरुध्द पक्षाने कुठलीही कार्यवाही केली नाही.
Indian Electricity Act नुसार 4 महिन्याचे आंत मीटर Faulty असल्याबद्दलचा शेरा विरुध्द पक्षाने लिहीला असल्यास मीटर लगेचच Laboratory Testing करुन, दुरुस्त करुन नवीन मीटर लावणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याने वारंवार बिलासंबंधी विचारणा करुन सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास बील कमी करुन देण्याबद्दलचे स्टेटमेन्ट दिले नाही व बील कमी करण्याचे तसेच 23,000/- रुपयाची सुट देण्यासाठी वापरलेली पध्दत व Statements तक्रारकर्त्यास दिले नाही. तक्रारकर्त्याला 8,370/- रुपयाचे मार्च 2013 चे बील देण्यात आले. सदरहू बीलाचे स्टेटमेन्ट विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिलेले नाही. Electricity कायदयानुसार विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास वीज पुरवठा खंडीत करण्यापुर्वी मीटर Disconnection बद्दल 15 दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे, परंतु तशाप्रकारची कुठलीही नोटीस तक्रारकर्त्यास देण्यात आलेली नाही. तक्रारकर्त्याचे मार्च 2013 चे बील भरणा करण्याची अंतीम तारीख ही 2/4/2013 असतांना सुध्दा त्याचा वीज पुरवठा दिनांक 10/3/2013 ला खंडीत करण्यात आला. तक्रारकर्त्याने न्यायमंचाच्या आदेशाप्रमाणे बिलाचे Under Protest पैसे भरुन वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात आला. विरुध्द पक्षाने दिनांक 10/10/2012 च्या पत्रानुसार मान्य केले आहे की तक्रारकर्त्याचे मीटर हे Faulty असून ते बदलणे आवश्यक आहे. तरी सुध्दा विरुध्द पक्षाने मीटर बदलून देण्यास सतत 1 वर्षे पेक्षा जास्त कालावधीकरीता टाळाटाळ केली. त्यामुळे विरुध्द पक्षाची सदरची कृती म्हणजे सेवेतील त्रृटी असून तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने तक्रारीत नमुद प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, असे म्हटले आहे.
10. विरुध्द पक्षाचे वकील अॅड.डी.आर.निर्वाण यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याने Junior Engineer व Executive Engineer यांना व्यक्तीगत स्वरुपात प्रतिवादी केल्यामुळे त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र राज्य आयोगाचे 112/2007 च्या Executive Engineer Vs. Prakashchandra Attal या न्याययनिवाडयानुसार ते Independent Legal Entity असल्याने त्यांचे विरुध्द सदरहु तक्रार चालु शकत नाही व सदरहू तक्रार वीज वितरण कंपनी विरुध्द दाखल न केल्यामुळे खारीज करण्यात यावी. तक्रारीमधील वाद हा Consumer Dispute नसल्यामुळे सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी, असे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये विरुध्द पक्षाने Deficiency Of Service केली असल्याबद्दल कुठल्याही प्रकारे Pleading केलेले नाही. तक्रारकर्त्याचे बील हे तांत्रिक चुकीमुळे, चुकीचे दिले असल्यामुळे व कालांतराने त्यात दुरुसती करुन रुपये 23,000/- ची सुट देवून अचुक बील तक्रारकर्त्यास दिल्यामुळे विरुध्द पक्षाने सेवेमध्ये कुठलीही त्रृटी केलेली नाही.
तक्रारकर्त्याने वापरलेले वीजेचे बील देण्याचे तक्रारकर्त्याचे कर्तव्य असून ते वसूल करण्याचा विरुध्द पक्षास अधिकार आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे Faulty मीटरचे सरासरी बील समायोजित करुन दिले. जर तक्रारकर्त्याचे मीटर नादुरुस्त असल्यास त्यास Average बील देण्याचा अधिकार विरुध्द पक्षास आहे. तक्रारकर्त्याला दुरुस्त करुन दिलेले बील हे योग्य बील आहे त्यामुळे विरुध्द पक्षाच्या सेवेमध्ये कुठलीही त्रृटी नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची मीटर संबंधी Consumer Personal Ledger दाखल केले आहे. तसेच Executive Engineer यांचे पत्र पान नं.77 वर दाखल केले आहे. मीटर रिडींग एजन्सीने जर मीटर रिडींग 0 किंवा Proper दाखविले नसले तर ते संपुर्ण मीटर दुरुस्त करुन दयावे असा आदेश Executive Engineer हयांनी सर्व Meter Reader ला काढलेला होता व त्याप्रमाणे दुरुस्तीचे काम चालु झाले होते. संबंधित आदेश काढलेला होता व तो आदेश सदरहू प्रकरणात दाखल केला आहे. त्यानुसार कमी रिडींग चे मीटर दुरुस्त करुन वेळीच उपाययोजना करण्यात आली होती. त्यामुळे विरुध्द पक्षाने योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे सेवेमध्ये कुठल्याही प्रकारे त्रृटी न केल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
11. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज व तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद यावरुन खालील मु्ददा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय
कारणमिमांसा
13. Maharashtra Electricity Regulatory Commission (Electricity Supply Code and Other Conditions of Supply) Regulations 2005 व Electricity Act 2003 Section 14.4 नुसार Testing And Maintenance of Meter करीता The Distribution Licensee shall be responsible for the periodic testing and maintenance of all consumer meters करीता जबाबदार आहे. तसेच Section 15.3 Billing in the absence of Meter Reading करीता जेव्हा Meter for the specific reason is not accessible त्या परिस्थितीमध्ये तक्रारकर्त्यास Estimated बील देण्यात यावे. परंतु Section 15.4 नुसार Billing in the Event of Defective Meters चे बील हे तक्रार आल्यापासून जास्तीत जास्त 3 महिने पर्यंत Adjust केल्या जावू शकते. तसेच विरुध्द पक्षाने Electricity Distribution Company मार्फत सदरील मीटरचे Testing करुन Executive Engineer दर्जाच्या अधिका-याकडून प्रत्यक्ष तपासणी करुन व अहवाल तयार करुन ते मीटर Laboratoy Testing साठी पंचनामा करुन त्यावर Consumer Owner ची सही घेणे हे Electricity Act नुसार Mandatory Provision असल्यामुळे व विरुध्द पक्षाने वरील तरतुदीचे पालन न केल्यामुळे तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास वारंवार तक्रार करुन सुध्दा तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निवारण वेळेत न केल्यामुळे व तक्रारकर्त्याचे मार्च 2013 चे बील Calculation करुन Statement न दिल्यामुळे विरुध्द पक्षाने निश्चितच त्यांच्या सेवेत त्रृटी केली आहे, असे मंचाचे मत आहे.
15. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा वीजपुरवठा दिनांक 10/3/2013 ला खंडीत करण्यापुर्वी लेखी सुचना 15 दिवसांचे न दिल्यामुळे व त्याबद्दल लेखी पुरावा सदरहू प्रकरणात न दाखल केल्यामुळे विरुध्द पक्षाने सेवेत त्रृटी केली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मार्च 2013 चे समायोजित बील रुपये 8,370/- भरण्याची अंतीम तारीख 2/4/2013 असून सुध्दा 10/3/2013 ला वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडीत केल्यामुळे विरुध्द पक्षाची सदरची कृती ही निश्चितच सेवेतील त्रृटी आहे, असे मंचाचे मत आहे. करीता खालील आदेश पारीत करीत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई पोटी रुपये 15,000/- (पंधरा हजार) दयावे.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चासाठी रुपये 5,000/- (पाच हजार) दयावे.
4. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत
प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी सदर आदेशाची प्रत
नियमानुसार तक्रारकर्त्यास विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.