Exh.No.16
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.10/2012
तक्रार दाखल झाल्याचा दि. 03/03/2012
तक्रार निकाल झाल्याचा दि. 22/05/2012
श्री अजय तुकाराम करलकर
वय सु.26 वर्षे, धंदा- शेती,
रा.मु.पो. कवठी,
ता.कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
करीता कार्यकारी अभियंता,
कुडाळ कार्यालय, कुडाळ,
ता.कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. एम.डी. देशमुख, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री ए.पी. बर्वे
विरुद्ध पक्षातर्फे- अधिकृत प्रतिनिधी श्री गंगाराम मारुती नाईक.
(मंचाच्या निर्णयाद्वारे श्री एम.डी. देशमुख, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.22/05/2012)
1) प्रस्तुत प्रकरण तक्रारदार यांनी विरुध्द पक्षाच्या वीज वितरण कंपनीच्या विरुध्द दाखल केलेले आहे. सामनेवाला यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. प्रस्तुत प्रकरणात 3 तारखा होऊनही सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला तसेच विदयूत वितरण कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी श्री गंगाराम मारुती नाईक यांनी म्हणणे देणेसाठी मुदतीचा अर्ज दिलेला आहे. सदरच्या अर्जास तक्रारदाराच्या वकीलांनी हरकत घेतलेली आहे. सामनेवाला यांनी दिलेल्या मुदतीच्या अर्जास कोणतेही संयुक्तीक कारण नसल्यामुळे सदरचा मुदतीचा अर्ज नामंजूर करणेत आलेला आहे.
2) प्रस्तुत प्रकरणाचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने त्यांचे निवासी कारणाकरीता सामनेवाला यांचेकडून विदयूत मीटर घेतलेला असून त्याचा विदयूत मीटर क्रमांक 238140001321 असा आहे. सदरचा विदयूत मीटर हा सामनेवाला विदयूत कंपनीचे ज्युनिअर इंजिनिअर यांनी केलेल्या तपासणीवरुन दोषयुक्त आहे असा अहवाल आहे. परंतु सामनेवाला विदयूत कंपनीने मे 2011 चे देयक दोषयुक्त मीटरवरुन दिलेले आहे. त्यामुळे सदरचे देयक हे रद्द करण्यात यावे व सरासरी वापराचे विदयूत देयक मिळावे अशी विनंती केली आहे.
3) युक्तीवादाचे वेळेस सामनेवाला कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी श्री गंगाराम मारुती नाईक यांनी तक्रारदारास सामनेवाला विदयूत कंपनीने नवीन विदयूत मीटर बदलून दिलेला असून देयकांमध्ये दुरुस्ती करुन देण्यात आलेली आहे व त्यासंदर्भात कंझ्युमर पर्सनल लेजरची प्रत दाखल केली. सदरची वस्तुस्थिती तक्रारदाराचे वकीलांनी मान्य केलेली आहे. परंतु सामनेवाला विदयूत कंपनीकडे सदर देयकापोटी यापूर्वी भरणा केलेली रक्कम पुढील येणा-या बिलामध्ये समायोजित करावी अशी विनंती केलेली आहे. सदर विनंती विचारात घेता सामनेवाला कंपनीने सदर देयकापोटी तक्रारदाराने भरलेली रक्कम पुढील देयकांमध्ये समायोजित करावी असे आदेशीत करण्यात येते.
सबब आदेश –
आदेश
1) प्रस्तुतचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) सदरचा आदेश दोन्ही बाजूंच्या उपस्थितीत घोषित करण्यात आला.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 22/05/2012
sd/- sd/- sd/-
(वफा खान) (एम.डी. देशमुख) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.