( आदेश पारित द्वारा मा. सदस्या, श्रीमती गीता रा. बडवाईक)
-- आदेश --
( पारित दि. 17 सप्टेंबर, 2012)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीबद्दल दाखल केली आहे.
1. सदर तक्रार दाखल करून घेण्याच्या मुद्दयावर तक्रारकर्त्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला.
2. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याचा विद्युत पुरवठा विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी दिनांक 04/07/2012 रोजी खंडित केलेला आहे. तो पूर्ववत सुरू करण्यासाठी तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल केलेली आहे.
3. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवज क्रमांक डी-2 वरून स्पष्ट होते की, सदर विद्युत पुरवठा हा ज्या मीटर वरून घेतला ते मीटर श्री. सुरेश गोविंदराव रणदिवे यांच्या नावाने आहे. तक्रारकर्त्याने त्यांना सुध्दा या तक्रारीमध्ये विरूध्द पक्ष क्रमांक 3 म्हणून जोडलेले आहे तसेच तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 4 व 5 म्हणून अनुक्रमे म्युनिसिपल ऑफीसर व एस. डी. ओ. यांना पार्टी केलेले आहे.
4. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (डी) नुसार ग्राहक या व्याख्येनुसार विरूध्द पक्ष 1 व 2 यांचा ग्राहक विरूध्द पक्ष 3 हा असून, तक्रारकर्ता हा ग्राहक नाही. तसेच विरूध्द पक्ष 3 च्या संम्मतीने तक्रारकर्त्यास विद्युत पुरवठा प्राप्त झाला नाही. याउलट विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात तक्रारकर्त्याने तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्यास Locus standi नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करिता तक्रारकर्त्याची तक्रार त्यास परत करण्यात येते. तक्रारकर्त्याने योग्य त्या न्यायासनासमोर दाद मागावी.
करिता आदेश
-// आदेश //-
1. तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्यास Locus standi नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार त्यास परत करण्यात येते.
2. तक्रारकर्त्याने योग्य त्या न्यायासनासमोर दाद मागावी.