Maharashtra

Jalna

CC/82/2014

Shivnath Sonaji Shejwal - Complainant(s)

Versus

M.S.E.D.C.L Through Executive Engineer - Opp.Party(s)

Sanjay J.Vaidya

26 Mar 2015

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/82/2014
 
1. Shivnath Sonaji Shejwal
R/o Sainathnagar,mantha Chaufulee,Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M.S.E.D.C.L Through Executive Engineer
Mastgad Office,Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. REKHA KAPDIYA PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. Suhas M.Alshi MEMBER
 
For the Complainant:Sanjay J.Vaidya, Advocate
For the Opp. Party:
Adv.G.R.Kad
 
ORDER

(घोषित दि. 26.03.2015 व्‍दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्‍य)

      अर्जदार यांनी त्‍यांच्‍या तक्रार अर्जात असे नमुद केले आहे की, अर्जदार हे जालना  ता.जि.जालना येथील रहिवाशी आहेत. त्‍यांनी गैरअर्जदार यांचेकडून वीज पुरवठा घेतला असून त्‍यांचा ग्राहक क्रमांक 510030501860 असा आहे. गैरअर्जदार यांनी निष्‍काळजीपणे एकुण रुपये 68089.70 वीज बिलाची आकारणी केली आहे. अर्जदार यांचा दिनांक 22.06.2010 पासून वीज पुरवठा सुरु असून ते नियमितपणे वीज बिलाचा भरणा करत आहेत. माहितीसाठी जुलै 2010 चे विद्युत देयक जोडण्‍यात आलेले आहे. अर्जदार यांना जुलै 2014 च्‍या देयकामध्‍ये थकीत वीज बिलाची रक्‍कम रुपये 68089.70 इतकी दर्शविली आहे. परंतु अर्जदार यांचेकडे कसलीही थकबाकी शिल्‍लक नाही. माहितीसाठी जूलै 2013 ते जुन 2014 च्‍या वीज बिल भरणा पावत्‍या जोडण्‍यात आलेल्‍या आहेत. जुलै 2014 चे देयक आल्‍यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे तोंडी विनंती केली परंतु त्‍यांनी कसलीही दाद न दिल्‍याने दिनांक 24.07.2014 रोजी तक्रार अर्ज देऊन रुपये 68089.70 वजा करुन देयक देण्‍याची विनंती केली. परंतु गैरअर्जदार यांनी तक्रार अर्जावर कोणतीही कार्यवाही केली नाही.

      दिनांक 01.08.2014 रोजी गैरअर्जदार यांच्‍या कर्मचारी यांनी एक आठवडयात थकीत वीज बिल न भरल्‍यास विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याची सूचना दिली. गैरअर्जदार यांनी थकीत बिलाबाबत कोणतेही स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही व त्रास देण्‍याचे उद्देशाने अतिरिक्‍त देयक देण्‍यात आलेले आहे. म्‍हणून अर्जदार विनंती करतात की, जूलै 2014 चे रुपये 68089.70 देयक रद्द करण्‍यात यावे व शारिरीक, आर्थिक त्रासापोटी रुपये 2,00,000/- नुकसान भरपाई मंजूर करण्‍यात यावी.

      अर्जदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जासोबत वीज देयके व देयक भरणा केल्‍याच्‍या पावत्‍या तसेच दिनांक 24.07.2014 रोजी गैरअर्जदार यांना दिलेला तक्रार अर्ज अशी कागदपत्र दाखल केली आहेत.

      गैरअर्जदार यांना नोटीस बजाविण्‍यात आली. त्‍यांनी आपला लेखी जवाब दाखल केला ते आपल्‍या जवाबाबत म्‍हणतात की, अर्जदार यांनी शिवनाथ सोनाजी शेजवळ अर्जदार यांचे याच वास्‍तुमध्‍ये या नावाने वीज पुरवठा घेतला विजेचा वापर करुन विजेच्‍या रकमेचा भरणा केला नाही. त्‍यामुळे अर्जदार यांचा वीज पुरवठा कायमस्‍वरुपी खंडीत करण्‍यात आला. त्‍यावेळी अर्जदार यांचेकडे रुपये 64643.57 इतकी थकबाकी शिल्‍लक होती. तसेच अर्जदार यांचा याच वास्‍तुमध्‍ये शिवनाथ सोनाजी शेजवळ याच नावाने दुसरे विद्युत मीटर असून त्‍याचा ग्राहक क्रमांक 510030501860 असा आहे व जुलै 2014 मध्‍ये वरील मीटरच्‍या थकबाकीची रक्‍कम या मीटर वरील देयकामध्‍ये दर्शविण्‍यात आलेली आहे.

      अर्जदार यांच्‍या तक्रारीची दखल घेण्‍यात आलेली असून, अर्जदार यांना वीज देयक कसे योग्‍य आहे याची माहिती देण्‍यात आलेली आहे व अर्जदार यांना कोणतेही चुकीचे देयक देण्‍यात आलेले नाही. अर्जदार यांना कसलाही मानसिक व आर्थिक त्रास झालेला नाही म्‍हणून नुकसान भरपाई मागण्‍याचा अर्जदार यांना अधिकार नाही म्‍हणून अर्जदार यांची तक्रार फेटाळण्‍यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे.   

अर्जदार यांच्‍या वतीने अॅड एम.जे.वैद्य व गैरअर्जदारांच्‍या वतीने अॅड जी.आर.कड यांचा सविस्‍तर युक्‍तीवाद ऐकला. दाखल कागदपत्र व दोनही पक्षाच्‍या युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.

             मुद्दे                                                  निष्‍कर्ष

1.गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या

  सेवेत त्रुटी केली आहे का ?                                           होय                                            

                              

2.काय आदेश ?                                                अंतिम आदेशा नुसार

कारणमीमांसा

 

मुद्दा क्रमांक 1 साठी – अर्जदार त्‍यांनी घरगुती वापराकरीता गैरअर्जदार यांचेकडून विद्युत जोडणी घेतलेली असुन, त्‍यांचा ग्राहक क्रमांक 510030501860 असा आहे. गैरअर्जदार यांचे अधिकृत प्रतिनिधी हे दरमहा अर्जदार यांचे घरातील मिटरचे रिडींग घेत होते व त्‍यांना वीज देयक देत होते. वीज देयका प्रमाणे अर्जदार हे वीज बिलाचा नियमितपणे भरणा करीत होते. तसेच वापरानुसार मिटर रिडींग घेऊन देयक ग्राहकास देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार यांची आहे. सदर कनेक्‍शनचे वीज देयकाचा भरणा अर्जदारांनी नियमितपणे केलेला आहे. त्‍याचेकडे सदर वीज कनेक्‍शनचे देयकापोटी कोणतीही थकबाकी नाही, हे त्‍याने प्रकरणात दाखल केलेल्‍या वीज देयकावरुन दिसुन येते.  अर्जदार यांना जुलै 2014 च्‍या देयकामध्‍ये वीज वापराचे एकुण वीज वापर 562 युनिट दर्शवून एकुण रुपये 73040/- चे देयक देण्‍यात आले व त्‍यामध्‍ये रुपये 68089.70 एवढी थकबाकीची रक्‍कम दर्शविण्‍यात आलेली आहे. वास्‍तविक पाहता अर्जदार यांना थकबाकी म्‍हणून ज्‍या मीटर क्रमांकाचे देयक देण्‍यात आलेले आहे त्‍याचा ग्राहक क्रमांक व मीटर क्रमांक गैरअर्जदार यांनी दर्शविला नाही. प्रकरणात दाखल केलेल्‍या सी.पी.एल ची पाहणी केली असता अर्जदाराकडे यापूर्वी 510030351868 या ग्राहक क्रमांकाचे कनेक्‍शन होते. तसेच प्रकरणात दाखल सी.पी.एल वरुन या कनेक्‍शनची थकबाकी 68089.70 एवढी थकबाकी असल्‍याचे दिसुन येते. तसेच गैरअर्जदार यांनी सदरचे कनेक्‍शन माहे मे 2012 पुर्वी कायमस्‍वरुपी बंद केलेले आहे. तसेच सदरचे कनेक्‍शन केंव्‍हा बंद केले, नवीन वीज जोडणी केंव्‍हा दिली, तसेच जुना ग्राहक क्रमांक काय या बाबत गैरअर्जदार यांच्‍या लेखी जवाबात कोणताही उल्‍लेख नाही. प्रकरणात दाखल केलेल्‍या सी.पी.एल वरुन अर्जदार यांनी दिनांक 26.06.2010 रोजी गैरअर्जदाराकडून नवीन वीज कनेक्‍शन घेतलेले आहे.

वास्‍तविक पाहता अर्जदाराकडे त्‍याचा जुना ग्राहक क्रमांक 510030351868 या खात्‍याची थकबाकी असतांना त्‍या ठिकाणी पुर्वीची थकबाकी वसुल केल्‍या शिवाय नवीन वीज कनेक्‍शनला मंजूरात देणे अपेक्षित नाही. तसेच नवीन कनेक्‍शन दिल्‍यानंतर जुन्‍या थकबाकीची रक्‍कम नवीन देयकामध्‍ये निरंतर करणे आवश्‍यक होते. परंतू गैरअर्जदार यांनी अर्जदाराला निरंतर मागणी केलेली नाही व अचानकपणे माहे जुलै 2014 च्‍या देयकामध्‍ये मागील जुन्‍या खात्‍याची थकबाकी रक्‍कम रुपये 68089.70 एवढी बेकायदेशिरपणे दर्शविली आहे.     

      अर्जदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांचा नवीन वीज पुरवठा दिनांक 22.06.2010 पासुन सुरु आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा जुना वीज पुरवठा खंडीत केल्‍याने त्‍यांना नवीन वीज जोडणी देयकामध्‍ये जुन्‍या थकबाकीची रक्‍कम ग्राहक क्रमांक 510030501860 मध्‍ये वळती केली असल्‍याचे दिसुन येते. गैरअर्जदार यांनी दिनांक जून 2010 ते जुलै  2014 पर्यंत थकबाकीच्‍या रकमेची मागणी का केली नाही याचा खुलासा केलेला नाही.

गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना जुन्‍या मीटरवरील थकीत रकमेचे देयक नवीन ग्राहक क्रमांक 510030501860 मध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आलेले आहे. परंतु अशा प्रकारची रक्‍कम गैरअर्जदार यांना वसुल करता येईल का ? या बाबत कोणताही लेखी पुरावा जोडण्‍यात आलेला नाही.

      तसेच वीज कायदा 2003 चे कलम 56 (2) प्रमाणे Notwithstanding anything contained in any other law for the time being in force, no sum due from any consumer, under this section shall be recoverable after the period of two years from the date when such sum became first due unless such sum has been shown continuously as recoverable as arrear of charges for electricity supplied and the licensee shall not cut off the supply of the electricity. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्‍याकडे बाकी असलेली रक्‍कम हि दोन वर्षाच्‍या आत वसुल करणे आवश्‍यक होते. परंतु दोन वर्षाचा कालावधी निघून गेल्‍यानंतर सदर रक्‍कम वसुल करण्‍याचा कोणताही अधिकार गैरअर्जदार यांना राहीलेला नाही, त्‍यामुळे सदर रकमेची वसुली जुलै 2014 मध्‍ये अथवा त्‍यानंतर करणे उचित होणार नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे, म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देवून हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.    

 

आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. गैरअर्जदार यांनी जुन्‍या मीटरचे लावलेले माहे जुलै 2014 च्‍या देयकातील रुपये 68089.70 एवढी थकबाकी रद्द करण्‍यात येत आहे.
  3. अर्जदार यांनी अंतरीम आदेशाची व इतर भरलेली रक्‍कम त्‍यांच्‍या ग्राहक क्रमांक 510030501860 चे पुढील बिलांमध्‍ये समायोजित करण्‍यात यावी.
  4. गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.
  5. वरील आदेशाचे पालन आदेश दिनांका पासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 
[HON'BLE MRS. REKHA KAPDIYA]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. Suhas M.Alshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.