जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार क्र. 895/2008.
तक्रार दाखल तारीखः-11/07/2008.
आदेश पारीत तारीखः- 28/10/2013.
रामकुमार चंद्राराम शर्मा,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यापार,
रा.प्लॉट नं.4, सिटी सर्व्हे नं.126/2,3,
जळगांव सेल गोडावुनचे समोर, जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लि,
तर्फे कार्यकारी अभियंता,
मटन मार्केट जवळ, अर्बन डिव्हीजन, जुना पॉवर हाऊस,
जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फेः श्री.एस.आर.यादव वकील.
विरुध्द पक्ष तर्फेः कैलास एन पाटील वकील.
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः प्रस्तुत तक्रारीचे अवलोकन करता सदरची तक्रार ही विज बिल विज कायदा कलम 135 नुसार दिलेल्या बिलाबाबत दाखल असल्याचे या मंचाचे निर्दशनास येते. नुकताच मा.सुप्रिम कोर्ट यांनी सिव्हील अपिल क्र.5466/2012 यु.पी.पॉवर कॉर्पोरेशन लि व इतर // विरुध्द // अनिस अहमद यामध्ये दिलेल्या दिशा निर्देशानुसार विज कायदा कलम 135 खालील विज चोरीच्या तक्रारी चालविण्याचे अधिकार ग्राहक मंचाला नाहीत असा निर्वाळा दिलेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार फेटाळण्याचे निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. तक्रारदाराने त्याची तक्रार योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाखल करावी व प्रस्तुत तक्रारीकामी या मंचासमोर व्यतीत झालेला कालावधी हा मुदतमाफीसाठी ग्राहय राहील. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2) प्रस्तुत तक्रारीकामी व्यतीत केलेला कालावधी हा मुदत माफीसाठी ग्राहय
धरण्यात यावा.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
ज ळ गा व
दिनांकः- 28/10/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.