जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार क्र. 434/2008. आदेश पारीत तारीखः- 22/10/2013.
श्रीमती जिजाबाई पांडूरंग पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.विवेकानंद नगर, कुलकर्णी प्लॉट नं.12,
सबजेलच्या पाठीमागे, शाळा क्र.45 समोर, जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
मुख्य कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ,जळगांव,
मुख्य ऑफीस, मटन मार्केट च्या मागे,
जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः उपरोक्त तक्रार अर्जाचे कामी तक्रारदार व त्यांचे वकील दि.06 मार्च,2012 पासुन नेमलेल्या पुढील तारखांना सतत गैरहजर. तक्रारदाराने दि.06 मार्च,2012 पासुन तक्रार अर्जाचे कामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. याकामी आज रोजी नेमलेल्या तारखेस विरुध्द पक्षा तर्फे वकील हजर, त्यांनी विनंती अर्ज दाखल करुन तक्रारदाराने दि.06 मार्च,2012 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नसल्याने सदर प्रकरणी योग्य ते आदेश व्हावेत अशी विनंती केली. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्याची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराचे हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
ज ळ गा व
दिनांकः- 22/10/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.