ग्राहक तक्रार क्र. 65/2014
दाखल तारीख : 04/03/2014
निकाल तारीख : 11/03/2015
कालावधी: 01 वर्षे 00 महिने 07 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सुनिल प्रल्हादराव पाटील,
वय-46 वर्षे, धंदा – शेती,
रा.इर्ला, ता. जि. उस्मानाबाद.
ह.मु. तांबरी विभाग, भोसले हायस्कूल जवळ,
उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
मार्फत कार्यकारी अभियंता,
(म.रा.वि.वि.कं.) ताजमहल टॉकीज जवळ,
उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.आर.एस.जगताप.
विरुध्द पक्षकारातर्फे विधीज्ञ : श्री.व्ही. बी. देशमुख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम. व्ही. कुलकर्णी, यांचे व्दारा.
अ) 1) विरुध्द पक्षकार (विप) विदयुत कंपनीकडून आपल्या शेतात विज कनेक्शन घेतल्यानंतर विजेच्या तारांमुळे आग लागून ऊस व पाईपलाईन जळाल्यामुळे तक्रारकर्ता (तक) यांने भरपाई मिळावी म्हणून ही तक्रार दिलेली आहे.
2) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात असे की मौजे इरला ता.जि. उस्मानाबाद येथील जमीन गट क्र.145 हेक्टर 6 आर.01 चा तो मालक आहे. जमीनीत एक बोअरवेल आहे. विप कडून विदयुत पुरवठा घेऊन तेथे पंप बसविला आहे. तसेच ठिबक सिंचन योजना केलेली आहे. कनेक्शन नं. ए.जी.117(591270057363) असा आहे. 2011-12 साली तक ने 10 एकर क्षेत्रावर ऊस लावला होता. विप ने तक च्या शेताच्या बांधावर डिपी बसविला आहे. खांबावरील चार तारा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी विप ची आहे. विदयूत मिटर तक चे भावाचे नावे असून कुटंब व्यवस्थेप्रमाणे त्याचा उपभोग तक हाच घेत आहे.
3) 01/03/2012 पुर्वी ऊस कारखान्याकडे घातला होता. खोडवा 3 ते 4 फुटापर्यंत वाढला होता. दि.01/03/012 रोजी दुपारी 03 ते 04 चे दरम्यान विदयुत तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या पडल्या व पाचटाने पेट घेतला त्यामुळे सर्व खोडवा ऊस जळून गेला. ठिबक सिंचनाचे पाईप जळून निकामी झाले. इतर मशीनरी वगैरे जळून एकूण रु.11,00,000/- चे नुकसान झाले. तक ने पोलिस स्टेशन व विप यांना कळविले. तहसिलदार यांच्याकडे दि.02/03/2012 रोजी अर्ज दिला तलाठी यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला. हरबरा पीक शेणखत वगैरे रु.3,00,000/- चे नुकसान झाले. मानसिक त्रासासह एकूण रु.15,00,000/- नुकसान भरपाई विप कडून मिळणे जरुर आहे. विप कडे मागणी केली असता विप ने नकार दिला. म्हणून ही तकार दि.04/03/2014 रोजी दाखल करण्यात आली आहे.
4) तक्रारीसोबत तक ने सातबारा ऊतारा, ठिबक सिंचन खरेदी पावत्या, पोलिस तक्रार अर्ज, पोलीस पंचनामा, विप कडे दिलेला अर्ज, तहसिलदारकडे दिलेला अर्ज, तलाठी पंचनामा, विदयुत निरीक्षक यांना दिलेला अर्ज, विदयूत निरीक्षक यांचा अहवाल, जमीनीचे फोटो इ. कागदपत्रे हजर केले आहेत.
ब) 1) विप यांनी मंचात हजर होऊन दि.17/07/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे तक हा त्यांचा ग्राहक नाही. विप चे कर्मचारी विदयुत लाईनची वेळोवेळी देखभाल करतात. तक ने 10 एकर क्षेत्रात ऊसाचे पीक घेतले हे अमान्य. तशी सातबारा ऊता-यावर नोंदही नाही. तक चे जमीनीत खोडवा ऊस होता हे अमान्य. विदयुत तारांच्या घर्षणाने ठिणग्या पडून आग लागली हे अमान्य पोलिसांनी केलेला पंचनामा अमान्य. तक चा ऊस ठिबक सिंचन पाईप मशीनरी जळून नुकसान झाले हे अमान्य. तलाठी यांनी केलेला पंचनामा अमान्य. विदयुत निरीक्षक यांचा अहवाल अमान्य, पुढील वर्षी ऊस चांगला यावा म्हणून शेतकरी स्वत: पाचट पेटवून देतात तसाच प्रस्तुतचा प्रकार असावा. ऊसतोडीचे वेळी ठिबकसिंचन संच बाहेर काढून ठेवला जातो. तक चे कोणतेही नुकसान झाले नसल्यामुळे तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
क) विप ने तक हा ग्राहक नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे तो मुद्दा आम्ही प्राथमिक ठरवून प्रथम चर्चेस घेत आहोत.
मुद्दा उत्तर
1) तक हा विप चा ग्राहक आहे काय ? नाही.
2) ही तक्रार या मंचात चालेल काय ? नाही.
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2
1) तक ने म्हंटले आहे की तो गट नं.145 हे. 06 आर.01 या जमीनीचा मालक आहे व कुटुंब व्यवस्थेत ही जमीन त्याला मिळाली आहे. जमिनीत बोअरवेल आहे. तक ने गट क्र.145 चा सातबारा ऊतारा हजर केला आहे. हेक्टर 06 आर.01 चे जमीनीचा तक मालक म्हणून नोंदला गेला आहे. इतर हक्कात विहीर व बोअरवेल यांची नोंद आहे. तक चे म्हणणे आहे की त्याने आपले जमीनीत ठिबक सिंचन संच बसविला होता. तुषार अॅग्रो एजंन्सी शेटफळ यांचेकडील रु.3,51,015/- ची पावती तक ने हजर केली आहे. तिची तारीख 10/12/2010 वरुन बदलून 10/12/2011 केल्याचे दिसते. त्यावर बिल क्र.13 चा उल्लेख आहे. जे कोटेशन रु.3,51,015/- चे दाखल केले त्यावर तारीख दिसून येत नाही. बिल नंबर 13 हजर केले असून त्यावर तारीख 10/12/2010 दिसून येते. तपासणी अहवाल ठिबक सिंचन संचाचा हजर केला असून तो दि.22/01/2012 चा आहे. अनुदान प्रपत्राप्रमाणे अनुदान रु.81,817/- होते. घटनेची तारीख दि.01/03/2012 दिलेली आहे. फोटोमध्ये काही जळालेले पाईप दिसून येतात. त्यामुळे तक ने जमीनीत पाईपलाईन केली होती असे मानता येईल.
2) तक चे म्हणणे आहे की बागायती ऊस पीकाची लागवड 2011-12 साली दहा एकर क्षेत्रावर त्याने केली. ते दाखविणारा सातबारा ऊतारा त्याने हजर केलेला नाही. 2010-11 चे पीक पाहणीत ऊसाचे क्षेत्र नव्हते दि.01/03/2012 पूर्वी ऊस कारखान्याला घातला असे तक चे म्हणणे आहे. आंबेडकर साखर कारखान्याचे पत्राप्रमाणे सौ. विमल प्रल्हादार पाटील यांनी गट नं.145 मध्ये दि.28/11/2010 रोजी ऊस लागण केल्याचे नोंद केली होती. सौ विमल पाटील यांचा 2011-12 मध्ये 263.081 टन ऊस रु.5,39,316/- किंमतीचा आल्याचे म्हंटले आहे. सौ. विमल प्रल्हाद पाटील या कणगरा गावच्या रहीवाशी असल्याचे म्हंटले आहे सदरहू सौ. विमल आपली आई असल्याचे तक ने कुठेही म्हंटलेले नाही. कारखान्याचे दाखल्याप्रमाणे विमल या कणगरा गावच्या रहीवाशी आहेत. त्या तेथे का राहतात याचा खुलासा तक ने केलेला नाही. स्वत:चे जमीनीच्या हिश्यातील ऊस विमल यांच्या नावे का घातला याबद्दल तक ने चकार खब्द काढलेला नाही. विमल यांच्या हिश्याला काही जमीन दिली किंवा नाही याचा खूलासा केलेला नाही. कारखान्याकडून घेतलेले प्रमाणपत्र संशय विरहित नाही.
3) जी तक्रार पोलीसांकडे देण्यात आली त्यात म्हंटले आहे की डिपीमधून तेल गळत होते. विदयूत यंत्रणेत स्पार्कीग झाल्यामुळे तेलाने पेट घेतला. तक्रारीत म्हंटले आहे की विदयूत तारांमध्ये हवेमुळे घर्षण झाले व ठिणग्या खाली पडून शेतातील पाचटाने पेट घेतला. पोलीस पंचनाम्यातील नकाशाचे अवलोकन केले असता शेतातील पीकावरुन जाणा-या विद्यूत तारा दिसून येत नाहीत. उलट तक चे म्हणणे आहे की डिपी हा बांधावर आहे. विपतर्फे केलेल्या पंचनाम्याप्रमाणे तारेवर स्पार्कींगच्या खाणा खूणा दिसून आल्या नाहीत. विदयूत निरीक्षकाकडे दि.23/05/2012 रोजी अर्ज दिल्याचे दिसते त्यामुळे त्यांचे अहवालास फाससे महत्व देता येणार नाही.
4) तक चे म्हणणे आहे की त्याने बोअरवेलसाठी विप कडून विद्यूत पूरवठा घेतला त्याचा नंबर ए.जी.117(591270057363) असा आहे. सदर जमीन कुटुंब व्यवस्थेत तक ला मिळाली असली तरी विदयूत मिटर भावाचे नावाने आहे. मात्र उपभोग तक हाच घेत आहे. विज कनेक्शनसाठी डिपॉजिट भरल्याची पावती तक ने हजर केलेली नाही. एकही बिल भरल्याची पावती तक ने हजर केली नाही. ज्या डिपीचा तक ने उल्लेख केला तीथून बोअर मधील मोटारीला विज पुरवठा केला या बद्दल तक ने कोणताही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे तक हा विप चा ग्राहक आहे असे आमचे मत नाही. त्यामुळे ही तक्रार या मंचात चालणार नाही असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.