ग्राहक तक्रार अर्ज क्र. 122/2011
दाखल दिनांक. 28/02/2011
अंतीम आदेश दि. 21 /01 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
मुकेश अशोकरावा सुर्वे, तक्रारदार
उ.व. 35, वर्ष, धंदा – नोकरी, (अॅड.सुरजपाल यादव)
रा. प्लॉट नं. 63, गायत्री नगर,
मु.पो. जळगांव. ता.जि. जळगांव
विरुध्द
कार्यकारी अभियंता, सामनेवाला
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्टीबुयशन कं.लि. (कोणीही नाही)
मटन मार्केट जवळ, अर्बन डिव्हीजन,
जुना पॉवर हाऊस जळगांव.
निशाणी क्र. 01 वरील आदेश
मिलींद.सा.सोनवणे,अध्यक्ष–प्रस्तुत केसचे रेकॉर्ड पाहाता असे दिसून येते की, प्रस्तुत तक्रार दि. 28/02/2011 रोजी दाखल करण्यात आलेली आहे. आमच्या पुर्वाधिकारी मंचाने त्याच रोजी सामनेवाल्यांना नोटीस काढण्यात यावी असे आदेश केलेले आहे. त्या आदेशावरहुकूम या मंचाच्या प्रबंधकांनी सामनेवाल्यांना दि.01/03/2011 रोजी मंचाची नोटीस जारी केलेली आहे. त्याच्या स्थळप्रतीवर ती नोटीस सामनेवाल्यास बजल्याबाबत स्विकृती चा शिक्का आहे. ती स्थळ प्रत नि. 07 वर दाखल आहे. मात्र त्या नंतर तक्रारदाराने सामनेवाल्यां विरुध्द कोणतीही स्टेप्स घेतलेली नाही, किंवा स्वतःचा पुरावा देखील सादर केलेला नाही. तक्रारदार व त्यांचे वकील दि.15/07/2011 पासून सातत्याने गैरहजर आहेत. त्यावरुन असे दिसते की, तक्रारदारास सामनेवाला यांच्या विरुध्द तक्रार अर्ज चालविण्यास स्वारस्य उरलेले नाही. परिणामी, तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13 (2) (सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. आमच्या पुर्वाधिकारी मंचाने दि. 03/03/2011 रोजी तक्रारदाराच्या लाभात नि. 06 वरील आदेशान्वये जारी केलेला अंतरीम मनाई हुकूम देखील रदद बातल करण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
2. दि. 03/03/2011 रोजी तक्रारदाराच्या लाभात जारी करण्यात आलेला अंतरीम मनाई हुकूम रदद करण्यात येतो.
3. खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
(श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव