Maharashtra

Jalgaon

CC/12/159

Pramilabai Bhaurao Deshmukha - Complainant(s)

Versus

M.S.E.B. Parola - Opp.Party(s)

Ashok Mahajan

12 Oct 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/12/159
 
1. Pramilabai Bhaurao Deshmukha
Mahanubhao galli,Parola
Jalgaon
MS
...........Complainant(s)
Versus
1. M.S.E.B. Parola
Parola
jalgaon
MS
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. D.D.MADAKE PRESIDENT
 HON'ABLE MRS. S.S.Jain MEMBER
 
PRESENT:Ashok Mahajan, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर.
                        तक्रार क्रमांक 159/2012
 
                        तक्रार दाखल तारीखः-   11/06/2012
                        तक्रार निकाल तारीखः- 12/10/2012
 
गं.भा.प्रमिलाबाई भाऊराव देशमुख,                              .........तक्रारदार
उ व 65 धंदा घरकाम.
रा.महानुभाव गल्‍ली,पारोळा जि. जळगांव.
तर्फे जनरल मुखत्‍यार- श्री.अनिल भाऊराव देशमुख.
रा.महानुभाव गल्‍ली,पारोळा जि. जळगांव.
 
 
      विरुध्‍द
 
1.     कार्यकारी अभियंता,                                   ........विरुध्‍दपक्ष.
      म.रा.वि.वि.कंपनी मर्या,उपविभाग पारोळा.
2.    सहायक अभियंता,
म.रा.वि.वि.कंपनी मर्या. उपविभाग पारोळा.
 
 
 
कोरम
                     श्री. डी.डी.मडके                         अध्‍यक्ष.
                     सौ. एस.एस.जैन.                       सदस्‍या.
                        -------------------------------------------------
                        तक्रारदार     तर्फे अड.एस.एस.पाटील.
                        विरुध्‍दपक्ष   तर्फे अड.के.एन.पाटील.
 
                                 नि का ल प त्र
 
श्री. डी.डी.मडके,अध्‍यक्ष ः  तक्रारदार यांचे घराचा विज पुरवठा महावितरणने बेकायदेशीरपणे खंडीत करुन सेवेत त्रुटी केली म्‍हणुन तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.
2.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, त्‍या महानुभाव गल्‍ली,पारोळा जि.जळगांव या ठिकाणी भाडयाने राहतात. सदर घराचे घरमालक मोतीराम दगडू चौधरी यांनी सदर जागेत विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत वितरण कंपनी (यापुढे संक्षिप्‍ततेसाठी महावितरण असे संबोधण्‍यात येईल) कडुन ग्राहक क्र.132510013801 व जुना ग्राहक क्र.1380 अन्‍वये वीज पुरवठा घेतला आहे. तक्रारदार भाडेकरु या नात्‍याने सदर ग्राहक क्रमांकाच्‍या वीज वापराचे बीले नियमीत भरत आहेत. त्‍यामुळे ते महावितरणचे ग्राहक आहेत.
3.    तक्रारदार यांनी पुढे असे म्‍हटले आहे की, मार्च 2012 मध्‍ये तक्रारदार या बाहेरगांवी नातेवाईकाकडे गेले असता, त्‍यांच्‍या अनुपस्थितीचा गैरफायदा घेऊन त्‍यांचे वीज मीटर काढुन नेण्‍यात आले. त्‍याबाबत महावितरणकडे चौकशी केली असता, महावितरणने त्‍यांचे वीज मीटर काढुन घेऊन गेल्‍याचे समजले. तक्रारदार वापरत असलेल्‍या वीजेचे संपूर्ण बील भरले असताना, त्‍यांना पुर्वसूचना न देता त्‍यांचे वीज कनेक्‍शन बदं करण्‍यात आले आहे सदर कृती सेवेतील त्रुटी आहे.
4.    तक्रारदार यांनी महावितरणला नोटीस देऊन वीज पुरवठा पुर्ववत चालु करणेबाबत कळवले परंतु विज पुरवठा चालू केला नाही. तसेच माहीतीच्‍या अधिकारात मागीतलेली माहीतीही अपूर्ण दिली व तक्रारदार यांची काहीही चुक नसतांना त्‍यांना अंधारात राहावे लागत आहे.
5.    तक्रारदार यांनी शेवटी महावितरणने तक्रारदार हीचे राहते घरी वीज मीटर लावून विज पुरवठा पुर्ववत करुन द्यावा,मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.5,000/- द्यावा अशी विनंती केली आहे.
 
6.    तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ नि.5 वर शपथपत्र तसेच नि.3 वरील कागदपत्रांच्‍या यादीनुसार एकुण 12 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्‍यात नि.3/7 वर मुख्‍त्‍यारपत्र, फोटो, वीज बीले, नोटीस, उत्‍तर तसेच नि.13/1 ते 13/10 वर घरपटटी, पाणीपटटी भरल्‍याच्‍या पावत्‍या दाखल केल्‍या आहेत.
7.    महावितरणने आपले लेखी म्‍हणणे नि.10 वर दाखल करुन तक्रारदार यांचा अर्ज त्‍यातील म्‍हणणे व मागणे संपुर्णपणे खोटे आहे. तक्रारदार ग्राहक नाहीत व त्‍यांच्‍या नांवाने वीजपुरवठा दिलेला नाही. त्‍यामुळे ग्राहक व सेवा देणार असे नाते नाही त्‍यामुळे तक्रार रद्य करावी अशी विनंती केली आहे.
8.    महावितरणने ग्राहक क्र.1325100113801 श्री.मोतीराम दगडु चौधरी यांच्‍या नांवाने वीजपुरवठा दिला होता हे मान्‍य केले आहे. तसेच सदर मीटरचे मार्च 2012 पर्यंतचे संपुर्ण बील भरल्‍याचेही मान्‍य केले आहे.
9.    सत्‍य परिस्थिती या सदरात महावितरणने म्‍हटले आहे की, मोतीराम दगडु चौधरी रा.महानुभाव गल्‍ली पारोळा यांनी दि.08/03/1974 रोजी विज पुरवठा घेतला होता ते मयत झाल्‍यानंतर त्‍यांचे वारस म्‍हणुन दोधू मोतीराम चौधरी वगैरे 11 यांची मिळकत पत्रिकेवर वारसाने नोंद करण्‍यात आली आहे. दोधु मोतीराम चौधरी हे दि.21/06/2003 रोजी मयत झाल्‍याची नोंद देखील मिळकत पत्रिकेवर करण्‍यात आली. त्‍यानंतर पुंडलीक मोतीराम चौधरी वगैरे 10 यांनी सदर मिळकत भिका तुकडू चौधरी यांना खरेदीखतान्‍वये दिली व ते मिळकतीचे मालक झाले. श्री.भिका तुकडू चौधरी यांनी दि.13/03/2012 रोजी कनिष्‍ठ अभियंता पारोळा यांना विज कनेक्‍शन कायम स्‍वरुपी खंडीत करण्‍याबाबत अर्ज दिला. त्‍यावरुन सदरचे वीज कनेक्‍शन दि.14/03/2012 रोजी कायम स्‍वरुपी खंडीत करण्‍यात आले.
 
10.   महावितरणने पुढे असे म्‍हटले आहे की, तक्रारदार हे जर सदर मिळकतीत भाडेकरु म्‍हणुन असतील तर विद्युत कायदा 2003 नुसार भाडयाची पावती विहीत नमुन्‍यातील कागदपत्रासह नविन विज पुरवठा करण्‍याच्‍या अर्जासोबत सादर केल्‍यास तक्रारदार यांना विज पुरवठा देण्‍यास ते तयार आहेत. मयत इसमाच्‍या नांवावर असलेल्‍या कनेक्‍शनवर जिवीत व वित्‍त हानी झाल्‍यास जबाबदार कोण हा तांत्रिक मुद्या भविष्‍यात उपस्थित होऊ शकतो. त्‍यामुळे तक्रार अर्ज रद्य करावा अशी त्‍यांनी विनंती केली आहे.
11.    महावितरणने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ नि.11 वर शपथपत्र तसेच नि.15/1 वर भिका चौधरी यांचा अर्ज, नि.15/2 वर मिळकत पत्रिकेचा उतारा, नि.15/3 वर वीज पुरवठा खंडीत केल्‍याची यादी दाखल केली आहे.
 
12.   तक्रारदार यांची तक्रार, महावितरणचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्‍या समोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
      मुद्ये                                             उत्‍तर.
 
1.     तक्रारदार ग्राहक आहेत काय                            होय.
2.    महावितरणने सेवेत त्रुटी केली आहे काय?                     होय.
3.    तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.           खालील प्रमाणे 
4.    आदेश काय ?                                     खालील प्रमाणे.
 
13.   मुद्या क्र. 1 - . महावितरणने आपल्‍या म्‍हणण्‍यात तक्रारदार ग्राहक नाहीत व त्‍यांच्‍या नांवाने वीजपुरवठा दिलेला नाही. त्‍यामुळे ग्राहक व सेवा देणार असे नाते नाही त्‍यामुळे तक्रार रद्य करावी अशी विनंती केली आहे.
त्‍यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयार्थ (1) मा.महाराष्‍ट्र राज्‍य आयोग, मुंबई, यांनी 2004 (1) CPJ 262,  केशव बाबु तारे विरुध्‍द एक्‍झेक्‍युटिव्‍ह इंजिनियर आणि (2) मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी 2004 NCJ 15 अशोककुमार विरुध्‍द हरीयाणा विद्युत प्रसारण निगम  हे न्‍यायिक दृष्‍टांत दाखल केले आहेत.
 
14.   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारअर्जात त्‍या महानुभाव गल्‍ली,पारोळा जि.जळगांव या ठिकाणी भाडयाने राहतात. सदर घराचे घरमालक मोतीराम दगडू चौधरी यांनी सदर जागेत विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत वितरण कंपनी (यापुढे संक्षिप्‍ततेसाठी महावितरण असे संबोधण्‍यात येईल) कडुन ग्राहक क्र.132510013801 व जुना ग्राहक क्र.1380 अन्‍वये वीज पुरवठा घेतला आहे. तक्रारदार भाडेकरु या नात्‍याने सदर ग्राहक क्रमांकाच्‍या वीज वापराची बीले नियमीत भरत आहेत. त्‍यामुळे त्‍या महावितरणचे ग्राहक आहेत असे म्‍हटले आहे. त्‍यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयार्थ मा.महाराष्‍ट्र राज्‍य आयोग, मुंबई, यांनी 2012 (1) All MR (Journal) 21  रिलांन्‍स एनर्जी लि, विरुध्‍द राजन अग्रवाल हान्‍यायिक दृष्‍टांत दाखल केला आहे.
 
15.   वरिल म्‍हणणे पाहता ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाची व्‍याख्‍या विचारात घेणे आवश्‍यक ठरते. सदर व्‍याख्‍या खालीलप्रमाणे आहे.
 
(d)  "consumer" means any person who—
(i)    buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
(ii)   hires or avails of any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly prom­ised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who 'hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person but does not include a person who avails of such services for any commercial purposes;
 
     वरिल व्‍याख्‍येमध्‍ये and includes any beneficiary of such services  असा उल्‍लेख आहे.
16.    सदर तक्रारीत तक्रारदार या मोतीराम चौधरी यांचे भाडेकरु म्‍हणुन राहात असल्‍यामुळे घरमालकांचे नांवावर असलेल्‍या विज मीटरचेवरुन विज वापरत असल्‍यामुळे मोतीराम यांनी घेतलेल्‍या सेवेचे त्‍या लाभार्थी आहेत व ग्राहक या संज्ञेत ते येतात असे आम्‍हास वाटते.
या संदर्भात आम्‍ही मा.महाराष्‍ट्र राज्‍य आयोग, मुंबई, यांनी 2012 (1) All MR (Journal) 21  रिलांन्‍स एनर्जी लि, विरुध्‍द राजन अग्रवाल या न्‍यायिक दृष्‍टांचा आधार घेत आहोत. त्‍यात मा.आयोगाने पुढील प्रमाणे तत्‍व विषद केले आहे.
 
The contention raised on behalf of the Opponent that the electricity meter stands in the name of the builder and, therefore, the Complainant is not a ‘consumer’ is not sustainable in law because the said electricity connection was taken by the builder for the benefit of the Complainant and the premises of the said flat and above all, the electricity bills were paid by the Complainant.  In fact, the Complainant is a ‘beneficiary’ for whom the said electricity connection was taken.  The Complainant himself is availing the services rendered by the Opponent and the Complainant himself is making payment of ‘consideration’ for the said service when-ever the bills were tendered.  Therefore, looking to the definition of the term – ‘consumer’, which includes a ‘beneficiary’, the Complainant is a ‘consumer’ within the definition and we find no force and merits in the contention raised by the Opponent and, therefore, said contention is hereby rejected.
 
17.   महावितरणने दाखल केलेल्‍या न्‍यायिक दृष्‍टांतातील वस्‍तुस्थिती व प्रस्‍तुत तक्रारारीतील वस्‍तुस्थिती भिन्‍न असल्‍यामुळे सदर न्‍यायिक दृष्‍टांत याठिकाणी लागु होत नाही. त्‍यामुळे तक्रारदार ग्राहक आहे या मतास आम्‍ही आलो आहोत म्‍हणुन मुद्या क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.
 
18.   मुद्या क्र.2 तक्रारदार यांची तक्रार आहे की, मार्च 2012 मध्‍ये तक्रारदार या बाहेरगांवी नातेवाईकाकडे गेले असता, त्‍यांच्‍या अनुपस्थितीचा गैरफायदा घेऊन महावितरणने त्‍यांचे वीज मीटर काढुन नेले आहे. त्‍याबाबत महावितरणकडे चौकशी केली असता, महावितरणने त्‍यांचे वीज मीटर काढुन घेऊन गेल्‍याचे समजले. तक्रारदार वापरत असलेल्‍या वीजेचे संपूर्ण बील भरले असताना, त्‍यांना पुर्वसूचना न देता त्‍यांचे वीज कनेक्‍शन बदं करण्‍यात आले आहे सदर कृती सेवेतील त्रुटी आहे.
19.   महावितरणने आपल्‍या खुलाशात असे म्‍हटले आहे की, मोतीराम दगडु चौधरी रा.महानुभाव गल्‍ली पारोळा यांनी दि.08/03/1974 रोजी विज पुरवठा घेतला होता. ते मयत झाल्‍यानंतर त्‍यांचे वारस म्‍हणुन दोधू मोतीराम चौधरी वगैरे 11 यांची मिळकत पत्रिकेवर वारसाने नोंद करण्‍यात आली आहे. दोधु मोतीराम चौधरी हे दि.21/06/2003 रोजी मयत झाल्‍याची नोंद देखील मिळकत पत्रिकेवर करण्‍यात आली. त्‍यानंतर पुंडलीक मोतीराम चौधरी वगैरे 10 यांनी सदर मिळकत भिका तुकडू चौधरी यांना खरेदीखतान्‍वये दिली व ते मिळकतीचे मालक झाले. श्री.भिका तुकडू चौधरी यांनी दि.13/03/2012 रोजी कनिष्‍ठ अभियंता पारोळा यांना विज कनेक्‍शन कायम स्‍वरुपी खंडीत करण्‍याबाबत अर्ज दिला. त्‍यावरुन सदरचे वीज कनेक्‍शन दि.14/03/2012 रोजी कायम स्‍वरुपी खंडीत करण्‍यात आला. त्‍यामुळे सेवेत त्रुटी केली हे तक्रारदाराचे म्‍हणणे चुकीचे आहे. 
 
20.   आम्‍ही तक्रारदार यांनी नि.3/4 ते 3/8 व नि.13/1 ते नि.13/10 वरील विज बीले व पारोळा नगरपालिका यांची घरपटटी व नळपटटीची बीले मोतीराम चौधरी यांच्‍या करीता भाऊराव देशमुख, अनिल भाऊराव देशमुख यांनी 1993-94 पासुन मार्च 2012 पर्यंत भरल्‍याचे दिसुन येते. यावरुन तक्रारदार हे मोतीराम चौधरी यांच्‍या जागेत भाडयाने राहात आहेत असे दिसुन येते. महावितरणच्‍या विज बिलांचा भरणा नियमीत होता हे महावितरणने मान्‍य केले आहे. महाराष्‍ट्र रेंट कंट्रोल अक्‍ट 1999 नुसार कुठलाही घरमालक भाडेकरुच्‍या आवश्‍यक सुविधा रोखु शकत नाही. परंतु या ठिकाणी श्री.भिका तुकडू चौधरी यांनी दि.13/03/2012 रोजी विज पुरवठा कायम स्‍वरुपी बंद करणे बाबत अर्ज दिला असता त्‍याच दिवशी कनिष्‍ठ अभियंता यांनी विज पुरवठा खंडीत करणे बाबत आदेश दिल्‍याचे दिसुन येते. यावरुन घरमालकास जे कायद्याने करता येत नाही ते त्‍यांने महावितरणला अर्ज देऊन करण्‍यास भाग पाडले आहे असे दिसुन येते.
 
      महाराष्‍ट्र रेंट कंट्रोल अक्‍ट 1999 च्‍या कलम 29 मध्‍ये खालिलप्रमाणे तरतुद आहे.
     
29. Landlord not to cut-off or withhold essential supply or service.
(1) No landlord, either himself or through any person acting or purporting to act on his behalf, shall, without just or sufficient cause, cut-off or withhold any essential supply or service enjoyed by the tenant in respect of the premises let to him.
Explanation.- ln this section,-
(a) essential supply or service includes supply of water, electricity, lights in passages and on staircases, lifts and conservancy or sanitary service;
(b) withholding any essential supply or service shall include acts or omissions attributable to the landlord on account of which the essential supply or service is cut-off by the municipal authority or any other competent authority.
(7) Without prejudice to the provisions of sub-sections (1) to (6) or any other law for the time being in force, where the tenant,-
(a) who has been in enjoyment of any essential supply or service and the landlord has withheld the same, or
(b) who desires to have, at his own cost, any other essential supply or service for the premises in his occupation, the tenant may apply to the Municipal or any other authority authorized in this behalf, for the permission or for supply of the essential service and it shall be lawful for that authority to grant permission for, supply of such essential supply or service applied for without insisting on production of a "No Objection Certificate" from the landlord by such tenant.
21.   वास्‍तविक सदर मीटर श्री.भिका तुकडु चौधरी यांच्‍या नांवावर वर्ग करण्‍यात आलेले नव्‍हते तसेच सदर अर्ज आल्‍यानंतर महावितरणने प्रत्‍यक्ष जागेवर जाऊन राहणा-या व्‍यक्तिंना सदर अर्जाबाबत सुचीत करणे आवश्‍यक होते असे आम्‍हास वाटते. त्‍यामुळे महावितरणने तक्रारदार वापरत असलेल्‍या मीटरचा विज पुरवठा खंडीत करुन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्‍ही आलो आहोत. म्‍हणुन मुद्या क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.
22.   मुद्या क्र. 3 - तक्रारदार यांनी महावितरणने तक्रारदार हीचे राहते घरी वीज मीटर लावून विज पुरवठा पुर्ववत करुन द्यावा,मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.5,000/- द्यावा अशी विनंती केली आहे. महावितरणने खुलाशामध्‍ये म्‍हटले आहे की, तक्रारदार हे जर सदर मिळकतील भाडेकरु म्‍हणुन असतील तर विद्युत कायदा 2003 नुसार भाडयाची पावती विहीत नमुन्‍यातील कागदपत्रासह नविन विज पुरवठा करण्‍याच्‍या अर्जासोबत सादर केल्‍यास तक्रारदार यांना विज पुरवठा देण्‍यास ते तयार आहेत. मयत इसमाच्‍या नांवावर असलेल्‍या कनेक्‍शनवर जिवीत व वित्‍त हानी झाल्‍यास जबाबदार कोण हा तांत्रिक मुद्या भविष्‍यात उपस्थित होऊ शकतो.
 
23.   वास्‍तविक जो घरमालक तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा खंडीत करतो तो ग्राहकास भाडयाची पावती देईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.  त्‍यामुळे महावितरणने नवीनअर्जासोबत भाडयाची पावती किंवा भाडे करार देण्‍याची घातलेली अट अयोग्‍य आहे. तसेचMaharashtra Rent Control Act, 1999च्‍या कलम 55 नुसार सर्व भाडे करार नोंदणीकृत करण्‍याची जबाबदारी घरमालकाची आहे. तसे न केल्‍यास भाडेकरुचे म्‍हणणे ग्राहय धरण्‍यात यावे असे नमुद आहे. सदर तरतुद खालिलप्रमाणे आहे.
55. Tenancy agreement to be compulsorily registered.
(1) Notwithstanding anything contained in this Act or any other law for the time being in force, any agreement for leave and license or letting of any premises, entered into between the landlord and the tenant or the licensee, as the case may be, after the commencement of this Act, shall be in writing and shall be registered under the Registration Act, 1908.
(2) The responsibility of getting such agreement registered shall be on the landlord and in the absence of the written registered agreement, the contention of the tenant about the terms and conditions subject to which a premises have been given to him by the landlord on leave and license or have been let to him, shall prevail, unless proved otherwise.
       याठिकाणी तक्रारदार यांनी मुळ विज पुरवठा पुर्ववत चालु करण्‍याबाबत केलेली विनंती सदर मालक मयत झाल्‍यामुळे मान्‍य करता येणार नाही. तसेच महावितरणने तक्रारदारास अर्ज केल्‍यास विज पुरवठा देण्‍याचे मान्‍य केलेले असल्‍यामुळे तक्रारदार यांनी 23.    महावितरणनकडे विज पुरवठा मिळण्‍यासाठी अर्ज करावा. सदर अर्ज मिळाल्‍यानंतर महावितरणने दहा दिवसांच्‍या आंत तक्रारदारास घरमालकाची नाहरकत किंवा भाडयाच्‍या पावतीची मागणी न करता डिमांड नोट द्यावी. तक्रारदार यांनी डिमांड नोटनुसार रक्‍कम भरल्‍यानंतर महावितरणने विज पुरवठा तात्‍काळ द्यावा असा आदेश करणे आम्‍हास योग्‍य व न्‍यायाचे वाटते. 
24.   वरिल विवेचनावरुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
                                आदेश.
1.     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अशंतः मंजुर करण्‍यात येत आहे.
2.    तक्रारदाराने महावितरणकडे नवीन विज पुरवठा मिळण्‍यासाठी अर्ज सादर करावा.
3.    तक्रारदार यांनी आदेश क्र. 2 नुसार अर्ज केल्‍यानंतर महावितरणने दहा दिवसांच्‍या आंत तक्रारदारास घरमालकाची नाहरकत किंवा भाडयाच्‍या पावतीची मागणी न करता तक्रारदारास डिमांड नोट द्यावी.
4.    तक्रारदार यांनी डिमांड नोटनुसार रक्‍कम भरल्‍यानंतर महावितरणने विज पुरवठा तात्‍काळ द्यावा.
5.    तक्रारदार व विरुध्‍दपक्ष यांनी आपापला खर्च सोसावा.
 
                    (सौ.एस.एस.जैन)               (श्री.डी.डी.मडके)
                         सदस्‍य                        अध्‍यक्ष 
                                            जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव.
 
 
 
 
[HON'ABLE MR. D.D.MADAKE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S.S.Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.