Maharashtra

Chandrapur

CC/19/102

Sayyad Sabir Sayyad Sadique Hussain - Complainant(s)

Versus

M.S.E.B. Chandrapur Jr. Engineer - Opp.Party(s)

Virsen S. Damke

29 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/19/102
( Date of Filing : 23 Jul 2019 )
 
1. Sayyad Sabir Sayyad Sadique Hussain
Hislop College Naginabag Ward Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M.S.E.B. Chandrapur Jr. Engineer
Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 29 Jul 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

             (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्‍पना जांगडे (कुटे), मा. सदस्‍या)                  

                    (पारीत दिनांक २९/०७/२०२२)

 

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे  कलम १२ अन्‍वये  दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष यांचेकडून निवासी वापराकरिता वीज पुरवठा घेतला असून त्‍याचा ग्राहक क्रमांक ४५००१३६५९६४३ असा आहे. तक्रारकर्त्‍याकडे कोणतीही वीज देयकाची थकबाकी नसतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास कोणतीही सूचना/नोटीस न देता दिनांक २२/७/२०१९ रोजी तक्रारकर्त्‍याकडील वीज पुरवठा खंडित केला. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्षाकडे त्‍यांनी खंडित केलेला  वीज पुरवठा तात्‍काळ सुरु करण्‍याकरिता अर्ज केला परंतु त्‍यांनी त्‍यावर कोणताही विचार केलेला नाही त्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी याबाबत रामनगर पोलीस स्‍टेशनला रिपोर्ट सुध्‍दा दिली. तक्रारकर्त्‍याकडे कोणत्‍याही देयकाची रक्‍कम थकीत नसतांनासुध्‍दा विरुध्‍द पक्षाने वीज पुरवठा खंडित केल्‍याने शारीरिक, मानसिक व आर्थिक  ञास झाला. विरुध्‍द पक्ष यांनी अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याप्रति अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याने तक्रारकत्‍याने आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक २२/७/२०१९ रोजी तक्रारकर्त्‍याकडील वीज पुरवठा खंडित केल्‍याने विरुध्‍द पक्ष यांनी योग्‍य सेवा न देता अनुचित व्‍यापार पध्‍दती अवलंबिलेली आहे असे घोषित करण्‍यात यावे आणि विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक ञासाकरिता रक्‍कम रुपये १,००,०००/- तसेच तक्रार खर्च रुपये २०,०००/- देण्‍याचे आदेशीत व्‍हावे.
  3. तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष यांना नोटीस काढण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष यांना नोटीस तामील झाल्‍यावर ते आयोगासमक्ष हजर होऊन त्‍यांनी आपले लेखी उत्‍तर दाखल करुन त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन अमान्‍य करुन पुढे आपल्‍या विशेष कथनामध्‍ये नमूद केले की,  तक्रारकर्त्‍याने राहत असलेल्‍या घरी दिनांक २६/१०/२०१७ रोजी वादग्रस्‍त वीज पुरवठा घेतल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्ता राहत असलेल्‍या ठिकाणी पुर्वी मोहम्‍मद शफी अब्‍दुल गफ्फार यांचे नावाने ग्राहक क्रमांक ४५००१०३६७३८२ नुसार वीज पुरवठा असून तो दिनांक १४/०६/१९९७ ते ५/१२/२०१७  पर्यंत सुरु होता आणि अभिलेखानुसार त्‍यांचेकडे थकबाकी असल्‍यामुळे माहे डिसेंबर २०१७ मध्‍ये वीज पुरवठा कायमचा खंडित केला. वीज पुरवठा खंडित करण्‍यापूर्वी दिनांक ६/११/२०१७ रोजी मोहम्‍मद शफी अब्‍दुल गफ्फार यांना थकबाकी भरण्‍यासंदर्भात १५ दिवसांचा विद्यूत कायदा कलम ५६ अन्‍वये नोटीस देण्‍यात आला परंतु तो प्राप्‍त झाल्‍यानंतर हजर इसमाने/तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे कार्यालयीन प्रतिवर सही करण्‍यास नकार दिला त्‍यामुळे डिसेंबर २०१७ मध्‍ये वीज पुरवठा कायमस्‍वरुपी खंडित करण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याकडील वीज पुरवठा दिनांक २६/१०/२०१७ रोजी सुरु झालेला आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने वीज पुरवठा मिळण्‍यासाठी १ महिण्‍यापुर्वी दिनांक २६/१०/२०१७ रोजी अर्ज केला असे गृहीत धरता येईल. ग्राहक क्रमांक ४५००१०३६७३८२  चे वीज पुरवठा डिसेंबर २०१७ मध्‍ये कायमस्‍वरुपी खंडित केला त्‍यावेळी वीज मीटर काढण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने वीज पुरवठा मिळण्‍याकरिता अर्ज केला तेव्‍हा जुन्‍या ग्राहकाचे वीज मीटर तक्रारकर्त्‍याच्‍या परिसरात अस्तित्‍वात होते आणि त्‍यावरच्‍या थकबाकीची संपूर्ण कल्‍पना तक्रारकर्त्‍यास होती. तक्रारकर्ता यांनी मोहम्‍मद शफी कडून त्‍याचे राहते घर विकत घेतले असावे व आपले नावे वीज पुरवठा घेतला असे दिसून येते परंतु तक्रारकर्ता यांनी नवीन वीज पुरवठा घेतांना त्‍याठिकाणी जुना वीज पुरवठा होता काय तसेच त्‍यांना पुर्ण वीज देयकाचा भरणा केला काय किंवा कसे या सर्व बाबी लपवून विरुध्‍द पक्ष यांची दिशाभुल करुन त्‍यांचेकडून  वीज पुरवठा प्राप्‍त करुन घेतला. पुर्वी ते राहत असलेल्‍या घरी पूर्वीच मालक मोहम्‍मद शफी यांचे नावाने असलेल्‍या वीज पुरवठ्याची दिनांक २/८/२०१७ पर्यंत रुपये २६,३६७/- थकबाकी होती व त्‍यावर नंतर दंड व व्‍याजसुध्‍दा लागले. जुने मालक मोहम्‍मद शफी अब्‍दुल गफ्फार यांचेनंतर संपूर्ण थकबाकी भरण्‍याची जबाबदारी ही तक्रारकर्त्‍याची आहे. तक्रारकर्ता यांनी जुन्‍या वीज पुरवठ्यावर असलेल्‍या थकबाकीचे स्‍वतः तसेच पुर्वीच्‍या मालकाने सुध्‍दा भरणा केलेला नाही. त्‍यामुळे दिनांक २२/७/२०१९ रोजी वादग्रस्‍त वीज पुरवठा तात्‍पुरता खंडित केला. तक्रारकर्ता राहत असलेल्‍या  ठिकाणी माहे डिसेंबर २०१७ पर्यंत वीज पुरवठ्याची रक्‍कम रुपये ३१,३१०/- एवढी थकबाकी असून ती भरण्‍यास तक्रारकर्ता जबाबदार आहे. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास न्‍युनतम सेवा दिली नसून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब सुध्‍दा केलेला नाही. तक्रारकर्त्‍याने वास्‍तविकता लपवून तसेच विरुध्‍द पक्ष यांची दिशाभूल करुन बेकायदेशीररित्‍या वादग्रस्‍त वीज पुरवठा प्राप्‍त करुन घेतला आहे. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे. 
  4.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ, तक्रारकर्त्‍याचे मुळ अर्जास व पुराव्‍यास त्‍यांचे लेखी युक्‍तीवाद समजण्‍यात यावे अशी पुरसीस आणि विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर, दस्‍तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्‍या  विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमिमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

   अ.क्र.                 मुद्दे                                                                  निष्‍कर्ष

    १.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याप्रति न्‍युनतापूर्ण सेवा दिली             नाही  

        आहे कायॽ

      २.  आदेश कायॽ                                                                  अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

  1. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष यांचेकडून निवासी वापराकरिता विद्युत पुरवठा  जोडणीकरिता अर्ज केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास दिनांक २६/१०/२०१७ रोजी वीज पुरवठा दिला असून त्‍याचा वीज मीटर क्रमांक ०५३७६२१३८७५ असा आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे.

      प्रस्‍तुत तक्रारीत विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडील वीज पुरवठा पुर्वीच्‍या थकीत वीज देयकाच्‍या रकमेपोटी दिनांक २२/७/२०१९ रोजी खंडित केला याबाबत उभयपक्षात वाद आहे. प्रकरणात दाखल दस्‍तवेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की तक्रारकर्त्‍याने वीज पुरवठा घेतलेल्‍या  जागा/घरामध्‍ये (नगिना बाग, चंद्रपूर) पुर्वी मोहम्‍मद शफी अब्‍दुल गफ्फार यांचे नावाने वीज पुरवठा दिलेला होता व त्‍याचा ग्राहक क्रमांक ४५००१०३६७३८२ हा असून तो वीज पुरवठा दिनांक १४/०६/१९९७ ते दिनांक ५/१२/२०१७ पर्यंत सुरु होता. मोहम्‍मद शफी अब्‍दुल गफ्फार यांचेकडून वीज देयकाची थकबाकी रक्‍कम रुपये २६,३६७/- घेणे होते त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक ६/११/२०१७ रोजी वीज पुरवठा खंडित करण्‍याची विद्युत कायदा २००३ च्‍या कलम ५६ अंतर्गत सूचना दिली होती परंतु त्‍यांनी पञ घेण्‍यास नकार दिला तसा शेरा त्‍या पञावर दिसून येतो व मोहम्‍मद शफी अब्‍दुल गफ्फार यांनी थकबाकी रकमेचा भरणाही केला नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी डिसेंबर २०१७ मध्‍ये मोहम्‍मद शफी अब्‍दुल गफ्फार यांचेकडील वीज पुरवठा कायमचा खंडित केला व  त्‍यादिवशी रक्‍कम रुपये ३१,३१०/- घेणे होते. या संदर्भातले सी.पी.एल., दिनांक ६/११/२०१७ चे सूचना पञ आणि पुरवठा कायमचा खंडित केल्‍याचे दस्‍तावेज विरुध्‍द पक्ष यांनी प्रकरणात दाखल केलेले आहेत. यावरुन जुन्‍या वीज पुरवठ्यावरील वीज देयकाची थकीत रककम घेणे होते ही बाब स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने त्‍याच जागा/घरामध्‍ये निवासी वापराकरिता विरुध्‍द पक्षाकडे अर्ज करुन नवीन वीज पुरवठा घेतला परंतु त्‍या जागेमध्‍ये पूर्वी असलेल्‍या जुन्‍या वीज पुरवठ्यावर थकबाकी होती व त्‍याचा मोहम्‍मद शफी अब्‍दुल गफ्फार यांनी तसेच तक्रारकर्त्‍याने सुध्‍दा भरणा न केल्‍याने विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक २२/७/२०१९ रोजी तक्रारकर्त्‍याकडील वीज पुरवठा खंडित केला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडून वीज पुरवठा मिळण्‍याचा अर्ज/फॉर्म वर असलेल्‍या घोषणापञामध्‍ये

                सध्‍या ज्‍या ठिकाणी विद्युत पुरवठ्याची मागणी केली आहे त्‍या ठिकाणी पुर्वीची थकबाकी असल्‍यास अशी थकबाकी भरणे मला/आम्‍हाला बंधनकारक असेल व पुर्वीची थकबाकी असल्‍यास मला/आम्‍हाला नवीन विद्युत पुरवठा मिळणार नाही. याबाबत मला/आम्‍हाला अवगत करण्‍यात आले आहे.

 

      असे नमूद असून अर्जावर तक्रारकर्त्‍याची स्‍वाक्षरी सुध्‍दा आहे असे असून सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने जुन्‍या वीज पुरवठ्याच्‍या थकबाकीचा भरणा केलेला नाही आणि जुन्‍या वीज पुरवठ्याची थकबाकी रक्‍कम असल्‍याने विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडील वीज पुरवठा खंडित केला हे दाखल दस्‍तऐवजांवरुन स्‍पष्‍ट होते तसेच तक्रारकर्ता त्‍या जागेवर कसा आला, अथवा त्‍याने ती जागा विकत घेतली किंवा कसे याबाबत सत्‍य माहिती/वास्‍तविकता लपूवन विरुध्‍द पक्ष यांची दिशाभूल करुन नवीन वीज पुरवठा मिळविला आणि फॉर्मवरील घोषणेप्रमाणे थकीत रकमेचा भरणा करण्‍याचे मान्‍य केले आहे, तरी त्‍याचा भरणा केला नाही.  

    मा. राष्‍ट्रीय आयोग, नवी दिल्‍ली यांनी पारित केलेल्‍या  Dr. Indrajit Singh Shergill Vs. P.S.E.B. through its Chief Engineer, Border Zone Ajnala & Ors,  या निवाड्यात पुढीलप्रमाणे निष्‍कर्ष नों‍दविला आहे.

      “The very fact that the application form required  consumer to declare that there were no dues against any previous connection clearly shows that it was a condition of supply of electricity to new consumer that previous dues against any connection in the same property shall be paid before a new connection was released. The respondent, therefore was entitled in law, to recover the said dues before releasing the fresh connection in favour of the complainant/petitioner.”

     उपरोक्‍त न्‍यायनिवाड्याचे तत्‍व प्रस्‍तुत प्रकरणात लागू पडते. प्रस्‍तुत प्रकरणात सुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांनी पुर्वीच्‍या वीज पुरवठ्याच्‍या थकीत रकमेपोटी तक्रारकर्त्‍याकडील वीज पुरवठा खंडित करुन तक्रारकर्त्‍याप्रति सेवेत कोणतीही न्‍युनता दर्शविली नाही, हे दाखल दस्‍तऐवजांवरुन सिध्‍द होते या निष्‍कर्षाप्रत आयोग आले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची प्रस्‍तुत तक्रार अंतरिम अर्जावरील आदेशासह खारीज होण्‍यास पाञ आहे.  सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. मुद्दा क्रमांक १ च्‍या विवेचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.   

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. १०२/२०१९ खारीज करण्‍यात येते.
  2. अंतरिम आदेश दिनांक २३/७/२०१९ निष्‍प्रभ करण्‍यात येतो.
  3. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  4. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.