(निकालपत्र सदस्य, श्री.चंद्रकांत मोहन येशीराव यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तुत तक्रार ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अवास्तव वीज देयके देण्याबाबतचे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल करण्यात आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, तक्रारदार हे नोंदणीकृत सदगुरु एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे सचिव आहे या शैक्षणिक इमारती मध्ये वीज पुरवठयासाठी मीटर ग्राहक क्र. 110012130937/4-26-2130-930 असे मीटर बसविलेले आहे. तक्रारदारांनी दि.06/11/2009 रोजी सामनेवाला यांच्याकडे सन 2008 पासून वीज बिले मिळालेली नाहीत म्हणुन अर्ज केला याचा राग येवून सामनेवाला यांनी एकत्रित ऑगस्ट 2008 पासुन मे 2009 या कालावधीचे अवास्तव व चुकीचे युनिट लावून रु. 2,24,974/- चे वीज बिल दिले त्याचबरोबर दि.20/11/2009 तारखेचे नोटीसही दिली. याबाबत तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडे तक्रार केली की, त्यांनी दिलेले वीज बिल अवास्तव आहे बिलामध्ये कर्मेशिअल त्री फेज काही वीज बिला मध्ये टु फेज व काही बिलामध्ये वन फेज लावलेले आहे तरी सदरचे वीज बिल दुरुस्त करुन मिळावे तसेच सोसायटी मध्ये श्रीमती. गिताबाई एस.खडके या नावाने वीज मिटर आहे. त्यांना आलेले वीज बिल तक्रारी नंतर दुरुसत करुन देण्यात आले व त्यानुसार तक्रारदार यांनी वीज बिलाचा भरणा केलेला आहे. तक्रारदार हे शैक्षणिक संस्था असल्याने या आवारात संस्थेचे कार्यालय, शैक्षणिक वर्ग, चालु असतात सदरचे शैक्षणिक कामकाज निरंतर चालु असते तरी सामनेवाला यांनी डोरलॉक असा शेरा मारुन बिले दिली आहे. थकबाकी नसतांनाही थकबाकी दाखवुन अवास्तव वीज बिलाची मागणी केलेली आहे म्हणुन तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे. विदयुत पुरवठा खंडीत करु नये सन 2008 ते मे 2009 या कालावधीचे एकत्रित वीज बिल पाठविण्याचा सामनेवाला यांना अधिकार नाही व ती मागणी बेकायदा आहे असे जाहीर करुन मिळावे व इतर न्यायाचे हुकूम व्हावे यासाठी या मंचात तक्रार दाखल केली आहे.
03. तक्रारदाराने तक्रारी सोबत प्रतिज्ञापत्र, सामनेवाला यांनी पाठविलेली नोटीस, नोटीस उत्तर, वीज बिल मिळणेबाबतचा अर्ज, वीज देयके, तात्पुरत्या मनाई हुकूमाचा अर्ज त्यासोबत प्रतिज्ञापत्र, तक्रारदार व सामनेवाला यांच्यात झालेला पत्र व्यवहार व वीज देयके भरल्याच्या पावत्या दाखल केल्या आहेत.
04. सामनेवाला यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली नोटीस मिळून सामनेवाला मंचात हजर झाले सामनेवाला यांनी मुळ अर्जास व तुर्तातुर्त मनाई हुकूमाच्या अर्जास एकत्रित खुलासा दाखल केला खुलाष्यासोबत प्रतिज्ञापत्र, सीपीएल 2007 ते 2009, मीटर रिपलेसमेंट रिपोर्ट, वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केल्याचा रिपोर्ट दाखल केला आहे.
सामनेवाला यांचे कथन आहे की, तक्रारदारांचा अर्ज व त्यातील म्हणणे संपुर्णपणे खोटे लबाडीचे व बेकायदेशीर आहे व ते सामनेवाला यांना मान्य नाही. तक्रारदारांना नियमीत वीज बिले देण्यात आलेले आहे व तक्रारदारांकडे रु. 2,24,974/- इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांना नोटीस दिलेली आहे. सामनेवाला यांचे असेही म्हणणे आहे की, तक्रारदार हे सामनेवाला यांच्या कर्मचा-यांना मीटरचे रिडिंग घेवू देत नव्हते मीटर बसविलेली खोली नेहमी बंद ठेवत असे त्यामुळे तक्रारदार यांना सामनेवाला यांनी रिडींग उपलब्ध नाही लॉस स्टेटसची अदांजित सरासरी आकारणीची वीज बिले दिली आहे. मीटर रिडींग उपलब्ध झाल्यानंतर मीटर रिडींग नुसार वीज बिलात समायोजित करण्यास सामनेवाले हे तयार आहे. सामनेवाला यांनी सेवा देण्यात कोणताही कसूर केलेला नाही त्यामुळे सामनेवाला यांचा अर्ज रदद होण्यास पात्र आहे.
05. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्रे व तक्रारदार यांच्या वकीलांचा युक्तीवाद यावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मीटर रिडिंग
प्रमाणे वीज देयके मिळण्यास पात्र आहे काय ? होकारार्थी
2. आदेशाबाबत काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
06. तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडून त्यांच्या सोसायटी अंतर्गत सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रमासाठी वीज पुरवठा घेतलेला आहे त्यांचा ग्राहक क्रमांक 110012130937/4-26-2130-930 असा आहे. तक्रारदारांनी ऑगस्ट 2008 ते दि. 06/11/2009 पर्यंतचे वीज बिले मिळाली नाही म्हणुन त्यांनी सामनेवाला कडे लेखी अर्ज दिला त्याचा राग येवून सामनेवाला यांनी उपरोक्त कालावधीची रु. 2,24,947/- चे एकत्रित वीज बिल व वीज पुरवठा खंडीत करण्याची नोटीस दिली. सदरचे वीज बिल तक्रारदारांना मान्य नसल्यामुळे सदरचे वीज बिल बेकायदेशीर असल्याचे जाहीर करुन मिळावे वीज पुरवठा खंडीत करु नये, नोटीस बेकायदेशीर आहे असे जाहीर करुन मिळावे व इतर न्यायाच्या हुकूमासाठी सदरची तक्रार दाखल आहे. सामनेवाला यांनी आपल्या खुलाष्यात तक्रारदार व त्यांचे कर्मचारी हे सामनेवाले यांना मीटर रिंडीग घेवू देत नाही वीज बिला बाबत खोटया तक्रारी करतात मीटर बसविलेली खोली नेहमी बंद असते त्यामुळे विदयुत नियामक आयोग विनिमय 2005 च्या नियम 15.3.1 नुसार अंदाजित सरासरी वीज बिले तक्रारदारांना दिल्याचे मान्य केलेले आहे. तसेच मीटर रिडींग उपलब्ध झाल्यावर मीटर रिडींग नुसार वीज देयके देण्याबाबत व वीज बिलाची रक्कम समायोजित करण्यास तयार असल्याबाबत नमूद केले आहे.
07. तक्रारदारांची तक्रार सामनेवाले यांचा खुलासा, तक्रारदारांचे वकीलांनी दाखल केलेले मा.केंद्रीय आयोग यांचा न्यायनिवाडा याचे अवलोकन केले असता तक्रारदाराची तक्रार मीटर रिडींग न घेता अवास्तव वीज बिल दिल्याबाबतची आहे. सदर बाबतीत सामनेवाला यांनी मीटर रिडींग उपलब्ध नसल्यामुळे विदयुत कायदयाप्रमाणे सरासरी वीज बिल दिल्याचे मान्य केले आहे. तसेच मीटर रिडींग उपलब्ध झाल्यावर त्यानुसार वीज बिल देण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर तक्रारदारानी थकीत वीज बिल भरल्यास मीटर रिडींग उपलब्ध झाल्यावर नियमाप्रमाणे बिलाची उर्वरीत रक्कम समायोजित करण्याबाबतही मान्य केलेले आहे. याचबरोबर त्यांनी असेही कथन केले आहे तक्रारदार हे मीटर रिडींग घेवू देत नाही मात्र याबाबत त्यांनी कोणताही पुरावा मंचासमोर सादर केलेला नाही. यापुढे जावून मंचाचा असा निष्कर्ष आहे की, जर तक्रारदार हे सामनेवाला यांना मीटर रिडींग घेवू देत नव्हते तर सामनेवाला हे तक्रारदारा विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करु शकत होते. मात्र असे झाल्याचे कुठलेही कागदपत्र या मंचासमोर नाही. त्यामुळे सामनेवाला यांच्या या कथनात तथ्य नाही की, तक्रारदार हे मीटर रिडींग घेवू देत नव्हते. मंचाच्या असेही निर्देशनास आले आहे की, तक्रारदार यांनी सन 2008 पासून ते वादातीत वीज बिल मिळेपर्यंत वीज बिल भरलेले नाही हे सुध्दा योग्य नाही असे या मंचाचे मत आहे म्हणुन तक्रारदारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसांत वादातीत वीज बिल रक्कम रु. 2,24,947/- भरावे तक्रारदारांनी वादातीत वीज बिल भरल्यानंतर मीटर रिडींग चे वाचन करुन मीटर रिडींग नुसार सरासरी वीज देयके दयावेत व तक्रारदारांनी भरलेली रक्कम समायोजित करुन दयावी, सामनेवाला यांच्या कृती मुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक व मानसिक त्रास झाला आहे तसेच तक्रार देखील करावी लागली आहे हे पाहता तक्रारदार हे सामनेवाला यांच्या कडून मानसिक,शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रार अर्ज खर्च रु. 3,000/- मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे म्हणुन मुद्दा क्र.1 चे उत्तर मंच होकारार्थी देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते,
2. तक्रारदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारीतील वादातीत वीज बिल रक्कम
रु. 2,24,947/- हे आदेश प्रत प्राप्ती नंतर 30 दिवसात सामनेवाला यांच्याकडे भरावे
3. सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारदारांनी वादातीत वीज देयक
रु. 2,24,947/- भरल्यानंतर आदेश प्रत प्राप्ती नंतर 30 दिवसांत तक्रारदारांच्या वीज मीटरचे वाचन करुन मीटर वाचनानुसार सरासरी वीज बिल दयावे व तक्रारदारांनी भरलेली वादातीत वीज बिल रक्कम रु. 2,24,947/- याचे समायोजित करण्यात यावी.
3. सामनेवाले यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास शारिरीक,मानसिक त्रासाची
नुकसान भरपाई रु. 10,000/- व तक्रार खर्च म्हणून रु. 3000/- अदा करावा.
4. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगाव
दिनांक. 05/06/2015
(श्री.चंद्रकांत मो. येशीराव) (श्री. विनायक रा.लोंढे)
सदस्य अध्यक्ष