(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार यांना, बसमध्ये आसन क्षमता नसताना देखील गैरअर्जदार यांनी तिकीट दिल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाबददल अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार दि.30.04.2010 रोजी गैरअर्जदार यांच्या वाहनातून पूणे ते औरंगाबाद असा प्रवास करण्यासाठी तिकीट घेतले. गैरअर्जदार यांनी, त्यांना 42 क्रमांकाचे सिट दिले व त्यासाठी 400/- रुपये प्रवासभाडे आकारले. (2) त.क्र.371/10 अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या बसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना वाहनात एकूण 41 सिट असल्याचे समजले. त्यांनी याबाबत संबंधित कर्मचा-याकडे तक्रार केली असता, त्यांना ड्रायव्हर केबिनमध्ये बसविण्यात आले, ज्यामुळे त्यांना मानसिक व शारिरिक त्रास सोसावा लागला. गैरअर्जदार यांच्या या कृती विरुध्द अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस प्राप्त होऊनही हजर झाले नाहीत, म्हणून त्यांच्याविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या क्रागदपत्रांवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे दि.30.04.2010 रोजी पूणे ते औरंगाबाद या प्रवासासाठी तिकीट खरेदी केले, व त्यासाठी 300/- रुपये भरले, व गैरअर्जदार क्र.2 यांच्या बसमधून अर्जदाराने प्रवास केला. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास दिलेल्या तिकीटाचे निरीक्षण केल्यावर त्यात अर्जदारास देण्यात आलेला आसन क्रमांक 42 असा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अर्जदाराने प्रादेशिक परिवहन कार्यालय, औरंगाबाद येथून त्यांनी केलेल्या प्रवास वाहनाबाबत माहिती मागविली असता, बसचा वाहन क्रमांक एम.एच.20 डब्ल्यू 9428 असा असून, वाहन आसन क्षमता 41 + 1 असे एकूण 42 असल्याची दिसून येते. याचाच अर्थ वाहनाची आसन क्षमता ड्रायव्हर व्यतिरिक्त 41 असल्याचे स्पष्ट होते. यावरुन वाहनात आसन क्षमता नसली तरी, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास नियमाविरुध्द तिकीट दिले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. व यामुळे अर्जदारास ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसून प्रवास करावा लागला. अर्जदारास झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासासाठी गैरअर्जदार क्र.1 व 2 हे संयुक्तपणे जवाबदार असल्याचे मंचाचे मत आहे. आदेश 1) अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबदद्ल गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी प्रत्येकी रु.5,000/- 30 दिवसात अर्जदारास द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |