Maharashtra

Nagpur

CC/348/2021

SHRI. KHUSHAL SHALIKRAM KUMBHARE - Complainant(s)

Versus

M.K. HOUSE REAL ESTATE, THROUGH PROPRIETOR DR. SEEMA MANIKRAO VAIDYA - Opp.Party(s)

ADV. ABHIJIT S. SIRSIKAR

20 Apr 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/348/2021
( Date of Filing : 29 Jun 2021 )
 
1. SHRI. KHUSHAL SHALIKRAM KUMBHARE
R/O. FLAT NO.AY-31, 3RD FLOOR, JYESHTHA APARTMENT, NEAR NAGOBA MANDIR CHOWK, BHAMTI, RING ROAD, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M.K. HOUSE REAL ESTATE, THROUGH PROPRIETOR DR. SEEMA MANIKRAO VAIDYA
R/O. 55 (A), NIT COMMERCIAL LAYOUT, TRIMURTI NAGAR, RING ROAD, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. ABHIJIT S. SIRSIKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 20 Apr 2023
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, वि. प. एम. के. हाऊस रिअल इस्‍टेटचे प्रोप्रा. स्‍व. मानिकराव वैद्य होते व त्‍यांच्‍या निधनानंतर त्‍यांची पत्‍नी डॉ. सिमा मानिकराव वैद्य या आहेत.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या मौजा- पिटीचुवा, प.ह.नं. 25, खसरा क्रं. FS-II, ग्रामपंचायत बोथली, तह. उमरेड, जि. नागपूर येथील ले-आऊट मधील प्‍लॉट / फार्म हाऊस क्रं. 507, एकूण क्षेत्रफळ 22,000 चौ.फूट एकूण रक्‍कम रुपये 55,000/- मध्‍ये विकत घेण्‍याकरिता आरक्षित केला होता व त्‍यापोटी वेळोवेळी रक्‍कम अदा केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने सदरच्‍या फार्म हाऊसचा स्‍थावर मालमत्‍तेचा कब्‍जा पत्र  दि. 20.09.2003 रोजी करुन दिलेला आहे आणि सदरच्‍या फार्म हाऊसचे कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता विनंती केली असता जो पर्यंत शासना तर्फे सदरच्‍या ले-आऊटची मंजुरी प्राप्‍त होत नाही तो पर्यंत तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे कायदेशीर विक्रीपत्र करुन देऊ शकत नाही असे सांगितले.  परंतु विरुध्‍द पक्षाने दि. 18.06.2004 रोजी तक्रारकर्त्‍याला पत्राद्वारे कळविले की, दि. 03.07.2004 रोजी रुपये 2800/- वि.प.कडे जमा करुन सदरच्‍या फार्म हाऊसचे कायदेशीर विक्रीपत्र करुन घ्‍यावे. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रक्‍कम जमा केली होती. त्‍या दरम्‍यान विरुध्‍द पक्षाचे पती मानिकराव वैद्य यांचे निधन झाल्‍यामुळे तेव्‍हा पासून त्‍यांची पत्‍नी  सिमा मानिकराव वैद्य ही सदरच्‍या रिअल इस्‍टेटची प्रोप्रायटर आहे.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने जानेवारी 2021 मध्‍ये सदरच्‍या ले-आऊट मधील काही सदस्‍यांची फार्म हाऊसचे कायदेशीर विक्रीपत्र करुन दिले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे पुनश्‍च त्‍याच्‍या फार्म हाऊसचे कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्‍याची विनंती करुन सुध्‍दा ही त्‍याकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे सदरच्‍या फार्म हाऊसची कायदेशीर विक्रीपत्र करुन द्यावे. सदरच्‍या फार्म हाऊसचे विक्रीपत्र करुन देणे शक्‍य नसल्‍यास आयोगा मार्फत तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्‍यात यावे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.  विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 03.01.2022 रोजी पारित करण्‍यात आला.

 

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे काय ?                  होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?            होय

 

  1. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या मौजा- पिटीचुवा, प.ह.नं. 25, खसरा क्रं. FS-II, ग्रामपंचायत बोथली, तह. उमरेड, जि. नागपूर येथील ले-आऊट मधील प्‍लॉट क्रं. (फार्म हाऊस क्रं.) 507, एकूण क्षेत्रफळ 22,000 चौ.फूट एकूण रक्‍कम रुपये 55,000/- मध्‍ये विकत घेतले होते व रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याच्‍या पावत्‍या नि.क्रं. 2 वर दाखल केल्‍या आहेत. तसेच सदरच्‍या प्‍लॉटची संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे स्‍थावर मालमत्‍तेचा कब्‍जा पत्र  दि. 20.09.2003 रोजी करुन दिला असल्‍याचे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्षाने प्‍लॉट क्रं. 507 ची संपूर्ण रक्‍कम स्‍वीकारल्‍यानंतर कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला दि. 03.07.2004 च्‍या रक्‍कम भरण्‍याबाबत पत्र दिले होते, त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 2800/- जमा केले असल्‍याचे नि.क्रं. 2(6) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून विक्रीपत्र लावून देण्‍याकरिता शुल्‍क स्‍वीकारुन सुध्‍दा तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे कायदेशीर विक्रीपत्र करुन दिले नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे दिसून येते.

 

सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने स्‍वखर्चाने तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे मौजा- पिटीचुवा, प.ह.नं. 25, खसरा क्रं. FS-II, ग्रामपंचायत बोथली, तह. उमरेड, जि. नागपूर येथील ले-आऊट मधील प्‍लॉट / फार्म हाऊस क्रं. 507, एकूण क्षेत्रफळ 22,000 चौ.फूट चे कायदेशीर विक्रीपत्र करुन द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.