जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक: 18/10/2010. तक्रार आदेश दिनांक :23/02/2011. ग्राहक तक्रार क्रमांक : 579/2010. विष्णू अण्णा गवळी, वय 43 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. गवळेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 580/2010. सावित्राबाई विष्णू गवळी, वय 38 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. गवळेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 581/2010. मालन अण्णा गवळी, वय 60 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. गवळेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, तर्फे प्रशासक, रा. सुराणा मार्केट, मुरारजी पेठ, सोलापूर. 2. श्री. अविनाश लक्ष्मण महागांवकर, रा.4/8, विद्यानगर क्र.2, सिव्हील हॉस्पिटलमागे, पाथरुट चौक, सोलापूर. 3. श्री. विशाल विलास लडगे, मु.पो. वडशिंगे, ता. माढा, जि. सोलापूर. 4. नरेंद्र गोविंद काळे, रा. न्यू संतोष नगर, विजापूर रोड, सोलापूर. 5. राजेंद्र कांतीलाल कोठारी, रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर. 6. सौ. मृदुला औदुंबर तळेकर, रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. 7. रामेश्वर ज्ञानदेव लोंढे, रा. चौधरी प्लॉट, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 8. नवनाथ काशिनाथ आतकर, रा. जिजामाता नगर, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 9. पोपट बनाजी हनवते, रा. भांबुरे वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 10. काकासाहेब अप्पासाहेब पाटील, रा. बारलोणी, ता.माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष 11. संजय सुब्राव राऊत, रा. मानेगांव, ता.माढा, जि. सोलापूर. 12. विष्णू नरसू अनंतकवळस, रा. कुर्डु, ता. माढा, जि. सोलापूर. 13. जावेद दस्तगीर अतार, रा. भगवंत कॉम्प्लेक्स, राज मोबाईल शॉपी, बार्शी, जि. सोलापूर. 14. सौ. स्मिता धनंजय शहाणे, रा. मंगळवार पेठ, क्लासिक ऑफसेट, माढा, जि. सोलापूर. 15. संजय संभाजी कुटे, रा. कुटे वस्ती, मु.पो. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. आर.एफ. सोनिमिंडे विरुध्द पक्ष क्र. 2, 3 ते 7, 11 ते 13 व 15 यांचेतर्फे अभियोक्ता : डी.पी. बागल आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या कुर्डुवाडी शाखेमध्ये खालीलप्रमाणे रक्कम गुंतवणूक केलेली आहे. ग्राहक तक्रार क्र.579/2010 मध्ये :- ठेव तपशील | रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर | बचत खाते | 1,20,432 | क्र.2230 | -- | 17/2/2009 | -- |
ग्राहक तक्रार क्र.580/2010 मध्ये :- ठेव तपशील | रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर | मुदत ठेव | 25,000/- | 033135 | 4/5/2007 | 4/6/2008 | 12 टक्के | मुदत ठेव | 25,000/- | 033136 | 4/5/2007 | 4/6/2008 | 12 टक्के | मुदत ठेव | 6,510/- | 039944 | 13/7/09 | 13/10/2009 | 10 टक्के |
ग्राहक तक्रार क्र.581/2010 मध्ये :- ठेव तपशील | रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर | दामदुप्पट ठेव | 5,000/- | 009133 | 13/2/06 | 13/5/2012 | -- |
2. तक्रारदार यांनी गुंतवणूक केलेल्या ठेव रकमेची व्याजासह मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यांनी अभियोक्त्यांमार्फत नोटीस पाठवूनही विरुध्द पक्ष यांनी त्यांना ठेव रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे आणि विरुध्द पक्ष यांच्याकडे गुंतवणूक केलेली ठेव रक्कम व्याजासह मिळावी आणि तक्रार खर्च व मानसिक त्रासापोटी अनुक्रमे रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 3. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्यात आले. 4. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या कुर्डुवाडी शाखेत बचत खाते, मुदत ठेव व दामदुप्पट ठेव योजनेमध्ये रक्कम गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल पावत्यांवरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी त्यांची प्रमुख तक्रार आहे. 6. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या कुर्डुवाडी शाखेमध्ये बचत खाते, मुदत ठेव व दामदुप्पट ठेव योजनेमध्ये रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर किंवा मुदतपूर्व मागणीनुसार यांना ठेव रक्कम परत करणे विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम परत करण्यात आलेली नाही. निर्विवादपणे तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे ठेव रक्कम व्याजासह परत मिळविण्यास हक्कदार आहेत, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. तक्रारदार यांच्या ठेव पावत्यांचे अवलोकन करता, ठेवीच्या व्याजापोटी काही रक्कम अदा केल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे ज्या दिवसांपासून व्याज प्राप्त झाले नाही, तेथून पुढे व्याज मिळविण्यास तक्रारदार पात्र ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्कम या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. ग्राहक तक्रार क्र.579/2010 मध्ये :- ठेव तपशील | ठेव रक्कम (रुपयामध्ये) | पावती क्रमांक | खालील तारखेपासून व्याज द्यावयाचे | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | बचत खाते | 1,20,432 | 2230 | 17/2/2009 | 12 टक्के |
ग्राहक तक्रार क्र.580/2010 मध्ये :- ठेव तपशील | ठेव रक्कम (रुपयामध्ये) | पावती क्रमांक | खालील तारखेपासून व्याज द्यावयाचे | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | मुदत ठेव पावती | 25,000/- | 033135 | 13/7/2009 | 10 टक्के | मुदत ठेव पावती | 25,000/- | 033136 | 13/7/2009 | 10 टक्के | मुदत ठेव पावती | 6,510/- | 039944 | 13/7/2009 | 10 टक्के |
ग्राहक तक्रार क्र.581/2010 मध्ये :- ठेव तपशील | ठेव रक्कम (रुपयामध्ये) | पावती क्रमांक | खालील तारखेपासून व्याज द्यावयाचे | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | दामदुप्पट ठेव | 5,000/- | 009133 | 13/2/2006 | 12 टक्के |
2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/17211)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |