जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २०३/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०४/१०/२०११
तक्रार निकाली दिनांक – २७/०६/२०१४
आफरीन बानो मो. रफी
उ.वय ३२, धंदा – गृहउद्योग
रा. मिल्लत नगर, वडजई रोड, हड्डी
कारखान्याजवळ, धुळे, ता.जि. धुळे - तक्रारदार
विरुध्द
- महा. राज्य विद्युत वितरण कं. मर्या. मुंबई.
- उपकार्यकारी अभियंता
महा. राज्य विद्युत वितरण कं. मर्या.
आनंद नगर, देवपूर, धुळे.
(सामनेवाला नं.१ ची नोटीस नं.२ वर बजवण्यात यावी.)- सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.आर.एन. अग्रवाल)
(सामनेवाले तर्फे – अॅड.श्री.वाय.एल. जाधव)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. सामनेवाले यांनी यंत्रमाग वीज जोडणी वैधतेबाबत मागितलेल्या दाखल्याची कृती बेकायदेशीर ठरवून मिळण्याबाबत तक्रारदार यांनी या मंचात सदरची तक्रार दाखल केली आहे.
- , यंत्रमाग वीज जोडणीबाबत तक्रारदार यांनी सादर केलेला ना हरकत दाखला महापालिकेने दिलेला नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे यंत्रमाग वैधतेबाबत महापालिकेचा वैध ना हरकत दाखला तीन दिवसाच्या आत सादर करावा अन्यथ विजपुरवठा खंडीत करण्यात येईल.
सामनेवाले यांनी पाठविलेले हे पत्र बेकायदेशीर व चुकीचे आहे.असा दाखला मागण्याचा सामनेवाले यांना अधिकार नाही. संबंधित दाखल्याबाबत मनपाची तक्रार नाही व मनपाने कोणतीही कारवाई केलेली नाही. मनपाने सामनेवाले यांना यासंदर्भात कोणती माहिती दिली हे सामनेवाले यांनी तक्रारदारास कळू दिलेले नाही. तक्रारदार यांना बाजू मांडण्याची संधी दिलेली नाही, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सामनेवाले यांचे वरील पत्रच बेकायदेशीर असून ते रद्द करून मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. सामनेवाले यांच्याकडून मानसिक त्रासाबद्दल रूपये २५,०००/- आणि तक्रारीचा खर्च रूपये १०,०००/- मिळावा अशी मागणीही तक्रारदार यांनी केली आहे.
- , ऑक्टोबर २०१० ते सप्टेंबर २०११ या कालावधीतील वीज आदी देयके आणि कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले यांनी मंचात हजर होवून आपला खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटया दस्तऐवजावर दाखल आहे. यंत्रमाग किंवा चक्कीसाठी वीज जोडणी देण्यापूर्वी महापालिकेचा ना हरकत दाखला आवश्यक असतो. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे खोटा दाखला देवून वीज पुरवठा घेतला आहे. महापालिकेच्या पत्र क्र.धुनपा/नर/९७६/१०-११ दि.०३/०२/२०११ या पत्रावरून हा दाखला खोटा असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतरच सामनेवाले यांनी दि.२७/०९/२०११ च्या पत्रान्वये तक्रारदार यांच्याकडून खुलासा मागविला होता. सामनेवाले यांची ही कृती कायदेशीर असून त्याविरूध्द या मंचात दाद मागता येत नाही. तक्रारदार यांची तक्रार सेवेत कमतरता या सदरात बसत नाही, त्यामुळे सदर तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
५ तक्रारदार व सामनेवाले यांच्या विद्वान वकिलांना युक्तिवादासाठी वेळोवेळी सुमारे बारा तारखांना संधी देण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांनी युक्तिवाद केलेला नाही. म्हणून तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्र, सामनेवाला यांचा खुलासा यावरून आमच्या समोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात. त्यांची उत्तरेही आम्ही सकारण देत आहोत.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी बेकायदेशीर कृती केली आहे
हे स्पष्ट होते काय ? नाही
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
६. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी त्यांच्या यंत्रमाग या गृहउद्योगासाठी सामनेवाले यांच्याकडून विजपुरवठा घेतलेला आहे. त्यासंदर्भात सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी वीज देयके दिलेली आहे. त्या देयकांच्या छायांकीत प्रती तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केल्या आहेत. ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे स्प्ष्ट होते. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा ‘ब’- तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून दि.१९/१०/२००४ पासून विजपुरवठा घेतलेला आहे. त्याबाबत सामनेवाले यांनी वेळोवेळी दिलेली देयकेही तक्रारदार यांनी भरलेली आहेत. तक्रारदार यांचा विजपुरवठा यंत्रमाग या गृहउद्योगासाठी आहे, ही बाब तक्रारदार आणि सामनेवाले दोघांनीही नाकारलेली नाही. तथापि सामनेवाले यांनी दि.२७/०९/२०११ रोजी पाठविलेले पत्र आणि त्यासोबत विजपुरवठा खंडीत करण्याचा दिलेला इशारा ही कृती बेकायदेशीर असल्याचे तक्रारदार यांचे मुख्य म्हणणे आहे.
या मुद्यावर खुलासा करतांना सामनेवाले यांनी आपल्या कैफयतीत म्हटले आहे की, तक्रारदार यांनी यंत्रमाग या गृहउद्योगासाठी विजपुरवठा घेतलेला आहे. यंत्रमाग आणि चक्कीसाठी विजपुरवठा घेतांना त्यासाठी महापालिकेचा ना हरकत दाखला सादर करणे आवश्यक असते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे महापालिकेचा ना हरकत दाखला सादर केला, मात्र हा दाखला खोटा, बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रारदार यांना दि.२७/०९/२०११ चे पत्र पाठविण्यात आले व त्यावर खुलासा मागविण्यात आला. सामनेवाले यांनी दि.२७/०९/२०११ च्या पत्रात महानगरपालिकेच्या पत्र क्र. धुनपा/नर/९७६/१०-११ दि.०३/०२/२०११ या पत्राचा संदर्भ दिला आहे. तक्रारदार यांनी पत्र मिळाल्यापासून तीन दिवसाच्या आत यंत्रमागाच्या वैधतेबाबत खुलासा न केल्यास विजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला होता. त्यावर तक्रारदार यांनी या मंचात तुर्तातुर्त मनाई हुकूमाचा अर्ज करून तुर्तातुर्त मनाई हुकूम मिळविला होता.
तक्रारदार यांनी उपस्थित केलेला मुददा आणि त्यावर सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा पाहता, तक्रारदार यांनी विजपुरवठा मिळवितांना सादर केलेला महापालिकेचा ना हरकत दाखला खोटा, बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतरच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पत्र पाठवून खुलासा मागविल्याचे दिसून येते.
यंत्रमाग, चक्की यासाठी वीज जोडणी घेतांना महापालिकेचा ना हरकत दाखला सादर करणे आवश्यक असते असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. त्यावर तक्रारदार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे सामनेवाले यांचे म्हणणे योग्य आहे असे आम्हांला वाटते.
कोणत्याही उद्योगासाठी, व्यवसायासाठी, निवासस्थानासाठी विजपुरवठा घेतांना तो उद्योग, व्यवसाय किंवा निवासस्थान अधिकृत आहे, नोंदणीकृत आहे याबाबतचा दाखला वीज कंपनीकडे सादर करणे हे नियमाला धरून किंवा कायद्याला अभिप्रेत आहे असे आम्हांला वाटले. तक्रारदार यांनी त्यांच्या यंत्रमाग गृहउद्योगासाठी विजपुरवठा घेतांना सामनेवाले यांच्याकडे महापालिकेचा ना हरकत दाखला सादर केला. मात्र तो दाखला खोटा, बनावट असल्याचे महापालिकेनेच सामनेवाले यांना कळविले. ही बाबत निदर्शनास आल्यानंतरच सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडे खुलासा मागितला आणि यंत्रमाग वैधतेबाबत दाखला सादर करण्यास सांगितले.
सामनेवाले यांची ही कृती बेकायदेशीर आहे, याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी मंचासमोर आणला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या दि.२७/०९/२०११ च्या पत्रावर कोणताही खुलासा, स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याचबरोबर तक्रारदार यांनी त्यांनी विजपुरवठा घेतेवेळी सादर केलेला महापालिकेचा ना हरकत दाखला वैध आहे, याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे सामनेवाले यांची कृती त्यांच्या नियमाला धरून आणि कायद्याला अभिप्रेत अशीच आहे असे आम्हांला वाटते.
तक्रारदार यांनी सदरची तक्रार सेवेत कमतरता या सदराखाली दाखल केली आहे. तथापि सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडे ज्याबाबतच्या खुलाशाची मागणी केलेली आहे ती मागणी पाहता आणि सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेले दि.२७/०९/२०११ चे पत्र पाहता तक्रारदार यांची तक्रार सेवेत कमतरता या सदरात बसत नाही असे आम्हांला वाटते. दि.२७/०९/२०११ चे पत्र देवून सामनेवाले यांनी कशा प्रकारची सेवेत कमतरता केली आहे हे तक्रारदार सिध्द करू शकलेले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिलेला आहे. मात्र तक्रारदार यांनी यंत्रमाग वीज जोडणीबाबत वैध दाखला तीन दिवसात सादर न केल्यास विजपुरवठा खंडीत केला जाईल असे सामनेवाले यांनी म्हटले आहे. यावरून सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वैध दाखला सादर करण्याची संधी दिली नाही असे म्हणता येणार नाही.
वरील मुद्यांचा विचार करता सामनेवाले यांची कृती बेकायदेशीर आहे हे स्पष्ट होत नाही. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा ‘ड’ - वरील सर्व विवेचनाचा विचार करता तक्रारदार यांची तक्रार सेवेत कमतरता या सदरात बसत नाही असे आम्हांला वाटते. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
-
-
(श्री.एस.एस. जोशी)(सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.