Maharashtra

Nagpur

EA/115/2018

SHRI. SHYAM PRABHAKAR GAIKI - Complainant(s)

Versus

M. M. GANDHI, PARTNER OF GAYATRI BUILDERS - Opp.Party(s)

NAMRATA R. SATFALE (GHODE)

09 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Execution Application No. EA/115/2018
( Date of Filing : 28 Sep 2018 )
In
Complaint Case No. CC/10/260
 
1. SHRI. SHYAM PRABHAKAR GAIKI
R/O. ZENDA CHOWK, MAHAL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SAU SANDHYA SHYAM GAIKI
R/O. ZENDA CHOWK, MAHAL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Appellant(s)
Versus
1. M. M. GANDHI, PARTNER OF GAYATRI BUILDERS
R/O. PLOT NO. 209, GAYATRI SAHANIWAS, RESHIMBAG, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 09 Jan 2020
Final Order / Judgement

 

(आदेश पारीत व्‍दारा- मा. सुभाष रा. आजने, मा. सदस्‍य)

  1. प्रस्‍तुत दरखास्‍त गैरअर्जदार यांचे विरुध्‍द त्‍याने मंचाचे आदेशाचे पालन केले नाही म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २५ अंतर्गत दाखल करण्‍यात आली आहे.
  2. अर्जदाराने गैरअर्जदार  विरुध्‍द ग्राहक तक्रार १०/२६० मंचात दाखल केली होती. त्‍या तक्रारीमध्‍ये मंचाने दिनांक ४/५/२०१२ ला आदेश पारीत करुन तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करतांना विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आदेशीत केले होते की,
  1. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराला देणे असलेली रुपये ९१,०१५/- ही रक्‍कम धनाकर्षाद्वारे आदेश प्राप्‍त झाल्‍यापासुन २ महिण्‍याच्‍या आत मंचात जमा करावी  व त्‍याबाबतची सूचना गैरअर्जदाराला द्यावी. गैरअर्जदाराने अशी सूचना प्राप्‍त होताच तक्रारकर्त्‍यास वादग्रस्‍त मालमत्‍तेचे विक्रीपञ नोंदवून द्यावे. विक्रीपञात काही वाढीव खच लागल्‍यास त्‍याची जबाबदारी गैरअर्जदार याची राहील.
  2. गैरअर्जदाराने आदेश प्राप्‍त झाल्‍यापासुन दोन महिण्‍याच्‍या आत सदर इमारतीमध्‍ये लिफ्ट बसवून द्यावे.
  3. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारीरीक ञासापोटी गैरअर्जदाराने रुपये १०,०००/- आणि तक्रारीचा खर्च रुपये २,०००/- द्यावे. तक्रारकर्ते सदर रक्‍कम गैरअर्जदारास देय असलेल्‍या रकमेतून समायोजित करु शकतात.

 

  1. सदर आदेशाविरुध्‍द गैरअर्जदाराने मा. राज्‍य ग्राहक आयोग मुंबई, परिक्रमा खंडपीठ नागपूर येथे अपील क्रमांक FA/12/356 अन्‍वये अपील दाखल केले होते. मा. राज्‍य ग्राहक आयोग मुंबई, परिक्रमा खंडपीठ नागपूर यांनी दाखल अपील क्रमांक FA/12/356 मध्‍ये दिनांक १७/११/२०१४ ला खालिलप्रमाणे आदेश पारीत केला.
  1. The appeal is partly allowed.
  2. The  impugned order is modified as follows

The appellant to execute sale-deed of the flat No. 402 in favour of the respondent, in the span of one month from the date of receipt of copy of  this order and withdraw the amount deposited by the respondent in the Forum. The registration charges of the  sale deed be borne by the respondent.

  1. The appellant to fit the lift in the building in the span of three months from the date of this order and provide water and electric meter.
  2. Appellant not to pay Rs. 10,000/- as compensation and Rs. 2,000/- as cost.
  1. मा. राज्‍य ग्राहक आयोग मुंबई, परिक्रमा खंडपीठ नागपूर यांनी अपील क्रमांक FA/12/356 मध्‍ये दिनांक २७/११/२०१४ रोजी पारीत केलेल्‍या आदेशाचे पालन दिलेल्‍या ३० दिवसाचे मुदतीत गैरअर्जदार यांनी केले नाही. तक्रारकर्त्‍याने मा. मंचाचे दिनांक ४/५/२०१२ चे आदेशान्‍वये रुपये ७९,०१५/- मंचामध्‍ये दिनांक ७/८/२०१२ ला जमा केले. त्‍यानंतर मा. राज्‍य ग्राहक आयोग, परिक्रमा खंडपीठ नागपूर  यांनी अपील क्रमांक FA/12/356 मधील दिनांक २७/११/२०१४ रोजीच्‍या आदेशान्‍वये रुपये १२०००/- धनाकर्षाद्वारे दिनांक १६/१२/२०१४ ला मंचामध्‍ये जमा केले. तक्रारकर्त्‍याने आदेशान्‍वये संपूर्ण रक्‍कम जमा करुनही गैरअर्जदाराने आदेशाप्रमाणे तक्रारकर्त्‍याला सदनिकेतील फ्लॅट नंबर ४०२ चे विक्रीपञ तक्रारकर्त्‍याला करुन दिले नाही. त्‍यानंतर गैरअर्जदाराने मा. राज्‍य ग्राहक आयोग मुंबई, परिक्रमा खंडपीठ नागपूर यांचे आदेश विरुध्‍द मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, दिल्‍ली येथे अपील दाखल केले होते परंतू मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने गैरअर्जदाराचे अपील खारीज केले. तसेच मा. सुप्रिम कोर्टात दाखल केलेली एस.एल.पी. सुद्धा खारीज करण्‍यात आली. गैरअर्जदाराने मंचाचे आदेशाची अवमानना केली त्‍यामुळे अर्जदारास प्रस्‍तुत दरखास्‍त मंचासमोर दाखल करावी लागली.
  2. अर्जदाराने सदर दरखास्‍त अर्ज सादर करुन दिनांक ४/५/२०१२ चे ग्राहक तक्रार क्रमांक २६०/२०१० मधील आदेशान्‍वये गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला सदनिका  क्रमांक ४०२ चे विक्रीपञ करुन देण्‍याचे निर्देश द्यावे. जर गैरअर्जदार CC/260/2010 मधील दिनांक ४/५/२०१२ चे आदेशान्‍वये तक्रारकर्त्‍याला सदनिका क्रमांक ४०२ चे विक्रीपञ करुन देण्‍यात अपयशी ठरला तर प्रबंधक यांना सदनिका क्रमांक ४०२ चे विक्रीपञ करुन देण्‍याचे निर्देश द्यावे.
  3. अर्जदाराची दरखास्‍त दाखल झाल्‍यानंतर गैरअर्जदारास मंचामार्फत दिनांक १९/१०/२०१८ च्‍या आदेशान्‍वये नोटीस पाठविण्‍यात आली. गैरअर्जदाराला नोटीस प्राप्‍त होऊनही गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले नाही. करीता मंचाने गैरअर्जदार विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ३१/१२/२०१८ ला पारीत केला.
  4. प्रस्‍तुत दरखास्‍त प्रकरणातील मुळ ग्राहक तक्रार क्रमांक २६०/२०१० मधील दिनांक ४/५/२०१२ रोजीचे आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी  तसेच विरुध्‍द पक्षाने मंचाचे आदेशाचे पालन न केल्‍यामुळे अर्जदाराचा दरखास्‍त अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम २५ नूसार मंजूर होण्‍यास पाञ आहे. अर्जदाराची दरखास्‍त ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम २५ नूसार मंजूर करुन खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

 

  1. अर्जदाराची दरखास्‍त पुढील निर्देशासह मंजूर करण्‍यात येते.
  2. प्रबंधक, जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी मौजा नागपूर, भुमापन क्रमांक १७२, शिट नंबर २९८, प्‍लॉट नंबर २०९, I.A.& I.B.Scheme, Reshimbag Lay Out, Ward No. 13, House No. 1013 , तह. जिल्‍हा नागपूर येथील अपार्टमेंट मधील चौथ्‍या माळ्यावरील वादातील सदनिका क्रमांक ४०२ चे विक्रीपञ नोदंणी तक्रारकर्त्‍याचे नावे करुन द्यावे. तक्रारकर्त्‍याने सदनिका विक्री पञ नोंदणी खर्च स्‍वतः सोसावा.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.