// कारणमिमांसा //-
6. मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रार अर्जातील तक्रारकर्त्याचे म्हणणे विचारात घेतले असतांना असे दिसते की, त्याचा हा तक्रार अर्ज विरुध्द पक्षातर्फे श्री. माणिकराव वैद्य यांचेसोबत फार्म हाऊस नं.202 व 203 बाबत केला होता. परंतु श्री. माणिकराव वैद्य यांनी त्या कराराची पुर्तता केली नाही, तसेच श्री. माणिकराव वैद्य यांचा मृत्यूनंतर त्यांची पत्नी श्रीमती सिमा वैद्य यांनी सुध्दा त्या कराराची पुर्तता केली नाही. या बाबी साबीत करण्यासाठी तक्रारकर्त्याने जे दस्त दाखल केले त्यावरुन ते सिध्द झाले की नाही हे पाहावे लागेल. तक्रारकर्त्याने दाखल केलेला सभासदत्व स्विकारण्याचा अर्ज तसेच जी रक्कम श्री. माणिकराव वैद्य यांना दिली त्याबद्दलच्या पावत्या व करारनामा, खरेदीखत पाहता असे दिसते की, तो व्यवहार भुखंड क्र.202 व 203 चा असुन फार्म हाऊस संबंधाने नव्हता. झालेला व्यवहार हा फार्म हाऊस संबंधाने होता हे दर्शविणारा कोणताही दस्त तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. दि. 24.10.2001 च्या खरेदीखतावरुन देखिल हे सिध्द होते, जर श्री. माणिकराव वैद्य यांचेसोबत झालेला व्यवहार हा भुखंडाबाबतचा होता व खरेदीखतानुसार त्या भुखंडाचा ताबा तक्रारकर्त्यास देण्यांत आला होता, असे असतांनाही जेव्हा या बाबत तक्रारकर्त्यास माहित असतांना सुध्दा त्यानं हा व्यवहार हा फार्म हाऊसचा होता असे कथन कश्याच्या आधारे केले त्याचे आकलन होत नाही. दि.24.10.2001 रोजी भुखंडाचे खरेदीखत करुन देतांना तक्रारकर्त्याने त्याबाबत काही आक्षेप नोंदविला होता काय याबाबतचे निवेदन तक्रारकर्त्याने तक्रार अर्जात केले नाही. सन 2001 नंतर तक्रारकर्त्याने दि.22.11.2013 रोजी प्रथमतः नोटीस पाठविली त्यामुळे तक्रार अर्ज हा मुदतीत नसल्याचे निष्पन्न निघते.
7. एम.के. हाऊस रियल इस्टेट, नागपूर यांचे प्रोप्रायटर श्री. माणिकराव वैद्य यांचे सोबत तक्रारकर्त्याचा भुखंड खरेदीचा व्यवहार झाला होता. त्यांचे मृत्यूनंतर तक्रारकर्त्याने हे प्रकरण दाखल करुन श्री. माणिकराव वैद्य यांची पत्नी श्रीमती सिमा वैद्य यांना प्रोप्रायटर असल्याचे दाखविले. सौ सिमा वैद्य यांनी हे नाकारले की, त्या एम.के. हाऊस रियल इस्टेट, नागपूरच्या प्रोप्रायटर आहे. तसेच त्यांचे पती मयत श्री. माणिकराव वैद्य यांचेसोबत तक्रारकर्त्याचा जो व्यवहार झालेला होता त्याबद्दल त्यांना माहित होते. अश्या परिस्थितीत तक्रारकर्त्याने श्री. माणिकराव वैद्य यांच्या मृत्यूनंतर सिमा वैद्य यांना प्रोप्रायटर होत्या हे साबीत करणे आवश्यक होते, परंतु त्यांनी ते साबीत केले नाही.
8. वरील बाबी विचारात घेता हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने जो व्यवहार श्री. माणिकराव वैद्य यांचेसोबत केला होता जो भुखंडाचा होता ही बाब तक्रारकर्त्यास ज्ञात होती. असे असतांना कोणत्याही आधाराशिवाय तो व्यवहार फार्म हाऊसचा होता असे कथन करुन तक्रारकर्त्याने हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे, ही चूक त्याने अजाणतेपणे केली असे दिसत नाही व तसे केल्याने विरुध्द पक्ष यांना कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय या प्रकरणात सामील केल्याने या प्रकरणात हजर होऊन प्रकरण चालवावे लागले. त्यामुळे विरुध्द पक्षांचे कथन असे की, तक्रार अर्ज खर्चासह खारिज करण्यांत यावा.
9. वरील विवेचनावरुन असा निष्कर्ष काढण्यांत येतो की, तक्रार अर्ज हा मुदतीत नसुन तो मंचापुढे चालविण्यास समर्थनिय नाही. सबब मुद्दा क्र. 1 व 2 ला नकारार्थी उत्तर देऊन तो खालिल आदेशानुसार नामंजूर करण्यांत येतो.
-// आ दे श //-
1. तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करण्यांत येतो.
2. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना खर्चाची रक्कम रु.2,000/- (रु.दोन हजार फक्त) द्यावे.
3. तक्रारकर्त्याने तक्रार अर्ज योग्य कारणाशिवाय दाखल केलेला असल्याने व तो नामंजूर करण्यांत आला असल्याने रु.5,000/- (रु.पाच हजार फक्त) या मंचाच्या आदेशाचे तारखेपासुन 30 दिवसांचे आंत जमा करावी, ती रक्कम तक्रारकर्त्याने मुदतीत न भरल्यास या मंचाच्या प्रबंधकांनी वसुलीसाठी योग्य ती कारवाई करावी व रक्कम वसुल झाल्यावर ग्राहक सहाय्यता निधीत जमा करावी.
4. उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
5. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.