Maharashtra

Nagpur

CC/09/621

Vyanktesh Thieaters Pvt. Ltd. - Complainant(s)

Versus

M S E D Co.Ltd, Nagpur - Opp.Party(s)

ADV.JAYESH VORA

31 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/09/621
 
1. Vyanktesh Thieaters Pvt. Ltd.
Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M S E D Co.Ltd, Nagpur
Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:ADV.JAYESH VORA, Advocate for the Complainant 1
 ADV.A.M.KAZI, Advocate for the Opp. Party 1
ORDER

-आदेश-

(पारित दिनांक - 31  मार्च 2012)

1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अशी आहे की, तक्रारकर्ते हे कंपनी एक्‍टच्‍या अंतर्गत खाजगी व्‍यवसाय करुन, चित्रपट व्‍यवसाय करतात. त्‍याकरीता त्‍यांनी गैरअर्जदाराकडून विज पुरवठा घेतलेला आहे. त्‍यांना 11348 युनिटच्‍या विज वापराचे रु.96,070/- चे देयक 23.07.2009 गैरअर्जदाराकडून मिळाले. त्‍यामुळे त्‍यांनी सदर तक्रार दाखल केलेली होती. सदर देयक हे चुकीचे घोषित करुन रद्द करावे आणि दुरुस्‍त करुन देण्‍यात यावे, शारिरीक व मानसिक त्रासाकरीता भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केलेली आहे.

2. गैरअर्जदारांनी नोटीसवर हजर होऊन लेखी उत्‍तर दाखल करुन विपरीत विधाने नाकबूल केली. मुख्‍य आक्षेप हा आहे की, तक्रारकर्ती ही एक नफा कमविणारी कंपनी आहे व व्‍यवसायिक उपयोगाकरीता विज पुरवठा ते गैरअर्जदाराकडून घेत आहे. थोडक्‍यात गैरअर्जदाराकडून घेतलेली सेवा व्‍यावसायिक उपयोगाची आहे आणि म्‍हणून तक्रारकर्ता  ग्रा.सं.का. अंतर्गत ग्राहक ठरत नाही. त्‍यामुळे या मंचास सदर तक्रार चालविण्‍याचे आधिकार नसल्‍याने तक्रार खारिज करण्‍यात येते.

3. तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीचे परिच्‍छेद क्र.  1 मध्‍ये नमूद केले आहे की, तक्रारकर्ती ही एक कंपनी कायद्याखाली खाजगी कंपनी म्‍हणून नमूद आहे. ते चित्रपट दर्शविण्‍याचा व्‍यवसाय करतात. त्‍यांच्‍या तर्फे व्‍यावसायिक संचालकांनी तक्रार दाखल केलेली आहे. सदर सेवा ही व्‍यावसायिक कारणाकरीता घेतलेली असल्‍यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदारांचा ग्राहक ठरत नाही. म्‍हणून मंचाला सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकार क्षेत्र नाही.

-आदेश-

1) तक्रारकर्त्‍यांची तक्रार खारीज करण्‍यात येते. तक्रारकर्ते आपला वाद सोडवून घेण्‍याकरीता योग्‍य त्‍या न्‍यायालयात जाण्‍यास मुक्‍त आहे.

2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्‍वतः सोसावा.

 

 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.