Pratap Devidas Surywanshi filed a consumer case on 27 Jan 2015 against M S E D C L in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/14/315 and the judgment uploaded on 12 Mar 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद
________________________________________________________________________________________________
ग्राहक तक्रार क्रमांक :-315/2014
तक्रार दाखल तारीख :-15/07/2014
निकाल तारीख :- 27/01/2015
________________________________________________________________________________________________
श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष
श्रीमती संध्या बारलिंगे,सदस्या श्री.के.आर.ठोले,सदस्य.
________________________________________________________________________________________________
प्रताप देविदास सुर्यवंशी,
रा. प्लॉ ज.214, एन-3, सिडको, औरंगाबाद …….. तक्रारदार
विरुध्द
1. महराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी डिस्टीब्यूटर कं.लि.,
मार्फत – इंजिनिअर ( ग्रामीण ऑफिस),
ऑफिस अॅट – निअर बस स्टेशन ता.जि.औरंगाबाद
2. हेड कस्टमर सर्व्हिस सेल जीटीएल लि.,
टेक्नॉलौजी पार्क इंडिया, चिकलठाणा,
एमआयडीसी एरिआ, औरंगाबाद ........ गैरअर्जदार
________________________________________________________________________________________________
तक्रारदारातर्फे – अॅड. आनंद मामिडवार
गैरअर्जदार 2 तर्फे – अॅड. श्रीकांत कुलकर्णी
________________________________________________________________________________________________
निकाल
(घोषित द्वारा – श्रीमती. संध्या बारलिंगे, सदस्या)
तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्ये दाखल केली आहे.
तक्रारदार हा गैरअर्जदार कंपनीचा ग्राहक आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 490012742719 असून मीटर क्रमांक 931563 आहे. तक्रादार हा नियमित बिल भरत होता. गैरअर्जदाराने दि.20/10/13 रोजी रु.10820/- इतके वाढीव बिल दिले. गैरअर्जदाराने चुकीचे रीडिंग घेऊन वाढीव बिल दिले आहे. तक्रारदाराने अनेक वेळा तक्रार केली परंतु गैरअर्जदाराने प्रतिसाद दिला नाही. मीटरचे फोटो न घेता तक्रारदारास faulty बिल दिले आहे. दि.15/1/14 रोजीच्या मीटर रीडिंगमध्ये मागील रीडिंग 08 इतके आहे. तक्रारदाराने सदरील वाढीव बिले रद्द करून सुधारित विद्युत बिल देण्याची विनंती केली आहे. तसेच नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्रं 1 यांना नोटिस मिळून देखील ते गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरुद्ध एकतर्फा आदेश पारित करण्यात आले आहे.
गैरअर्जदार क्रं 2 यांनी लेखी जवाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध ‘नो से’ चा आदेश पारित करण्यात आला.
तक्रारदाराने डिसेंबर 2011 ते डिसेंबर 2013 पर्यंतचे विद्युत देयके दाखल केली आहेत. तक्रारदारास देण्यात आलेला विद्युत पुरवठा दि.30/4/11 पासून आहे. त्यांच्या जुन्या मिटरचा क्रमांक 0500931563 हा होता. जानेवारी 2012 मध्ये नवीन मीटर बसवले असून त्याचा क्रमांक 7656007456 असा आहे. गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या मिटरचे रीडिंग घेऊन विद्युत बिल आकारलेले नाही. त्याला देण्यात आलेली देयके सरासरी रीडिंग गृहीत धरून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष वीज वापर प्रती महिना किती आहे, याचे कोणतेही प्रमाण मंचासमोर दाखल नाही. तक्रारदाराने अनेक वेळा तक्रार केल्याचा पुरावा मंचासमोर दाखल आहे. तक्रारदाराच्या घरामध्ये नवीन विद्युत मीटर बसवल्यापासून आजवर किती वीज वापर झाला आहे, हे पाहण्याकरिता आमच्यासमोर कोणताही पुरावा दाखल नाही. गैरअर्जदारास नोटिस मिळूनही ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांचा जवाब मंचासमोर दाखल नाही. तक्रारदारास गैरअर्जदाराने दिलेली सर्व वीज बिले faulty status असलेली आहेत. त्यावरून प्रति महिना तक्रारदाराचा प्रत्यक्ष वीज वापर किती आहे, याचे काहीही बोध होत नाही. CPL चा उतारा किंवा संबधित कागदपत्र सादर केलेले नाहीत. प्रत्यक्ष वीज वापराचा कोणताही पुरावा आमच्या समोर नाही, परंतु गैरअर्जदाराकडे तक्रारदाराने अनेक वेळा तक्रार केल्याचा पुरावा मंचासमोर दाखल आहे. तक्रारदाराने अनेक वेळा तक्रार करून देखील गैरअर्जदाराने त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. उलटपक्षी दर महिन्याचे रीडिंग न घेता सरासरी वीज बिल देणे मात्र सुरू ठेवलेले आहे. त्यामुळे आमच्या मते, तक्रारदाराचा प्रति दिवस 1 यूनिट प्रमाणे विजेचा वापर झाला आहे असे गुहित धरून प्रति महिना 30 यूनिट वीज वापर झाल्याचे वीज बिल द्यावे.
वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
(श्रीमती संध्या बारलिंगे) (श्री.किरण.आर.ठोले) (श्री.के.एन.तुंगार)
सदस्या सदस्य अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.