नि का ल प त्र
श्री.सी.एम.येशीराव, सदस्यः विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांचा मुलगा मयत झाला त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारदार यांनी सदर तक्रार मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांची मौजे लोहगड ता.जि.धुळे येथील ग.नं.१८५/२-२, क्षेत्रफळ हे.०-६३ आर. ही शेतजमिन आहे. सदर शेतजमिनीत विहीर असून या विहिरीवर पुर्वीपासून इलेक्ट्रीक मोटर आहे. तक्रारदार यांचे वडील हरी मानजी महार यांचे नावाने विद्युत पुरवठा आहे. त्याचा ग्राहक क्र.०९१५२७०१२६९० असा आहे व तक्रारदार यांचे शेतात इलेक्ट्रीक वायरचे खांब सुध्दा आहे. सदर वहिरीवर बसवलेल्या पंपास विद्युत पुरवठयासाठी खांबाद्वारे वायर नेण्यात आलेल्या आहेत. त्या वायरी सैल होवून जमिनी लगत लोंबकळत असल्यामुळे तक्रारदाराने वेळोवेळी विरुध्द पक्ष यांच्या संबंधीत कार्यालयास कळवून लोंबकळणा-या विद्युत वायरी ताणून त्या जमिनीपासून उंच करण्याबाबत कळवलेले होते.
तक्रार क्र.१७९/१०
३. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, दि.२९/०८/०९ रोजी तक्रारदार यांचा मुलगा प्रवीण हा शेतात काम करीत असतांना दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान पाऊस चालू असतांना व शेतातील इलेक्ट्रीक वायरी लोंबकळत असल्यामुळे मुलगा प्रवीण शेतातील विहिरीजवळ गेला असता तेथे खांबाजवळ विद्युत प्रवाह हा जमिनीत उतरलेला असल्यामुळे त्यास लागलीच शॉक बसून तो खांबाच्या ताणाला चिकटला गेला व जागीच मयत झाला. सदर घटनेबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशनला से.डा.ई. व ४६/दि.२९/०८/०९ रोजी १८.३० वाजता नोंद झालोली आहे. सदर घटना विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे झालेली आहे. विरुध्द पक्ष यांच्याकडे तक्रारदार यांनी वेळोवेळी नुकसान भरपाईची मिळणेसाठी प्रयत्न केले परंतू त्यांनी चालढकल केली. म्हणून दि.१६/०१/१० रोजी वकिला मार्फत रजि.नोटीस पाठविली. परंतू त्यांनी नोटीसी प्रमाणे पुर्तता न करता खोटे-नाटे उत्तर पाठविले. सबब विरुध्द पक्षाकडून नुकसान भरपाईपोटी रु.१०,००,०००/- मिळावे व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून १२ टक्के व्याज मिळावे, तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
४ तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.९ व सातबारा उतारा, नि.१० वर विज बिल, नि.११ वर मृत्यु प्रमाणपत्र, नि.१२ ते १७ वर जबाब, नि.१८ वर मरणोत्तर पंचनामा, नि.२० वर शवविच्छेदन अहवाल, नि.२१ वर खबर, नि.२२ वर नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
५. विरुध्द पक्ष यांनी नि.३० वर लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यात त्यांनी तक्रारदार यांची तक्रार खोटी, चुकीची व बेकायदेशीर आहे. मयतास लोंबकळलेल्या तारांचा स्पर्श झालेला नाही. परस्पर नविन विहिरीवर केलेल्या अनधिकृत स्थलांतराच्या जमिनीवर पसरवलेल्या वाय/केबलच्या (४ ठिकाणी जोड असलेल्या) चा धक्का लागून मृत्यु झाला आहे. लोंबकळलेल्या तारांचा विजपुरवठा जमिनीत उतरु शकत नाही. तक्रारदारने विजचोरीचा प्रकार केल्याने विज चोरीचे बिल तक्रारदारने अदा केले आहे. विज चोरीमुळे तक्रारदारास तक्रारीचा हक्क नाही. सह.विद्युत निरिक्षक, धुळे यांनी केलेल्या दि.१३/०७/१० चे चैकशी अहवालानुसार अपघाताचे कारण संदिग्ध आहे असे नमुद केलेले आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षसाठी खालील मुद्दे उपस्थीत होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
तक्रार क्र.१७९/१०
मुद्दे उत्तर
१. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? नाही.
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? नाही.
३. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
७. मुद्दा क्र.१ – तक्रारदार यांनी महावितरणकडून विदयुत पुरवठा घेतला होता व त्यांचा ग्राहक क्र.०९१५२७०१२६९० आहे तसेच तक्रारदार यांचा मुलगा प्रविण हा दि.२९/०८/२००९ रोजी विजेचा शॉक लागून मयत झाला याबद्दलही वाद नाही. तक्रारदारयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी महावितरणाच्या कार्यालयात विजेच्या वायरी सैल होवून जमिनी लगत लोंबकळत आहेत असे कळवून त्या उंच करण्याबाबत कळवले होते. परंतू महावितरणच्या कर्मचा-यांनी त्या सुस्थितीत केल्या नाहीत. दि.२९/०८/०९ रोजी प्रविण शेतात काम करत असतांना दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान पाऊस चालू असतांना वायरी लोंबकळत असल्यामुळे विजेच्या खांबाजवळ विदयुत प्रवाह जमिनीत उतरला असल्यामुळे शॉक बसून तो खांबाच्या ताणाला चिकटला गेला व मयत झाला. सदर मृत्यु महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या कर्मचा-यांनी येऊन संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास सदर वायरी व्यवस्थीत केल्या व घटनेची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेची पोलिस स्टेशन, धुळे व विदयुत निरिक्षक यांनी केलेली आहे.
८. महावितरणने तक्रारदार यांनी कथित अपघातापुर्वी कंपनीचे नेर कार्यालयात तारांबाबत तक्रार दिल्याचे व त्या २/४ दिवसात ऊंच करु असे आश्वासन दिल्याचे नाकारले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी त्यांना मुळ ठिकाणी दिलेल्या कनेक्शन मधून अनधिकृतपणे ४५० ते ५०० फुटापावेतो पुर्वेकडे ४ ठिकाणी जोड असेलेले केबल वायर टाकून जमिनीवरुन विज प्रवाह नेला होता. त्याचे फोटोही दाखल केले आहेत. सदर जोड असलेल्या वायरचा धक्का लागून मृत्यु झाला आहे. विज चोरीचे बिलही तक्रारदाराने अदा केले आहे. यामध्ये महावितरणचा काहीही दोष नाही असे म्हटले आहे.
तक्रार क्र.१७९/१०
९. तक्रारदार यांनी महावितरणच्या वायरी लोंबकळत असल्यामुळे विज प्रवाह जमिनीत उतरला हे सिध्द करण्यासाठी स्वतःचे शपथपत्र, तसेच नि.५/४ वर अनंदा पवार, नि.५/५ वर सौ.शांताबाई भिल, नि.५/६ वर उखा भील आणि नि.५/७ वर तक्रारदाराच्या जबाबाच्या प्रती दाखल केल्या आहे. तसेच नि.५/१० वर एफ.आय.आर. ची प्रत, नोटीस, मरणोत्तर पंचनामा दाखल आहे.
१०. आम्ही सदर जबाबांचे आवलोकन केले आहे. नि.५/६ वर उखा मोर (भिल) यांनी महावितरणचे कर्मचारी तारा ओढून टाईट करत होते असे म्हटले आहे तर मोहन नेरकर यांनी सदर तारा जमिनीपासून १० ते १५ फुटावरच होत्या त्यामुळे दुर्घटना घडली असे म्हटले आहे. नि.५/१० वरील खबर मध्ये स्वतःचे शेतात पाण्याची मोटार सूरु करण्यास गेला असता त्यास इले. पाण्याच्या मोटारीचा शॉक बसल्याने त्यास मयत स्थितीत काका विपिनचंद नेरकर यांनी दवाखान्यात दाखल केले असा उल्लेख आहे.
११. महावितरणने सदर अपघाताची माहिती विदयुत निरिक्षक यांना देण्यात आली होतीव त्यांनी चौकशी करुन अहवाल दिला आहे. त्यात मृत्युचे कारण संदिग्ध आहे, सबब कारण स्पष्टपणे देऊ शकत नाही असे कळवले आहे. तसेच त्यांनी नि.१५/३ वर कनिष्ठ अभियंता नेर यांनी दिलेला अहवाल दाखल केला आहे. त्यात तक्रारदार यांनी विनापरवानगी विज प्रवाह अनधिकृत ठिकाणी नेल्याचे रेखाचित्र,नि.१५/९ वर कनिष्ठ अभियंता यांचा जबाब, नि.१५/१० वर लाईनमनचा जबाब, नि.१५/११ वर साहेबराव पाटील यांचा जबाब आणि नि.१५/१२ वर घटनास्थळाचे व विज प्रवाह नविन ठिकाणी नेलेल्या ठिकाणच्या फोटोच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत.
१२. तसेच आम्ही नि.१५/९, नि.१५/१० वनि.१५/११ वरील जबाबांचे अवलोकन केले आहे. त्यामध्ये तक्रारदारांचा मुलगा उघडया केबलवर पाय पडून मयत झाल्याचा उल्लेख आहे. श्री.साहेबराव पाटील हे प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी त्या ठिकाणी गेलेचे दिसून येते. त्यांनी म्हटले आहे की, मोहन नेरकर यांनी त्यांना त्या दिवशी ४ वाजता थांबवले. त्यानंतर दोघे घटनास्थळावर गेले त्यावेळी मयत हा निळया रंगाच्या केबल जवळ असलेल्या जॉईंट जवळ पडलेला होता. जुन्या विहीरीवर पाणी नसल्यामुळे नविन विहीरीकडे ४५० फुट केबल जोडून विजप्रवाह नेला होता. सदर प्रवाह बंद करुन प्रेत खंडू नेरकर (सर) यांच्या गाडीत धुळे येथे पाठवण्यात आले.
तक्रार क्र.१७९/१०
१३. महावितरणने नि.१५/२ वर १० फोटोच्या झेरॉक्स प्रतिही दाखल केल्या आहेत. त्या असपष्ट आहेत. त्यामध्ये विज प्रवाह नविन विहीरीकडे नेल्याचे दिसून येते. तसेच अभियंत्यांनी खालील प्रमाणे अहवाल दिलेला आहे.
Suspected eletrical fatal accident has occured Pravin Mohan Nerkar sun of Shri Mohan Hari Nerkar in his field where as pump conection No.Ag 73 is given (Detailed justification note is sepretly attached)
Justification Note
On Date 29/08/2009 at village Lohagad shiwad Tal. & Dis.Dhule in the filed of Shri Mohan Hari Nerkar where old Agriculture pump conection is given in the name of Shri Hari Manji Nerkar bearing coulsing No Ag 091527012690 suspected total electrical accident occured. It is observed that we well where conction used given was dry lhence no motor pumpset was lustalled. The said counsumer exavated new well about 400 to 500 ft long at east direction & shited his motor pumpset illegally on this new well. Coniver laid 3 phase 3 wire cable from main switch box of old well Ag conection to new well main switch box & a pumpset motor of new well with 4 to five pieces of differant cabels conection with open.
In the afternoon time son of landowe Shri Mohan Hari Nerkar i.e. Pravin (Ravindra) Hari Nerkar was working in this field got suspected electric shock due to his foot fallen on open joint of the said cable laid on ground about 25 to 30 away from old well in the direction of East. Due to his bare foot & open joint of cable contact victim got electricated.
१४. वरील सर्व कागदपत्रे, शपथपत्रे, जबाब, एफ.आय.आर. व विदयुत निरिक्षक यांचा अहवाल पाहता तक्रारदार यांचे म्हणणे की, वायरी लुज होत्या त्यामुळे विज प्रवाह जमिनीमध्ये उतरला व त्यात प्रविण मयत झाला हे मान्य करता येणार नाही. कारण वायर लोंबकळत असल्यामुळे विज प्रवाह जमिनीत उतरण्याची शक्यता राहत नाही. फार तर वायरमध्ये स्पार्किंग होऊन ठिणग्या पडू शकतात. तसेच तक्रारदाराने ज्या जबाबाच्या आधारे महावितरण दोषी आहे असे म्हटले आहे त्यापैकी वायर जमिनीवर पडली होती असे कुणाचेही म्हणणे नाही. तसेच एफ.आय.आर. नि.५/१० मध्ये मयत मोटार चालू करत असतांना करंट लागून मयत झाला असा उल्लेख आहे.
१५. उलट नि.१५/११ वर साहेबराव मोरे यांनी दिलेल्या जबाबामध्ये तथ्य आहे असे वाटते. कारण ते तक्रारदार मोहन नेरकर यांचे समवेत प्रेताजवळ जाणारे पहिले व्यक्ती होते. शिवाय कनिष्ठ अभियंता यांनी घटनेचे फोटो काढलेले आहेत. त्यामध्येही केबल जोडून विज प्रवाह ४५० ते ५०० फुट नेलेल्या वायरला ४ ठिकाणी
तक्रार क्र.१७९/१०
जोड असल्याचा उल्लेख आहे. विदयुत निरिक्षक यांनीही सदर घटनेस महावितरणला जबाबदार ठरवलेले नाही.
१६. या संदर्भात आम्ही मा.छत्तीसगड राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, रायपूर I (2011) CPJ 420 C.G.State Electricity Distribution Co.Ltd. & Anr. V/s D.Prakash Rao & Anr या न्यायिक दृष्टांताचा आधार घेत आहोत. त्यात पुढील प्रमाणे तत्व विषद करण्यात आले आहे.
Consumer Protection Act, 1986 – Section 2 (1) (g), Rules, 1956 – Rule 30 – Elecrticution – Death of son of complainant – Deficiency in service alleged – Forum directed appellant to pay compensation – Hence appeal – Report of Inspector found that complainant himself resposible for faulty connection of tullu pump, which became cause of death – police found neighbour of complaint responsible as he changed illegally service line of complainant – Duty of consumer to take care of supply line – Criminal matter against neighbour pending – No evidence to prove deficiency of service – Order set aside.
१७. या सर्व विवेचनावरुन महाविरणच्या विजेच्या तारा लोंबकळत असल्यामुळे विज प्रवाह जमिनीत उतरुन प्रविण मयत झाला हे सिध्द होऊ शकलेले नाही या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१८. मुद्दा क्र.२ – महावितरण यांनी विजेच्या वायर सुस्थितीत ठेवल्या नाहीत व त्यामुळे तक्रारदाराच्या मुलाचा मृत्यु झाला हे सिध्द होऊ शकलेले नाही असे आम्ही मुद्दा क्र.१ मध्ये म्हटले आहे. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. त्यामुळे मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१९. मुद्दा क्र.३ - वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो.
२. तक्रारदार व महावितरणने आपआपला खर्च सोसावा.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे