जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार क्र. 92/2011. आदेश पारीत तारीखः- 18/10/2013.
शिवाजी गोविंदा पाटील,
वय- सज्ञान,धंदा-शेती,
रा.मनुर बु, ता.बोदवड,जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
मॅनेजर,
एल अण्ड टी फायनान्स लि,
3 बी, लक्ष्मी टॉवर्स, सी-25, जी ब्लॉक,
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (इस्ट)
मुंबई 400 051. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदार आज रोजी मंचासमोर स्वतः हजर झाले व तक्रार बोर्डावर घेण्याबाबतचा अर्ज दाखल करुन सोबत तडजोड पुरसीस दाखल करुन तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेत कोर्टाबाहेर आपसात तडजोड झालेली असल्याने तक्रारदारास सदरची तक्रार पुढे चालविणे नाही असा विनंती अर्ज देऊन तक्रार निकाली काढावी अशी विनंती केली. सबब तक्रारदाराची तक्रार अंतिमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 18/10/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.