Maharashtra

Nagpur

CC/339/2017

Shanta Hardas Patil, through Power of Attorney holder Hardas Kisan Patil - Complainant(s)

Versus

Lotus Electronics Supermarket - Opp.Party(s)

Adv. D.P.Lalwani

24 Aug 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/339/2017
( Date of Filing : 09 Aug 2017 )
 
1. Shanta Hardas Patil, through Power of Attorney holder Hardas Kisan Patil
R/o. 136, Bajaj Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Lotus Electronics Supermarket
Platina Enclave, 13, Shivaji Nagar, Opp. Workhardt Hospital, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. HP India Sales Pvt. Ltd.
24, Salarpuria Arena, House Main Road, Adugodi, Bangalore 560030
Banglore
Karnataka
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Adv. D.P.Lalwani, Advocate for the Complainant 1
 ADV. FRANCIS KARAYIL, Advocate for the Opp. Party 1
 ADV. SONALI SAWARE/ GADHAVE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 24 Aug 2023
Final Order / Judgement

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारकर्ती ही इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी असुन तिने शिक्षणाकरिता दिनांक 5.1.2017 ला लोटस इलेक्ट्रॉनिक्स सुपर मार्केट येथुन रुपये 32,999/- इतक्या किमतीचा लॅपटॉप खरेदी केला त्याचा मॉडेल कं.15-ay020tu असा होता लॅपटॉप खरेदी करतेवेळी लॅपटॉप सिलबंद नव्हता. वि.प.क्रं.1 हे वि.प.क्रं.2 यांनी उत्पादीत केलेल्या लॅपटॉप चे विक्रेते आहेत.
  2. तक्रारकर्तीने लॅपटॉप वापरण्‍यास सुरुवात केली असता 15 दिवसात म्हणजेच दिनांक 5.2.2017 रोजी तक्रारकर्तीला असे लक्षात आले की, पावर बटन दाबल्यावर सुध्‍दा लॅपटॉप सुरु होत नव्हता म्हणुन तक्रारकर्तीने तक्रार अर्ज क्रं.4782252881  अन्वये कस्टमर केअरला तक्रार केली. वि.प.यांनी सव्हीस इंजिनिअरची नियुक्ती केली.  दिनांक 9.2.2017 ला आगरतळा येथुन ८९८९८ इंजिनीअर दुपारी 12 वाजता आले व त्यांनी लॅपटॉपचा मदरबोर्ड डिफेक्टीव असल्यामुळे त्याचे पार्ट बदलविण्‍याची आवश्‍यकता असल्याचे सुचविले परंतु तक्रारकर्तीने मदरबोर्ड बदलविण्‍यास नकार दिला कारण तक्रारकर्तीने 15 दिवसापूर्वीच लॅपटॉप विकत घेतला होता व त्यात गंभीर दोष निर्माण झाल्यामूळे तिला पैसे परत पाहिजे होते. त्यावर सव्हींस इंजिनीअरने कस्टमर केअरशी संपर्क करण्‍यास सांगीतले असता तक्रारकर्तीने दिनांक 11.2.2017 ला संपर्क केला असता तेथील टेक्नीकल सुपरव्हायझर यांनी तक्रारकर्तीला तक्रार अर्ज करण्‍याची मागणी केली. तक्रारकर्तीने सदर लॅपटॉप लोटस इलेक्टॉनिक्स यांचे कडुन दिनांक 5.1.2017 ला विकत घेतला परंतु तक्रारकर्तीने तक्रार केली असता वि.प.ने हाच लॅपटॉप अन्य दुस-याला यापूर्वीच म्हणजे दिनांक 22.10.2016 विकल्याची एचपी कस्टमर केअर मध्‍ये नोंद आहे असे तक्रारकर्तीला सांगण्‍यात आले. दिनांक 18.2.2017 ला तक्रारकर्तीला श्री धीरजकुमार राय,एच.पी.ग्लोबल यांचेकडुन फोन आला व तक्रारकर्तीला तक्रारीबद्दल विचारणा करण्‍यात आली असता तक्रारकर्तीने दिनांक 5.1.2017 ला लोटस इलेक्टॉनिक्स कडुन लॅपटॉप विकत घेतला व तो सिलबंद नव्हता परंतु असली असल्याचा वि.प.ने भरोसा दिला होता. परंतु लॅपटॉप विकत घेतल्यानंतर 15 दिवसांत असे दिसुन आले की, सदर लॅपटॉप अन्य दुस-या व्यक्तीला विकण्‍यात आला होता त्यांने तो विक्रेत्याला परत आणून दिला होता. त्यामूळे तक्रारकर्तीने लॅपटॉपची किंमत रुपये 32,999/- परत मिळण्‍याची मागणी केली. श्री धीरज कुमार रॉय यांनी तक्रारकर्तीला भरोसा दिला की, तक्रारकर्तीचे उचीत समाधान केले जाईल व तक्रारकर्तीला बिल पाठविण्‍याची मागणी केली त्यानुसार तक्रारकर्तीने दिनांक 18.2.2017 ला सदर बिल पाठविले. तक्रारकर्तीसमोर दिनांक 8.3.2017 ला लॅपटॉप बदलवुन देण्‍याचा प्रस्ताव मांडला असता सदर प्रस्ताव तक्रारकर्तीने अमान्य केला व रक्कमेची मागणी केली. तक्रारकर्तीने वि.प.क्रं.2 ला दिनांक 7.4.2017 रोजी नोटीस पाठवली असता वि.प.ने त्यांची दखल घेतली नाही म्हणुन सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन लॅपटॉपची किंमत रुपये 32,999/- परत मिळावे व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  3. वि.प.क्रं.1 ने आपले लेखी उत्तरात नमुद केले की, तक्रारकर्तीने लॅपटॉप हा वि.प.क्रं.1 यांचेकडुन दिनांक 5.1.2017 ला रुपये 32,999/- इतक्या रक्कमेत विकत घेतला. तक्रारकर्तीने तक्रारीतसोबत लॅपटॉप खरेदी बिल दाखल केले आहे त्यामध्‍ये लॅपटॉप सिलबंद नव्हता असे कुठेही नमुद नाही व त्याबाबतचा कुठलाही शेरा अथवा आक्षेप तक्रारकर्तीने लॅपटॉप घेतेवळी वि.प.क्रं.1 च्या विक्री कार्यकारी अधिकारी यांचेकडे नोंदविला नाही. त्यामूळे तक्रारकर्तीने लॅपटॉप मॉडेल हे सिलबंद नव्हते पुराव्यानिशी सिध्‍द करणे आवश्‍यक आहे. वि.प.क्रं.1 हा वि.प.क्रं.2 चा अधिकृत विक्रेता असुन तो कंपनीचे उत्पादन विकल्यानंतर सेवा देण्‍याचे काम करतो. तक्रारकर्तीने लॅपटॉप विकत घेतल्यानंतर तो तिने 15 दिवसा वापरला त्याच कालावधीत तिने कुठलीही तक्रार नोंदविली नाही. यावरुन हे सिध्‍द होते की, तक्रारकर्तीने वि.प.क्रं.1 यांचेकडुन लॅपटॉप घेतेवेळी सुस्थीती व दोष रहीत होता. लॅपटॉप मध्‍ये दोष आढळल्यास विक्री नंतरची सेवा पूरविण्‍याची जबाबदारी ही निर्मात्याची असते. तक्रारकत्यांने नमुद केल्याप्रमाणे दिनांक 9.2.2017 रोजी सेवा अभियंता यांनी लॅपटॉप पाहणी करुन सांगीतले की, लॅपटॉपचा मदरबोर्ड दोषपूर्ण आहे व तो बदलविण्‍याची आवश्‍यकता आहे अशा परिस्थीतीत वि.प.क्रं.2 हे सदर मदरबोर्ड बदलवून देण्‍यास जबाबदार आहेत. अशा परिस्थीतीत सेवा अभियंत्यांनी सदर भाग बदलवून देण्‍याची ईच्‍छा दर्शविली असतांना तक्रारकर्तीने तो भाग बदलवून घेऊन लॅपटॉप पूर्ववत करुन घेणे अपेक्षीत होते पंरतु तक्रारकर्तीने सदरहू लॅपटॉप भाग बदलविण्‍यास नकार दिला व यांस कोणतेही संयुक्तीक कारण कळत नाही.
  4. वि.प. क्रं.1 ने सदर लॅपटॉप दुस-या व्यक्तीला विकल्याचे वि.प.क्रं.2 च्या ग्राहक सेवा केन्द्रात नमुद आहे. हे म्हणणे सर्वस्वी खोटे आहे आणि वि.प.क्रं.1 ला तक्रारीत गोवण्‍यासाठी हेतुपुरस्सर पक्षकार करण्‍यात आले आहे. कुठल्याही कंपनीने उत्पादन विकल्यानंतर त्याचा मॉडेल क्रमांक नमुद करुन विक्री बिल तयार करण्‍यात येते व त्यांची स्टॉकवहीत नोंद घेतल्या जाते व त्याबाबतची माहिती कंपनीला दिली जाते. त्यामूळे तकारकर्तीने दिनांक 22.10.2016 ला ज्या व्यक्तीला सदर लॅपटॉपची विक्री करण्‍यात आली होती त्याबाबतचे कागदपत्रे तक्रारीसोबत  दाखल करणे गरजेचे होते.
  5. वि.प.कं.2 यांनी तक्रारकर्तीला लॅपटॉप मधील भाग बदलवुन दुरुस्ती करुन देण्‍याचे आश्‍वासीत केल्यावरही तक्रारकर्तीने दिनांक 7.4.2017 ला वि.प.क्रं.1 ला नोटीस पाठवून त्याव्दारे लॅपटॉपची किंमत रुपये 32,999/- व नुकसान भरपाईची मागणी केली. वि.प.क्रं.1 हा अधिकृत विक्रेता आहे व त्यांने उत्पादनाचे उत्तरदायित्वाचे व्यवस्थीत पालन केले आहे. त्यांमूळे वि.प.क्रं.1 विरुध्‍दची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.
  6. वि.प.क्रं.2 आपले लेखी उत्तरात नमुद करतात की, त्यांनी निर्मीत केलेल्या सर्व उत्पादनाचे त्यांचे अधिकृत सव्हीस सेंटर आणि अधिकृत चॅनेल पार्टनर यांचेव्दारे ग्राहकांना सेवा पूरविली जाते. तकारकर्तीने त्यांचे तक्रारीत कोणत्याही प्रयोगशाळेच्या अहवालावरुन अवलंबुन न राहता सदर लॅपटॉपमध्‍ये दोष आहे आणि सेवेमध्‍ये त्रुटी आहे असे आरोप केले आहे. तक्रारकर्तीने सदर लॅपटॉपमध्‍ये दोष असल्याचा कोणताही पूरावा दाखल केला नाही व सदर लॅपटॉप मध्‍ये निर्मीत दोष असल्याची बाब सिध्‍द करु शकली नाही.
  7. तक्रारकर्तीने दिनांक 5.1.2017 ला वि.प.क्रं.2 यांनी निर्मीत केलेला एच.पी.लॅपटॉप रुपये 32,999/- एवढया किमतीत वि.प.क्रं.11 यांचेकडुन विकत घेतला. तक्रारकर्तीने दिनांक 5.2.2017 ना vide case id 4782252881 आणि दिनांक 11.2.2017 ला vide case id 4782494996 अन्वये लॅपटॉप वर नो डिस्प्लेबाबत तक्रार केली होती. तक्रारकर्तीकडुन तक्रार प्राप्त होताच वि.प.चे सर्व्‍हीस टीमने तक्रारकर्तीची तक्रारची दखल घेतली व लॅपटॉपची तपासणी केल्यानंतर मदर बोर्डबाबत संशय होता त्यामूळे मदरबोर्ड बदलवुन देण्‍याची तयारी दर्शविली आणि वॉरन्टीच्या शर्ती व अटी नुसार तक्रार सोडविण्‍यात आली. परंतु तक्रारकर्ती त्याकरिता तयार नव्हती व लॅपटॉपची किंमत मिळण्‍याकरिता आग्रह करीत होती. तक्रारकर्तीने दिनांक 13.2.2017 व दिनांक 8.3.2017 ला vide case id 4782508454 व 47833338.39 अन्वये संपूर्ण लॅपटॉपची किंमत व नुकसान भरपाई मिळण्‍याबाबत तक्रार केली. तक्रारकर्तीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एक विशेष बाब म्हणुन तक्रारकर्तीला लॅपटॉप बदलवून देण्‍याची संधी दिली होती पंरतु तक्रारकर्तीने संधीचा फायदा घेतला नाही आणि लॅपटॉपच्या किंमतीची मागणी केली पंरतु वॉरन्टीच्या शर्ती व अटीनुसार ते देय नव्हते.  वि.प.क्रं.2 यांनी कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा न दिल्यामूळे वि.प.क्रं.2 यांचे विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे. 
  8. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे व तज्ञ अहवाल यांचे वाचन करता खालील मुद्दे विचारार्थ आले.

मुद्दे                          उत्तर

  1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ?           होय.
  2. वि.प.ने तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ?     होय.
  3. काय आदेश ?                              अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तकारदाराने वि.प.क्रं.1 यांचे कडुन वि.प.क्रं.2 यांनी निर्मीत केलेला लोटस सुपर मार्केट येथुन रुपये 32,999/- इतक्या किमतीचा लॅपटॉप खरेदी केला त्याचा मॉडेल कं. 15-ay020tu असा होता लॅपटॉप दिनांक 5.1.2017 रोजी विकत घेतल्याबाबत उभयपक्षात वाद नाही. तक्रारकर्तीने वि.प.कडुन विकत घेतलेला लॅपटॉप वि.प.ने तक्रारकर्तीला दिनांक 5.1.2017 ला विकण्‍यापूर्वी अन्य कुणाला दिनांक 22.10.2016 ला विकला होता व त्याबाबतची नोंद एच पी कस्टमर केअर मध्‍ये असल्याची तक्रार पूराव्या अभावी नाकारण्‍यात येत आहे. तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल तज्ञ अहवालानुसार लॅपटॉप मध्‍ये निर्मीती दोष असल्याचे स्पष्‍ट होते. परंतु तक्रारकर्तीने वि.पक्षाला दिनांक 13.2.2017 व दिनांक 8.3.2017 ला vide case id 4782508454 व 47833338.39 अन्वये केलेल्या तकारीनुसार तक्ररकर्तीने वॉरन्टी कालावधीमध्‍ये विकत घेतलेल्या लॅपटॉप मधील मदरबोर्ड बदलवून देण्‍याची वि.प.ची विनंती अमान्य केली तसेच लॅपटॉप बदलवुन नवीन लॅपटॉप देण्‍याची विनंती अमान्य केली त्यामूळे तक्रारकर्ती वि.प.कडुन लॅपटॉपची किंमत मिळण्‍यास पात्र आहे आयोगाचे स्पष्‍ट  आहे. परंतु तकारकर्तीची नुकसान भरपाईची मागणी अमान्य करण्‍यात येते. सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.क्रं.1 व 2 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला लॅपटॉपची किंमत रुपये 32,999/- (बत्तीस हजार नऊशे नव्व्यानऊ फक्त) अदा करावी.
  3. तकारकर्तीने वि.प.क्रं.1 व 2 कडुन लॅपटॉपची किंमत रुपये 32,999/- प्राप्त होताच तात्काळ तक्रारकर्तीने लॅपटॉप वि.प. यांना परत करावा.   
  4. खर्चाबद्दल आदेश नाही.
  5. उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.