Maharashtra

Nagpur

CC/88/2021

ANMOL ASHOK DONGRE THROUGH POWER ATTORNY ASHOK SADARAM DONGRE - Complainant(s)

Versus

LORD BUDDHA TELEVISION PVT. LTD. - Opp.Party(s)

ADV. PRAMOD N. KAMBLE

16 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/88/2021
( Date of Filing : 04 Feb 2021 )
 
1. ANMOL ASHOK DONGRE THROUGH POWER ATTORNY ASHOK SADARAM DONGRE
R/O. PLOT NO.267, SIDDHARTH NAGAR, TEKA, POST OFFICE DR. AMBEDKAR MARG, NAGPUR-440017
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. LORD BUDDHA TELEVISION PVT. LTD.
H.O. PRATHMESH VIHAR, 3RD FLOOR, SAMRAT ASHOK CHOWK, GRATE NAG ROAD, NEAR DAINIK BHASKAR PRESS, NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
2. BHAIYA KHAIRKAR, PRESIDENT, LORD BUDDHA TELEVISION PVT. LTD.
H.O. PRATHMESH VIHAR, 3RD FLOOR, SAMRAT ASHOK CHOWK, GRATE NAG ROAD, NEAR DAINIK BHASKAR PRESS, NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
3. SACHIN MOON, MANAGING DIRECTOR, LORD BUDDHA TELEVISION PVT. LTD.
H.O. PRATHMESH VIHAR, 3RD FLOOR, SAMRAT ASHOK CHOWK, GRATE NAG ROAD, NEAR DAINIK BHASKAR PRESS, NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
4. RAJU MOON, MANAGING DIRECTOR, LORD BUDDHA TELEVISION PVT. LTD.
H.O. PRATHMESH VIHAR, 3RD FLOOR, SAMRAT ASHOK CHOWK, GRATE NAG ROAD, NEAR DAINIK BHASKAR PRESS, NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. PRAMOD N. KAMBLE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 16 Mar 2022
Final Order / Judgement

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये  

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  विरुध्‍द पक्षाचा टीव्ही चॅनल प्रसारणाचा व्यवसाय आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक एक ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून विरुद्ध पक्ष क्रमांक दोन, तीन व चार हे अनुक्रमे अध्यक्ष व संचालक आहेत. विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला दिलेल्या माहितीनुसार तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षाच्‍या कंपनीत दिनांक 16.10.2012 रोजी रुपये1,00,000/- पावती क्रमांक 5 अन्वये पाच वर्षाकरिता द.सा.द.शे.18 टक्के व्याजदराने गुंतविली होती व सदरची रक्‍कम दिनांक 17.10.2017 ला व्‍याजासह मिळणार होती. त्‍यानंतर तक्रारकर्त्याने गुंतविलेली रक्‍कमेची मागणी केली असता विरुद्ध पक्षाने आर्थिक अडचणीचे कारण पुढे करून संपूर्ण रक्कम दिनांक 25.01.2019 पर्यंत परत करण्याचे आश्वासित केले.  तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षाला वारंवार गुंतविलेल्‍या रकमेची मागणी केल्यानंतर विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 30.05.2019 ला धनादेश क्रं. 549782 अन्‍वये रुपये 50,000/- व दिनांक 30.06.2019 ला धनादेश क्रमांक 549783 अन्‍वये रुपये 50,000/- चा चेक दिला होता, परंतु सदरचे धनादेश बँकेमध्ये वटविण्‍याकरिता सादर केल्यानंतर दोन्ही धनादेश अपु-या रक्‍कमे अभावी वटविण्यात आले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 4  यांच्‍या विरुद्ध दिनांक 27.12.2019 ला इमामवाडा पोलीस स्टेशन, नागपूर यांच्‍याकडे आर्थिक फसवणूक झाल्याबाबतची तक्रार दाखल केली, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.  म्‍हणून तक्रारकर्त्याने दिनांक 04.01.2021 ला विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावली. परंतु सदरची नोटीस Not Claimed या पोस्‍टाच्‍या शे-यासह परत आल्‍यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करून खालील प्रमाणे मागणी केली की, ...

1   विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 4 यांना निर्देश देण्यात यावे की, त्‍यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तपणे तक्रारकर्त्‍याला त्‍याची गुंतविलेली रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 16.10.2012 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत देण्‍याचा आदेश द्यावा.

2   मानसिक व शारीरिकत्रासा करिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च  देण्‍याचा ही आदेश करावा.

  1.      विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 4 यांना आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस refused (घेण्‍यास नकार) या पोस्‍टाच्‍या शे-यासह परत आली. त्‍यानंतर ही विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 4 आयोग समक्ष हजर झाले नाही. त्‍यामुळे विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 4 यांच्‍या विरुद्ध प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 22.10.2021 रोजी पारित करण्यात आला.
  1.      तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्ताऐवज व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

                          मुद्दे                          उत्तरे

1    तक्रारकर्ता विरुद्ध पक्षाचा ग्राहक आहे काय ?                      होय

2    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?        होय

3    विरुद्ध पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय?  होय

4    काय आदेश?                                 अंतिम आदेशानुसार

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत - तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षाच्‍या कंपनीत पावती क्रमांक 5 अन्वये  पाच वर्षाकरिता द.सा.द.शे.18 टक्के व्याजदराने रुपये 1,00,000/- दिनांक 16.10.2012 ला गुंतविले असल्‍याचे नि.क्रं.2(1) वर दाखल दस्तऐवजावरुन दिसून येते, यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्याने   विरुद्ध पक्षाकडे गुंतवलेल्या रकमेची दि. 17.10.2017 नंतर वारंवांर मागणी केली असता विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 30.05.2019 ला धनादेश क्रं. 549782 अन्‍वये रुपये 50,000/- व दिनांक 30.06.2019 ला धनादेश क्रमांक 549783 अन्‍वये रुपये 50,000/- चा चेक दिला होता, परंतु सदरचे दोन्ही धनादेश अपु-या रक्‍कमे अभावी वटविण्यात आले नसल्‍याचे नि.क्रं. 2(3 व 4) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते, अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे त्‍याची गुंतविलेली रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याची वारंवांर विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची रक्‍कम परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाची अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारकर्ता त्‍याची गुंतविलेली रक्‍कम व्‍याजासह विरुध्‍द पक्षाकडून परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 ते 4 यांना निर्देश देण्यात येते की,  विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 4 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्‍या तक्रारकर्त्याला रुपये 1,00,000/- व त्‍यावर दिनांक 16.10.2012 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 ते 4 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्‍या तक्रारकर्त्याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- अदा करावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांनी वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्‍याला परत कराव्‍या.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.