Maharashtra

Nagpur

CC/413/2019

SMT. REKHA DHANRAJ KHOBRAGADE - Complainant(s)

Versus

LORD BUDDHA TELEVISION LTD., THROUGH DIRECTOR, SHRI. SACHIN MOON - Opp.Party(s)

ADV. ROSHAN R. BAGADE

11 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/413/2019
( Date of Filing : 25 Jul 2019 )
 
1. SMT. REKHA DHANRAJ KHOBRAGADE
R/O. MAHALAXMI NAGAR NO. 3, PLOT NO. 146, LANE NO. 7, MANEWADA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. LORD BUDDHA TELEVISION LTD., THROUGH DIRECTOR, SHRI. SACHIN MOON
OFF. AT, PRATHMESH VIHAR, 3RD FLOOR, NEAR MAROTI SUZUKI SHOWROOM GREAT NAG ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. RAJU MOON
OFF. AT, PRATHMESH VIHAR, 3RD FLOOR, NEAR MAROTI SUZUKI SHOWROOM GREAT NAG ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 11 Jun 2020
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- मा. सुभाष रा. आजने, मा. सदस्‍य)

   

  1. तक्रारकर्ती यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-१९८६ चे कलम-१२ खाली विरुध्‍दपक्ष लॉर्ड बुध्‍दा टेलिव्‍हीजन प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे विरुध्‍द  गुंतवणूक केलेली रक्‍कम देय व्‍याजासह परत न केल्‍यामुळे दोषपूर्ण सेवे संबधाने ग्राहक मंचासमक्ष दाखल केली आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ हे लॉर्ड बुद्धा टेलिव्‍हीजन प्रायव्‍हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. विरुध्‍द पक्ष हे प्रसारण केंद्र असुन संपूर्ण भारतभर दुरदर्शनचे प्रसारण करीत असतात. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीशी संपर्क साधुन ५ वर्षाकरीता मुदतीठेव मध्‍ये रक्‍कम गुंतविण्‍याकरीता आग्रह केला. सदर आग्रहापोटी तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे रुपये १,००,०००/- द.सा.द.शे. १८ टक्‍के प्रमाणे मुदतीठेव म्‍हणून धनादेश क्रमांक ०७६१२१ अन्‍वये जमा केले. विरुध्‍द पक्षाने सदर मुदतीठेवीची पोच पावती ज्‍याचा क्रमांक ५७/२०१२ असुन ती तक्रारकर्तीला दिनांक २/६/२०१२ ला दिली.
  3. तक्रारकर्तीची मुदतीठेव ही दिनांक १/६/२०१७ रोजी परिपक्‍व झाली. तक्रारकर्तीने सदरची मुदतीठेव मधील रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍याबाबत गैरअर्जदारांना मागणी केली. सदर मागणीला उत्‍तर म्‍हणून गैरअर्जदारांनी दिनांक ८/८/२०१७ रोजी एक विनंतीपञ तक्रारकर्तीला पाठविले. सदर विनंतीपञामध्‍ये गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस मुदतीठेव व त्‍यावरील व्‍याजाच्‍या  रकमेच्‍या परतफेडीसाठी डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ मागीतली. तक्रारकर्तीने गैरअर्जदारास डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली.
  4. तक्रारकर्तीने डिसेंबर २०१७ नंतर गैरअर्जदाराकडे उपरोक्‍त मुदतीठेव व त्‍यावरील व्‍याजाची मागणी केली. परंतु गैरअर्जदारांनी नेहमीच तक्रारकर्तीला वेगवेगळी कारणे देऊन तक्रारकर्तीस मुदतीठेव व त्‍यावरील व्‍याजाच्‍या  रकमेची परतफेड करण्‍याचे टाळत गेला. तक्रारकर्तीस तीची फसवणूक होत असल्‍याचे लक्षात येताच तीने वकीलामार्फत दिनांक १७/१२/२०१८ रोजी गैरअर्जदारांना नोटीस बजावली व त्‍याव्‍दारे रकमेची मागणी केली. गैरअर्जदाराला दिनांक १९/१२/२०१८ रोजी नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍याने नोटीसची दखल घेतली नाही. करीता तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्तीला मुदतीठेव मध्‍ये ठेवलेली रक्‍कम रुपये १,००,०००/-, द.सा.द.शे. १८ टक्‍के  व्‍याजासह देण्‍याचे आदेशीत करावे व मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- देण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना मंचाचे मार्फत पाठविलेली रजि. नोटीस प्राप्‍त होऊनही ते मंचा समक्ष हजर झाले नाहीत. सबब दिनांक  २४/१०/२०१९ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २  यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाद्वारे पारीत करण्‍यात आला.
  1. तक्रारकर्तीने मंचाचे अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवज व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                  उत्‍तर

  1. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?                होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ?       होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रं. 1 ते 2 बाबत  तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष कंपनी यांचेकडे रुपये १,००,०००/- धनादेश क्रमांक ०७६१२१, दिनांक ०१/०६/२०१२ अन्‍वये  गुंतविले होते. विरुध्‍द पक्ष कंपनी यांनी त्‍याबाबतची पावती तक्रारकर्तीला अदा केली. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २(१) दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे रुपये १,००,०००/- एवढी रक्‍कम गुंतवणुक केल्‍याची बाब सिद्ध होते. त्‍यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे हे सिद्ध होते. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे दिनांक २/६/२०१२ ते ३१/०५/२०१७ या कालावधीकरीता गुंतविलेली रक्‍कम रुपये १,००,०००/- ही व्‍याजासह परत मिळण्‍याकरीता विरुध्‍द पक्षाला मागणी केली परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला रक्‍कम अदा केली नाही. तक्रारकर्तीने तीचे वकीलामार्फत विरुध्‍द पक्षाला दिनांक १७/१२/२०१७ रोजी कायदेशीर नोटीस बजावली व त्‍याव्‍दारे रकमेची व्‍याजासह मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या नोटीस ची दखल घेतली नाही व रक्‍कम व्‍याजासह परत केली नाही. ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्तीप्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाकडुन गुंतवणूक केलेली रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पाञ आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

आदेश

  1. तक्रारकर्ती यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष लॉर्ड बुध्‍दा टेलिव्‍हीजन प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्ष क्रमांक १ व २ यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्ती यांनी गुंतवणूक केलेली रक्‍कम रुपये १,००,०००/- तक्रारकर्तीला अदा करावी व सदर रकमेवर दिनांक २/०६/२०१२ पासुन द.सा.द.शे. १२ टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्तीला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रुपये २०,०००/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये १०,०००/- तक्रारकर्तीला अदा करावे.
  4. सदर आदेशाचे अनुपालन निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून ३० दिवसांचे आत करावे.
  5. उभय पक्षकारांना निकालपत्राची प्रत निःशुल्‍क उपलब्‍ध करुन द्यावी.
  6. तक्रारकर्ती यांना “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात. 
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.