जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 585/2009. तक्रार दाखल दिनांक : 04/11/2009. तक्रार आदेश दिनांक :20/01/2011. सौ. हेमा सुरेश जाधव, वय 30 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. नागणे प्लॉट, आदर्श नगर, गाडेगाव रोड, बार्शी, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. लोकश्रध्दा नागरी सहकारी पतसंस्था मर्या., शिवाजी नगर, बार्शी, जि. सोलापूर. 2. जाधव महारुद्र विष्णू, अध्यक्ष, रा. मु.पो. शिवाजी नगर, बार्शी, जि. सोलापूर. 3. देशमुख नागन्नाथ बाबासाहेब, उपाध्यक्ष, रा. मु.पो. शिवाजी नगर, बार्शी, जि. सोलापूर. 4. बैरागी बजीरंग तुळशिराम, संचालक, रा. मु.पो. गाडेगाव रोड, बार्शी, जि. सोलापूर. 5. ननवरे महादेव तुकाराम, संचालक, रा. मु.पो. शिवाजी नगर, बार्शी, जि. सोलापूर. 6. इंगळे पांडुरंग नरहरी, संचालक, रा. मु.पो. शिवाजी नगर, बार्शी, जि. सोलापूर. 7. बोराडे गौतम पांडुरंग, संचालक, रा. मु.पो. लातूर रोड, बार्शी, जि. सोलापूर. 8. थोरे अविरत दत्तात्रय, संचालक, रा. मु.पो. उपळाई रोड, बार्शी, जि. सोलापूर. 9. जगताप साहेबराव काशिनाथ, संचालक रा. मु.पो. शिवाजी नगर, बार्शी, जि. सोलापूर. 10. आवारे पंकज नानासाहेब, संचालक, रा. मु.पो. उपळाई रोड, बार्शी, जि. सोलापूर. 11. सौ. गाढवे मिरा ज्ञानदेव, संचालक, रा. मु.पो. गाडेगाव रोड, बार्शी, जि. सोलापूर. 12. सौ. अवघडे सुनिता राजेंद्र, संचालक, रा. मु.पो. परांडा रोड, बार्शी, जि. सोलापूर. 13. वाघमारे अनिता सुरेश, संचालक, रा. मु.पो. परांडा रोड, बार्शी, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष 14. कु. राऊत कांता अजिनाथ, संचालक, रा. मु.पो. परांडा रोड, बार्शी, जि. सोलापूर. 15. जाधव अनिरुध्द विष्णू, सचिव, रा. मु.पो. शिवाजी नगर, बार्शी, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : यु.डी. फरतडे विरुध्द पक्ष 2 व 15 यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.के. जाधव आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये खालीलप्रमाणे रक्कम मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. ठेव तपशील | रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर | मुदत ठेव पावती | 50,000 | 208 | 7/4/08 | 7/7/2009 | 15 टक्के | मुदत ठेव पावती | 50,000 | 209 | 7/4/08 | 7/7/2009 | 15 टक्के | मुदत ठेव पावती | 50,000 | 210 | 7/4/08 | 7/7/2009 | 15 टक्के | मुदत ठेव पावती | 50,000 | 211 | 7/4/08 | 7/7/2009 | 15 टक्के |
2. ठेवीचा 15 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांनी रकमेची व्याजासह मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यापैकी त्यांनी घरगुती अडचणीमुळे पावती क्र.211 तारण ठेवून रु.25,000/- घेतले आहेत. तक्रारदार यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व घरगुती अडचणी सोडविण्यासाठी ठेव रकमेची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे आणि विरुध्द पक्ष यांच्याकडे गुंतवणूक केलेली ठेव रक्कम व्याजासह मिळावी आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी अनुक्रमे रु.50,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र. 2 व 15 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेवर श्री.एस.एल. पवार यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येऊन दि.28/5/2009 पासून संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलेले आहे. तक्रारदार यांनी प्रशासक यांच्याकडे ठेव रकमेची मागणी करणे आवश्यक आहे. ते संचालक मंडळ अस्तित्वात असताना त्यांनी खातेदारांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती केलेली आहे. 4. विरुध्द पक्ष क्र. 1 व 3, 4 ते 14 यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते गैरहजर राहिले आहेत आणि त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्यात आले. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 2 व 15 यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या बार्शी शाखेमध्ये मुदत ठेव योनजेत रक्कम गुंतविल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांना मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी व घरगुती खर्चासाठी ठेव रकमेची गरज निर्माण झाल्यामुळे त्यांनी ठेवीचा 15 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रक्कम मागणी केली असता रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे. 7. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या शिवाजी नगर, बार्शी शाखेमध्ये मुदत ठेव योजनेमध्ये रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांच्या मुलांच्या शैक्षणिक व घरगुती खर्चासाठी ठेव रकमेची आवश्यकता भासल्यामुळे वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 8. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर लोकश्रध्दा नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बार्शी या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली असून त्याप्रमाणे त्यांना तक्रारीमध्ये समाविष्ठ करण्यात आलेले आहे. सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका बार्शी यांनी लोकश्रध्दा नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बार्शी या पतसंस्थेच्या संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश रेकॉर्डवर दाखल केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वार्षिक व मासिक सभा न घेणे, संचालकांकडे मोठी कर्ज थकबाकी असणे, कर्जदारांची फसवणूक करणे, ताळेबंद सादर न करणे, व्याज दराबाबत उल्लंघन करणे, कर्ज वसुलीसाठी कार्यवाही न करणे, नियमबाह्य खरेदी, नियमबाह्य रोख शिल्लक हातावर ठेवणे, संचालकाकंडून बंधपत्र न घेणे इ. गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचे नमूद आहे. तक्रारदार यांची ठेव रक्कम गुंतवणूक केल्यानंतर सदरचे आदेश निर्गमीत केलेले आहेत. निश्चितच तक्रारदार यांच्या ठेव रकमेचा विनियोग संचालक मंडळाकडून योग्य झालेला नाही, या स्पष्ट अनुमानास आम्ही येत आहोत. तसेच सहायक निबंधकांच्या आदेशाबाबत विरुध्द पक्ष यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. 9. वरील विवेचनावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. तक्रारदार यांनी ठेव पावती क्र.211 वर रु.25,000/- कर्ज घेतल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांना व्याजासह एकूण देय असणा-या रकमेतून कर्ज रक्कम वजावट करता उर्वरीत रक्कम मिळविण्यास तक्रारदार हक्कदार आहेत, या मतास आम्ही आलो आहोत. सध्याचे व्याज दर विचारात घेता, तक्रारदार एकूण देय ठेव रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज मिळविण्यास पात्र ठरतात. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्कम या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. ठेवीचा तपशील | पावती क्रमांक | ठेव रक्कम (रुपयामध्ये) | खालील तारखेपासून व्याज द्यावयाचे | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | मुदत ठेव पावती | 208 | 59,375 | 7/7/2009 | 12 टक्के | मुदत ठेव पावती | 209 | 59,375 | 7/7/2009 | 12 टक्के | मुदत ठेव पावती | 210 | 59,375 | 7/7/2009 | 12 टक्के | मुदत ठेव पावती | 211 | 59,375 | 7/7/2009 | 12 टक्के |
2. पावती क्र.211 वर तक्रारदार यांनी घेतलेले रु.25,000/- कर्ज व त्यावरील व्याजाची रक्कम उपरोक्त आदेश क्र.1 प्रमाणे देय रकमेतून वजावट करुन उर्वरीत रक्कम विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी तक्रारदार यांना द्यावी. 3. विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/18111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |