Maharashtra

Sangli

CC/08/1323

Swati Rajaramsinh Rajput - Complainant(s)

Versus

Lokmitra Nag.Sah.Pat.Mar.Sangli - Opp.Party(s)

16 Feb 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/08/1323
 
1. Swati Rajaramsinh Rajput
Khanbhag, Sangli, Tal.Miraj, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Lokmitra Nag.Sah.Pat.Mar.Sangli
Gala No.6, Gokhale Complex, Maruti Chowk, Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

 
                                                            नि. ३६
 
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
                                                   
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या सौ सुरेखा बिचकर
                            
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१३२३/२००८
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख    :  २८/११/२००८
तक्रार दाखल तारीख  :  १२/१२/२००८
निकाल तारीख         : १६/०२/२०१२
-----------------------------------------------------------
 
 
स्‍वाती राजारामसिंह रजपुत
वय ३५ वर्षे, व्‍यवसाय घरकाम
सूरज राजारामसिंह रजपुत
वय १७ वर्षे, व्‍यवसाय शिक्षण
रा.खणभाग, सांगली ता.मिरज जि.सांगली                             ..... तक्रारदारú
  
 विरुध्‍द
 
१. लोकमित्र नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. सांगली
    गाळा नं.६, गोखले कॉम्‍प्‍लेक्‍स, मारुती चौक, सांगली
२. चेअरमन,
    लोकमित्र नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. सांगली
    गाळा नं.६, गोखले कॉम्‍प्‍लेक्‍स, मारुती चौक, सांगली
३. अजिंक्‍य नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.सांगली
    ओक बिल्‍डींग, जुने मुरलीधर मंदीर नजीक,
    हरभट रोड, सांगली
४. चेअरमन, अजिंक्‍य नागरी सहकारी पतसंस्‍था
    मर्या.सांगली ओक बिल्‍डींग,
    जुने मुरलीधर मंदीर नजीक, हरभट रोड, सांगली
५. श्री हणमंत बंडू पवार, चेअरमन
 
 
    पत्रकार नगर, सांगली ता.मिरज जि. सांगली
६. राजेंद्र दत्‍तात्रय भोसले, व्‍हाईस चेअरमन
    अंजना बॅग्‍ज मेन रोड, सांगली
७. श्री रमेश सुरेश खिलारे, संचालक
    रा.गणेश नगर, सांगली
८. श्री राजेंद्र विद्याधर देसाई, संचालक
    रा.वसंत मार्केट यार्ड, सांगली
    (मंचाच्‍या दि.२७/७/११ रोजीच्‍या आदेशान्‍वये वगळले)
९. श्री प्रकाश राजाराम शिरसागर, संचालक
    रा.गांवभाग, ढवळे तालमीजवळ, सांगली
१०. श्री सुभाषचंद्र लोकचंद गुप्‍ता, संचालक
    रा.खणभाग, बदाम चौक, सांगली
११. श्री वसंतराव गणपती सावंत, संचालक  
    रा.गवळी गल्‍ली, रेणुका प्रिंटस सांगली
१२. श्री प्रताप परशुराम चौधरी
    रा.सांगली अर्बन बॅंकेजवळ, राममंदीर रोड, सांगली
    (मंचाच्‍या दि.२७/७/११ रोजीच्‍या आदेशान्‍वये वगळले)
१३. श्री इब्राहिम हाजीगुलाब पटवेगार, संचालक
    रा.गवळी गल्‍ली, सांगली
१४. श्री भारत तुकाराम जाधव, संचालक
    रा.मु.पो.बुधगांव सांगली, 
१५. श्री नागेश रामगोंडा पाटील, संचालक
    रा.चांदणी चौक, सांगली
१६. श्री दिलीप श्रीपाल हमीदवाड, संचालक
    रा.पुष्‍पराज चौक, दिलीप टायर्स, सांगली
१७. सौ कल्‍पना संभाजी काशीद, संचालक
    रा.पेठभाग, सांगली
    (मंचाच्‍या दि.२७/७/११ रोजीच्‍या आदेशान्‍वये वगळले)
१८. सौ उषा विजय लाड, संचालक
    रा.मारुती रोड, सांगली
    (मंचाच्‍या दि.२७/७/११ रोजीच्‍या आदेशान्‍वये वगळले)   ..... जाबदार
 
 
                     तक्रारदार तर्फे - +ìb÷. श्री पी.एम.मैंदर्गी
                     जाबदार क्र.१ ते ७, ९ ते ११, १३ ते १६ तर्फे +ìb÷. श्री एस.एस.शेठ
                     जाबदार क्र.८, १२, १७ व १८ वगळले
   नि का ल प त्र
 
 
द्वारा- मा.सदस्‍या सौ सुरेखा बिचकर 
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने दामदुप्‍पट ठेवी व बचत खात्‍यान्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ लोकमित्र नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. सांगली (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे रक्‍कम गुंतविलेली होती. सदरची पतसंस्‍था जाबदार क्र.३ या पतसंस्‍थेमध्‍ये विलीन झालेली आहे. तक्रारदार यांच्‍या ठेवींच्‍या मुदती पूर्ण झालेल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण २२ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    जाबदार क्र. १ ते ७, ९ ते ११, १३ ते १६ यांनी याकामी हजर होवून नि.२४ ला त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये प्रस्‍तुत कामी जाबदार क्र.२, ४ ते १८ यांना चुकीच्‍या पध्‍दतीने पक्षकार करण्‍यात आले आहे. तक्रारदार व जाबदार क्र.२, ४ ते १८ यांचेमध्‍ये ग्राहक व मालक असे नाते प्रस्‍थापित होवू शकत नाही. महाराष्‍ट्र सहकार कायदा कलम ६() चा विचार करता प्रस्‍तुत जाबदार क्र.२, ४ ते १८ हे लोकमित्र नागरी सहकारी पतसंस्‍थेचे व अजिंक्‍य नागरी सहकारी पतसंस्‍थेचे मर्यादित दायित्‍व स्‍वीकारलेले सदस्‍य असल्‍याने सदर सदस्‍यांची जबाबदारी सदस्‍यांनी घेतलेल्‍या शेअर्सच्‍या रकमेइतकीच आहे. त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या ठेवींच्‍या रकमा देण्‍याची जबाबदारी जाबदार क्र.२, ४ ते १८ यांनी स्‍वीकारली नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सहकारी संस्‍थाच्‍या कामकाजाबाबत अफवा उठल्‍याने ठेवींदारांनी ठेवी मुदतपूर्व काढून घेतल्‍या त्‍याचा फटका जाबदार क्र.१ व ३ पतसंस्‍थेस बसला. जाबदार क्र.१ व ३ पतसंस्‍थेने अनेक ठेवीदारांना त्‍यांच्‍या ठेवी परत केल्‍या आहेत. अद्यापही कर्जदारांकडून कर्जाची वसुली करुन घेवून ठेवी परत करण्‍याचे प्रयत्‍न चालू आहेत. जाबदार यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. त्‍यामुळे तक्रारअर्ज नामंजूर करणेत यावा असे जाबदारांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात नमूद केले आहे. जाबदारांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ नि.२५ ला शपथपत्र दाखल केले आहे.
 
३. जाबदार क्र. ८, १२, १७ व १८ यांना मे.मंचाचे दि.२७/७/११ चे आदेशानुसार प्रस्‍तुत प्रकरणातून वगळणेत आले.
 
४.    प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी नि.४ सोबत दाखल केलेल्‍या ठेवपावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी दामदुप्‍पट ठेव योजनेअंतर्गत रकमा गुंतविलेल्‍या आहेत. सदरच्‍या ठेव पावत्‍यांची मुदतही पूर्ण झाली आहे. त्‍यामुळे या ठेवींमधील मुदतीनंतर मिळणारी ठेवीची मुदत संपल्‍याचे दुसरे दिवशीपासून द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे. तसेच बचत खात्‍यातील शेवटच्‍या तारखेस शिल्‍लक असलेली रक्‍कम त्‍या शेवटच्‍या तारखेपासून द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे.
 
५.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २, ४ ते ७, ९ ते ११, १३ ते १६ यांना पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो. जाबदार लोकमित्र नागरी सहकारी मर्या. ही पतसंस्‍था अजिंक्‍य नागरी सहकारी मर्या.सांगली या पतसंस्‍थेमध्‍ये विलीन झाली असल्‍याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. त्‍यामुळे अजिंक्‍य नागरी सहकारी मर्या.सांगली ही संस्‍था तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो. 
 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
१. यातील जाबदार क्र.३ पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावत्‍या क्र.०००१७२, ०००१७३, ०००१७४, ०००१७५, ०००१८१, ०००१८२, ०००१८३, ०००१८४, ०००१८५ मधील प्रत्‍येकी रक्‍कम रु.२०,०००/- (रुपये वीस हजार फक्‍त) व या रकमेवर दि.६/९/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.
 
२. यातील जाबदार क्र.३ पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खात्‍यामधील शिल्‍लक रक्‍कम रु.६,०००/- (रुपये सहा हजार फक्‍त) व या रकमेवर दि.२८/५/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.
 
३. यातील जाबदार क्र.३ पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.३१/३/२०१२ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांक:१६/०२/२०१२
 
 
 
        (सुरेखा बिचकर)                        (अनिल य.गोडसे÷)
             सदस्‍या                              अध्‍यक्ष            
     जिल्‍हा मंच, सांगली.                             जिल्‍हा मंच, सांगली.  
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.