सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ. सविता भोसले, अध्यक्षा
मा. श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा. सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 161/2012
तक्रार दाखल दि.21-12-2012.
तक्रार निकाली दि.15-07-2015.
मोनाली लक्ष्मण शिंदे,
रा. 42, रिंग रोड, पोतदार हॉस्पिटलजवळ,
फलटण, ता.फलटण,जि.सांगली. .... तक्रारदार.
विरुध्द
1. लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या.लि.,फलटण,
ता.फलटण, जि.सातारा तर्फे चेअरमन
2. चेअरमन, डॉ.भगवान खंडेराव यादव,
लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या.लि.,फलटण
ता. फलटण, जि.सातारा,रा.लक्ष्मीनगर,फलटण
3. मॅनेजर, अमोल हणमंत जगताप,
लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या.लि.,फलटण,
ता.फलटण, जि.सातारा, मु.पो.कुरवली,
ता.फलटण,जि.सातारा ... जाबदार.
....तक्रारदारतर्फे (अँड.आर.बी.धुमाळ)
....जाबदार क्र.1 ते 3 तर्फे (अँड.आर.सी.कोरडे)
-ः न्यायनिर्णय ः-
(मा.सौ.सविता भोसले, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारदारांचे तक्रार अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे फलटण, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी असून त्यांनी जाबदार पतसंस्थेत खाली नमूद केलेप्रमाणे मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतविली होती व आहे.
अ नं | ठेव पावती क्रमांक | नांव | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख | मुदतीनंतरची मिळणारी रक्कम |
1. | 1321 | मोनाली लक्ष्मण शिंदे | 30,000/- | 02/02/ 2005 | 02/10/ 2010 | 60,000/- |
2 | 002475 | मोनाली लक्ष्मण शिंदे | 25,000/- | 04/01/ 2006 | 04/10/ 2008 | व्याजासह |
3 | 002476 | मोनाली लक्ष्मण शिंदे | 25,000/- | 04/01/ 2006 | 04/10/ 2008 | व्याजासह |
4 | 002499 | मोनाली लक्ष्मण शिंदे | 2,266/- | 14/03/2006 | 14/03/2012 | 4,532/- |
वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत ठेवीच्या रकमा गुतविल्या होत्या. प्रस्तुत ठेवींची मुदत संपल्यानंतर तक्रारदाराने जाबदारांकडे ठेवीच्या रकमेची वारंवार मागणी केली. परंतु जाबदार यांनी रक्कम तक्रारदाराला दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि.31/5/2012 रोजी लेखी पत्र देवून जाबदाराकडे ठेवीच्या रकमेची मागणी केली. परंतु जाबदार यांनी तक्रारदाराला ठेवीची रक्कम परत दिली नाही. त्यामुळे प्रस्तुत ठेवीची रक्कम जाबदार कडून वसूल होवून मिळणेसाठी तक्रारदाराने मे मंचात सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून वर परिशिष्टातील नमूद ठेवपावत्यांची एकूण रक्कम रु.1,39,532/- (रुपये एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे बत्तीस फक्त) पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याजासह वसूल होवून मिळावी, तक्रारदारास झालेल्या मानसीक व शारीरिक त्रासाबाबत रक्कम रु.15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त) मिळावेत व अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने त्याचे अर्जातील कथनाच्या सिध्दतेसाठी नि.क्र. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/5 कडे अनुक्रमे मुदत ठेव पावती क्र.1321 ची मुळ ठेवपावती, ठेवपावती क्र. 002475 ची मुळ ठेवपावती, ठेवपावती क्र. 002476 ची मुळ ठेवपावती, ठेवपावती क्र. 002499 ची मुळ ठेवपावती, तक्रारदाराने जाबदाराला दिलेले लेखी पत्र, नि.12 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस लागू झालेनंतर ते मे. मंचात हजर झाले परंतु त्यांनी सदरकामी म्हणणे/कैफीयत दाखल केलेली नाही. सबब जाबदार क्र.1 ते 3 यांचेविरुध्द दि.11/7/2013 रोजी नि. 1 वर ‘म्हणणे नाही’ आदेश पारीत करणेत आला आहे. सबब जाबदारांचे म्हणण्याविना सदर तक्रार अर्ज पुढे चालवणेत आला.
5. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत कामी तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा उत्तर
1- तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का?- होय.
2- जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरविली आहे काय?- होय.
3- अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे.
विवेचन -
1. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- प्रस्तुत तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत खाली नमूद परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे मुदत ठेवीच्या स्वरुपात रक्कम गुंतवली होती व आहे.
अ नं | ठेव पावती क्रमांक | नांव | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख | मुदतीनंतरची मिळणारी रक्कम |
1. | 1321 | मोनाली लक्ष्मण शिंदे | 30,000/- | 02/02/ 2005 | 02/10/ 2010 | 60,000/- |
2 | 002475 | मोनाली लक्ष्मण शिंदे | 25,000/- | 04/01/ 2006 | 04/10/ 2008 | व्याजासह |
3 | 002476 | मोनाली लक्ष्मण शिंदे | 25,000/- | 04/01/ 2006 | 04/10/ 2008 | व्याजासह |
4 | 002499 | मोनाली लक्ष्मण शिंदे | 2,266/- | 14/03/2006 | 14/03/2012 | 4,532/- |
प्रस्तुतची बाब तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/4 कडे दाखल केले मुळ ठेवपावत्यांवरुन स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवपावत्यांच्या मुदती संपलेनंतर तक्रारदाराने ठेवीच्या व्याजासह रकमेची मागणी जाबदाराकडे लेखी व तोंडी स्वरुपात वारंवार केली असता जाबदार यांना सदरची रक्कम तक्रारदाराला परत देणेस टाळाटाळ केली व रक्कम परत दिली नाही. त्यामुळे सदर रकमेच्या वसुलीसाठी तक्रारदाराने तक्रारअर्ज मे. मंचात दाखल केला आहे. तथापी, जाबदार हे याकामी हजर झाले परंतु जाबदार यांनी तक्रार अर्जातील कथने खोडून काढणेसाठी त्यांचे म्हणणे याकामी दाखल केलेले नाही. त्यामुळे जाबदार यांचेविरुध्द ‘म्हणणे नाही’ आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहे. जाबदाराने तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रारदाराचे कथनाप्रमाणे जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेचे स्पष्ट होते. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
प्रस्तुतकामी तक्रारदाराने ठेवीची रक्कम जाबदार पतसंस्थेत गुंतवलेचे सिध्द झाले आहे. त्यामुळे जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तसेच जाबदार क्र. 3 यांनी संयुक्तीकपणे तक्रारदारास Co-Operative Corporate Veil नुसार ठेवींची व्याजासह रक्कम अदा करणे न्यायोचीत होईल असे या मे. मंचाचे मत आहे. प्रस्तुत कामी आम्ही मे. उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडील रिटपिटीशन नं. 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडत्वाचा आधार घेतला आहे.
सबब प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या व जाबदार क्र. 3 ने संयुक्तीकपणे तक्रारदाराचे वरील परिशिष्टात नमूद केले ठेवपावत्यांची त्या-त्या ठेवपावतीवरील नमूद व्याजासह होणारी सर्व रक्कम तक्रारदार यांना अदा करणे न्यायोचीत होणार आहे. सबब सदर कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
-ः आदेश ः-
1. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या व जाबदार क्र. 3 ने संयुक्तीकपणे तक्रारदाराचे वर परिशिष्टात नमूद ठेवींची रक्कम त्या-त्या ठेवपावत्यांवरील नमूद व्याजासह अथवा संस्थेच्या नियमाप्रमाणे व्याजासह तक्रारदार यांना अदा करावी.
3. प्रस्तुत सर्व रकमेवर ठेवपावत्यांची मुदत संपले तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने होणारी व्याजाची रक्कम जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या व जाबदार क्र.3 ने संयुक्तीकपणे तक्रारदाराला अदा करावी.
4. जाबदार यांनी प्रस्तुत ठेवपावत्यांच्या रकमेपैकी जर कांही रक्कम तक्रारदाराला अदा केली असेल ती रक्कम सदर ठेवपावत्यांच्या रकमेतून वजा करुन उर्वरीत रक्कम व्याजासह जाबदारांनी तक्रारदाराला अदा करावी.
5. तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम व तक्रार अर्जाचा खर्च
म्हणून रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार फक्त) जाबदार क्र. 1 व 2
यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या व जाबदार क्र. 3 ने संयुक्तीकपणे
तक्रारदार यांना अदा करावी.
6. वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व
संयुक्तिकरित्या व जाबदार क्र. 3 ने संयुक्तीकपणे आदेश पारीत तारखेपासून
45 दिवसांचे आत करावे.
7. वरील आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेस तक्रारदाराला ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
8. पस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
9. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि.16-07-2015
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.