निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1689/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 18/12/2008
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 04/02/2009
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-09/10/2009
श्री.अविनाश लिलाधर सावदेकर,
उ.व. सज्ञान, धंदाः शेती,
रा.मु.पो.असोदा, ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत,असोदा,
मु.पो.असोदा, ता.जि.जळगांव.
2. श्री.हरी गोविंदा महाजन, चेअरमन,
लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत,असोदा,
मु.पो.असोदा, ता.जि.जळगांव.
3. श्री.भास्कर दंगल पाटील, व्हा.चेअरमन,
लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत,असोदा,
मु.पो.असोदा, ता.जि.जळगांव.
4. श्री.नितीन मिठाराम कोल्हे, व्यवस्थापक,
लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत,असोदा,
मु.पो.असोदा, ता.जि.जळगांव. ......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 09/10/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदारा तर्फे श्री.पी.जी.मुंदडा वकील हजर
सामनेवाला क्रं.2 व 4 तर्फे श्री.विशाल एस. सोनवणे वकील हजर.
सामनेवाला क्रमांक 1 व 3 एकतर्फा.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. वेगवेगळया प्रकारच्या व्याजावर ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | बचत खाते क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 5/105 | | 39,476/- | |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या बचत खात्यातील शिल्लक रक्कमेची तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने, तक्रारदार हे त्यांची बचत खात्यातील शिल्लक रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या बचत खात्यातील रक्कम व्याजासह परत मिळणेकामी व त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. सामनेवाला क्रमांक 1 व 3 यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश केला. तसेच सामनेवाला क्र. 2 व 3 हे प्रस्तुत प्रकरणी वकीलामार्फत हजर झाले तथापी वेळोवेळी लेखी म्हणणे सादर करण्यासाठी मुदती घेऊनही मुदतीत लेखी म्हणणे सादर न केल्याने सामनेवाला क्र. 2 व 3 विरुध्द नो-से आदेश पारीत करण्यात आले.
3. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता व तक्रारदार यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
4. मुद्या क्रमांक 1 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. म्हणून तक्रारदार ठेवीची रक्कम व त्यावरील व्याज व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत. सबब मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांची तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं.1 ते 4 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांचे बचत खाते क्रमांक 5/105 मध्ये शिल्लक असलेली एकुण रक्कम सदर खात्यावर देय असलेल्या व्याजासह तक्रारदारास द्यावी.
( क ) सामनेवाला क्रं.1 ते 4 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं.1 ते 4 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं.1 ते 4 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 09/10/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव