गणपूर्तीः- मा. भास्कर बी. योगी, अध्यक्ष, मा रायपुरे. सरिता बी ., सदस्या,
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
उपस्थितीः- तक्रारकर्ता तर्फे- अधिवक्ता :- श्री.डी.एम.कोसरकर
वि. पक्ष क्र. 1 व 2 तर्फे अधिवक्ता :- श्री. एस. बी. राजनकर
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-
पारित द्वारा- मा .सरिता बी. रायपुरे सदस्या,
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**
अंतिम आदेश
( पारित दिनांक 28/03/2023)
1. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडुन बांधकामासाठी लागलेली रक्कम परत मिळविण्याकरिता तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 35 (1) अन्वये दाखल केलेली आहे.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा तक्रारित नमुद पत्यावर राहत असुन तक्रारकर्त्याने मौजा-तिरोडा येथे घराचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदार श्री. शेलेष पटले रा. भुराटोला यांना घर बांधकामाचा ठेका दिला होता. त्यानुसार तक्रारकर्त्याच्या घराचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी अंबुजा कंपनीचे सिमेंट वापरण्यात आले होते. तक्रारकर्त्याने दिनांक 29/10/2021 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांच्याकडुन स्लॅब करिता अंबुजा कंपनीचे (अंबुजा कवच) उच्च दर्जाचे सिमेंट खरेदी केले आणि ते दिनांक 31/10/2021 रोजी स्लॅबचे बांधकाम पुर्ण करण्यात आले होते. त्यांनतर तक्रारकर्त्याने सदर घराचे पी.ओ.पी. पुर्ण केले आणि सदर घराचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर मार्च 2022 मध्ये तक्रारकर्ता नविन बांधकाम पुर्ण झालेल्या घरी राहण्यास गेले त्यांनतर दिनांक 05/05/2022 रोजी पाऊस आला आणि तक्रारकर्त्याच्या घराचे स्लॅब गळु लागले करिता तक्रारकर्त्याने घराचे बांधकाम ठेकेदार श्री. शेलेष पटले यांना फोन करून बोलावले व त्यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 2 चे इंजिनियअरला फोन करून स्लॅबची पाहणी करण्याकरिता बोलावले व दोन ठिकाणी घराचे रिपेअर करून दिले त्यांनतर जुलै 2022 मध्ये पाऊस आल्यावर तक्रारकर्त्याचे स्लॅब मधुन दुस-या जागे मधुन खुप जास्त प्रमाणात पाणी गळु लागले त्यामुळे तक्रारकर्त्याच्या घरातील पी.ओ.पी चे अंदाजे रू. 30,000/- किंमतीचे व ईतर ईलेक्ट्रीक साहित्य खराब झाले. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र.1 ला स्लॅब मधुन पाणी गळण्याची माहीती दिली त्यामुळे विरूध्द पक्ष क्र. 2 च्या इंजिनियरला फोन करून बोलावले. जुलै 2022 मध्ये इंजिनियर अभिजित रायपुरकर यांनी मोक्यावर पाहणी केली असता संपुर्ण स्लॅबवर दरारे पडलेली आहे व त्यांनी तक्रारकर्त्याला आश्वासन दिले की, स्लॅबचे सोल्युशन पाऊस बंद झाल्यावर लवकरात लवकर करू. तक्रारकर्त्याने पाऊस बंद झाल्यावर विरूध्द पक्ष क्रमांक 1 व अंबुजा कंपनीचे इंजिनियर यांना फोन केला तेव्हा इंजिनियरने आश्वासन दिले होते. त्यानंतर तक्रारकर्त्याने दुसरे सिव्हिल इंजिनियर द्वारे तपासणी केली असता असे कळले की, स्लॅबसाठी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दिलेले अंबुजा कंपनीचा सिमेंट(अंबुजा कवच) हा खराब दर्जाचा होता त्यामुळे तक्रारकर्त्याच्या घराची स्लॅब गळु लागली आहे व इतर साहित्याचे नुकसान झाले. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी अंबुजा कवच हे खराब दर्जाचे व बनावटी सिमेंट तक्रारकर्त्यास दिले त्यामुळे तक्रारकर्त्याच्या घराचे स्लॅब गळु लागले व तक्रारकर्त्याचे अंदाजे 2,00,000/- रूपयाचे नुकसान झाले तसेच स्लॅब गळल्यामुळे घरातील पी.ओ.पी.खराब झाल्यामुळे रू. 30,000/- नुकसान झाले आणि घरातील इतर साहित्य खराब झाले करिता तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू. 10,000/- असे एकुण रू. 3,30,000/- चे नुकसान झाले त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 05.09.2022 रोजी अधिवक्ता मार्फत विरूध्द पक्षकारांना कायदेशीर नोटीस पाठवुन नुकसान भरपाईची मागणी केली पंरतु सदर नोटीसची विरूध्द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही तर उलट विरूध्द पक्ष क्र. 2 ने दिनांक 15.09.2022 तक्रारकर्त्याच्या नोटीसला खोटे उत्तर पाठविले. विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याला चांगल्या, उत्तम क्वालीटीचे अंबुजा कवच सिमेंट गॉरेन्टेड आहे असे सांगुन तक्रारकर्त्याला कमी दर्जाचे सिमेंट दिले व तक्रारकर्त्याची फसवणुक करून करार व शर्तीचा भंग केलेला आहे. करिता तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करून आयोगाकडे खालील प्रमाणे मागणी केली. विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास मुद्दाम खराब/लोक्वालिटिचे अंबुजा कवच सिमेंट दिल्यामुळे स्लॅब गळु लागले तसेच तक्रारकर्त्याचे ईतर साहित्य खराब झाले व तक्रारकर्त्यास मानसिक, शारिरिक त्रास सहन करावा लागला करिता तक्रारकर्त्यास रू. 3,30,000/- नुकसान भरपाई विरूध्द पक्षानी देण्याचे आदेश दयावे. विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याचे घराचे स्लॅब दुरूस्ती स्वखर्चाने करून दयावे व त्याकरिता लागणारा संपुर्ण खर्च विरूध्द पक्ष यांच्यावर आकारण्यात यावा. सदर तक्रारीचा खर्च रू. 10,000/- तक्रारकर्त्याला देण्याचे आदेश् दयावे अशी मागणी केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान आयोगाने दिनांक 19.10.2022 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्षांना आयोगामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला.
4. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 तर्फे अधिवक्ता श्री. एस.बी.राजनकर यांनी आपला लेखीजबाब दिनांक 16/01/2023 रोजी आयोगात सादर केला. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील हा मजकुर मान्य केला आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 29/10/2021 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडुन अंबुजा कंपनीचे अंबुजा कवच या दर्जाचे सिमेंट खरेदी केले होते. पंरतु सदर सिमेंट हे घराच्या स्लॅबसाठी खरेदी करण्यात आले होते हे अमान्य केले आहे. विरूध्द पक्षाने आपल्या बचावाच्या समर्थनार्थ म्हटले आहे की, विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास योग्य व नमुद दर्जाचे सिमेंट दिले व त्याबाबत प्रमाणपत्र सोबत जोडलेले आहे. स्लॅब किंवा इतर बांधकामाची उत्कृष्ठता ही फक्त सिमेंट वर आधारित नसुन इतर बांधकाम साहित्य म्हणजेच रेती, गिट्टी तसेच पाण्याद्वारे योग्य मिश्रण, काम करणारे मिस्त्री व कामगार यांची बांधकाम करण्याची पध्दतवर निर्भरित आहे. स्लॅब झाल्यावर त्याचे योग्य प्रकारे कयुरींग करणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याने योग्य शिक्षित ठेकेदार, लेबर तसेच चांगले बांधकाम साहित्य म्हणजेच रेती व गिट्टी न वापरल्याने सुध्दा स्लॅब खराब होण्याची शक्यता नाकारण्यात येवु शकत नाही. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास खराब दर्जाचे व बनावटी दर्जाचे सिमेंट पुरविले याबाबत कोणतेही लेबोरेटरी टेस्ट रिपोर्ट दाखल केला नाही म्हणुन तक्रारकर्त्याने केलेले सर्व आरोप फेटाळण्यात यावे. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये रू. 3,30,000/- रूपये नुकसान भरपाईची केलेली मागणी किंवा स्लॅब दुरूस्ती करून देण्याची केलेली मागणी सरासर खोटी व गैर- कायदेशीर आहे. करिता तक्रारकर्त्याची सदर तक्रार खारीज करण्यांत यावी अशी विनंती विरूध्द पक्षो आपल्या लेखी जबाबात केली आहे.
5. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्षाचे लेखी जबाब, मौखिक युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | निःष्कर्ष |
1. | विरूध्द पक्ष क्र 1 व 2 ने तक्रारकर्त्यास कमी दर्जाचे सिमेंट दिले आहे का? | नाही |
2. | तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे का? | नाही |
3. | तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसे प्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 बाबत :-
6. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दाखल करून विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी कमी दर्जाचे व बनावटी अंबुजा कवच सिमेंट तक्रारकर्त्यास दिले त्यामुळे तक्रारकर्त्याचे नविन घराचे बांधकाम केलेले स्लॅब गळु लागले करिता तक्रारकर्त्याने नुकसान भरपाईची मागणी विरूध्द पक्षाकडे केली आहे. याविषयी माननीय आयोगाचे सपष्ट मत असे आहे की, तक्रारकर्त्याने केवळ तक्रारित नमुद केले आहे की, अंबुजा कंपनीचे अंबुजा कवच सिमेंट कमी दर्जाचे / खराब लोक्वालीटीचे होते त्यामुळे स्लॅब गळु लागले. तक्रारकर्त्याच्या घराच्या बांधकामाचे/ पी.ओ.पी. व ईतर साहित्याचे नुकसान झाले. पंरतु तक्रारकर्त्याने तक्रारित असा कोणताही भरभक्कम पुरावा सादर केला नाही किंवा अंबुजा कवच सिमेंटची तपासणी करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 38 (2) (c) अनुसार शासकिय प्रयोगशाळेत सिमेंटची तपासणी करण्यासाठी पाठवुन त्यासबंधी अहवाल सादर केला नाही. तसेच तक्रारकर्त्याने ज्या सिविल इंजिनियरचा अहवाल सादर केला आहे त्या अहवाला वरून हे सिध्द होत नाही की, अंबुजा कंपनीचे सिमेंट हे कमी दर्जाचे आहे तसेच तक्रारकर्त्याने नेमलेला इंजिनिअर असल्याने तो तक्रारकर्त्याच्या फायदयासाठी तक्रारकर्त्याच्या बाजुने अहवाल देणार त्यामुळे इंजिनिअर निःपक्षपणे अहवाल देणार का ? हा सुध्दा एक प्रश्नचिन्ह आहे.
घराचे बांधकाम करताना केवळ सिमेंट जबाबदार नसते तर त्यांसाठी आवश्यक साहित्य रेती, गिट्टी, पाणी यांचे प्रमाण किती असावे हया सर्व साहित्यांचे मिश्रण योग्य प्रमाणात असले तरच बांधकाम योग्य होते तसेच बांधकाम पुर्ण करणारे मजुर हे कतिी प्रशिक्षीत आहेत या सर्व बाबींचा विचार केला जातो. तक्रारकर्त्याने केवळ पुराव्या अभावी म्हटले आहे की, विरूध्द पक्षाने अंबुजा कवच सिंमेट निम्न दर्जाचे दिले करिता स्लॅब गळु लागले आणि नुकसान झाले पंरतु तक्रारकर्त्याने आयोगासमोर योग्य तो पुरावा सादर केला नाही. विरूध्द पक्षाकडुन खरेदी केलेले अंबुजा कंपनीचे सिंमेट कमी दर्जाचे होते यांसबंधी कोणताही पुरावा सादर केलेला नाही किंवा सिंमेट निकृष्ट दर्जाचे होते हे सिध्द करण्याची जबाबदारी विरूध्द पक्षाची आहे. अंबुजा सिमेंट कंपनी ही एक नावाजलेली कंपनी आहे आणि या कंपनीचे सिमेंट कमी दर्जाचे/ किंवा खराब आहे यासंबधी कोणताही ठोस पुरावा दाखल न करता कमी दर्जाचे आहे असे म्हणणे योग्य नाही. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने आपली तक्रार पुराव्यादवारे सिध्द केली नाही. तक्रारकर्त्याने घराचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदार शेलेष पटले यांना ठेका दिला होता त्यांस सदर तक्रारित आवश्यक पक्षकार म्हणुन संम्मलित न केल्याने सदरची तक्रार पुराव्या अभावी खारिज करण्यात येत आहे.
विरूध्द पक्षाचे अधिवक्ता यांनी माननीय राज्य आयोगाच्या न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे. सदर न्यायनिवाडे हातातील प्रकरणाशी लागु पडतात.
State Consumer Disputes Redressal Commission Haryana.
J.K. Corporation Ltd- Vs- Bansh Raj Choudhary Son of Shri Ram 08 June 2012. First Appeal no. 520/ 2006 & 5212006
करिता मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
7. वरील चर्चेनुरूप व निःष्कर्षावरून मा. आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
:: अंतिम आदेश :ः
1 तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यात येते.
2. खर्चाबाबत कसलाही आदेश नाही.
3. निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यांत याव्यात.
4. प्रकरणाच्या “ब” व “क” फाईल्स तक्रारकर्तीला परत करण्यांत याव्यात