नि.39 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 246/2010 नोंदणी तारीख – 21/10/2010 निकाल तारीख – 23/2/2011 निकाल कालावधी – 118 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ----------------------------------------------------------------------------------- नामदेव बाबा कोकरे रा.मु.पो. विडणी, ता. फलटण जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आनंद कदम) विरुध्द 1. लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण एम.एस.ई.बी. कॉलनीसमोर, लक्ष्मीनगर, फलटण ता.फलटण जि. सातारा तर्फे चेअरमन श्री भगवान खंडेराव यादव 2. चेअरमन, डॉ भगवान खंडेराव यादव, रा. लोकमान्य नर्सिंग होम, लक्ष्मीनगर, फलटण ता. फलटण जि. सातारा 3. व्हा. चेअरमन, श्री मुगुटराव फत्तेसिंह रणवरे रा.निलम एम्पोरियम, लक्ष्मीनगर, फलटण, ता.फलटण जि.सातारा ----- जाबदार क्र.3 (अभियोक्ता श्री जावेद मेटकरी) 4. संचालिका, डॉ सौ सुरेखा भगवान यादव रा. लोकमान्य नर्सिंग होम, लक्ष्मीनगर, फलटण ता. फलटण जि. सातारा 5. संचालक, डॉ बाळासाहेब दत्तात्रय भरड रा.मु.पो.वाखरी, ता.फलटण जि.सातारा 6. संचालक, श्री मोहनराव बंकटलाल चांडक रा.मारवाड पेठ, फलटण ता.फलटण जि.सातारा 7. संचालक, श्री दिलीप कृष्णराव वसव रा.मु.पो.कोळकी, ता.फलटण जि.सातारा 8. संचालक, डॉ चंद्रशेखर महादेव यादव, रा.भडकमकर नगर, फलटण ता.फलटण जि.सातारा 9. संचालक, श्री सुनिल बुवासो अब्दागिरे रा.विद्यानगर, फलटण ता.फलटण जि.सातारा 10. संचालक श्री भास्कर दत्तात्रय गायकवाड रा.विद्यानगर, फलटण ता.फलटण जि.सातारा 11. संचालिका, सौ वैशाली अरुण नाळे रा.मु.पो.कोळकी, ता.फलटण जि.सातारा 12. संचालक, श्री मोहनराव जयसिंग जगताप रा.मु.पो.रावडी, ता.फलटण जि.सातारा ----- जाबदार क्र.1, 2 व 4 ते 12 (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदर पावत्यांची मुदत सन 2012-13 मध्ये संपणार आहे. परंतु अर्जदार यांना त्यांच्या घरगुती अडचणींमुळे सदर रकमेची नितांत गरज असल्याने त्यांनी जाबदार यांचेकडे ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1, 2 व 4 ते 9 व 11, 12 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, जाबदार क्र.1, 2 व 4 ते 9 व 11, 12 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. जाबदार क्र.3 यांनी याकामी त्यांचे लेखी म्हणणे नि. 28 कडे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. अर्जदार हे जाबदार यांचेकडे रक्कम मागणीसाठी कधीही आलेले नव्हते. कर्जदारांनी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड त्यांनी वेळेत न केल्यामुळे संस्था अडचणीत आली आहे. अर्जदार यांना जसजशी कर्जाची वसुली होईल त्याप्रमाणे ठेवी परत करणेत येतील असे सांगितले होते. जाबदार संस्थेचा संपूर्ण व्यवहार हा जाबदार संस्थेचे चेअरमन हे स्वतः पहात आहेत. त्यामुळे सदरचे जाबदार क्र.3 यांना याबाबत काहीही माहिती नाही. संस्थेच्या कर्जदारांविरुध्द वसूलीसाठी दावे दाखल केले आहेत. जाबदार हे वैयक्तिक व संयुक्तरित्या अर्जदारच्या रकमेस जबाबदार नाहीत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.3 यांनी कथन केले आहे. 4. जाबदार क्र.10 यांनी याकामी त्यांचे लेखी म्हणणे नि. 31 कडे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार क्र. 10 यांनी दिलेला राजीनामा जाबदार संस्थेने अधिकृतरित्या ठराव घेवून मान्य केला आहे. तसेच सहायक निबंधक यांचे दफतरी देखील सदरील जाबदारचे संचालक म्हणून नाव कमी झाले आहे. राजीनामा देण्यापूर्वी जाबदार यांनी संस्थेच्या कोणत्याही आर्थिक कामकाजात भाग घेतलेला नाही. त्यामुळे जाबदार हे वैयक्तिक व संयुक्तरित्या अर्जदारच्या रकमेस जबाबदार नाहीत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.10 यांनी कथन केले आहे. 5. जाबदार क्र.3 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये कर्जदारांनी कर्जे थकीत ठेवल्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत आली आहे, जसजशी कर्जाची वसुली होईल तसतशा अर्जदारच्या रकमा परत करण्यात येतील असे कथन केले आहे. परंतु ठेव रक्कम परत न करण्यास सदरची कारणे ही कायदेशीर कारणे ठरु शकत नाही. ठेवीची मुदत संपलेनंतर अगर संपण्यापूर्वी ठेव रकमा परत मिळण्याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. तसेच संस्थेच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांस संस्थेचे संचालक मंडळ हे सर्वस्वी जबाबदार असल्याने जाबदार क्र.3 हे इतर संचालकांबरोबर अर्जदारची ठेव रक्कम परत करण्यास वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब जाबदार क्र.3 यांचे म्हणण्यातील कथने याकामी ग्राहय धरता येणार नाहीत. 6. जाबदार क्र.10 यांनी नि.31 कडे कैफियत देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार क्र.10 यांनी राजीनामा दिला आहे व सहायक निबंधक सो यांचे दफतरी सदरील जाबदारचे संचालक म्हणून नाव कमी झाले आहे. सबब जाबदार रक्कम देणेस जबाबदार नाहीत असे कथन केले आहे. परंतु राजीनामा दिले असलेबाबत तसेच सहायक निबंधक सो यांचे दफतरी प्रस्तुत जाबदारचे नाव कमी झाले असले बाबत जाबदारने कोणताही लेखी पुरावा दाखल केला नाही. सबब केवळ जाबदारचे कथनाव्यतिरिक्त कोणताही इतर पुरावा दाखल नसलेने जाबदारचे कथन ग्राहय धरणे योग्य होणार नाही असे या मंचाचे मत आहे. 7. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 5 सोबत नि.6 ते 8 कडे ठेव पावत्यांच्या मूळ प्रती दाखल केल्या आहेत. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. सदरचे ठेवपावतींची मुदत जरी संपली नसली तरी मुदत संपणेपूर्वी मुदतपुर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह ठेव रक्कम परत मिळण्यास अर्जदार हे पात्र आहेत. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 5 सोबतच्या नि. 6 ते 8 कडील ठेवींच्या रकमा मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 8. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 12 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.004326, 003582, 003776, 004399, 004498, 002257 कडील रक्कम मुदतपूर्व ठेवपावती नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.23/2/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |