Maharashtra

Kolhapur

CC/10/527

Sambhaji Dattatray Sankpal - Complainant(s)

Versus

Liquidator, K.S.Chougale, Shri Mahadev Gramin Bigar Sheti Sah Pat Sanstha Maryadit, - Opp.Party(s)

Netaji A. Patil

15 Mar 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/527
1. Sambhaji Dattatray SankpalA/p.Kasaba Valawa, Tal-Radhnagari, Dist.Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Liquidator, K.S.Chougale, Shri Mahadev Gramin Bigar Sheti Sah Pat Sanstha Maryadit,Kasaba valava, Tal-Radhanagri, Dist.Kolhapur2. Rajkumar Maruti Patil.Kapileshwar, Tal- Radhanagri Kolhapur,3. Dilip Bajirao Patil.Vidyamandir Majgaon. Tal- Radhanagri.Kolhapur, 4. Jotiram Bapuso patil.Vidyamandir Baradwadi.Tal- Radhanagri.Kolhapur, 5. Shivaji Ganpati Sankpal.Jivan Sikashan Vidyamandir.kasaba Valave. Tal- Radhanagari.Kolhapur, 6. Suresh Hanmant patil.864,A 10 Pradhmesh Nagar.Kalamba Road.Kolhapur7. Satish Shripati PatilR/o.Kendra Pramukh, Kendra Shala, Kote, Tal.Radhanagari, Dist.Kolhapur8. Bajirao Jivaba PatilAt Post Kasaba Walve, Tal- Radhanagari.Kolhapur, 9. Ajit Rajaram PatilAt Post Kasaba Valave, Tal- Radhanagari, Dist.Kolhapur, 10. Rajaram Maruti ShindeAt Post Kasaba Valave, Tal- Radhanagari, Dist.Kolhapur, 11. Bhagirathi Bhikaji KanakekarAt Post Kasaba Valave, Tal- Radhanagari, Dist.Kolhapur, 12. Vimal Krishnat PatilAt Post Kasaba Valave, Tal- Radhanagari, Dist.Kolhapur, 13. ., ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
Adv.S.S.Sankpal for the Opponent No.2 to 6, 9, 10 & 11

Dated : 15 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.15.03.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 ते 6, 9, 10 व 11 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला क्र.2 ते 6, 9, 10 व 11 यांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. तक्रारदार तसेच त्‍यांचे वकिल गैरहजर.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदार क्र.1 व 2 हे नात्‍याने पती-पत्‍नी आहेत. सामनेवाला क्र.1 ही महाराष्‍ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार नोंदविणेत आलेली सहकारी पतसंस्‍था असून सामनेवाला क्र. 2 ते 12 हे सामनेवाला क्र.1 चे संचालक आहेत. सामनेवाला क्र.1 हे अवसायक आहेत. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद ठेवीच्‍या स्‍वरुपात व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे:
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
दि.22.07.2010 रोजीअखेर व्‍याजासह होणारी रक्‍कम
1.
S/B.A/c.No.301
11199/-
--
12372/-
2.
1109
18000/-
28.08.2006
23618/-
3.
1110
18000/-
28.08.2006
23618/-
4.
973
25000/-
21.05.2005
35340/-
5.
1107
18000/-
28.08.2006
23618/-
6.
1108
18000/-
28.08.2006
23618/-

 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि, सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.23.07.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. सदरची रक्‍कम परत करणेची सामनेवाला क्र.1 ते 12 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, सेव्हिंग्‍ज खात्‍यांचे पासबुक व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र. 2 ते 5, 9, 10 व 11 यांनी त्‍यांच्‍या एकत्रित म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सहकार खात्‍याने सामनेवाला क्र.1 संस्‍थेवर अवसायकांची नियुक्‍ती केली. त्‍यामुळे प्रस्‍तुत सामनेवाला यांना वसुलीची कोणतीही कारवाई करता आली नाही. तसेच, सामनेवाला संस्‍थेचे संचालक मंडळ बरखास्‍त झाले असलेमुळे तक्रारदारांच्‍या रक्‍कमांची परतफेड करणेची जबाबदारी केवळ अवसायक यांचेवरच टाकता येवू शकेल. सहकार कायद्ययातील तरतुदीनुसार अवसायकांनी संस्‍थेची मालमत्‍ता विक्री करुन व कर्जदारांकडून कर्ज वसुली करुन संस्‍थेच्‍या देणेक-यांची देणी भागविणे आवश्‍यक आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती केली आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.6 यांनी त्‍यांचे म्‍हणणे सामनेवाला क्र. 2 ते 5, 9, 10 व 11 यांनी दिलेल्‍या म्‍हणण्‍यासारखेच दिले आहे.    
 
(7)        या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे व उपलब्‍ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये मुदतबंद ठेव ठेवली आहे व त्‍याची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्‍कमा व्‍याजासह दिलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाला यांनी सदर रक्‍कमा देणेची कायद्याने कोणतीही जबाबदारी त्‍यांचेवर येत नसल्‍याचे प्रतिपादन केले आहे. परंतु, वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदार संस्‍थेने सामनेवाला संस्‍थेकडे मुदतबंद ठेव व सेव्हिंग्‍ज खात्‍यावर रक्‍कम ठेवली आहे व दि.23.07.2010 रोजी नोंद पोच डाकेने मागणी केली आहे व मागणी करुनही सदर रक्‍कम सामनेवाला संस्‍थेने दिलेली नाही. त्‍यामुळे सदर ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 2 ते 12 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्‍कम देणेबाबत आहे असे तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत प्रतिपादन केले आहे. परंतु, महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्‍थेच्‍या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्‍तुत सामनेवाला यांची त्‍याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्‍थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 ते 12 यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचे तक्रारदारांचे प्रतिपादन हे मंच फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे.  सदर सामनेवाला पतसंस्‍थेवरती अवसायकांची नेमणुक झाली आहे. सामनेवाला बँकेचे प्रतिनिधी या नात्‍याने तक्रारदारांच्‍या ठेवींच्‍या देय रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र.1- अवसायकांची जबाबदारी ही संयुक्तिकरित्‍या असेल या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सदर विवेचनास पूर्वाधार म्‍हणून मा.ना.उच्‍च न्‍यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्‍त्‍वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :-
 
“The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.”
 
(8)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कम ठेवल्‍याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्‍ज खाते क्र. 301 वर दि.30.03.2009 रोजीअखेर रुपये 24,199/- जमा असल्‍याचे दिसून येते. तथापि, तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये सदर खात्‍यावरील रुपये 11,199/- इतक्‍या रक्‍कमेचीच मागणी केली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम रुपये 11,199/- द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(10)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
1.    तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
1109
18000/-
2.
1110
18000/-
3.
973
25000/-
4.
1107
18000/-
5.
1108
18000/-

 
(3)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र.301 वरील रक्‍कम रुपये 11,199/- (रुपये अकरा हजार एकशे नव्‍याण्‍णव फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.30.03.2009 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(4)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT