Maharashtra

Beed

CC/14/216

Ganesh Panditrao Ingale - Complainant(s)

Versus

Liquidator, Champavati Co-Op Bank Ltd - Opp.Party(s)

Kukadgaonkar

16 Mar 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/216
 
1. Ganesh Panditrao Ingale
R/o Laxman Nagar, Lendi Raod Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Liquidator, Champavati Co-Op Bank Ltd
Hanuman chowk Bashirganj Beed
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकालपत्र

                                दिनांक- 16.03.2015

                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष )

            तक्रारदार  यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी बचत खात्‍यातील रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली व सेवेत त्रूटी दिली म्‍हणून दाखल केली आहे.

            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे,, तक्रारदार हे बीड ता. जि.बीड येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेत बचत खाते क्र.2144 मध्‍ये रक्‍कम रु.3,41,112/- जमा केले होते. सामनेवाले बँकेवर नंतर प्रशासक नेमण्‍यात आला. अवसायक मंडळाने वर्तमानपत्रात नोटीस देऊन रु.1,00,000/- चे आतील रक्‍कम घेऊन जाणे बाबत कळविले. तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे दि.3.5.2010 रोजी मागणी अर्ज भरुन दिलेलो आहे व त्‍यानंतर वरील रककमेची तोंडी मागणी केली परंतु रक्‍कम मिळाली नाही. शेवटी दि.27.8.2008 व दि.3.2.2014 रोजी तक्रारदाराने अवसायक यांना लेखी अर्ज देऊन वरील रक्‍कम आठ दिवसांचे आंत दयावी अशी मागणी केली. अवसायक यांनी आजतागायत रक्‍कम दिली नाही.  महाराष्‍ट्र सहकारी संस्‍थेचे अधिनियम 1960 चे कलम 107 नुसार जिल्‍हा उपनिंबंधक सहकारी संस्‍था बीड यांची परवानगी असल्‍याशिवाय अवसायका विरुध्‍द कूठल्‍याही प्रकारचे प्रकरण चालू शकत नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने दि.15.07.2014 रोजी जिल्‍हा उपनिंबधक सहकारी संस्‍था बीड यांचेकडे अवसायक यांचे विरुध्‍द तक्रार दाखल करणेसाठी परवानगी मागणारा अर्ज दाखल केला आहे.  त्‍यांनी दि.24.11.2014 रोजीचे पत्रानुसार सक्षम न्‍यायालयात तक्रार दाखल करण्‍यास परवानगी दिली आहे. तक्रारदार हा व्‍यापारी असून त्‍यांला घर खरेदी करणेासाठी व इतर प्रांपचिक व घरगुती अडचणी निवारणेकामी रक्‍कमेची अत्‍यंत आवश्‍यकता आहे.  सामनेवाले यांनी तक्रारदाराची बचत खात्‍यातील रक्‍कम न दिल्‍यामुळे शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागलेलाआहे. तक्रारदाराने सदरील तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, बचत खाते क्र.2144 मधील रक्‍कम रु.3,41,112/-, मनस्‍तापाबददल नुकसान भरपाई रु.20,000/- तसेच तक्रारीचा खर्च रु.3,000/-असे एकूण रु.3,64,112/- मिळावेत अशीमागणी केली आहे.   

                        सामनेवाले  हे मंचासमोर हजर झाले.त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. बचत खाते क्र.2144 मध्‍ये रक्‍कम रु.3,41,112/- आहे हे त्‍यांना मान्‍य नाही. बॅक रेकार्ड प्रमाणे दि.5.1.2015 अखेर रक्‍कम रु.7601.90 शिल्‍लक आहेत.  तक्रारदाराने मागणी केलेली रक्‍कम रेकार्ड नुसार नसलेने देण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. बॅकेत झालेला अपहार/गैरव्‍यवहार प्रकरणी फिर्याद क्र.56/2009 फौजदारी गुन्‍हा नोंद आहे. सदर प्रकरणी चार्ज शिट क्र.468/2011 अन्‍ये जिल्‍हा न्‍यायालयात प्रकरण चालू असताना पून्‍हा अवसायका विरुध्‍द या मंचात प्रकरण चालू शकत नाही.   फौजदारी प्रकरणाचा निकाल लागेपर्यत अवसायक मंडळास तक्रारदाराने मागणी केलेली रक्‍कम परत करता येत नाही.   तक्रारदाराची तक्रार योग्‍य नसून ती फेटाळण्‍यात यावी.

            तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या लेखी जवाबाचे व कागदपत्राचे अवलोकन केले.

            तक्रारदार  यांचे वकिल श्री.कूक्‍कडगांवकर  यांचा युक्‍तीवाद ऐकला, न्‍याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

                 मुददे                                       उत्‍तर

1.    तक्रारदार यांना सामनेवाले यांनी बचत खात्‍यातील रक्‍कम न

      देऊन सेवेत त्रूटी केली ही बाब सिध्‍द केली आहे काय ?           होय.      

2.    तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली रक्‍कम मिळण्‍यास

      पात्र आहेत काय ?                                        होय.

3.    काय आदेश ?                                     अंतिम आदेशाप्रमाणे.

                              कारणे

मुददा क्र.1 ते 3 ः-

                                तक्रारदाराच्‍या वकिलांनी युक्‍तीवादात सांगितले की, तक्रारदार यांने सामनेवाले यांच्‍याकडे बचत खाते क्र.2144 मध्‍ये रक्‍कम रु.3,41,112/- जमा केलेले आहेत. तक्रारदार यांना  रक्‍कम आवश्‍यकता असलेने सामनेवाले कडे मागण्याकरिता गेले. सामनेवाले यांनी सदर रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांने सामनेवाले यांच्‍याकडे पैशासाठी चकरा मारल्‍या तरी सुध्‍दा सामनेवाले यांनी रक्‍कमा देण्‍याची तयारी दर्शविली नाही. शेवटी दि.03.6.2010 रोजी सामनेवाले यांना अर्ज पाठविला. सदर अर्जाचे उत्‍तर सामनेवाले यांनी दिले नाही. सामनेवाले यांनी बचत खात्‍यातील  रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज परत न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे. त्‍यामुळे तक्रारदारास शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे. सबब, तक्रारदार हा तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र आहे.

            सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांचा यूक्‍तीवाद ऐकला. त्‍यांच्‍या कथनेनुसार सदर बँकेवर अवसायकाची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.सामनेवाले यांचे पुढील कथन की,तक्रारदार यांचे बॅकेतील रेकार्ड नुसार  रु.7601.90/-  बचत खात्‍यात जमा आहे. तेवढी रक्‍कम देण्‍यास ते आजही तयार आहेत. बॅकेत अपहार झाल्‍याने त्‍याबाबत जिल्‍हा न्‍यायालयात तक्रार प्रलंबित आहे. रक्‍कम न देऊन सामनेवाले यांनी कोणतीही सेवेत त्रूटी ठेवलेली नाही.

 

             वर नमूद केलेला यूक्‍तीवाद लक्षात घेतला व तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजाचे अवलोकन केले. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा जो खाते उतारा दाखल केला आहे त्‍यांचे अवलोकन केले. सामनेवाले यांनी सदरील खाते उतारा हा दि.30.06.2008 पर्यतचे तक्रारदार यांचे खात्‍यामध्‍ये किती रक्‍कम जमा झाली व किती रक्‍क्‍मा काढल्‍या या बाबत बाबी नमूद केलेल्‍या आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या पावत्‍याचे अवलोकन केले.  तक्रारदार यांनी रु.18,000/- जमा केलेले आहेत. तसेच दि.10.07.2008 रोजी रु.60,000/- पावतीने बॅकेत जमा केलेले आहेत. दि.18.08.2007 रोजी रु.40,000/- पावतीने जमा केले आहेत. दि.06.05.2008 रोजी रु.50,000/- जमा केलेजे आहेत. सदरील पावत्‍या तक्रारदार यांनी या मंचासमोर हजर केलेल्‍या आहेत. सामनेवाले हयांनी दाखल केलेला उतारा लक्षात घेतला सता सदरील रक्‍कम खात्‍यावर जमा झाल्‍याचे दाखवले नाही.  सदरील पावत्‍यावर रक्‍कम घेणारे कॅशीयर यांची सही आहे व बँकेचे शिक्‍के आहेत. तसेच तक्रारदार यांचे सहया आहेत. सामनेवाले यांचा यूक्‍तीवाद की, बॅंकेच्‍रूा कर्मचा-याने अपहार केला आहे त्‍यांचे विरुध्‍द फौजदारी केसेस दाखल केलेल्‍या आहेत. ग्राहकाने बँकेच्‍या सक्षम अधिका-याकडे खात्‍यात भरण्‍यासाठी पैसे पावती भरुन दिले आहेत व त्‍यावर बँकेच्‍या अधिका-याची रक्‍कम स्विकारल्‍याची सही आहे. ते पैसे तक्रारदार यांचे बचत खात्‍यावर जमा करण्‍याची जबाबदारी संबंधीत अधिका-याची आहे. संबंधीत अधिका-याने ती रक्‍कम जमा न करता परस्‍पर अपहार केला असल्‍यास त्‍यांस तक्रारदार जबाबदार नाहीत. सामनेवाले यांनी  सदरील रक्‍कम काढून दिली आहे या बाबत कोणताही दस्‍त अथवा पुरावा हजर केला नाही. तक्रारदार यांनी त्‍यांचे बचत खात्‍यामध्‍ये तक्रारीत नमूद केलेली रक्‍कम जमा पावत्‍या लिहून भरले आहे व पैसे स्विकारल्‍याची सामनेवाले यांहचे अधिका-याच्‍या सहया आहेत. म्‍हणजेच सदरील रक्‍कम तक्रारदार यांनी त्‍यांचे खात्‍यात भरण्‍यासाठी जमा केले आहे. जर सदरील रक्‍कम तक्रारदार यांनी काढहून घेतली असेल तर तसे दस्‍ताऐवज सामनेवाले यांनी या मंचासमोर हजर करणे गरजेचे आहे. सामनेवाले यांनी कोणतेही दस्‍त हजर केले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे त्‍यांचे खात्‍यात भरलेल्‍या रक्‍कमेची वेळोवेळी मागणी केली. सामनेवाले यांनी ती देण्‍यास टाळाटाळ करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, तक्रारदार हे त्‍यांचे बचत खात्‍यातील रक्‍कम रु.3,41,112/- व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच त्‍यांना झालेल्‍या मानसिक त्रासाबददल रु.3,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- मिळण्‍यास पात्र आहेत.

            मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

आदेश

1.     तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

2.    सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार

      यांना त्‍यांचे बचत खात्‍यातील  रक्‍कम रु.3,41,112/-व त्‍यावरील व्‍याज

      निकाल कळाल्‍यापासून 30  दिवसांचे आंत दयावी, सदर रक्‍कम विहीत

      मुदतीत न दिल्‍यास संपुर्ण रक्‍कमेवर तक्रार दाखल दिनांक 16.12.2014

      पासून संपुर्ण रक्‍कम वसुल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज

      दयावे.

3.    सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार यांना मानसिक व   

      शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- व दाव्‍याच्‍या खर्चापोटी रक्‍कम

      रु.2000/- निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत.

      4.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील  कलम 20

                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.

 

 

 

 

   श्री.रविंद्र राठोडकर        श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                       

        सदस्‍य                सदस्‍या                         अध्‍यक्ष   

                                 जिल्‍हा  ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.