Maharashtra

Kolhapur

cc/10/723

Tanaji Maruti Gore - Complainant(s)

Versus

Life Insurance Corporation Of India - Opp.Party(s)

S.M.Potdar

11 Feb 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. cc/10/723
1. Tanaji Maruti Gorea/p Takaliwadi, Tal. Shirol, Dist. Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Life Insurance Corporation Of IndiaFirst Floor, Center Point Complex, Station Road, Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar, Advocate for Complainant
R.V.Kulkarni , Advocate for Opp.Party

Dated : 11 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 

निकालपत्र :- (दि.11/02/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या) 

(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षातर्फे लेखी युक्‍तीवाद दाखल् उभय पक्षांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला. 
 
           सदरची तक्रार सामनेवालांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारलेमुळे दाखल करणेत आली आहे.
          
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला हे विमा व्‍यवसाय करणारी कंपनी असून तक्रारदाराची पत्‍नी मयत गीता तानाजी गोरे यांची सामनेवालांकडे जिवन आस्‍था ही विमा पॉलीसी उतरविलेली आहे. सदर पॉलीसीचा कालावधी सन 2009ते 2019 असा असून पॉलीसीचा क्रमांक947665134 असा आहे.
 
           ब) नमुद पॉलीसी कालावधीत 13/01/2010 रोजी सकाळी 11.00 वा चे दरम्‍यान तक्रारदाराचे पत्‍नी गीता तानाजी गोरे यांना अचानक छातीमध्‍ये दुखु लागलेने त्‍यांची प्रकृती गंभीर झाली. त्‍यांना उपचारासाठी दवाखान्‍यात नेणेपूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्यानंतर तक्रारदारांनी आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवाला यांचेकडे क्‍लेमची मागणी केली असता दि.23/11/2010 रोजी ‘’ पॉलिसीधारकाने पॉलिसी उतरवितेवेळी पूर्वी झालेली शस्‍त्रक्रिया पॉलिसी प्रस्‍तावामध्‍ये सांगितली नाही.’’ असे कारण देऊन नाकारलेली आहे.
 
           क) वास्‍तविक तक्रारदार यांची मयत पत्‍नी गीता तानाजी गोरे यांची सदरची पॉलिसी ही दहा वर्षाचे कालावधीकरिता होती. सदरची पॉलीसी उतरवितेवेळी त्‍यांनी सामनेवालांचे प्रतिनिधीला स्‍वत:चे प्रकृतीबाबत संपूर्णत: सत्‍य माहिती पुरविलेली आहे. तसेच त्‍यांचेवर सन-2008 मध्‍ये  “ Abdominal Hysterectomy”  ची शस्‍त्रक्रिया झालेचेदेखील सामनेवालांचे प्रतिनिधींना स्‍पष्‍टपणे सांगितले होते. तसेच तक्रारदारांच्‍या पत्‍नीचा मृत्‍यू हा अचानकपणे आलेल्‍या हृदय विकाराच्‍या तीव्र झटक्‍याने झालेला आहे. त्‍यांना पूर्वी कधीही उच्‍च रक्‍तदाब अथवा हृदयाशी संदर्भात कोणत्‍याही प्रकारचा आजार अथवा औषधोपचार झालेला नव्‍हता व नाहीत.त्‍यामुळे पूर्वी झालेल्‍या शस्‍त्रक्रियेचा व मृत्‍यूचे कारणाचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही ही वस्‍तुस्थिती सामनेवालांना मेडिकल रिपोर्टवरुन माहिती होऊनही सामनेवालांनी तक्रारदारांचा न्‍याययोग्‍य,पारदर्शी व सवच्‍छ क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेने प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन सामनेवालांकडून पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु.1,50,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह मिळावेत व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारलेचे पत्र व पॉलीसी कव्‍हर नोट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(04)       सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार-अ) विमाधारक सौ.गीता तानाजी गोरे यांनी त्‍यांचे हयातीत ‘’जीवनआस्‍था’’ या प्रकारची विमा पॉलीसी घेतली होती. सदर पॉलीसी दि.17/01/009 पासून सुरु झाली. सदर विमेदाराचा मृत्‍यू हा दि.13/1/010 रोजी म्‍हणजे विमा पॉलिसी सुरु झालेपासून 2 वर्षाचे आत झाला आहे. त्‍याकामी सदर पॉलीसीतील इन्‍शुरन्‍स अॅक्‍ट 1938 कलम 45 लागू होते. विमाधारकाने विमा घेतेवेळी प्रपोझल फॉर्ममध्‍ये क्‍लॉज 11(ब) मध्‍ये विचारलेल्‍या-(1) निरीक्षण उपचार अगर शस्‍त्रक्रियेसाठी आपण एखादया रुग्‍णालयात किंवा आरोग्‍य धामात वास्‍तव्‍य केले होते काय? या प्रश्‍नाला ‘’ नाही ’’ असे खोटे उत्‍तर दि.15/01/009 रोजी पॉलीसी घेणेपूर्वी दिले होते. प्रत्‍यक्षात मयत सौ.गीता तानाजी गोरे यांचे दि.01/03/2008 रोजी गर्भाशय काढून टाकणेचे व पोटाचे ऑपरेशन(शस्‍त्रक्रिया) डॉ. जाधव नर्सिंग होम, गोसावी बिल्‍डींग हेरवाड रोड, कुरुंदवाड ता. शिरोळ जि.कोल्‍हापूर येथे झाले होते. त्‍याची कागदपत्रे कामात दाखल आहेत. सदरची माहिती विमेदाराने प्रपोझल फॉर्ममध्‍ये न देता दडवून ठेवली व सामनेवाला यांना फसवून विमा पॉलीसी मिळवली. तसेच तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीतील कलम 3 मध्‍ये सामनेवालांचे प्रतिनीधीला विमा उतरवितेवेळी स्‍वत:चे प्रकृतीबाबत संपूर्णत: सत्‍य माहिती पुरविलेली आहे व विमाधारकावर सन-2008 मध्‍ये “ Abdominal Hysterectomy”  ची शस्‍त्रक्रिया झालेचे सांगितलेचे कथन खोटे व चुकीचे आहे. त्‍यामुळे सदर कथनावर विश्‍वास ठेवता येणार नाही. त्‍यामुळे विमा करार बेकायदेशीर असलेने तो तसेच विमेदाराचा मृत्‍यू पॉलीसी सुरु झालेनंतर 2 वर्षाचे आत झालेमुळे इन्‍शुरन्‍स अॅक्‍ट कलम 45 प्रमाणे असणारे अधिकारात पॉलीसी अमान्‍य करुन क्‍लेम नाकारला आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर करुन खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनंती सामनेवालां यांनी सदर मंचास केली आहे.
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ मयत विमेदार मयत सौ.गीता तानाजी गोरे यांनी स्‍वत:चे सहीने भरुन दिलेला प्रपोजल फॉर्म तसेच मयत विमेदाराची दि.01/03/2008 रोजी  “ Abdominal Hysterectomy”  ची शस्‍त्रक्रिया झाली होती त्‍याचा डॉ. आर.बी. जाधव यांचा दाखला इत्‍यादी कागदपत्रे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केली आहे.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे तसेच उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्‍तीवाद  इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
 
1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय         --- होय.
2. तक्रारदार विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?   --- होय.
3. काय आदेश ?                                                      ---शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे पत्‍नी सौ.गीता तानाजी गोरे यांची जीवन आस्‍था‍ या प्रकारची सामनेवालांकडे विमा पॉलीसी उतरविलेली होती. सदर पॉलीसीचा कालावधी सन 2009ते 2019 असा असून पॉलीसीचा क्रमांक 947665134 असा आहे. सदर पॉलीसीची मूळ विमा रक्‍कम रु.1,50,000/-इतकी आहे. सामनेवालांनी पॉलीसी मान्‍य केलेली आहे. सामनेवाला यांनी आपल्‍या म्‍हणणेमध्‍ये सदर पॉलीसी दि.17/01/2009 पासून सुरु झाली तर विमेदाराचा मृत्‍यू दि.13/01/2010 रोजी म्‍हणजे विमा पॉलीसी सुरु झालेपासून 2 वर्षाचे आत झालेचे मान्‍य केलेले आहे. तक्रारदाराने प्रस्‍तुतचा क्‍लेम सामनेवालांकडे मागणी केला असता दि.23/11/2010 चे पत्रानुसार सामनेवालांनी विमा प्रस्‍तावातील प्रश्‍नावली कलम 11 मधील ब या प्रश्‍नाचे उत्‍तर नाही असे देऊन वस्‍तुस्थिती लपवून ठेवली आहे. तक्रारदाराचे गर्भाशयाचे पिशवी काढून टाकलेची शस्‍त्रक्रिया झालेली आहे. त्‍यामुळे आरोग्‍याबाबतची सत्‍य वस्‍तुस्थितीची माहिती न देता ती लपवून ठेवलेने प्रस्‍तुतचा क्‍लेम नाकारला आहे.
 
           वरील वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीत सन-2008 मध्‍ये “ Abdominal Hysterectomy”  शस्‍त्रक्रिया झालेचे स्‍पष्‍टपणे कथन केले आहे. तसेच प्रस्‍तुतची बाब विमा कंपनीच्‍या प्रतिनिधीला सांगितलेली होती असे प्रतिपादन केले आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या दि.15/01/2009 च्‍या विमा प्रस्‍तावाचे अवलोकन केले असता प्रस्‍तुत प्रस्‍तावावर तक्रारदाराच्‍या सहया घेतलेल्‍या आहेत. प्रस्‍तुतचा प्रस्‍ताव हा विमाधारकाने न भरता सामनेवालांच्‍या प्रतिनिधीने भरलेला आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. मात्र सदर प्रतिनिधीने सदर प्रस्‍तावातील पान क्र.4खाली क्र.1वर प्रस्‍ताव भरुन देणा-या व्‍यक्‍तीने या निवेदनावर सही करुन घ्‍यावी.तसेच निवेदकाचे नांव पत्‍ता त्‍याचप्रमाणे प्रस्‍ताविकास निट समजावून सांगून दिलेली उत्‍तरे सत्‍याला स्‍मरुन नमुद केलेली आहेत असे सहीनिशी देणेचे होते. ही सामनेवाला विमा प्रतिनिधीची जबाबदारी होती ती त्‍यांनी पार पाडलेली नाही. अशा परिस्थितीत तक्रारदाराची पत्‍नीने प्रस्‍तुतची माहिती दडवून ठेवली असे म्‍हणणे उचीत होणार नाही.
 
           तक्रारदाराचे विमाधारक पत्‍नीचा मृत्‍यू हा “ Abdominal Hysterectomy”  शस्‍त्रक्रियेच्या कारणास्‍तव झालेला नसून दि.13/01/2010 रोजी सकाळी 11.00 वाजता अचचानक छातीत दुखु लागून प्रकृती गंभीर झालेने उपचारास नेणेपूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झालेला आहे व सदरचा मृत्‍यू हा अचानकपणे आलेल्‍या हृदय विकाराचे तिव्र झटक्‍याने झालेला आहे. तसे वैद्यकीय अहवालावरुन स्‍पष्‍ट आहे. नमुद विमाधारकाने यापूर्वी उच्‍च रक्‍तदाब अथवा हृदयाशी संदर्भात कोणत्‍याही प्रकारचा आजार अथवा औषधोपचार झालेले नव्‍हते अथवा नाहीत. जर अशाप्रकारचे औषधोपचार झाले असतील तर ते दाखवून देण्‍याची जबाबदारी सामनेवाला विमा कंपनीची आहे. सबब नमुद विमाधारकाचा मृत्‍यू हृदयरोगाचे झटकयाने झालेला असून तो सामनेवाला म्‍हणतात त्‍याप्रमाणे वर नमुद गर्भाशयाचे शस्‍त्रक्रियेची बाब दडवून ठेवली त्‍यामुळे झालेला नाही ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. त्‍यामुळे वादाकरिता सामनेवाला म्‍हणतात त्‍या‍प्रमाणे वर नमुद शस्‍त्रक्रियेची दडवलेली माहिती व मृत्‍यूचे कारण यामध्‍ये कोणताही अर्थाअर्थी थेट संबंध दिसून येत नाही. यासाठी हे मंच खालील पूर्वाधार विचारात घेत आहे.
 
I (2007) CPJ 226(NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI- Life Insurance Corporation of India Vs Kamla Devi Gupts Revision Petition No4000 of 2006 Decided on 16.01.2007-Consumer Protection Act, 1986-Section 2(1)(g)-Life Insurance-Salaray Claim repudiated on ground of non-disclosure of diseases like bronchitis, T.B. etc. for which insured took treatment around 4-5 years ago- Same not suppression/concealments of material fact-No evidence that life insured ever remained admitted in any hospital and/or treated for cancer prior to his obtaining policy-Insurer liable.
 
I(2010)CPJ 167-CHHATTISGARH STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSSION RAIPUR- LIC OF INDIA AND ANR VS MERCY MASIH-Appeal No 886/2008 Decided on 06/07/2009- Consumer Protection Act, 1986-Section 2(1)(g) –Life Insurance-Suppression of facts alleged- Insured died due to heart failure during validity of policies- Claim repudiated alleging suppression of facts-Deficiency in services alleged-Complaint allowed-OP Directed to refund amount of Rs.1,00,000/- along with compensation of Rs.5,000/- Costs awarded- Hence appeal-Contention, deceased suffering from Cerebro Vascular Accident-Leave obtained by complainant for a period of one and a half months on medical grounds- Contention rejected-Fitness certificate and leave certificate  perused-Meaning, symptom causes or affects of the alleged disease not explained-Merely mentioning of a disease or a fit and unfit certificate for availing leave not sufficient to hold insured guilty of suppression of facts-Insured died of heart failure-Nothing on record to show any nexus between cause of death and alleged disease of CVA-Order upheld-No interference required.          
 
           वरील विस्‍तृत विवेचन व पूर्वाधाराचा विचार करता तसेच विमा पॉलीसीच्‍या मूळ हेतूचा विचार न करता केवळ तांत्रिक कारणास्‍तव सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे या निष्‍कषाप्रत हे मंच येत आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 :- वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हा त्‍याची विमाधारक पत्‍नीचा मृत्‍यू झालेने पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु.1,50,00/- व्‍याजासह मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. 
 
 
                           आदेश
 
 
(1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
(2) सामनेवाला यांनी तक्रारदारांना विमा रक्‍कम रु.1,50,000/-(रु.एक लाख पन्‍नास हजार फक्‍त) त्‍वरीत अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.23/11/2010पासून द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.
 
3) सामनेवाला  यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावेत.
 
 
 

 


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT