निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 28/02/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 05/03/2013
तक्रार निकाल दिनांकः- 11/02/2014
कालावधी. 11 महिने. 06 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
डॉ.प्रशांत पिता पुंडलिकराव मुंढे. अर्जदार
वय 31 वर्षे,धंदा.वैद्यकीय व्यवसायीक, अॅड.डि.यु.दराडे.
रा.यलदरी कॅम्प ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
भारतीय जिवन विमा निगम, गैरअर्जदार.
तर्फे व्यवस्थापक, जिवन ज्योती,नेहरु रोड, अॅड.एम.एस.कुलकर्णी.
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, तो यलदरी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवाशी असून तो वैद्यकीय व्यवसाय करतो. अर्जदाराने दिनांक 21/11/2009 रोजी गैरअर्जदाराकडून पॉलिसी क्रमांक 987342062 अन्वये पॉलिसी घेतली होती, व सदर पॉलिसीचा कालावधी 21/08/2024 पर्यंत होती. सदरची पॉलिसी जिवन सरल योजनेची असून विमा रक्कम 3,12,500/- होती. व सदर पॉलिसी मध्ये अपघात लाभ अंतर्भुत असून कायम स्वरुपी अपंगत्वास 5,00,000/- रु. इतका लाभ देय आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने सदर पॉलिसीचे त्रैमासिक हप्ता विमा कंपनीकडे नियमित भरणा केलेला आहे. सदरची पॉलिसी कधीही खंडीत झाली नाही, किंवा पुर्नजिवीत केली नाही. अर्जदाराने सदर पॉलिसीचे हप्ते वेळेवर विमा कंपनीकडे भरले व शेवटचा हप्ता त्याने विमा कंपनीकडे 04/05/2012 रोजी भरले होते.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 17/04/2012 रोजी त्याचा वसमत रोड परभणी येथे अपघात झाला व त्या मध्ये त्याचे दोन्हीही पाय तुटले या संबंधी नवा मोंढा परभणी पो.स्टेशनला संबंधीत ट्रक चालका विरुध्द गुन्हा नोंद झाला. अर्जदारास जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी यांनी 100 टक्के कायम स्वरुपी अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने काढलेल्या गैरअर्जदार विमा कंपनीकडे सदर विमा पॉलिसी अंतर्गत लाभ मिळावा म्हणून अर्जदाराने विमा प्रस्ताव गैरअर्जदाराकडे दाखल केला, परंतु विमा कंपनीने विमा प्रस्तावाचा योग्य विचार केला नाही, व दिनांक 28/12/2012 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमादावा फेटाळला व विमादावा फेटाळण्याचे कारण असे दाखविले होते की, सदर अपघातावेळी अर्जदाराची पॉलिसी बंद अवस्थेत असल्यामुळे पॉलिसी अंतर्गत येणारा अपंगत्वाचा फायदा देता येणार नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार विमा कंपनीचे दावा फेटाळण्याचे कारण एकदम चुकीचे आहे, कारण अर्जदाराची पॉलिसी कधीही बंद नव्हती पॉलिसी बंद झाले बाबत विमा कंपनीने नोटीसव्दारे अर्जदारास कधीही कळविले नव्हते, व तसेच अर्जदाराचे म्हणणे की, पॉलिसीचे सतत पाच त्रैमासिक हप्ते भरले नाही तरच पॉलिसी बंद पडते, परंतु अर्जदाराचे पॉलिसीचे हप्ते बाकी नव्हते व तसेच पॉलिसी कधीही पुर्नजिवीत केलेली नाही, तसेच विमा कंपनीने कोणत्या अटीशिवाय दिनांक 04/05/2012 रोजीचा हप्ता अर्जदाराकडून स्विकारलेला आहे व विमा करार चालू ठेवला त्यामुळे सदर विमा कराराचा भंग अर्जदाराकडून झालेला नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, विमा कंपनीने पॉलिसीतील तरतुदीचा विचार न करता अर्जदाराचा विमा क्लेम नाकारला आहे, प्रस्तुत पॉलिसीतील अट क्रमांक 2 चा विचार गैरअर्जदाराने केलेला नाही, व तसेच विमा कंपनीने चुकीच्या पध्दतीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव फेटाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदाराना आदेश करावा की, पॉलिसी क्रमांक 987342062 अन्वये विमा कंपनीने कायम स्वरुपी अपंगत्वाचा लाभ दिनांक 17/04/2012 पासून पूर्ण रक्कम मिळे पर्यंत 12 टक्के व्याजासह अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा, व तसचे मानसिक त्रासापोटी 20,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 10,000/- रु. विमा कंपनीने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्यासोबत नि.क्रमांक 4 वर 4 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये रेप्युडेशन लेटर, पॉलिसीची प्रत, पॉलिसी स्टेट्स रिपोर्ट, अपंगत्वाचे प्रमाणपत्र कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराची प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत येत नाही, म्हणून सकृतदर्शनी फेटाळण्यात यावी, कारण विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही.
विमा कंपनीचे म्हणणे की, दिनांक 17/04/2012 रोजीच्या अर्जदाराच्या अपघाता दिवशी सदरची पॉलिसी अस्तित्वात नव्हती, कारण अर्जदाराचा सदर पॉलिसीचा 21/02/2012 रोजीचा हप्ता देय होता व अर्जदाराने निर्धारीत वेळेत सदरचा हप्ता विमा कंपनीकडे भरला नाही व या कारणामुळे अर्जदारास पॉलिसी अंतर्गत अपंगत्वाचा लाभ घेता येत नाही, व अर्जदाराची तक्रार चालवणे योग्य नसलेमुळे ती खारीज होणे योग्य आहे.
विमा कंपनीचे म्हणणे की, विमा कंपनीने पॉलिसीच्या नियमा प्रमाणेच अर्जदाराचा विमादावा नाकारलेला आहे, त्यामुळे अर्जदारास सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच येत नाही, तसेच विमाधारक अपघातानंतर कोणत्याही प्रकारचा व्यवसाय, कामधंदा करीत असेलतर व त्यामधून त्याला उत्पन्न मिळत असेलतर विमा धारक कायम स्वरुपी अपंगत्वाचा लाभास पात्र नाही, असे पॉलिसी मध्ये स्पष्टपणे नमुद केले आहे. व अर्जदाराने त्याच्या तक्रारीमध्ये असे स्पष्टपणे नमुद केले आहे की, तो वैद्कीय व्यवसाय करतो, तरी या कारणावरुन देखील अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावा.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराने त्यांचेकडे पॉलिसी नं. 987342062 ची पॉलिसी घेतली होती. तसेच विमा कंपनीचे म्हणणे की, दिनांक 17/04/2012 रोजी अर्जदाराची पॉलिसी अस्तीत्वात नव्हती. कारण अर्जदाराने 21/02/2012 रोजीचा हप्ता अर्जदाराने भरला नव्हता, म्हणून पॉलिसी बंद झाली होती, म्हणून अर्जदार अपंगत्वाचा लाभ घेण्यास पात्र नाही. पॉलिसीचा हप्ता वेळेवर नाही भरला तर पॉलिसी बंद होती हा नियम पॉलिसी मध्येच आहे. तसेच विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराने 21/02/2012 चा हप्ता दिनांक 04/05/2012 रोजी भरला, परंतु
पॉलिसीच्या अटीची पुर्तता केली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार 10,000/- रु. खर्चासह खारीज करण्यात यावी.
विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 12 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफीयतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराची पॉलिसी क्रमांक987342062
अन्वये कायम स्वरुपी अपंगत्वाचा अंतर्गत अर्जदाराचा
पॉलिसी प्रस्ताव फेटाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे जिवन सरल योजनेच्या नावाने पॉलिसी 987342062 अन्वये गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक 21/11/2009 रोजी विमा रक्कम 3,12,500/- कायमस्वरुपी अपंगत्वासाठी 5,00,000/- रक्कमेची सदर नावाची पॉलिसी काढली होती, ही अॅडमिटेड फॅक्ट आहे.
सदर पॉलिसीचा हप्ता त्रैमासिक स्वरुपाचा होता व प्रत्येकी हप्ता हा 3,749/- रु. चा होता व पॉलिसीची देय तारीख 21/11/2024 पर्यंत होती, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/2 वरील पॉलिसी प्रतवरुन सिध्द होते, सदरचा पॉलिसीचा हपता प्रत्येक वर्षात फेब्रुवारी, मे, ऑगस्ट व नोव्हेंबर या महिन्यातील 21 तारखेला अर्जदाराने विमा कंपनीकडे भराचा होता, ही बाब देखील नि.क्रमांक 4/2 वरील पॉलिसी प्रत वरुन सिध्द होते.
अर्जदाराचा दिनांक 17/04/2012 रोजी अपघात होवुन त्याचे पाय 100 टक्के निकामी झाले होते, ही बाब नि.क्रमांक 4/4 वर दाखल केलेल्या सिव्हील हॉस्पीटल परभणी यांनी दिनांक 06/06/2012 रोजी दिलेल्या Disability Certificate वरुन सिध्द होते.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने त्याचा अपघात होण्या पर्यंतच्या तारखे पर्यंत म्हणजे दिनांक 17/04/2012 पर्यंत विमा कंपनीकडे हप्ता वेळोवेळी भरले, याबाबत गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबामध्ये म्हंटले आहे की, अर्जदाराने 21/02/2012 रोजीचा हप्ता अर्जदाराने 04/05/2012 रोजी भरला याचा अर्थ असा होता की, अर्जदाराने विमा कंपनीकडे पॉलिसी जारी केलेल्या तारखे पासून म्हणजेच दिनांक 21/11/2009 पासून ते 21/11/2011 पर्यंत पुढील प्रमाणे 09 हप्ते विमा कंपनीकडे भरले आहेत ते असे.
1) 21/11/2009 2) 21/02/2010 3) 21/05/2010
4) 21/08/2010 5) 21/11/2010 6) 21/02/2011
7) 21/05/2011 8) 21/08/2011 9) 21/11/2011
सदरचे नऊ हप्ते सदर पॉलिसी अंतर्गत अर्जदाराने विमा कंपनीकडे भरले नाहीत, असे गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केलेल्या नि.क्रमांक 11 वर लेखी जबाबात कोठेही नाकारलेले नाही, गैरअर्जदार विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबा म्हंटले आहे की, अर्जदाराने 21/02/2012 रोजीचा हप्ता अर्जदाराने अपघातानंतर दिनांक 04/05/2012 रोजी विमा कंपनीकडे भरला व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे अर्जदाराच्या दिनांक 17/04/2012 रोजीच्या अपघता वेळी 21/02/2012 चा हप्ता वेळेत भरला नाही, म्हणून अर्जदाराची पॉलिसी बंद झाली होती, व पॉलिसीच्या अटीची पुर्तता अर्जदाराने केली नाही, म्हणून विमा कंपनीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव विमा कंपनीने नाकारला याबाबत अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/2 वरील पॅालिसीच्या नियम क्रमांक 2, 3 व 4 मध्ये खालील प्रमाणे म्हंटले आहे की,
2) Grace Period: A grace period of one month but not less than 30 days will be allowed for payment of yearly, half-yearly or quarterly premiums. If a premium that has become due is not paid, before the expiry of the days of grace the Policy lapses, if death occurs in the first policy year, any premium that has fallen due but not paid and premiums. If any falling due before the policy anniversary shall the deducted from the claim amount.
3) Revival of discontinued Policies : if the policy has lapsed it may be revived during the life time of the life assured but within a period of 5 years from the due date of the first unpaid premium and before the date of maturity. On submission of proof of continued insurability to the satisfaction of the interest compounding half yearly at such rate as may be fixed by the corporation from time to time the corporation reserves the right to accept or accept with modified terms or decline the revival of discontinued policy The revival of a discontinued policy shall take effect only after the same is approved by the Corporation and is specifically communicated to the proposer / Life Assured.
4) Non-forfeiture Regulations: It after at least 3 full yeas premium have been paid in respect of this policy, any subsequent premium be not duty paid this policy shall not be wholly void. But shall subsists as a paid-up policy for a reduced sum assure. This Reduced Sum Assured will be called as paid-up Value which shall be payable in case of death/maturity and shall depend on the number or years form which premiums have been paid and shall be the greater of – a sum that bears the same ratio to the Maturity Sum Assured as the number of premiums actually paid shall bear to the total number of premiums originally stipulated in the policy.
अर्जदाराच्या सदर पॉलिसीचा हप्ता दिनांक 21/02/2012 रोजीचा देय असतांना दिनांक 04/05/2012 रोजी विमा कंपनीकडे भरला हे गैरअर्जदाराने आपल्या लेखी जबाबात म्हंटले आहे. याबाबत अर्जदाराने आपल्या संपूर्ण तक्रारीत दिनांक 04/05/2012 रोजी त्यांनी भरलेला सदरचा हप्ता हा कोणत्या महिन्याचा दिला याचा कोठेही उल्लेख केलेला नाही, वा अर्जदाराने 21/02/2012 रोजीचा हप्ता त्याने वेळेवर विमा कंपनीकडे अदा केला होता, याबाबत कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही, याचाच अर्थ असा होतो की, अर्जदाराने 21/02/2012 रोजीचा हप्ता त्याने दिनांक 04/05/2012 रोजी विमा कंपनीकडे भरला होता.
अर्जदाराच्या तक्रारीचे अवलोकन केले असता त्याने त्याचा अपघात दिनांक 17/04/2012 रोजी झाला होता, म्हंटले आहे व 21/02/2012 रोजीचा हप्ता त्याने विमा कंपनीकडे 04/05/2012 रोजी भरला आहे, जर अर्जदाराने 21/02/2012 रोजीचा हप्ता सरल पॉलिसीतील नियम क्रमांक 2 प्रमाणे Due Date च्या ग्रेस पिरयड 30 दिवसांच्या आत म्हणजेच 21/03/2012 रोजी विमा कंपनीकडे भरला असता तर अर्जदाराची पॉलिसी चालु राहिली असती, परंतु तसे न करता अर्जदाराने दिनाक 21/02/2012 चा हप्ता त्याचा अपघात दिनांक 17/04/2012 रोजी झाल्यानंतर संपूर्ण विचाराअंती गैरअर्जदार विमा कंपनीस अपघाताची माहिती न देता स्वतः त्याने 04/05/2012 रोजी 21/02/2012 चा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरल्याचे दिसून येते. याचाच अर्थ असा निघतो की, अर्जदाराच्या अपघाता दिवशी म्हणजे दिनांक 17/04/2012 रोजी अर्जदराची सदरची पॉलिसी पॉलिसीतील नियम क्रमांक 2 प्रमाणे बंद होती व पॉलिसीच्या नियम क्रमांक 2 मध्ये स्पष्टपणे म्हंटले आहे की, विमा धारकाने पॉलिसीचा हप्ता वेळेत नाही भरला तर व Due date च्या नंतर 30 दिवसाच्या ग्रेस पिरीयड मध्ये हप्ता नाही भरला तर विमा धारकाची पॉलिासी बंद होईल, असे स्पष्टपणे म्हंटले आहे.तसेच पॉलिसीत नियम क्रमांक 3 Revival of discontinued Policies – सदराखाली विमा कंपनीने स्पष्टपणे म्हंटले आहे की, विमा धारकाची पॉलिसी बंद पडलीतर Due date नंतर 5 वर्षाच्या आत विमा धारकाला थकीत हप्ते भरुन बंद पडलेली पॉलिसी परत चालु करता येते. याचाच अर्थ असा होतो की, अर्जदाराने त्याच्या पॉलिसीचा हप्ता 21/02/2012 देय असलेला 04/05/2012 रोजी भरुन अर्जदाराने सदरची पॉलिसी पुर्नजिवीत केली, परंतु अर्जदारास दिनांक 17/04/2012 रोजी झालेल्या अपघाता मध्ये त्याचे पाय गमवुन 100 टक्के Disability झाली म्हणून अर्जदारास सदर पॉलिसीखाली लाभ घेता येणार नाही, असे मंचाचे ठाम मत आहे. कारण सदर अपघाता दिवशी वरील चर्चेप्रमाणे अर्जदाराची पॉलिसी अपघात दिवशी पॉलिसीच्या नियम क्रमांक 2 प्रमाणे हप्ता वेळेत न भरलेमुळे बंद होती.
तसेच पॉलिसीच्या नियम क्रमांक 4 मध्ये म्हंटले आहे की, विमाधारकाने कमीत कमी 3 वर्षाचे पॉलिसी अंतर्गत पूर्ण हप्ते भरले नंतर विमा धारकाची पॉलिसी कोणत्याही कारणास्तव बंद होणार नाही. व प्रस्तुत प्रकरणातील अर्जदाराने सदर पॉलिसी अंतर्गत विमा कंपनीकडे 9 हप्त्याची रक्कम भरल्याची दिसून येते, म्हणजे ते 3 वर्षा पेक्षा कमी आहेत.
याबाबत मा. सर्वोच्च न्यायालय भारत यांनी Unite India Insurance Co. Ltd. V/s Harchandlal Rai Chandan रिपोर्टेड केस मध्ये स्पष्टपणे म्हंटले आहे की, “ The terms and conditions of the contract entered into between the parties have to be strictly construed and no deviation can be made there from.” सदरचा निकाल प्रस्तुत प्रकरणात तंतोतंत लागु पडतो, अर्जदाराचा विमादावा कराराच्या नियम क्रमांक 2 प्रमाणे विमा कंपनीने नामंजूर केला आहे व ते योग्यच आहे व गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे कोठेही सिध्द होत नाही. असे मंचाचे ठाम मत आहे, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.