निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 28/02/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 05/03/2013
तक्रार निकाल दिनांकः- 26/09/2013
कालावधी 06महिने. 21 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
भगवान पिता विठ्ठलराव सामाले. अर्जदार
वय 55 वर्षे. धंदा.नोकरी. अॅड.डि.यु.दराडे.
रा.प्रभावती नगर,जुना पेडगाव रोड,परभणी.ता.जि.परभणी.
विरुध्द
भारतीय जिवन विमा निगम. गैरअर्जदार.
तर्फे व्यवस्थापक. अॅड.ए.एन.पालीमकर.
जिवन ज्योती, नेहरुरोड, परभणी ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या पॉलिसीचे भुगतान ऊशिरा करुन अर्जदारास सेवेत त्रुटी व मानसिकत्रास दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा राज्य परिवहन महामंडळात नौकरीस आहे व त्याने दिनांक 25/12/2000 रोजी गैरर्जदाराकडे त्यांची पॉलिसी क्रमांक 982758055 हि घेतली होती. सदर पॉलिसी कालावधी 25/11/2012 रोजी पर्यंत होता. सदर पॉलिसी 50,000/- रुपयांची होती व अंतीम लाभ बोनससह 75,688/- रुपयांचा होता. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदर पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर दिनांक 08/11/2012 रोजी संपूर्ण कागदपत्रे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दाखल केले व त्या सोबत अर्जदाराने त्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूर रोड परभणीचे खाते क्रमांक 31418086837 चे खाते पुस्तकाची प्रत देण्यांत आली होती.तसेच सदर कागदपत्रे मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा प्रस्ताव मंजूर करुन 25/12/2012 रोजी परिपक्वता रक्कम रुपये 75,688/- रुपये अर्जदाराच्या दिलेल्या खात्यांत जमा करण्यासाठी आदेशित केले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 25/12/2012 रोजी केलेले पेमेंट आर.टी.जी.एस.व्दारे अर्जदारास दुस-या दिवशी मिळावयास हवे होते, परंतु गैरअर्जदार यांचे संबंधीत कर्मचारी यांनी हलगर्जीपणाने अर्जदाराच्या पेमेंट ऑर्डरवर बँकेचा खाते क्रमांक चुकीचा टाकला, त्यामुळे रिझर्व बँकने व्यवहार रद्द केला.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने केलेल्या निष्काळजीपणामुळे अर्जदारास त्याची रक्कम 37 दिवस ऊशिराने मिळाली व सदर रक्कमे बद्दल चौकशी करीत असतांना गैरअर्जदाराच्या कर्मचा-यांनी उध्दट व हिन दर्जाची वागणुक दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची पॉलिसी क्रमांक 982758055 चे भुगतान गैरअर्जदाराने ऊशिरा केल्या बद्दल सेवेत निष्काळजी व त्रुटी दिली आहे व त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी रु. 80,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 10,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश करावा अशी मंचास विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 4 वर 4 कागदपत्रांसह 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये पॉलिसीची प्रत, गैरअर्जदाराने अर्जदारास कागदपत्रे मागणी केल्याचा अर्ज, अर्जदाराचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे पासबुकची प्रत ई. कागदपत्रे दाखल केली आहेत.
मंचातर्फे लेखी जबाब दाखल करण्यासाठी गैरअर्जदार यांस नोटीस काढण्यांत आले. गैरअर्जदार वकिला मार्फत हजर व नि.क्रंमांक 9 वर आपला लेखी जवाब सादर व त्यांत त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही मंचाच्या कक्षेत येत नाही व तसेच सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमा काढला होता ही बाब गैरअर्जदारास मान्य आहे व सदर विमा अंतर्गत पुर्ण परिपक्व लाभासह अर्जदारास 75,688/- रुपये दिनांक 25/12/2012 रोजी मिळणार होते, परंतु अर्जदारानेच अर्जात चुकीची माहिती (चुकीचा खाते क्रमांक) दिल्यामुळे गैरअर्जदाराने भुगतान केलेली रक्कम अर्जदाराच्या खात्यांत जमा होऊ शकली नाही. व म्हणून गैरअर्जदारास अर्जदाराच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास विलंब लागला व गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली नाही व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार यांनी नि.क्रमांक 10 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे व तसेच नि.क्रमांक 12 वर 3 कागदपत्रांच्या यादीसह 3 कागदपत्रे दाखल केली आहेत.ज्यामध्ये अर्जदाराने भरलेला अर्ज, ई.एफ.टी., एल.आय.सी.चे पत्र, ईं.चा समावेश आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्याची पॉलिसी परिपक्व
झाल्यानंतर अर्जदारास ती रक्कम देण्यास विलंब करुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 25/12/2000 रोजी विमा काढला होता व सदरचा विमा कालावधी 25/11/2012 रोजी पर्यंतचा होता व पॉलिसीची रक्कम 50,000/- रुपये होती व अंतिम लाभ बोनससह 75,688/- रुपये एवढी होती, हि बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे.फक्त वादाचा मुद्दा हा की, सदरची पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर अर्जदारारस त्याची रक्कम देण्यास गैरअर्जदाराने ऊशिर केला, व त्यास ते जबाबदार आहेत, या बाबत आहे. गैरअर्जदाराने नि.क्रमांक 12/2 वर दाखल केलेल्या ई.एफ.टी. फॉर्म वरुन असे सिध्द होते की, अर्जदाराच्या खाते क्रमांक 31418086837 असा आहे सदरचा नंबर अर्जदाराने नि.क्रिमांक 4/3 वर दाखल केलेल्या पासबुकच्या प्रतवर असलेला क्रमांक सारखाच आहे. त्यामुळे गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने ई.एफ.टी. फॉर्म वर चुकीचा खाते क्रमांक दिलेला आहे, हे सदरचे म्हणणे चुकीचे आहे हे सिध्द होते. तसेच सदरची अर्जदाराची पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमा रक्कम मागणी केली असता गैरअर्जदाराने निष्काळजीपणे अर्जदाराच्या खात्याचा क्रमांक चुकीचा लिहून त्या खात्यावर रक्कम जमा केल्यामुळे अर्जदारास रक्कम मिळण्यास विलंब झाला व सदर विलंबास व अर्जदारास झालेल्या मानसिकत्रासास गैरअर्जदार हे जबाबादार आहेत व तसेच पॉलिसीचे रक्कम अर्जदारास देण्यांस 37 दिवसांचा विलंब करुन सेवेत त्रुटी दिली आहे, हे सिध्द होते. अर्जदाराने मानसिकत्रासापोटी रु.80,000/- मागीतलेले आहे जे की, मंचास योग्य वाटत नाहीत, कारण गैरअर्जदार ( L.I.C.) ही एक शासनाचा सार्वजनिक उपक्रम असलेली संस्था आहे व त्यातील ठेवी देखील सामन्य जनतेचेच आहेत व अनावधानाने अशा प्रकारची चुक होवु शकते.म्हणून अर्जदार मानसिक त्रासापोटी गैरअर्जदाराकडून 3,000/- रु.मिळणेस पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास 30 दिवसांच्या आत मानसिक त्रासापोटी रु.3,000/-
फक्त (अक्षरी रु.तीनहजार फक्त ) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/-
फक्त (अक्षरी रु.दोनहजार फक्त) द्यावेत.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.