Maharashtra

Ahmednagar

CC/15/387

Sangita Sanjay Mahadik - Complainant(s)

Versus

Life Insurance Corporation of India,Pune Division Office-1 - Opp.Party(s)

Kakade

07 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/387
( Date of Filing : 25 Aug 2015 )
 
1. Sangita Sanjay Mahadik
Shivaji Nagar,Rahuri Factory,Tal Rahuri,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Life Insurance Corporation of India,Pune Division Office-1
Branch Office-Shrirampur,Tal Shrirampur,
Ahmednagar
Maharashtra
2. Branch Manager,Life Insurance Corporation of India
Branch-Shrirampur,Tal Shrirampur
Ahmednagar
Maharashtra
3. T.K.Vitanor,Chairman Club Member,LIC Agent
A/P Devalali Pravara,Tal Rahuri,
Ahmednagar
Maharashtra
4. Shri Vivekanand Nursing Home,
A/P Shivaji Nagar,Tal Rahuri,
Ahmednagar
Maharashtra
5. Superintendent,Shri Vivekanand Nursing Home,
A/P Shivaji Nagar,Tal Rahuri,
Ahmednagar
Maharashtra
6. Shri Prasad Baburao Tanapure,Chairman,Shri Vivekanand Nursing Home,
Shivaji Nagar,Tal Rahuri,
Ahmednagar
Maharashtra
7. Shri Subhash Dattatraya Patil,Vice-Chairman,Vivekanand Nursing Home,
A/P Shivaji Nagar,Tal Rahuri
Ahmednagar
Maharashtra
8. Shri Vijay Tanaji Patil,Secretary ,Vivekanand Nursing Home,
A/P Shivaji Nagar,Tal Rahuri
Ahmednagar
Maharashtra
9. Shri Ashok Suryabhan Khurud, Khajindar
Shri Vivekanand Nursing Home,A/P Shivaji Nagar,Tal Rahuri,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Kakade, Advocate
For the Opp. Party: D.Asnikar & Jodhi & Bachkar & Shrisath & मुंदडा, Advocate
Dated : 07 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्त्‍यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ती नं.1 ही मयत डॉ.संजय बबनराव महाडिक यांची पत्‍नी असून तक्रारकर्ता नं.2 व 3 हे मयत संजय यांचे मुले असून तक्रारकर्ता नं.4 व 5 हे आई वडील आहेत.  तक्रारकर्त्‍यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला नं.4 हे श्री.विवेकानंद नर्सिंक होम अशी वैद्यकिय संस्‍था असून सदर संस्‍थेमध्‍ये मयत संजय बबनराव महाडिक हे वैद्यकिय अधिकारी म्‍हणून कायमस्‍वरुपी नोकरीस होते. व सामनेवाले क्र.5 ते 9 हे सामनेवाले नं.4 संस्‍थेचे सन 2012 च्‍या दरम्‍यान प्रमुख जबाबदार अधिकारी व पदाधिकारी होते. तक्रारकर्त्‍यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला क्र.4 यांनी त्‍यांचे संस्‍थेमधील कामकरणा-या सेवकांची वेतन बचत पॉलीसीज करण्‍याबाबत सामनेवाले नं.1 व 2 यांचेमध्‍ये योग्‍य तो करारनामा करुन घेतलेला आहे. सामनेवाले नं.4 हे मयत संजय महाडिक यांचे मासिक पगारातून एल.आय.सी. पॉलीसीचा हप्‍ता कपात करुन सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडे भरणा करीत होते. संस्‍थेतर्फे दोन विमा पॉलीसी घेतल्‍या होत्‍या, त्‍यातील एक विमा पॉलीसी रक्‍कम रु.1,00,000/- ची व दुसरी 5,00,000/- अशी मयत श्री.संजय महाडिक यांनी घेतलेली होती. व सदर पॉलीसीचे हप्‍ते भरण्‍याची तरतुद ही मयत डॉ.संजय महाडिक यांच्‍या पगारातून सामनेवाले नं.4 हे कपात करुन सामनेवाले नं.1 व 2 यांच्‍याकडे ग्रुप पेमेंटव्‍दारे भरणा करण्‍याची सोय केलेली होती. सामनेवाले नं.4 हे सर्व सेवकांचे एकत्रित पेमेंट सामनेवाले नं.1 व 2 यांच्‍याकडे अदा करत होते. दिनांक 24.08.2012 रोजी डॉ.संजय महाडिक यांना तिव्र हृदय विकाराचा झटका आल्‍यामुळे त्‍यांना डॉ.कुसळकर हॉस्‍पीटल, राहुरी येथे नेण्‍यात आले.  परंतू त्‍यामध्‍येच त्‍यांचे निधन झाले. मयत डॉ.संजय महाडिक यांना कोणताही आजार नव्‍हता. तक्रारकर्त्‍यांना कोणतेही उत्‍पन्‍नाचे साधन नाही. मयत डॉ.संजय महाडिक यांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍यांनी सामनेवाला क्र.3 यांचेकडून आवश्‍यक फॉर्म भरुन दोन्‍ही पॉलीसीचे विमा दावा सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे सादर केला. सामनेवाला नं.1 यांनी मयताचे नावावर असणारी विमा पॉलीसीची रक्‍कम रुपये 1,00,000/- तारीख 10.10.2012 रोजी अदा केली आहे. परंतू मयत यांची दुसरी पॉलीसी रक्‍कम रु.5,00,000/- चा विमा क्‍लेम तांत्रिक अडचण सांगून लॅप्‍सड कंडिशन असल्‍यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी बिना तारखेचे पत्र देवून पॉलीसी क्‍लेम तक्रारकर्ता यांना देण्‍याबाबत नकार दिलेला आहे. सामनेवाला क्र.4 व त्‍यांचे पदाधिकारी यांनी सेवकांचे पगारातून हप्‍त्‍याची रक्‍कम कापून सामनेवाला क्र.1 व 2 यांना पॉलीसीचा हप्‍ता देण्‍याची जबाबादारी होती. परंतू सामनेवाला क्र.4 यांनी तांत्रिक अडचण सांगून तो हप्‍ता सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे भरलेला नाही. यामुळे तक्रारकर्ताला विमा करीता मिळणारा लाभ योग्‍य वेळी मिळू शकला नाही. तसेच सामनेवाले क्र.1 व 2 यांनी कोणतेही योग्‍य कारण नसताना तक्रारकर्ताचा विमा दावा अस्विकृत केला. म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

3. तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला यांनी तक्रारकर्त्‍यांचे विमा दाव्‍याचा क्‍लेम संबंधीची रक्‍कम व्‍याजासह मिळावी. तसेच तक्रारकर्त्‍यांना झालेल्‍या शारीरीक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळावी व तक्रारीचा खर्च सामनेवालाकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.

4. तक्रारकर्त्‍यांची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. सदर नोटीस सामनेवालाला प्राप्‍त होऊन ते प्रकरणात हजर झाले. सामनेवाला क्र.6, 8 व 9 हे प्रकरणात हजर झाले नाहीत. म्‍हणून सामनेवाला क्र.6, 8 व 9 यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्‍यात आला.

5. सामनेवाला क्र.1 व 2 हे प्रकरणात हजर झाले व त्‍यांनी निशाणी क्र.25 वर त्‍यांची लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्त्‍यांने तक्रारीत सामनेवाला यांचेविरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवाला क्र.1 व 2 यांना नाकबूल आहेत. सामनेवाला क्र.1 व 2 ने पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला क्र.4 यांनी त्‍यांचे सेवकांना म्‍हणजेच मयत श्री.संजय बबनराव महाडिक यांना एप्रिल 2012 ते ऑगस्‍ट 2012 चे वेतन दिनांक 08.11.2012, 21.12.2012, 18.02.2013, 04.03.2013 व 18.03.2013 ला देण्‍यात आले आहे. व त्‍या वेतनावेळी या पॉलीसीचा हप्‍ता भरला गेला नसल्‍यामुळे त्‍यांचा हप्‍ता सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे भरणा करण्‍यात आला नव्‍हता. त्‍यामुळे मयत डॉ.संजय बबनराव महाडिक यांचे एका पॉलीसीचा हप्‍ता भरला गेला नसल्‍यामुळे त्‍यांची पॉलीसी लॅप्‍स झाली. सदर पॉलीसी लॅप्‍स झाली असल्‍याने मयताच्‍या पॉलीसीची रक्‍कम देण्‍यात आली नव्‍हती. यात सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्‍याने सदर तक्रार खोटया स्‍वरुपाची दाखल केली असून ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 व 2 यांनी केली आहे.

6. सामनेवाला क्र.3 यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी क्र.35 वर दाखल केली आहे. सामनेवाला क्र.3 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने तक्रारीत सामनेवाला क्र.3 यांचे विरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवाला क्र.3 यांना नाकबूल आहेत. सामनेवाला क्र.3 यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला क्रमांक 4 या संस्‍थेचे ते सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे पॉलीसीचे हप्‍त्‍याची रक्‍कम मे.2012 पासून जमा केली नसल्‍याने सदर पॉलीसी बंद झालेली आहे. त्‍यामुळे सदर पॉलीसीचा हप्‍ता वेळेवर न भरल्‍यामुळे सदर पॉलीसीचा विमा दावा नाकारण्‍यात आला आहे. सामनेवाला क्र.3 हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे अधिकृत विमा प्रतिनिधी आहेत. व त्‍यांनी पॉलीसी संदर्भात मोबदला स्विकारलेला नाही. त्‍यांचे विरुध्‍द खोटी तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. सदर तक्रार सामनेवाला क्र.3 यांचे विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

7. सामनेवाला क्र. 4 व 5 यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी क्र.36 वर दाखल केली आहे. सामनेवाला क्र.4 व 5 यांनी त्‍यांचे कैफियतीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत सामनेवाला क्र.4 व 5 यांचेविरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवाला क्र.4 व 5 यांना नाकबूल आहेत. सामनेवाला क्र.4 व 5 यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला क्र.4 यांचे तक्रारकर्तासोबत ग्राहक व विक्रेता यांचा संबंध नाही. त्‍यामुळे सदर तक्रार सामनवेाला क्र.4 व 5 यांचे विरुध्‍द चालविण्‍याचा या मंचाला अधिकारक्षेत्र नाही. सामनेवाला क्र.4 व 5 यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला क्र.4 ही श्री.विवेकानंद नर्सिंग होम या नावाने नोंदणीकृत ट्रस्‍ट असून या ट्रस्‍ट मार्फत आयुर्वेद महाविद्यालय, चिकित्‍सालय, बी.फार्मसी, नर्सिंग शिक्षण व इतर शैक्षणिक सेवा व वैद्यकिय सेवा दिल्‍या जातात. ट्रस्‍टचे प्रमुख सामनेवाला क्र.5 असून महाविद्यालय व चिकीत्‍सालय यांचे प्रमुख प्राचार्य असुन त्‍यास प्रशासन प्रमुख या नात्‍याने अधिक्षक म्‍हणून संबोधले जाते. सद्या या ट्रस्‍टवर प्रशासकाची नेमणुक झालेली आहे. तक्रारकर्तयांनी प्रशासकास पक्षकार बनवलेले नाही. सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. सामनेवाला क्र.4 ही शैक्षणिक सेवा संस्‍था असून संस्‍थेस मिळणारे अनुदान तांत्रिक अडचण असल्‍याने वेळेवर त्‍यांचा पगार देण्‍यात आला नव्‍हता. त्‍यामुळे पॉलीसीचा हप्‍ता भरण्‍यास विलंब होत होता. तरीसुध्‍दा सामनेवाला क्र.1 व 2 यांनी विम्‍याचे हप्‍ते स्विकारत होते. कर्मचा-यास माहे एप्रिल 2012.15 ते ऑगस्‍ट 2012 काही अडचणी असल्‍यामुळे पगार उशीर झाला. त्‍यानंतर दिनांक 07.05.2013 रोजीचा विमा हप्‍ता हप्‍त्‍याची रक्‍कम सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविण्‍यात आली होती. परंतू सदरचे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी ती नाकारली व पॉलीसी लॅप्‍स झाली असे कळविले होते. सामनेवाला क्र.4 व 5 यांची सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नसल्‍याने सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती करण्‍यात आली आहे.

8. सामनेवाला क्र.7 यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी क्र.37 वर दाखल केली आहे. सामनेवाला क्र.7 यांनी त्‍यांचे कैफियतीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत सामनेवाला क्र.7 यांचेविरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवाला क्र.7 यांना नाकबूल आहेत. सामनेवाला क्र.7 हे सामनेवाला क्र.4 या संस्थेचे उपाध्‍यक्ष होते. त्‍यांनी पुर्वीच उपाध्‍यक्ष पदाचा राजीनामा दिलेला असून त्‍यांचा या संस्‍थेशी कोणताही संबंध राहिलेला नाही. व पॉलीसीसंदर्भात सामनेवालाने क्र.7 हे वादातील सामनेवाला क्र.1 व 2 यांचे सोबत आहेत. सामनेवाला क्र.4 यांची काहीही माहिती नसून सामनेवाला क्र.7 यांनी कोणताही व्‍यवहार केलेला नाही. त्‍यांची व्‍यवहाराची जबाबदारी नसल्‍याने सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात अशी अशी विनंती करण्‍यात आली आहे.

9. तक्रारकर्त्‍यांनी दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र, सामनेवालांचे जबाब, दस्‍तावेज व उभयतांचे युक्‍तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ता क्र.1 ते 5 हे सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे “ग्राहक” आहेत काय.?                    

 

... होय.

2.

तक्रारकर्ता क्र.1 ते 5 हे सामनेवाला क्र.4 ते 9 यांचे “ग्राहक” आहेत काय.?                      

 

...नाही.

3.

सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना न्‍युनत्‍तम सेवा दर्शविलेली आहे काय.?

 

... होय.

4.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

10.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्ता क्र.1 ते 5 हे पॉलीसीधारक मयत श्री.संजय बबनराव महाडिक यांचे वारसदार असून व पॉलीसीची रक्‍कम मिळण्‍यास लाभार्थी आहेत, ते या नात्‍याने सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे “ग्राहक” आहेत असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

11.   मुद्दा क्र.2 – तक्रारकर्त्‍यांचे तक्रारीप्रमाणे मयत डॉ.संजय बबनराव महाडिक यांचे तक्रारकर्ता क्र.1 ते 5  हे वारसदार आहेत. डॉ.संजय बबनराव महाडिक हे सामनेवाला क्र.4 यांचेकडे नोकरी करीत होते. व सामनेवाला क्र.4 यांनी मयताचे वेतनातून पॉलीसीचा हप्‍ता कापून सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे अदा करण्‍याची जबाबदारी घेतलेली होती, ही बाब सामनेवाला क्र.4 ते 9 यांना मान्‍य आहे. परंतू सामनेवाला क्र.4 कडे डॉ.संजय बबनराव महाडिक हे नोकरी करीत होते. तक्रारकर्ता क्र.1 ते 5 हे त्‍यांचे वारसदार आहेत. त्‍यात त्‍यांचा ग्राहक व विक्रेता असा संबंध निर्माण होत नाही, असे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2 (1) (डी) मधील संज्ञेवरुन सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

12.  मुद्दा क्र.3 – सदर तक्रारीतील शपथपत्र पुरावा तसेच सामनेवाला क्र.1 ते 5 व 7 यांचे जबाबावरुन मंचाचे असे निदर्शनास येते की, मयत डॉ.संजय बबनराव महाडिक यांची पॉलीसी क्र.993100931 या पॉलीसी हप्‍त्‍याची रक्‍कम त्‍यांनी एप्रिल 2012 ते ऑगस्‍ट 2012 पर्यंत रक्‍कम भरणा करण्‍यात आली नव्‍हती. सदर पॉलीसी अंतर्गत रक्‍कम सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे भरणा केलेली नसल्‍यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 यांची जबाबदारी आहे की, त्‍यांचा पॉलीसीधारकांना हप्‍त्‍याची रक्‍कम भरण्‍याबाबत योग्‍य वेळी सुचना द्यावयास पाहिजे होती. तसेच हप्‍त्‍याची रक्‍कम भरण्‍याकरीता अंतिम संधीही दिली पाहिजे होती. परंतू सदर प्रकरणात सामनेवाला क्र.1 व 2 यांनी डॉ.संजय बबनराव महाडिक यांची पॉलीसीचा हप्‍ता वेळेवर भरला नसल्‍याने त्‍याला सूचना देण्‍यात आली की नाही या संदर्भात सामनेवाले क्र.1 व 2यांनी कोणताही दस्‍त प्रकरणात सादर केलेला नाही व त्‍याला सुचना न देता डॉ.संजय बबनराव महाडिक यांची पॉलीसी बंद करुन टाकली ही बाब सामनेवाला क्र.1 व 2 यांचे पॉलीसीधारकाप्रति सेवेत त्रुटी दर्शविते व सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

13.  मुद्दा क्र.4- सामनेवाला क्र.3 हे सामनेवाला क्र.1 व 2 चे प्रतिनिधी आहेत, त्‍यांनी कोणताही मोबदला पॉलीसीधारकाकडून घेतला नसल्‍याची बाब ग्राहय धरुन तसेच सामनेवाला क्र.4 ते 9 यांचे तक्रारकर्ता ग्राहक नसून, तक्रारकर्ता क्र.1 ते 5 हे पॉलीसीधारक वारसदार असून ते सामनेवाला क्र.1 व 2 चे ग्राहक आहेत. तसेच मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यांना वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या पॉलीसीची रक्‍कम रु.5,00,000/- (रक्‍कम रु.पाच लाख फक्‍त) दिनांक 16.10.2017 पासून द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याजासह रक्‍कम अदाईकीपर्यंत तक्रारकर्त्‍यांना द्यावे.

3.   सामनेवाला क्र.3 ते 9 यांचे विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

4.   सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्त्‍यांना झालेल्‍या शारीरीक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/- (रक्‍कम रु.वीस हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त ) तक्रारकर्त्‍यांना द्यावे.

5. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या या आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

6. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

7. तक्रारकर्त्‍यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.