जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/264 प्रकरण दाखल तारीख - 27/10/2010 प्रकरण निकाल तारीख – 10/05/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. विद्यावती भ्र.नागनाथ शेटकार वय 28 वर्षे, धंदा घरकाम अर्जदार रा.गुंला (बु.) ता.जुक्कल जि.निजामाबाद हा.मु.शाहुनगर, आनंद नगर, नांदेड विरुध्द. 1. भारतीय जीवन बिमा निगम विभागीय कार्यालय, महाराणा प्रताप चौक, गांधी नगर, नांदेड 2. भारतीय जीवन बिमा निगम विभागीय कार्यालय, शाखा देगलूर, ता.देगलूर जि. नांदेड गैरअर्जदार 3. मुख्याध्यापक, जि.प.केद्र वरिष्ठ प्रा.शाळा मानुर ता.देगलूर जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एम.सी.तिडके गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे - अड. एम.डी.देशपांडे गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्यक्ष ) 1. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हे मयत नागनाथ यांची पत्नी असून मयत नागनाथ यांचा मृत्यू दि.5.1.2010 रोजी आजारपणामुळे गुला (बु.) जि.निजामाबाद येथे झाला. मयत यांने त्यांच्या जीवनात गैरअर्जदार यांचेकडून चार विमा पॉलिसी ज्यांचा अनुक्रमांक 1. 980550660, 2. 980572674, 3. 983613261 व 4. 983715504 अशा आहेत. पॉलिसी क्र.1 ते 3 ची विमा रक्कम गैरअर्जदा यांनी मयताचे नॉमिनी म्हणून अर्जदार यांनी धनादेशाद्वारे दिली आहे. परंतु पॉलिसी नंबर 983715504 मध्ये मयताची विमा रक्कम रु.2,00,000/- मिळण्यासाठी गैरअर्जदार यांचेकडे नियमानुसार विहीत नमुन्यात अर्ज केला होता. सदर पॉलिसी ही दि.20.5.2008 रोजी देगलूर शाखेमार्फत काढली होती. सदर पॉलिसीचा हप्ता रु.1027/- मयताच्या पगारातून कपात करुन घेण्याचे ठरले होते. मयत नागनाथ हे माहे दि.09.11.2009 ते 5.1.2010 या काळात वैद्यकीय कारणामुळे अर्जीत रजेवर होते. त्यांनी त्या कालावधीचा पगार उचललेला नाही. दि.2.2.2.2010 रोजी सदर पॉलिसीची रककम मिळण्यासाठी विहीत नमुन्यात गैरअर्जदार यांचेकडे अर्ज केला होता त्यावर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांनी दि.27.4.2010 रोजी माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2009 चे हप्ते भरले नसल्याबाबतचे कळविले व दि.24.6.2010 रोजीच्या पञाद्वारे पॉलिसी ही हप्ते न भरल्यामुळे बंद पडल्याचे कळविले. अर्जदाराच्या चार पॉलिसीपैकी तिन पॉलिसीची विमा रक्कम दिली फक्त एकाच पॉलिसीची विमा रक्कम विमा हप्ते भरले नाही म्हणून बंद करुन विमा रक्कम दिली नाही. परंतु अर्जदारास विमा हप्ता भरला नसल्याबाबतचे कोणतेही सूचनापञ गैरअर्जदार यांनी दिले नाही. त्यामूळे अर्जदार यांनी वकिलामार्फत दि.19.8.2010 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस देऊन विमा रक्कमेची मागणी केली ती नोटीस गैरअर्जदार यांनी मिळाल्याबददल त्यांनी त्या नोटीसची उत्तर दि.20.09.2010 रोजी दिले परंतु विमा रक्कम दिली नाही म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, अर्जदाराची पॉलिसीची रक्कम रु.2,00,000/- व्याजासह मिळावी, तसेच झालेल्या मानसिक ञासाबददल व दाव्याच्या खर्चाबददल रु.50,000/- मिळावेत. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सदर तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयानुसार चालण्यायोग्य नसल्यामुळे खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. मयताचे मृत्यू पूर्वीचे नोव्हेंबर डिसेंबर 2009चे विमा हप्ते गैरअर्जदारास न मिळाल्यामूळे वादातीत विमा पॉलिसी ही मयत विमा धारकाच्या मृत्यूचे वेळेस बंद होली. गैरअर्जदाराने विम्याच्या शर्ती व अटीनुसार विमा दावा फेटाळण्याचा नीर्णय घेतला व तो दि.24.6.2010 रोजी अर्जदारास पञाने कळविण्यात आला.असे करुन गैरअर्जदार यांनी कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही.अर्जदार यांनी रु.2,00,000/-ची पॉलिसी घेतली होती व सदर विम्याचा हप्ता रु.1027/- प्रति महिना होता व तो त्यांचे पगारातून कपात होणार होता. गैरअर्जदारास ऑक्टोबर 2009 चे पर्यतचे हप्ते प्राप्त झाले असून मयताच्या मृत्यू पूर्वचे नोव्हेबर व डिसेंबर 2009 चे हप्ते प्राप्त झाले नाहीत. याबाबत गैरअर्जदार क्र.3 यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना दि.11.5.2010 रोजी पञ पाठवून मयत विमाधारक हा नोव्हेंबर डिसेंबर 2009 या कालावधीत रजेवर असल्यामुळै विमा हप्त्याची कपात झाली नसल्याचे कळविले आहे म्हणून मयताची विमा बंद स्थितीत होता त्यामूळे विम्याचे अटी व शतीनुसार गैरअर्जदार हे अर्जदारास काहीही देणे लागत नाही म्हणून सदर तक्रार रु.10,000/- सह खारीज करावी असे म्हटले आहे. 3. गैरअर्जदार क्र.3 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.मयत नागनाथ यांनी आजारी रजेवर गेले असता त्यांनी पॉलिसी हप्ता भरण्यासंबंधी अर्ज किंवा नगदी रुपाने रककम दिली नाही. नॉमिनी यांना तिन पॉलिसीची रक्कम देण्यात आलेली आहे व मयत आजारी रजेवर असल्यामूळे त्यांचे देयक सादर करता येत नाही त्यामूळे विम्याची रक्कम कपात करता येत नाही. दि.9.11.2009 ते 5.01.2010 या कालावधीत मयत वैद्यकीय रजेवर असल्यामूळे त्यांचा पगार उचलला नाही त्यामूळे विम्याची रक्कम मानूर शाळेच्या देयकातून विम्याची रक्कम कपात करण्याचा प्रश्न उदभवत नाही. मयत वैद्यकीय रजेवर असल्यामूळे हप्ते कपात करता आले नाही त्यामूळे पॉलिसी बंद झाली म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. मयताच्या पत्नीने आम्हाला वैद्यकीय काळातील तोंडी व लेखी कोणत्याच प्रकारची सूचना दिलेली नाही, रजेच्या कालावधीमध्ये नागनाथ हे मयत पावले म्हणून आम्हाला कोणतीच अंमलबजावणी करता आली नाही. सदर माहीती आपल्यात सेवेत सादर करीत आहेत असे म्हटले आहे. 4. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांनी दाखल केलेले कागदपञ पाहून जे मूददे उपस्थित होतात, ते मुददे व त्यावरील उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ते 3 ः- 5. अर्जदार यांनी तक्रारी सोबत जे पॉलिसी बाबत कागदपञ दाखल केले आहेत त्यावरुन अर्जदार यांनी सदर पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे काढली होती याबददल पूराव्यावरुन सिध्द होते तसेच गैरअर्जदार क्र.3 यांनी सूध्दा अर्जदार यांचे पॉलिसीबददल त्यांचे येथील पगारातून सदर पॉलिसीचा हप्ता कपात होत होता असे म्हटले आहे म्हणजे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात येते. 6. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे ज्या चार पॉलिसी काढल्या होत्या त्यापैकी तिन पॉलिसीचे धनादेशाद्वारे रक्कम अर्जदारास मिळालेली आहे. ज्या पॉलिसीची रक्कम मिळाली नाही त्याबददल ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी ज्या मूददयावर अर्जदाराच्या पॉलिसीची रक्कम दिली नाही ते म्हणजे मयत नागनाथ यांनी मृत्यूपूर्वी नोव्हेंबर व डिसेंबर 2009 चे हप्ते भरलेले नाहीत, म्हणून त्यांचा विमा दावा मंजूर केलेला नाही. यावर अर्जदाराचे म्हणणे की त्यांचे पती हे आजारी असल्यामूळे त्या काळात अर्जीत रजेवर होते त्यामूळे गैरअर्जदार क्र.3 यांनी त्यांचा त्या दोन महिन्याचा पगार काढला नाही म्हणून मयत नागनाथ यांची पॉलिसी पगारातून असल्यामूळे त्यांचे दोन महिन्याचे हप्ते हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे जमा होऊ शकले नाहीत. तसेच गैरअर्जदार यांचे म्हणणे की हप्ते न भरल्यामूळे अर्जदाराची पॉलिसी ही बंद झाली होती व बंद पॉलिसीचा विमा दावा देत येत नाही. गैरअर्जदार क्र.3 चे म्हणणे की, मयताची पत्नी यांनी मयत नागनाथ हा वैद्यकीय रजेवर असल्याबददल कोणतीही तोंडी व लेखी सूचना दिलेली नाही. म्हणजेच गैरअर्जदार क्र.3 यांचे सेवेत सूध्दा कोणतीही ञूटी नाही. 7. अर्जदार यांनी किंवा त्यांची पत्नीने अर्जदार आजारी असल्याबददल गैरअर्जदार क्र.3 यांना त्यांचे हप्त्याबददल कळवीणे आवश्यक होते. गैरअर्जदार जेव्हा तिन पॉलिसीची विमा रक्कम देतात, तेव्हा त्यांना एका पॉलिसीची विमा रक्कम देणे काही दूरापास्त नव्हते. पण गैरअर्जदार यांच्या पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसारच जर एखादी पॉलिसी बंद पडली असेल तर त्या पॉलिसीचा क्लेम मंजूर करता येत नाही. म्हणजेच मयत नागनाथ यांनी मृत्यू पूर्वी नोव्हेंबर व डिसेंबर 2009 चे दोन महिन्याचे हप्ते भरले नव्हते. म्हणून त्यांची पॉलिसी बंद पडली होती. म्हणून पॉलिसीच्या शर्ती व अटी नुसार त्यांचा विमा दावा नामंजूर केलेला आहे, असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. म्हणून मूददा क्र.2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात येते. 8. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |