::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 06.02.2012) 1. अर्जदार हीने, प्रस्तुत दरखास्त ग्राहक सरंक्षण कायद्या 1986 चे कलम 25 अन्वये दाखल केली आहे. अर्जदार हीने गै.अ.विरुध्द विद्यमान मंचात ग्राहक तक्रार क्र. 4/2010 श्रीमती स्वाती विरुध्द भारतीय जीवन बिमा निगम दाखल केली होती. सदर केस मध्ये मंचाने दि.27/07/2010 रोजी आदेश पारीत केला. 2. गै.अ.यांनी मंचाने पारीत केलेल्या आदेशाची पूर्तता मुदतीत केली नाही. दरखास्त दाखल करण्याचे पूर्वी वकीला मार्फत दि.20/12/2010 रोजी नोटीस पाठविला. परंतु तो त्यांना प्राप्त होवूनही नोटीसातील मागणी केल्याप्रमाणे आदेशीत रक्कम दिली नाही. त्यामुळे गै.अ.वर कलम 25 नुसार कारवाई करुन परिशिष्ट अ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे मालाची व संपत्तीची जप्ती करुन लिलाव करुन रक्कम मिळवून दयावी अशी मागणी केली आहे. 3. सदर दरखास्त नोंदणी करुन गै.अ.स शो-कॉज नोटीस काढण्यात आले. गै.अ.हजर होवून मा.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग सर्कीट बेंच नागपूर, यांनी स्टे आदेश पारीत केला. त्यामुळे हे प्रकरण राज्य आयोगाचे निर्देश मिळण्याकरीता ठेवण्यात आले. गै.अ.याने मा.राज्य आयोगात अपील क्र. A/11/1 मध्ये आदेशानुसार रु.10,72,890/-जमा केले. जमा केल्याबाबतची पुरसीस नि. 10 नुसार रेकॉर्डवर दाखल केली. 4. सदर दरखास्त मंचात प्रलंबीत असतांना अर्जदार आज रोजी हजर होवून गै.अ.यांचे अपील क्रं. A/11/1 दाखल केले होते ती अपील दि.11/10/2011 रोजी खारीज झाली आहे. गै.अ.याने जमा केलेली रक्कम उचल करण्याची परवानगी दिली असल्याने ही दरखास्त अधिकाराला बाधा न पोहचता वापस घेत आहे. या आशयाची पुरशीस नि. 16 नुसार दाखल केली. गै.अ.तर्फै अधि.खटी यांनी पुरशीस बघितल्याची नोंद घेतली. अर्जदार मंचासमक्ष हजर होवून पुरसीस नि.16 दाखल केली आहे. अर्जदार हीला पुरसीस मधील मजकुराबाबत विचारणा केली असता, त्यातील मजकुर खरा असुन दरखास्त परत घेत असल्याचे सांगीतले. गै.अ. यांच्या वकीलांनी राज्य आयोगात जमा केलेली रक्कम उचलण्याची हरकत नाही असे सांगीतले. अर्जदार ही दरखास्त वापस घेत असल्याने अंतीमता निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // आदेशाची पूर्तता झाली असल्याने दरखास्त परत घेतल्यामुळे निकाली. ( Decree fully satisfied hence disposed off ) चंद्रपूर, दिनांक : 06/02/2012. |