नि. ३५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १२५६/०८
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ०३/११/२००८
तक्रार दाखल तारीख : १५/११/२००८
निकाल तारीख : १८/११/२०११
----------------------------------------------------------------
श्री सुभाष पतंगराव शिंदे
वय ५० वर्षे, व्यवसाय – नोकरी,
रा.घाटनांद्रे, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
सध्या रा.पिंपरी (खुर्द)
ता.चिपळूण जि.रत्नागिरी ..... तक्रारदारú
विरुध्दù
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया,
डिव्हीजन ऑफिस सांगली,
शिवाजी स्टेडियम जवळ, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एम.डी.पवार
जाबदार तर्फे : +ìb÷.सौ ए.एम.शहा
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हे नोकरीनिमित्त रत्नागिरी जिल्हयामध्ये राहण्यास होते. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांच्या अज्ञान मुलाच्या नावे रत्नागिरी येथून विमा उतरविला होता. तक्रारदार यांचा मुलगा सुमित हा दि.१७/८/२००६ रोजी सज्ञान झाला. तो दि.५/५/२००७ रोजी अपघातामध्ये मयत झाला. तक्रारदार यांचा मुलगा मयत झालेनंतर जाबदार यांचेकडे विमादावा दाखल केला. जाबदार यांनी तक्रारदार यांचे मुलाचा मृत्यूदावा मंजूर केला व त्याप्रमाणे रक्कम अदा केली. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांना डबल अपघात फायदा (Double Accident Benefit) ची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ९ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी नि.११ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. विमा पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार अज्ञान मुलाच्या नावे अपघाती फायदा दिला जात नाही. अज्ञान व्यक्ती सज्ञान झालेनंतर सदरचा फायदा जादा प्रिमिअम भरल्यानंतर दिला जातो व तशी विनंती सदर व्यक्तीने विमा कंपनीकडे करणे गरजेचे असते व सदरचा फायदा हा सज्ञान झाल्यानंतर ज्या तारखेस पॉलिसी घेतली त्या पुढील तारखेपासून दिला जातो. तक्रारदार यांनी जादा प्रिमिअमची रक्कम भरली नाही त्यामुळे तक्रारदार हा मागणीप्रमाणे रक्कम मिळण्यास पात्र नाही. तक्रारदार यांनी पॉलिसी चिपळूण येथील कार्यालयाकडून घेतली आहे. तक्रारदार यांनी विमादावा चिपळूण कार्यालयाकडे दाखल केला आहे व तक्रारदार यांचा विमादावा चिपळूण कार्यालयाने फेटाळला आहे त्यामुळे या मंचास तक्रारदार यांचा तक्रारअर्ज चालविण्यास भौगोलिक अधिकारक्षेत्र नाही त्या कारणास्तवही तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१२ ला प्रतिज्ञापत्र व नि.१३ च्या यादीने १४ कागद दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांनी नि.१५ ला प्रतिउत्तर दाखल केले आहे व नि.१६ ला प्रतिउत्तराचे पुष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे तसेच नि.२१ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.३३ च्या यादीने कागद दाखल केले आहेत. जाबदार यांनी नि.१९ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. प्रस्तुतचा तक्रारअर्ज चालविण्यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र आहे का ? हा प्रमुख मुद्दा मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित झाला आहे. जाबदार यांनी भौगोलिक अधिकारक्षेत्राबाबत त्यांच्या म्हणण्यामध्ये आक्षेप घेतला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये ते रत्नागिरी जिल्हयामध्ये नोकरीस असताना जाबदार यांच्या चिपळूण शाखेकडून विमा पॉलिसी घेतली आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांचा विमादावा हा चिपळूण शाखेने फेटाळला आहे. तक्रारदार यांनी भौगोलिक अधिकारक्षेत्राबाबत तक्रारअर्जाच्या परिच्छेद ५ मध्ये तक्रारदार हे या जिल्हयातील रहिवाशी असल्याने व तक्रारदार यांचे मुलाचा अपघात या मंचाच्या अधिकारक्षेत्रामध्ये घडला असल्याने व जाबदार यांची शाखा या जिल्हयात असल्यामुळे सदर तक्रारअर्ज चालविण्यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र आहे असे नमूद केले आहे. भौगोलिक अधिकारक्षेत्राचा विचार करताना ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम ११ प्रमाणे जाबदार ज्या जिल्हयात राहतो अथवा त्याचे कार्यालय अथवा शाखा ज्या जिल्हयात आहे, त्या जिल्हा मंचाला तक्रारअर्ज चालविण्याचे भौगोलिक अधिकारक्षेत्र आहे. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार यांची सेवा तक्रारदार यांनी रत्नागिरी जिल्हयामध्ये घेतली आहे. जाबदार यांची शाखा सांगली जिल्हयामध्ये आहे, केवळ या कारणासाठी या मंचाला भौगोलिक अधिकार क्षेत्र येईल का ? हा मुद्दा उपस्थित होतो. सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने 2010 CTJ Page 2 या सोनी सर्जिकल विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी या निवाडयाचे कामी पुढील निष्कर्ष काढला आहे. The expression branch office in the C.P. Act means the branch office where the cause of action has arisen. तक्रारदार यांच्या तक्रारीस कारण चिपळूण शाखेशी संबंधीत आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीचा सांगली शाखेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे केवळ या जिल्हयामध्ये शाखा आहे, या कारणास्तव प्रस्तुत तक्रारअर्ज या मंचात दाखल करता येणार नाही. भौगोलिक अधिकारक्षेत्र ठरविताना दुसरी बाब विवचारात घ्यावी लागेल ती म्हणजे तक्रारीस पूर्णत: अथवा अंशत: या मंचाच्या अधिकारक्षेत्रामध्ये कारण घडले आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचे विधिज्ञांनी तक्रारदार यांचे मुलाचा अपघात या मंचाच्या अधिकारक्षेत्रामध्ये घडला असल्याने तक्रारीस अंशत: कारण या मंचाचे भौगोलिक अधिकारक्षेत्रामध्ये घडले आहे, असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून विमासेवा घेतली आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांचे चिपळूण शाखेने नाकारला आहे. तक्रारदार यांच्या मुलाचा अपघात या मंचाचे अधिकारक्षेत्रामध्ये झाला ही बाब तक्रारअर्जास कारण होवू शकत नाही. त्यामुळे तक्रारअर्ज दाखल करुन घेण्यास व चालविण्यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र येत नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असल्याने तक्रारदार मागणीप्रमाणे या मंचाकडून कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत. या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र येत नसल्याने तक्रारदार यांना योग्य त्या मंचापुढे तक्रारअर्ज दाखल करण्याची मुभा ठेवून तक्रारअर्ज परत करणे संयुक्तिक ठरेल या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज तक्रारदार यांना परत करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: १८/११/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११