नि का ल प त्र :- (दि.16.08.2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार व सामनेवाला यांचे वकिलांचा युक्तीवाद ऐकला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडून क्रिटीकल बेनिफीट क्लेम या योजनेअंतर्गत पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसीचा क्र. 946735224 असून पॉलिसीचा कालावधी दि. 15/03/2004 ते दि. 15/09/2024 असा आहे. दि. 13/12/2010 रोजी तक्रारदारांचेवर पाठीच्या मणक्यामधील डिस्क (चकती) काढून टाकण्यात आली. त्यासाठी तक्रारदारांचेवर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. तक्रारदार यांना वेस्टर्न इंडिया इन्स्टीटयूट ऑफ न्यूरो सायन्सेस या हॉस्पीटलमध्ये दि. 11/12/2010 ते 26/12/2010 या कालावधीत अडमिट होते. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना गंभीर स्वरुपाचा आजार नाही या कारणास्तव विमा क्लेम नाकारला आहे. तक्रारदारांनी क्लेम रक्कमेची मागणी केली. (3) सामनेवाला विमा कंपनीने त्यांचे म्हणणे तक्रारीत दाखल केले आहे. पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाल्याचे सामनेवाला विमा कंपनीने कथन केलेले आहे. (4) युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदारांचे वकील अड. माणगावे व सामनेवाला यांचे तर्फे अड. अर्चना यादव यांनी युक्तीवाद केला. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांकडून कोणतेही कागदपत्रे न घेता व छाननी न करता विमा क्लेम नाकारला आहे. व तक्रारदारांचेकडून क्लेम फॉर्म भरुन घेतलेला नाही ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आणून दिलेली आहे. यावर सामनेवाला यांचे वकिलांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदारांच्या वकिलांनी सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म व मेडीकल पेपर्स स्विकारावे व त्यानंतर सामनेवाला कंपनीने तक्रारदारांचा क्लेम निश्चित करावा. सामनेवाला विमा कंपनीच्या वकिलांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. उपरोक्त विवेचनाचा विचार करता न्यायाच्या दृष्टीकोनातून तक्रारदारांना सामनेवाला विमा कंपनीने क्लेम फॉर्म द्यावा व तक्रारदारांनी क्लेम फॉर्म भरुन योग्य त्या कागदपत्रासह सामनेवाला विमा कंपनीकडे सादर करावा व क्लेम फॉर्म सादर झालेनंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेमबाबत 30 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. - आ दे श - 1. तक्रारदारांना सामनेवाला विमा कंपनीने क्लेम फॉर्म द्यावा. तक्रारदारांनी क्लेम फॉर्म भरुन योग्य त्या कागदपत्रासह सामनेवाला विमा कंपनीकडे सादर करावा व क्लेम फॉर्म सादर झालेनंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेमबाबत 30 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा. 2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही. 3. सदरचा आदेश ओपन कोर्टात अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |