तक्रार क्र. CC/ 13/ 44 दाखल दि. 07.02.2014
आदेश दि. 13.08.2014
तक्रारकर्ता :- श्री भाऊराव वल्द मनीराम बागडे
वय – 66 वर्षे, धंदा—मजुरी
रा.वार्ड क्र.3, सोमलवाडा रोड, सावरी
पो.लाखनी, ता.लाखनी जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया,
तर्फे शाखा व्यवस्थापक,
जीवन ज्योती, गुर्जर पेट्रोल पंपाच्या मागे,
राष्ट्रीय महामार्ग क्र.6, जिल्हा परिषद चौक,
भंडारा, ता.जि.भंडारा
2. लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया,
मार्फत वरिष्ठ विभागीय व्यस्थापक,
डिवीजनल ऑफीस, नॅशनल इन्शुरन्स बिल्डींग,
एस.व्ही.पटेल मार्ग, पो.बॅग नं.63,
नागपुर
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.चन्ने
वि.प.तर्फे अॅड.सुषमा सिंग
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 13 ऑगस्ट 2014)
1. तक्रारकर्त्याचा मुलगा नितेश बागडे, वय 25 वर्षे याचा दिनांक 22/6/2012 ला नैसर्गिक मृत्यु झाल्यामुळे तक्रारकर्त्याने जीवन सरल विमा पॉलीसी चे पैसे मिळण्यासाठी विरुध्द पक्षाकडे विमा दावा मिळण्यासाठी अर्ज केला असता तो विरुध्द पक्षाने खारीज केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्त्याच्या मुलाने विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनी व विरुध्द पक्ष क्र.2 वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक यांचे मार्फत जीवन सरल विमा पॉलीसी क्रमांक 977922348 ही दिनांक 29/2/2012 ते 27/2/2013 या कालावधीकरीता काढली.
3. तक्रारकर्त्याचा मुलगा हा शरीरयष्टीने चांगला होता तसेच पॉलीसी काढण्याच्या वेळी त्याची शरीरयष्टी सुध्दा सुदृढ होती. तक्रारकर्त्याच्या मुलाची प्रकृती अचानक ताप येवून बिघडल्यामुळे त्याला भंडारा येथील शासकिय दवाखान्यात दिनांक 20/6/2012 ला भरती करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्याचा दिनांक 22/6/2012 ला मृत्यु झाला.
4. तक्रारकर्त्याच्या मुलास मृत्युच्या वेळी कुठलाही आजार नव्हता तसेच त्याचा मृत्यु अतिशय ताप आल्यामुळे झाला. तक्रारकर्ता हा मुलाच्या पॉलीसीमध्ये नॉमीनी (Nominee) आहे.
5. तक्रारकर्त्याने त्याच्या मुलाच्या विमा पॉलीसीचे पैसे मिळण्यासाठी संपुर्ण दस्तऐवजासह विरुध्द पक्षाकडे विमा दावा मिळण्यासाठी अर्ज केला. दिनांक 15/4/2013 च्या पत्राद्वारे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा खारीज केला. तक्रारकर्त्याच्या मुलास पॉलीसी काढतेवेळी कुठलाही आजार नव्हता व त्याचा खुलासा विरुध्द पक्ष यांचे एजन्ट कडे सुध्दा केला होता. तसेच तक्रारकर्त्याचा मुलगा Sickle-cell चा वाहक आहे असे विमा प्रतिनीधी किर्ती रोशन बनसोड यांना सुध्दा सांगितले होते. परंतु त्यांनी सदरहू बाब तक्रारकर्त्याच्या मुलाच्या पॉलीसी व अर्जामध्ये दाखवली नव्हती.
6. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 6/7/2013 ला कायदेशीर नोटीस सुध्दा पाठविली होती. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तक्रारकर्त्याने विमा पॉलीसीची रक्कम रुपये 5,00,000/-(पाच लाख) व्याजासह तसेच 10,000/- मानसिक त्रासासाठी व तक्रारीच्या खर्च मिळण्यासाठी सदरहू तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
7. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 7/2/2014 ला दाखल करुन विरुध्द पक्षांना नोटीस पाठविण्यात आली.
8. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आपला लेखी जबाब दिनांक 13/5/2014 ला दाखल केला. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आपले जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले आहे.
9. तक्रारकर्त्याने विमा काढतांना तक्रारकर्त्याच्या मुलाला Sickle-cell होता, ही बाब अर्जामध्ये न लिहील्यामुळे पॉलीसीमधील अट क्र.5 चे उल्लंघन असल्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा खारीज करणे म्हणजे सेवेतील त्रृटी नाही असे विरुध्द पक्षाने आपले जबाबात म्हटले. तक्रारकर्त्याच्या मुलाचा मृत्यु हा ‘Sickle-cell disease with anaemia and vaso-occolusive crisis’ या आजाराने भंडारा जनरल हॉस्पीटल येथे झाल्याने व तक्रारकर्त्याचा मुलगा हा Sickle-cell चा रोगी असल्यामुळे तक्रारकर्त्याच्या मुलाने आजाराबद्दल माहिती लपवून ठेवल्यामुळे व पॉलीसी काढतांना उघड न केल्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळणे म्हणजे सेवेतील त्रृटी नाही, करीता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे.
10. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत जीवन सरल पॉलीसी ची प्रत पान नं.14 वर दाखल केली आहे. मृत्यु प्रमाणपत्र पान नं.18 वर, विरुध्द पक्षाचा चौकशी अहवाल पान नं. 19 वर दाखल केला आहे. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस पान नं.21 वर, नोटीसचे उत्तर पान नं.23 वर दाखल केले आहे.
11. तक्रारकर्त्याचे वकील अॅड.चन्ने यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याच्या मुलाने तो Sickle-cell चा वाहक असल्याचे विमा प्रतिनीधी यांना सांगितले होते व त्याप्रमाणे त्यांनी तक्रारीमध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे सुध्दा न्यायमंचात सांगितले आहे. तक्रारकर्त्याच्या मुलाचा विमा अर्ज हा विमा प्रतिनीधीने भरला व तक्रारकर्त्याच्या मुलाने त्यावर सही केली. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या मुलाने कुठलीही बाब विरुध्द पक्षापासून लपविलेली नाही. तक्रारकर्त्याने संपुर्ण कागदपत्रासह विरुध्द पक्षाकडे विमा दावा मिळण्यासाठी रितसर अर्ज केला होता. तक्रारकर्त्याचा मुलगा हा Sickle-cell ने बाधित होता परंतु Sickle-cell हा आजार नसून तो एक अनुवांशिक दोष (Deformative) आणि तक्रारकर्त्याचा मुलगा Sickle-cell treatment घेत होता. त्यामुळे Sickle-cell हा आजार नसल्यामुळे कुठल्याही व्यक्तीचा मृत्यु हा Sickle-cell ने होऊ शकत नाही. मा. राज्य आयोग,मुंबई,खंडपीठ,नागपुर यांनी Life Insurance Corporation Vs. Gyaniram Tukaram Dewahare, Appeal No A/08/61 यामध्ये असे म्हटले आहे की "In fact in Vidarbha Region about 25% of people, residing in this region are suffering from the Sickle Cell Anemia, which is not a disease. It comes in person along with his birth. It is an inherent defect by birth in the person and it cannot be treated as disease."
त्यांनी पुढे न्यायनिवाडयात असेही म्हटले आहे की,
"Even after proposal form was submitted, LIC was duty bound to make through enquiry by visiting the place of respondent and contacting people to see whether the life insured had given any incorrect information and if that is so they can cancel the policy and refund the premium paid by the life insured. Moreover, the insured died by natural death and not by any disease".
त्यामुळे त्यांनी असा निष्कर्ष काढला की,
"We have to presume that the death of insured was natural". त्यामुळे वरील न्यायनिवाडा हा तक्रारकर्त्याच्या प्रकरणाशी सुसंगत असल्यामुळे तक्रारकर्त्याचा अर्ज मंजुर करण्यावा यावा, असा युक्तीवाद केला.
12. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे वकील अॅड.सुषमा सिंग यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याने ही बाब मान्य केली आहे की तक्रारकर्त्याचा मुलगा हा Sickle-cell चा वाहक होता व तक्रारीमध्ये दाखल केलेल्या जनरल हॉस्पीटल, भंडारा यांचे प्रमाणपत्रानुसार तक्रारकर्त्याच्या मुलाचे मृत्युचे कारण हे Sickle-cell हा आजार होता व Sickle-cell त्याच्या मृत्युस कारणीभुत असल्यामुळे व तक्रारकर्त्याचा मुलगा Sickle-cell चा वाहक असल्याबद्दल विमा अर्जामध्ये ही बाब न लिहील्यामुळे सदरहू बाब "Suppression of material fact" असल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा खारीज करणे म्हणजे सेवेतील त्रृटी नाही. तक्रारकर्त्याने सदरहु तक्रारीमध्ये विमा प्रतिनीधी यांना सुध्दा प्रतिवादी करणे आवश्यक होते, परंतु त्यांनी त्यांना प्रतिवादी न केल्यामुळे सदरहू प्रकरण खारीज करण्यात यावे.
13. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज व तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद यावरुन खालील मु्ददा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय
कारणमिमांसा
14. तक्रारकर्त्याच्या मुलाने विमा अर्ज भरतांना विमा प्रतिनीधी यांना तक्रारकर्त्याचा मुलगा हा Sickle-cell चा वाहक असल्याची माहिती विमा प्रतिनीधी यांना सांगितली होती, असे तक्रारीमध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू परिस्थिती विमा प्रतिनीधी यांच्या पासून लपवून ठेवणे, अशी परिस्थिती निर्माण होवू शकत नाही. मा.राज्य आयोग,मुंबई, नागपुर खंडपीठ यांनी Life Insurance Corporation Vs. Gyaniram Tukaram Dewahare, Appeal No A/08/61 या न्यायनिवाडयामध्ये असे म्हटले की विदर्भामध्ये 25 टक्के लोक Sickle-cell चे वाहक आहेत तसेच Sickle-cell म्हणजे Anemic Condition आहे परंतु Sickle-cell हा आजार नसून तो inherent defect हा जन्मापासून आलेला होता त्यामुळे तो आजार या व्याख्येमध्ये समाविष्ट होत नाही.
15. तक्रारकर्त्याचा मुलगा हा Sickle-cell चा वाहक असून तो वेळोवेळी Sickle-cell साठी उपचार घेत असल्यामुळे Sickle-cell हे प्राथमिक मृत्युचे कारण ठरु शकत नाही.
16. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मुलाचा मृत्यु हा Sickle-cell ने झाला व Sickle-cell हे मृत्यु चे प्राथमिक कारण होते याबद्दल त्यांनी डॉक्टरचे प्रतिज्ञापत्रद्वारे पुरावा म्हणुन सदरहू प्रकरणात न दाखल केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या मुलाचा मृत्यु हा Sickle-cell नेच झाला आहे ही बाब सिध्द होत नाही.
17. Sickle-cell is not direct & independent cause of death. Sickle-cell was present from birth, so he was survived for 25 years. There was no past reared serious illness because of sickle-cell filed insurance co. on record. Therefore so many cases in while person cn be died because of high temperature. Therefore Sicle-cell should not be the sole and direct reason of death, otherwise he would not have survived for 25 years of age.
18. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मुलाच्या मृत्युस Sickle-cell हे प्राथमिक कारण असून व Sickle-cell हा आजार आहे हे कुठल्याही independent evidence द्वारे व प्रतिज्ञापत्राद्वारे सिध्द् न करु शकल्यामुळे तक्रारकर्त्याच्या मुलाचा मृत्यु हा नैसर्गिक मृत्यु असल्यामुळे तक्रारकर्त्याने विमा प्रतिनीधींना तक्रारकर्त्याचा मुलगा हा Sickle-cell चा वाहक होता ही बाब सांगुन सुध्दा प्रतिनीधींने विमा अर्जात न लिहीणे म्हणजेच "Suppersion of material fact" होत नसल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळणे म्हणजे सेवेमधील त्रृटी आहे असे मंचाचे मत आहे. करीता खालील आदेश पारीत करीत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी जीवन सरल विमा पॉलीसीची रक्कम रुपये 5,00,000/- (पाच लाख) हे द.शा.द.शे.8 टक्के दराने व्याजासह तक्रार दाखल झाल्यापासून म्हणजेच दिनांक 7/2/2014 पासून ते संपुर्ण पैसे मिळेपर्यंत तक्रारकर्त्यास देण्यात यावे.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास मानसिक त्रासापोटी रुपये
10,000/- (दहा हजार) दयावे तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/-
(पाच हजार) दयावे.
4. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत
प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी सदर आदेशाची प्रत
नियमानुसार तक्रारकर्त्यास विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.
श्री हेमंतकुमार पटेरिया श्री अतुल दि. आळशी
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,
भंडारा