Maharashtra

Parbhani

CC/10/203

Bhura Rasu Pawar - Complainant(s)

Versus

Life Insurance Corporation of India through its Branch Manager Parbhani - Opp.Party(s)

Adv.D.U.Darade

16 Dec 2010

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/203
1. Bhura Rasu Pawarr/o Vivekanand nagar Old Pedgaon road, ParbhaniParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Life Insurance Corporation of India through its Branch Manager ParbhaniParbhaniParbhaniMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.D.U.Darade, Advocate for Complainant

Dated : 16 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र

 

                        तक्रार दाखल दिनांकः-  06/09/2010

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 06/09/2010

                        तक्रार निकाल दिनांकः- 16/12/2010

                                                                                    कालावधी 03 महिने 10 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

 

अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.

       सदस्‍या                                                                                  सदस्‍या

सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.              

    

          भूरा पि.रासू पवार.                                         अर्जदार

वय 50 वर्षे,धंदा नोकरी.                                     अड.डी.यु.दराडे.

रा.विवेकानंद नगर.जुना पेडगाव रोड.परभणी.     

               विरुध्‍द

      भारतीय जिवन विमा निगम                              गैरअर्जदार.

      तर्फे शाखा अधिकारी शाखा परभणी.                       अड.व्हि.के.बलखंडे.

------------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)         सौ.सुजाता जोशी.                   सदस्‍या.                                              3)         सौ.अनिता ओस्‍तवाल.                 सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------

          

         (  निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष.)

 

      आयुर्विमा महामंडळाकडून घेतलेल्‍या विमा पॉलिसी अंतर्गत अपंगत्‍वाची नुकसान भरपाई पॉलिसी हमी प्रमाणे देण्‍याचे एल.आय.सी.ने नाकारले म्‍हणून प्रस्‍तुतची तक्रार आहे.

      तक्रार अर्जातील थोडक्‍यात हकीकत.

      अर्जदाराने गैरअर्जदाराकडून तारीख 06/09/1993 रोजी रु.25,000/- ची पॉलिसी नंबर 980767711 आणि तारीख 06/05/1993 रोजी रु.15,000/- ची पॉलिसी नंबर 980767057 उतरविलेल्‍या होत्‍या त्‍यामध्‍ये अपंगत्‍वाच्‍या नुकसान भरपाईची हमी अंतर्भुत होती. तारीख 01/05/2005 रोजी अर्जदार मोटार सायकल नंबर एम.एच.12/इ 5136 वरुन सावंगी येथून येत असतांना समोरुन येणा-या जीप क्रमांक एम.एच.12 / पी.ए.9384 ने मोटार सायकलला धडक दिल्‍याने जीपचे चाक अर्जदाराच्‍या दोन्‍ही पायावरुन गेले  अपघातात पायांना गंभीर जखमा झाल्‍या अपघाताची नोंद परभणी ग्रामीण पोलिस स्‍टेशन यांनी गुन्‍हा रजिस्‍टर नंबर 34/05 ने केली.अर्जदाराला उपचारासाठी सरकारी रुग्‍णालय येथे सुरवातीला अडमिट केले होते त्‍यानंतर मुंबई येथील प्रकाश हॉस्पिटल मध्‍ये नेले परंतु फ्रॅक्‍चरची हाडे जुळून आली नाहीत. पोटरीचे हाड तुटल्‍यामुळे  7 से.मी. पायांच्‍या हाडांची लांबी कमी झाली. अर्जदार हॉस्पिटल मध्‍ये सहा महिने उपचार घेत होता परंतु पुर्ववत पाय बरा झाला नाही.पायास कायमचे अपंगत्‍व आले त्‍या संदर्भात 19/11/2008 रोजी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक सामान्‍य रुग्‍णालय परभणी यांनी अर्जदाराला 80 टक्‍के कामय स्‍वरुपी अपंगत्‍व असल्‍याचे सर्टीफिकेट दिले आहे.त्‍यानुसार पॉलिसी हमी प्रमाणे अर्जदाराने नुकसान भरपाई मिळणेसाठी गैरअर्जदाराकडे मेडीकल पेपर्स व क्‍लेमफॉर्म भरुन पाठविला होता.परंतु गैरअर्जदारांनी तारीख 09/09/2008 रोजी क्‍लेम नामंजुर केला त्‍यामध्‍ये पायास आलेले अपंगत्‍व संपूर्णपणे व कायम स्‍वरुपी नाही असे कारण दिले आहे. अर्जदाराचे म्‍हणणे असे की, वरील कारणास्‍तव गैरअर्जदारांनी बेकायदेशिररित्‍या क्‍लेम नाकारुन त्‍याच्‍यावर अन्‍याय केला आहे म्‍हणून ग्राहक मंचात प्रस्‍तुतची तक्रार दाखल करुन दोन्‍ही पॉलिसीच्‍या हमी प्रमाणे त्‍याला अपंगत्‍वाची नुकसान भरपाई मिळावी त्‍याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.10,000/- व दाव्‍याचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.

      तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) व पुराव्‍यातील कागदपत्रात नि.4 लगत गैरअर्जदाराकडून घेतलेल्‍या पॉलिसीचे तपशिल, अपघाता संबंधी ग्रामीण पोलिस स्‍टेशनकडे दिलेल्‍या एफ.आय.आर.ची कॉपी, सिव्‍हील सर्जनचे अपंगत्‍वाचे सर्टीफिकेट आणि गैरअर्जदारांचे तारीख 09/09/2008 चे क्‍लेम नाकारल्‍याचे पत्र अशी 5 कागदपत्रे दाखल केलेले आहेत.

      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्‍यावर त्‍याने तारीख 16/11/2010 रोजी प्रकरणात आपला लेखी जबाब ( नि.9 ) सादर केला अर्जदाराने दोन विमा पॉलिसी घेतल्‍यासंबंधीचा तक्रार अर्जातील मजकूर त्‍यांना मान्‍य आहे.परंतु अपघातासंबंधीचा मजकूर वैयक्तिक माहिती अभावी नाकारला आहे.तसेच उपचारासंबंधी लिहिलेला मजकूरही त्‍यांनी नाकारला आहे.अतिरिक्‍त लेखी जबाबात त्‍यांनी याबाबत असा खुलासा केला आहे की, अर्जदाराने क्‍लेम पेपर्स दाखल केल्‍यानंतर चौकशी अधिकारी नमून ख-या वस्‍तुस्थितीची माहिती घेतली असता तारीख 10/07/2006 च्‍या क्लिनीक हॉस्पिटलच्‍या सर्टीफिकेटमध्‍ये अर्जदाराने उपचार घेतले होते त्‍याबाबत त्‍याला 60 टक्‍के अपंगत्‍वाचे सर्टीफिकेट दिले गेले होते त्‍यानंतर डॉ.तरल व्‍ही नागोडा अर्थोपेडीक सर्जन यांच्‍याकडे घेतलेल्‍या उपचारासंबंधीच्‍या सर्टीफिकेट मध्‍ये 80 टक्‍के गुडघ्‍यास अपंगत्‍व असल्‍याचा दाखला दिला होता.अर्जदाराने त्‍यानंतर सिव्‍हील सर्जन परभणी यांच्‍याकडून मिळवलेल्‍या सर्टीफिकेटमध्‍ये 60 टक्‍के अपंगत्‍व असल्‍याचे नमुद केलेले आहे. वरील सर्व दाखले विमा मंहामंडळाचे उच्‍चअधिकारी डिव्‍हीजनल मेडीकल ( बी.एम.आर.) यांच्‍याकडे पाठविले त्‍याबाबत असे मत व्‍यक्‍त केले आहे की, अर्जदाराच्‍या पायाला कायम स्‍वरुपी अपंगत्‍व नाही त्‍यामुळे नुकसान भरपाई पॉलिसी नियमा मध्‍ये देय होत नाही त्‍यामुळे अर्जदारास तारीख 09/09/2008 रोजी पत्र पाठवुन नियमानुसार त्‍याचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे. यामध्‍ये गैरअर्जदाराकडून कोणत्‍याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी शेवटी विनंती केलेली आहे.

      लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदारांचे शपथपत्र ( नि.10) दाखल केलेले आहे.आणि पुराव्‍यातील कागदपत्रात नि.13 लगत 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

तक्रार अर्जाच्‍या अंतिम सुनावणीच्‍या वेळी अर्जदारतर्फे अड.ए.पी.ताठे व गैरअर्जदारकडून अड बलखंडे यांनी युक्तिवाद केला.

     निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

      मुद्दे.                                        उत्‍तर.

1)    गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा क्‍लेम तारीख 09/09/2008 

      च्‍या पत्रातून बेकायदेशिररित्‍या नाकारुन सेवात्रुटी केली आहे काय?  होय.

2)    अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय?              होय.

3)    निर्णय?                                          अंतिम आदेशा प्रमाणे.

           कारणे

     मुद्दा क्रमांक 1 व 2

अर्जदाराने गैरअर्जदार महामंडळाची मे 1993 मध्‍ये रु.15,000/- आणि सप्‍टेंबर 1993 मध्‍ये रु.25,000/- अशा दोन पॉलिसी घेतल्‍या होत्‍या ही अडमिटेड फॅक्‍ट आहे.

अर्जदाराने पुराव्‍यात पॉलिसीच्‍या गैरअर्जदाराकडून मिळालेल्‍या तपशिलाची प्रत अनुक्रमें नि.4/1 व 4/2 ला दाखल केलेली आहे.तारीख 01/05/2005 रोजी अर्जदार मोटार सायकलवरुन निघाला असतांना समोरुन येणा-या जीपने धडक दिल्‍यामुळे अपघातात जीपचे चाक अर्जदाराच्‍या दोन्‍ही पायावरुन गेल्‍यामुळे गंभीर जखमा झाल्‍या होत्‍या ही देखील अडमिटेड फॅक्‍ट आहे.अर्जदाराने पुराव्‍यात नि.4/3 ला ग्रामीण पोलिस स्‍टेशन परभणी गु.र.नं.34/05 मधील एफ.आय.आर.ची कॉपी दाखल केलेली आहे.अपघाता नंतर अर्जदाराला सरकारी रुग्‍णालय परभणी येथे सुरवातीला उपचारासाठी अडमिट केले होते त्‍यानंतर प्रकाश हॉस्पिटल मुंबई येथे पुढिल उपचारासाठी अडमिट केले होते हे लेखी जबाबातून गैरअर्जदारांनी नाकारलेले असलेतरी युक्तिवादाच्‍यावेळी अर्जदाराने संबंधीत हॉस्पिटलमध्‍ये इनडोअर पेशंट म्‍हणून उपचार घेतल्‍याच्‍या केस पेपरची छायाप्रत नि.13/3 वर दाखल केलेली आहे.त्‍यामुळे संबंधीत पुराव्‍यातून ही गोष्‍ट शाबीत झालेली आहे.अर्जदाराने घेतलेल्‍या उपचाराच्‍या दरम्‍यान अपघातात पायांची हाडे फ्रॅक्‍चर झाल्‍यामुळे व ती व्‍यवस्थित उपचारात जुळून न आल्‍यामुळे 7 से.मी. पायांचे हाड कमी करावे लागले होते त्‍यामुळे नैसर्गिकरित्‍या अर्जदाराला पुर्ववत चालता येणेशक्‍य नव्‍हते व पायाला कायम स्‍वरुपी अपंगत्‍व आले आहे. असे त्‍याचे म्‍हणणे आहे.त्‍यानुसार पॉलिसी हमी प्रमाणे पायास आलेल्‍या कायम स्‍वरुपची अपंगत्‍वाची नुकसान भरपाई मिळणेसाठी अर्जदाराने क्‍लेमफॉर्मसह मेडिकल पेपर्स गैरअर्जदारास पाठविल्‍यानंतर गैरअर्जदार यांनी तारीख 09/09/2008 च्‍या पत्रातून (नि.4/5) डि.एम.आर.यांच्‍या मतानुसार अर्जदाराच्‍या पायास कायम स्‍वरुपी व पूर्णपणे निकामी अपंगत्‍व आलेले नसल्‍यामुळे पॉलिसी नियम अटी प्रमाणे नुकसान भरपाईची रक्‍कम देय नाही.या कारणास्‍तव अर्जदाराचा क्‍लेम नामंजुर केला होता त्‍यामुळे गैरअर्जदाराने क्‍लेम नाकारण्‍याचे बाबतीत घेतलेले निर्णय कायदेशिर आहे काय ? व दिलेले कारण बरोबर आहे काय ? हा एकच मुद्दा निर्णयाच्‍या कामी महत्‍वाचा ठरतो.

अर्जदाराने तक्रार अर्जासोबत नि.4/4 ला जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक सरकारी हॉस्पिटल परभणी यांच्‍याकडून तारीख 19/11/2008 रोजी घेतलेल्‍या अपंगत्‍वाचे सर्टीफिकेट दाखल केलेले आहे.त्‍याचे बाकरकाईने अवलोकन केले असता सदर सर्टीफिकेटमध्‍ये असे स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे की, Non union Tibia (Rt) c bone loss c 7 cm shortening with non union # proximal tibia (Lt) with internal derangement of knee c malunited # shaft tibia left. he is physically disabled / 80 % permanent.

Note- This condition is non progressive.

 सर्टीफिकेट मध्‍ये स्‍पष्‍टपणे अर्जदाराच्‍या पायास कायम स्‍वरुपी अपंगत्‍व आले असल्‍याचे नमुद केले असून व त्‍यामध्‍ये पुन्‍हा कसलाही बदल होणार नाही असे ही स्‍पष्‍टपणे मत व्‍यक्‍त केले असतांना  गैरअर्जदारांनी त्‍याकडे दुर्लक्ष करुन अर्जदाराचा क्‍लेम नामंजुरीचा चुकीचाच निर्णय दिला असल्‍याचे यातून स्‍पष्‍ट होते.मोटार वाहान कायदा 1988 चे कलम 142 मध्‍ये कायम स्‍वरुपी अपंगत्‍व या शब्‍दाची अशी व्‍याख्‍या स्‍पष्‍ट केली आहे की, अपघातामध्‍ये एखाद्या व्‍यक्‍तीचे ( अ ) दोन्‍ही डोळे किंवा दोन्‍ही कान निकामी झाले असतील तर किंवा कोणताही अवयव किंवा सांधा निकामी झाला असेल किंवा ( ब ) कोणत्‍याही अवयवाची किंवा सांध्‍याची क्षमता कायमची नष्‍ट झाली असेल किंवा ( क ) डोके किंवा चेहरा विद्रूप झाला असेल अशा प्रकारची जखम किंवा जखमा झाली असेलतर त्‍या व्‍यक्‍तीला अशा स्‍वरुपाच्‍या अपघातामध्‍ये कायम स्‍वरुपी अपंगत्‍व आले असल्‍याचे मानण्‍यात येईल. वरील व्‍याख्‍येतील ( ब ) प्रमाणे अर्जदाराच्‍या अवयवाला म्‍हणजेच पायाला कायम स्‍वरुपी अपंगत्‍व आले आहे. हे सिव्‍हील सर्जनच्‍या सर्टीफिकेट मध्‍ये नमुद केले आहे.अर्जदाराचा पाय 7 से.मी.ने कमी झाला आहे.तो पाय पूर्णपणे अधू झाला आहे.त्‍या पायावर उभे राहता येत नाही किंवा चालताही येत नाही तो अवयव ( पाय ) वापर करण्‍याची क्षमता पूर्णपणे नष्‍ट झाली आहे.म्‍हणजेच पायाला कायमचे अपंगत्‍व आले आहे. ही वस्‍तुस्थिती आहे.गैरअर्जदारातर्फे सादर केलेला लेखी जबाबामध्‍ये पॉलिसी कंडीशन नं.10.4 चा संदर्भ देवुन शारिरीक अवयव पूर्णपणे काढून टाकला असेलतर त्‍याला कायमचे अपंगत्‍व मानले जाईल अशी पॉलिसीची अट आहे.असे निवेदन केले व युक्तिवादाच्‍यावेळी देखील गैरअर्जदारातर्फे अड.बलखंडे यांनी तोच मुद्दा उचलून धरला. परंतु ज्‍या पॉलिसी कंडीशनच्‍या आधारे गैरअर्जदारांनी बचाव घेतलेला आहे.त्‍या पॉलिसी कंडीशनची प्रतही मंचापुढे दाखल केलेली नाही. किंवा मंचापुढे आणण्‍याचा प्रयत्‍नही केलेला नाही.कारण घेतलेला बचाव हा कागदोपत्री पूर्ववत शाबीत करण्‍याची कायदेशिर जबाबदारी गैरअर्जदारांवरच येते तसेच ते शाबीत झालेले नाही. त्‍यामुळे कंडीशनच्‍या ठोस पुराव्‍या खेरीज गैरअर्जदारांनी घेतलेला बचाव ग्राहय धरता येणे कठीण आहे. मुळातच सिव्‍हील सर्जन परभणी यांनी दिलेल्‍या सर्टीफिकेट मधून अर्जदाराच्‍या डाव्‍या व उजव्‍या पायास 80 टक्‍के कायमचे अपंगत्‍व आले असलयाचे नमुद करुन ते अपंगत्‍व नॉन प्रोग्रेसिव्‍ह असल्‍याचेही स्‍पष्‍ट नोट दिली आहे.त्‍यामुळे तज्ञ डॉक्‍टरांनी या संदर्भात दिलेल्‍या दाखल्‍याकडे मुळीच दुर्लक्षकरता येणार नाही. तो ग्राहय धरावाच लागेल. गैरअर्जदारांनी ही वस्‍तुस्थिती नजरेआड करुन अर्जदाराला नुकसान भरपाई देण्‍याचे टाळण्‍यासाठीच 09/09/2008 च्‍या पत्रातून ( नि.4/5 ) अर्जदाराचा क्‍लेम बेकायदेशिररीत्‍या नाकारुन त्‍याचेवर अन्‍याय केलेला आहे.असे अनुमान निघते.गैरअर्जदारातर्फे अड.बलखंडे  यांनी युक्तिवादाच्‍यावेळी रिपोर्टेड केस 2007 (1) सी.पी.जे. पान 230 ( राष्‍ट्रीय आयोग ) आणि रिपोर्टेड केस 2010 (2) सी.पी.जे. पान 30 ( राष्‍ट्रीय आयोग ) या केसेसचा आधार घेतलेला आहे.परंतु यातील घटना व प्रस्‍तुत तक्रार अर्जातील घटना भिन्‍न स्‍वरुपाची असल्‍यामुळे प्रस्‍तुत प्रकरणाला लागु पडत नाही.वरील सर्व बाबी विचारात घेता पॉलिसी हमी प्रमाणे कायमच्‍या अपंगत्‍वाची नुकसान भरपाई देण्‍याचे गैरअर्जदारांनी बेकायदेशिररित्‍या नाकारुन सेवात्रुटी केली असल्‍याचे पुराव्‍यातून सिध्‍द झाल्‍यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देवुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.

                              आदेश

1                    तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2     गैरअर्जदारांनी आदेश तारखे पासून 30 दिवसांच्‍या आत अर्जदाराने घेतलेल्‍या

      पॉलिसी क्रमांक 980767711 आणि पॉलिसी क्रमांक 980767057 मध्‍ये    

         घेतलेल्‍या हमी प्रमाणे अर्जदाराच्‍या पायाला आलेल्‍या कायम स्‍वरुपी

         अपंगत्‍वाची नियमा प्रमाणे देय होणारी नुकसान भरपाई अदा करावी.

   3     याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.2,000/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- आदेश

         मुदतीत द्यावा.

   4     पक्षकारांना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात.

 

 

 

 

सौ. अनिता ओस्‍तवाल              सौ.सुजाता जोशी        श्री. सी.बी. पांढरपटटे

     सदस्‍या                        सदस्‍या                  अध्‍यक्ष.

 


[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member