आदेश
मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये –
- तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, त्याने विरुध्द पक्षाच्या एंजट मार्फत LIC Jeevan Saral (WITH PROFITS) ही विमा पॉलिसी क्रं. 976401940 विमामुल्य रक्कम रुपये 5,00,000/- करिता प्रतिमाह रुपये 2,042/- प्रमाणे 10 वर्षाकरिता दि. 05.10.2009 ला काढली होती व त्यात death benefit sum assured रुपये 5,00,000/- किंवा accident benefit sum assured म्हणून रुपये 5,00,000/- देय अंतर्भूत आहे. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसी घेतांना विरुध्द पक्षाच्या अधिका-यांनी पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर परिपक्वता रक्कम रुपये 5 लाखा पेक्षा जास्त मिळेल असे सांगितले होते व त्यामध्ये डेथ बेनिफिट आणि अपघात विमा अंतर्गत रु 5,00,000/- असल्याचे सांगितले होते व त्याप्रमाणे विरुध्द पक्षाने विमा हप्ता रुपये 2,042/- हा निश्चित केला. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसी सुरु झाल्यापासून म्हणजे दि. 05.10.2009 पासून दि. 05.10.2019 पर्यंत म्हणजेच 10 वर्षा पर्यंत प्रतिमाह 2042/- प्रमाण एकूण रक्कम रुपये 2,54,040/- वि.प.कडे जमा केली. विमा पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दि. 17.06.2019 रोजी विमा पॉलिसी अंतर्गत रु.80,943/- देय असल्याचे कळविले व त्यामध्ये मुळ रक्कम 61,180/- + अधिक बोनस रु 26,002/- चा समावेश आहे. विरुध्द पक्षाने रुपये 6,239/- (UNPAID PRM म्हणून रुपये 6126/- आणि INT On PRM म्हणून रुपये 95/-) परिपक्वता रक्कम मधून कमी केली व सरल विमा पॉलिसी अंतर्गत रुपये 80,943/- तक्रारकर्त्याला दिली, त्यामुळे तक्रारकर्त्याचा एकूण 4,23,097/- एवढया रक्कमेचा तोटा झाला. विमा पॉलिसी अंतर्गत मिळालेल्या रक्कमे नंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाशी संपर्क साधला असता त्यांना सुध्दा सरल विमा पॉलिसी अंतर्गत इतकी कमी रक्कम मिळेल याबाबत कल्पना नसल्याचे कळविले. विरुध्द पक्षाने विमा पॉलिसी परिपक्वते नंतर तक्रारकर्त्याला दुप्पट रक्कम मिळेल असे आश्वासन दिल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची पॉलिसी काढली होती. परंतु तक्रारकर्त्याला त्याप्रमाणे रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दि. 10.02.2020 रोजी कायदेशीर नोटीस बजाविली. परंतु विरुध्द पक्षाने त्याची दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याचे घोषित करावे. तसेच विरुध्द पक्षाने विमा पॉलिसी अंतर्गत देय असलेली रक्कम आणि विमा हप्त्या पोटी जमा केलेली संपूर्ण रक्कम व्याजासह देण्याचा आदेश द्यावा. त्याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा.
- विरुध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबात नमूद केले की, विमा पॉलिसी मध्ये maturity sum assured ही रक्कम स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. त.क.ने स्वतःहून तक्रारी सोबत सदर विमा पॉलिसी क्रं. 976401940 संलग्न केली आहे त्या अंतर्गत खालीलप्रमाणे देय आहे.
Maturity Sum Assured :- RS. 81,180/-
Death Benefit Sum Assured :- RS. 5,00,000/-
Accident Benefit Sum Assured :- RS. 5,00,000/-
Similarly the Policy bond further states about the contingencies when the Maturity benefits and benefit on Death are payable and the same in verbatim are as under :-
Maturity Benefits :- In the event of the Life Assured Surviving the date of Maturity a sum equal to Maturity Sum Assured after Partial surrenders, if any, along with the corresponding loyalty additions if any shall be payable.
Benefits on Death :- A sum equal to the Death Benefit Sum assured along with all premiums Paid (Excluding premiums paid for the first policy year, any extra premium and premiums in respect of Accident Benefit and term Rider benefits) shall be payable provided. If the proposer and/or life assured had surrendered the policy partially as per terms of this policy, the benefit shall be reduced in proportion of the reduction in premium for the main plan.
विमा पॉलिसीच्या 165 plan च्या विशिष्टानुसार विमा पॉलिसी अंतर्गत 10 वर्षे जर विमा हप्ता भरण्यात आला आणि विमा पॉलिसी अस्तित्वात राहिली तर परिपक्वता रक्कम अदा केली जाते. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचा मृत्यु किंवा अपघात न झाल्यामुळे तक्रारकर्त्याला Death Benefit sum assured or the accident benefit sum assured दिल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीनुसार तक्रारकर्त्याचा विमा दावा रक्कम रुपये 5,00,000/- मिळण्याची विनंती तर्कहिन असल्यामुळे प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले असता व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष
मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून JEEVAN SARAL (WITH –PROFITS) पॉलिसी क्रं. 976401940 ही 10 वर्षाकरिता घेतली असून त्याकरिता विमा हप्ता म्हणून प्रतिमाह रुपये 2,042/- विरुध्द पक्षाकडे जमा केले असल्याचे नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. नि.क्रं. 2 वर दाखल विमा पॉलिसी क्रं. 976401940 मध्ये..........
Maturity Sum Assured :- RS. 81,180
Death Benefit Sum Assured :- RS. 5,00,000/-
Accident Benefit Sum Assured :- RS. 5,00,000/- असे स्पष्टपणे नमूद आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे दि. 05.10.2009 ते 05.10.2019 या कालावधीत विमा हप्ता जमा केला असला तरी तक्रारकर्त्याचा विमा पॉलिसी अस्तित्वात असंताना मृत्यु किंवा अपघात झालेला नसल्यामुळे तक्रारकर्ता विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीनुसार Maturity Sum Assured अंतर्गत देय असलेली रक्कम मिळण्यास पात्र होता व सदरची रक्कम विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिलेली असल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही असे स्पष्टपणे दिसून येते.
सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.