Maharashtra

Kolhapur

CC/10/406

Smt.Surekha Namdev Raut - Complainant(s)

Versus

Life Insurance Corporation of India through Divisional Manager, - Opp.Party(s)

Santosh Shinde.

06 Jan 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/406
1. Smt.Surekha Namdev RautR/o.Pushpnagar, Gargoti, Tal.Bhudargad, dist.Kolhapur. Presently r/o. C/o.Anil Rama Tawar, 711, A ward, Juna Vashi Naka, Vijaynagar Colony, Kadam Khan, Kolhapur.2. Kum.Vaishnavi Namdeo Raut, Minor Guardian Mother Smt.Surekha Namdeo RautR/o. As above ...........Appellant(s)

Versus.
1. Life Insurance Corporation of India through Divisional Manager, Divisional Office, Trade Center, Station Road, Kolhapur.2. Life Insurance Corporation of India through Branch Manager, Kolhapur Division, Branch Murgud, Nagarpalika Building, Murgud, Tal.Kagal, Dist.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :

Dated : 06 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.06.01.2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे प्रस्‍तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत. तक्रारदार तसेच त्‍यांचे वकिल मागील अनेक तारखांना गैरहजर आहेत. सबब, हे मंच प्रस्‍तुतची तक्रार गुणावगुणावर निकाली काढीत आहे.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदार क्र.1 चे पती नामदेव पंडित राऊत यांचा दि.26.04.2007 रोजी मृत्‍यू झाला. नामदेव राऊत यांनी दि.27.03.1997 रोजी सामनेवाला विमा कंपनीकडे विमा उतरविला होता. त्‍याचा पॉलीसी क्र.9453733701 व पॉलीसीची मॅच्‍युरिटी दि.27.03.2022 अशी आहे. तक्रारदार क्र.1 यांनी त्‍यांच्‍या पतीच्‍या मृत्‍यूनंतर सामनेवाला विमा कंपनीकडे क्‍लेमची मागणी केली असता सामनेवाला विमा कंपनीने त्‍यास कोणतेही उत्‍तर दिले नाही. दि.28.06.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली असता सदर नोटीसीला उत्‍तर दिलेले आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या उत्‍तरामध्‍ये सदर पॉलीसीवर राजेंद्र नाते - भाऊ अशी नोंद असल्‍याने क्‍लेम देता येत नाही असे उत्‍तर दिले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार दिवाणी कोर्टास वारस ठरविणेचे अधिकार असतील असे असतानाही विमा कंपनीने पॉलीसीमधील नॉमिनीस सरळ वारस म्‍हणून घोषित केले आहे. तक्रारदार या सरळ वारस असताना तक्रारदारांचा क्‍लेम दिलेला नाही. सबब, इन्‍श्‍युरन्‍स पॉलीसी नियमानुसार मिळाणारी रक्‍कम देणेचा आदेश व्‍हावा व तक्रारीचा खर्च देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.
 
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत पॉलीसी, नामदेव राऊत यांचा मृत्‍यूचा दाखला, वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले मृत्‍यूचे प्रमाणपत्र, सामनेवाला यांना दि.11.06.2010 रोजी दिलेला अर्ज, सामनेवाला यांना दि.28.06.2010 रोजी पाठविलेली नोटीस, सामनेवाला यांनी दि.30.06.2010 रोजी पाठविलेले पत्र इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(4)        तक्रारदारांच्‍या तक्रारीचे स्‍वरुप विचारात घेतले असता तक्रारदार क्र.1 यांच्‍या पतीने सामनेवाला विमा कंपनीची पॉलीसी घेतली होती व पतीचे मृत्‍यूनंतर मिळणारा लाभ सरळ वारस म्‍हणून सामनेवाला विमा कंपनीने दिलेला नाही याबाबतची तक्रार आहे. पॉलीसीमध्‍ये नॉमिनी म्‍हणून पॉलीसीधारकाच्‍या भावाचे नांवाची नोंद असल्‍याचे दिसून येते.   प्रस्‍तुत प्रकरणी उपस्थित केलेला वाद हा वारसा हक्‍काबाबतचा आहे. सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या इच्‍छेनुसार योग्‍य त्‍या न्‍यायालयात वारसा हक्‍क ठरवून सामनेवाला विमा कंपनीकडे क्‍लेमची मागणी करावी. सबब आदेश.
आदेश
1.    तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत येते.

2.    खर्चाबाबत आदेश नाही.

 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT