नि का ल प त्र :- (दि.04/10/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार तर्फे वकिलांचा व सामनेवाला तर्फे प्रतिनिधी यांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला विमा कंपनी असून तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे पॉलिसीधारक आहेत. तक्रारदार क्र. 1 ते 8 करिता स्वत: तक्रारदार व क्र. 9 हे वटमुखत्यार आहेत. सदरचे तक्रारदार हे दि कोल्हापूर मराठा सह. बँकेचे कर्मचारी होते. सदरचे कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीनंतर सामनेवाला यांचेकडून “ग्रुप सुपर अन्युएशन पॉलिसी” विमा पेन्शन योजना चालू होती. सदर योजनेअंतर्गत तक्रारदारांनी सुरुवातीच्या काळात 10.5 ते 11 टक्के व्याज दराने सामनेवाला यांनी पेन्शन अदा केली होती. त्यानंतर अत्यंत कमी व्याज दराने म्हणजेच 4.5 ते 6 टक्के एवढया अत्यल्प दराने पेन्शन दिली. त्यामुळे योजनेच्या पाठीमागचा हेतू नाहीसा झालेला आहे. सामनेवाला विमा कंपनीने कराराच्या बाहेर जाऊन तक्रारदारांचे आर्थिक नुकसान केले आहे. तक्रारदारांनी स्वत: जमा रक्कमेवर सामनेवाला यांनी पेन्शन देणे चालू केले. कराराप्रमाणे 10.5 ते 11 टक्के प्रमाणे व्याज दराने पेन्शन देण्याची मागणी केली याबाबत वकिलामार्फत नोटीस पाठविली परंतु त्यास चुकीचे उत्तर दिले गेले. दि. कोल्हापूर मराठा को.ऑप. बँक ही दि. सारस्वत को. ऑप. बँकेत विलिन झालेली आहे. सदर बँकेने सदर तक्रारदारांना सेवेत न घेतलेने ते बेकार झालेले आहेत. सबब, तक्रारदारांनी सदरच्या योजनेखाली जमा केलेली रक्कम तक्रारदारांना देण्याचा आदेश व्हावा किंवा सदर रक्कम परत करता येत नसतील तर राष्ट्रीयीकृत बँकेचे ज्येष्ठ नागरिंकाचे ठेवीवरील व्याज दराने पेन्शन देण्याचा आदेश व्हावा. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत पॉलिसी पेपर्स, पॉवर ऑफ अटॉर्नी डीड, तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनी यांना पाठविलेले पत्र, सामनेवाला विमा कंपनीतर्फे कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचारी संघटना,कोल्हापूर यांना पाठविलेले पत्र, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, व पोहच पावत्या इत्यादींच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, पॉलिसीच्या परिशिष्ट क्र. 3 च्या अट क्र. 1 (ए) प्रमाणे त्यांना पॉलिसीप्रमाणे मिळणा-या पेन्शनची 1/3 इतकी रक्कम (कम्युटेड पेन्शन) घेणेचा विकल्प स्विकारुन त्याप्रमाणे कम्युटेड पेन्शनच्या रक्कमा स्विकारुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना संमती व पावत्या दिलेल्या आहेत. तसेच बाकीच्या 2/3 रक्कमांवर पॉलीसीच्या परिशिष्ट 2 व 5 प्रमाणे पॉलिसी करारात ठोक ठरलेल्या व्याजानुसार येणा-या पेन्शनची रक्कमा तक्रारदार घेत असतात. तक्रारदारांस मिळते ती पेन्शन आहे व्याज नाही. उपरोक्तप्रमाणे कम्युटेड पेन्शन व कलम 4 प्रमाणेची पेन्शन घेणेचा विकल्प तक्रारदारांनी स्विकारलेली आहे. सदरची माहिती तक्रारदारांनी मंचापासून लपविलेली आहे. तसेच उर्वरीत 2/3 रक्कम तक्रारदार सभासदांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसांना पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार मिळणार आहेत. यामध्ये तक्रारदार त्यांची रक्कम मागू शकत नाही. सबब, सामनेवाला यांनी कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे पेन्शन पॉलिसी घेतली आहे. तक्रारदारांची मागणी ही 10.5-11 टक्के या दराने पेन्शन स्कीमवरील व्याज देण्याचा आदेश व्हावा अथवा पेन्शन स्कीममध्ये भरलेल्या रक्कमा परत मिळाव्यात. परंतु मास्टर पॉलिसी रुल क्र. 3 व 4 यांचे अवलोकन केले असता सदर पॉलिसी शर्तीप्रमाणेच सामनेवाला विमा कंपनीने कार्यवाही केलेचे दिसून येते. SCHEDULE III 1. Upon retirement of the Members from the service of the Employer or on cessationof service for any reason , the amountstanding to the credit of the Members in the running account shall, subject to the provisions of he Rule, be utilisedin the following manner : (a) to provide for payment, if any, of the commuted value relating to the portion of the pension which the Member may elect to commute; and (b) to purchase the pension, selected by himin accordance with the Rules. 2. In the event of death of the Member while in service, the amount standing to the credit of the Member in therunning account will be utilized to secure for the Beneficiary of the Member the benefits as described in paragraph 1 above. 3. The amount of the pension will depend upon the amount standing to the credit of theMemberin the runing account, the age of the pension or persons to whom the pension is payable and the type of pension and will be determined on the basis of the immediate annuity rates of the Corporation in forces from time to time, the rates as on the date of commencement of the Policy being as shown in Schedule V hereof. The pension is payable monthly, quarterly, half-yearly or yearly as may be agreed to between the Grantees and the Corporation. If a deferred annuity rates in force on the date of purchase. 4. The Grantees shall notify to theCorporation the pension option exercised by the Member or the Beneficiary immediately but not later than thirty days of the Member’s retirement, cessation ofservice or death, as the case may be. उपरोक्त पॉलिसीची अटी व शर्ती विचारात घेतल्या असता सामनेवाला विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी झाली नसल्याचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सबब, आदेश. - आदेश - 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |