Maharashtra

Kolhapur

CC/10/552

Smti.Shashikala Daji Khopakar - Complainant(s)

Versus

Life Insurance Corporation of India, Satara Divisional Office, P & G Unit, G-711, through Local Bran - Opp.Party(s)

Ramesh Powar

14 Feb 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/552
1. Smti.Shashikala Daji KhopakarKasaba Thane, Tal-Panhala, Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Life Insurance Corporation of India, Satara Divisional Office, P & G Unit, G-711, through Local Branch Manager,Trade Center, Station Road, Kolhapur.2. President, Maharashtra Us Todani Va Vahatuk Kamgar Sanghatna Dr.Subhash Jadhav.Anandi Prasad.Besment.1074 Ka B Ward.Raviwaar Peth.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Ramesh Powar, Advocate for Complainant
Indira B. Rajepandhare, Advocate for Opp.Party

Dated : 14 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.14.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी क्र.1 यांनी म्‍हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 यांनी नोटीस स्विकारली नाही. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           सामनेवाला क्र.1 विमा कंपनी आहे. सामनेवला क्र.2 तर्फे तक्रारदारांच्‍या पतीचा सामनेवाला विमा कंपनीकडे जनश्री विमा योजने अंतर्गत विमा पॉलीसी उतरविलेली आहे. सदरची विमा योजना ही प्रामुख्‍याने कारखान्‍यातील ऊस तोडणी व वाहतुक कामगारांकरिता असून त्‍याचा रुपये 200/- चा प्रिमियम प्रत्‍येक कामगारा पाठीमागे असून रुपये 50/- कामगाराकडून व रुपये 150/- शासन भरीत होते. तक्रारदार हे कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे येथील कामगार होते व ते दि.14.11.2008 रोजी अपघाती मयत झाले. त्‍यानंतर आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह दि.14.01.2009 रोजी विमा कंपनीकडे क्‍लेमची मागणी केली असता तक्रारदारांना क्‍लेम देता येत नसल्‍याचे त्‍यांनी कळविले. 
 
(3)        तक्रारदार पुढे सांगतात, सामनेवाला विमा कंपनीस कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे यांना तक्रारदारांच्‍या करिता वकिलामार्फत दि.01.04.2010 रोजी नोटीस पाठविली. परंतु, त्‍याच चुकीची उत्‍तर‍ दिले. त्‍यानंतर दि.15.04.2010 रोजी नोटीस पाठविली, परंतु त्‍यास उत्‍तर दिले नाही. 
 
(4)        तक्रारदार पुढे सांगतात, जनश्री विमा योजना कालावधी सन 2007 ते 2008 या कालावधीकरिता होती व त्‍यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी जुनी पॉलीसी रिन्‍यू करणेकरिता कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे यांना रिन्‍युची रक्‍कम कामगारांकडून जमा करणेची सुचना केलेनंतर प्रिमियम गोळा करुन सामनेवाला क्र.1 यांचेकडे दि.16.05.2008 चा चेक नं.102700 रक्‍कम रुपये 2,55,350/- सन 2008-09 करिता पॉलीसीपोटी जमा केली. तो दि.29.05.2008 रोजी सामनेवाला क्र.1 यांचेकडे जमा झालेला आहे. त्‍यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी जुनी 2007-08 च्‍या पॉलीसीची मुदत संपलेनंतर लगेचच पुढील वर्षाची पॉलीसी रिन्‍यू करावयास पाहिजे होती. परंतु, सामनेवाला विमा कंपनीने सदर जबाबदारी झटकेलेली आहे व सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब, सामनेवाला यांनी वेयक्तिक तसेच संयुक्तिकरित्‍या क्‍लेम रक्‍कमरुपये 75,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(5)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत जनश्री विमा योजना माहितीपत्रक, सहा.कामगार आयुक्‍तांचे पत्र, सामनेवाला क्र.2 तर्फे कुंभी कासारी यांना प्रिमियम मागणी पत्र, सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविलेली वकिल नोटीस, सामनेवाला क्र.1 यांना दि.15.04.2010 रोजी पाठविलेली वकिल नोटीस, सामनेवाला क्र.1 यांनी दि.05.04.2010 रोजी दिलेले उत्‍तर तसेच, वर्दी, स्‍पॉट पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पोस्‍ट मॉर्टेम रिपोर्ट इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. 
 
(6)        सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू अपघातात झाला किंवा कसे याबाबतची विमा कंपनीस माहिती नाही. त्‍याबाबतचा एफ्.आय.आर. किंवा मृत्‍यू दाखला दिलेला नाही. 
 
(7)        सामनेवाला क्र.1 त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, जनश्री विमा योजना सन 2007-08 या कालावधीत दि.29.03.2007 ते दि.29.03.2008 असा होता. सदर कालावधी संपणेपूर्वी सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना पॉलीसीची मुदत संपत आहे याबाबत दि.07.01.2008 रोजी नोटीस दिली होती. सदर पॉलीसीमध्‍ये मृत्‍यू जर अपघातामध्‍ये झाला असेल तर सामनेवाला क्र.1 यांनी रक्‍कम रुपये 75,000/- देणे लागतात व नैसर्गिक मृत्‍यू झालेस केवळ रुपये 30,000/- देणे लागतात. पॉलीसी रिन्‍यु करणेबाबत लगेच कोणतीही पावले उचलली नाहीत. तसेच, 30 दिवस ग्रेस पिरीयड रिन्‍युअलचे पैसे भरले नाहीत. त्‍यानंतर दि.29.05.2008 रोजी रक्‍कम रुपये 2,55,350/- सामनेवाला क्र.1 यांचेकडे भरणा केलेली आहे, परंतु त्‍यासोबत योजनेचा प्रस्‍ताव विलंबाने पाठविला व दि.31.01.2009 रोजी सन 2009 ते 2010 सालाकरिता पुढील नविन पॉलीसी सुरु केली. नविन पॉलीसीचा कालावधी दि.19.01.2009 ते दि.19.01.2010 असा होता. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती केली आहे.
 
(8)        सामनेवाला क्र.1 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ जनश्री योजना प्रस्‍ताव फॉर्म जुनी मास्‍टर पॉलीसी नियमावलीसहीत, जुनी मास्‍टर पॉलीसी नं.685761, रिन्‍युअल डेट कळविणेसाठी सामनेवाला क्र.2 नी सामनेवाला क्र.1 ला दिलेली नोटीस, जनश्री योजनेचा प्रस्‍ताव फॉर्म सामनेवाला क्र.2 नी सामनेवाला क्र.1 ला दिलेली (नविन पॉलीसी), नविन जनश्री पॉलीसी नं.705298 नियमावलीसहीत, मास्‍टर पॉलीसी नं.705298, सागर पिलारे यांचे नांवे दिलेले एल.आय.सी.चे अधिकारपत्र इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.                     
 
(9)        या मंचाने दोन्‍ही बाजूंचा युक्तिवाद सविस्‍तर व विस्‍तृतपणे ऐकला आहे. उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांचे पती हे कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे यांचेकडे कामगार म्‍हणून ते काम करीत होते. दि.14.11.2008 रोजी त्‍यांचा अपघाती मृत्‍यू झालेला आहे. त्‍या अनुषंगाने प्र‍स्‍तुत प्रकरणी एफ.आय.आर.ची प्रत तसेच शवविच्‍छेदन अहवाल प्रस्‍तुत कामी दाखल केलेला आहे. सदर साखर कारखान्‍याच्‍या कामगारांसाठी सामनेवाला विमा कंपनीसाठी जनश्री विमा योजना ही पॉलीसी उतरविली होती व सदर पॉलीसीचा कालावधी हा दि.29.03.2007 ते 29.03.2008 असा होता ही वस्‍तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यू हा पॉलीसी कालावधीमधील नसल्‍याने क्‍लेम नाकारलेला आहे. परंतु, वस्‍तुस्थितीचा विचार करता सामनेवाला विमा कंपनीने पॉलीसी नुतनीकरणाकरिता प्रिमियम रक्‍कम रुपये 2,55,350/- दि.29.05.2008 रोजी जमा करुन घेतलेला आहे व सदर प्रकरणातील तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा दि.14.11.2008 रोजी झालेला आहे. सामनेवाला विमा कंपनीकडे पॉलीसी प्रिमियमचा हप्‍ता जमा झालेला होता. त्‍यामुळे प्रथम घेतलेल्‍या पॉलीसीचा प्रभाव नुतनीकरण तारखेपर्यन्‍त देणे आवश्‍यक आहे. क्‍लेम निश्चित करीत असताना तांत्रिक बाबींकडे न पाहता पॉलीसीचा मुळ हेतू विचारात घेवून व्‍यापक दृष्‍टीकोनातून विचार करणे आवश्‍यक असते. सदरचे विवेचन विचारात घेता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा नाकारलेला क्‍लेम यामध्‍ये त्‍यांची सेवात्रुटी दिसून येते. सदरच्‍या विवेचनास हे मंच खालील पूर्वाधार म्‍हणून विचारात घेत आहे :-
 
2010 ACJ 100 - IN THE HIGH COURT OF GUJARAT AT AHMEDABAD - Kantilal Gordhandas Lalakiya Vs. Ramniklal Laxmichand Khimasiya & others
 
Insurance Act, 1938, section 64-VB - Insurance - Policy - Commencement of - Liability of insurance company - Insurance company received premium from insured in cash on 22.03.2000 against receipt but issued policy on 29.08.2000 for a period upto 27.03.2001 - Accident occurred on 25.03.2000 and Commissioner exonerated insurance company on the ground that insurance company is liable only from the date on which policy was issued - Appeal by owner on the ground that insurance company is liable w.e.f. 22.03.2000 the date on which premium was accepted by insurance company - Insurance company contended that liability was accepted on 28.03.2000 and not prior to that date; policy was not in force and there was no contract between the parties on the date of accident; merely accepting the premium without any contract would not create any liability against the insurance company till issuance of policy - Whether insurance company is liable - Held: yes; liability has been accepted by insurance company on the date on which premium was accepted and receipt issued.
 
II (2009) CPJ 282 (NC) - NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI - United India Insurance Co.Ltd. V/s. Satish Aggarwal.
 
(i) Consumer Protection Act, 1986 - Section 21(b) - Insurance - Renewal of Policy - Policy expired on 02.08.1994 - New policy issued from 04.08.1994 - Reimbursement of hospitalzation and surgery claim repudiated - Contention, due to break of two days between expiry of old policy and taking of new policy, counting of first year in terms of exclusion clause will start from 04.08.1994, not relatable to earlier policy - Contention not acceptable - Words ‘renewal of policy’ used in policy issued on 04.08.1994 - ‘renewal’ means continuation of old policy - Insurer held liable to reimburse claimed amout with interest.
 
(10)       उपरोक्‍त विवेचन व पूर्वाधार विचारात घेता सामनेवाला विमा कंपनीने क्‍लेम रक्‍कम व्‍याजासह द्यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार हे व्‍याज मिळणेस पात्र असल्‍याने नुकसान भरपाई मागता येणार नाही. सबब आदेश.
 
आदेश
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
2.    सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 75,000/- (रुपये पंच्‍च्‍याहत्‍तर हजार फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि.03.10.2008 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज द्यावे.
3.    सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT