जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/272 प्रकरण दाखल तारीख - 16/11/2010 प्रकरण निकाल तारीख – 15/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री. दत्तात्रय पि.ज्ञानेश्वर रुपनोर, वय वर्षे 40, धंदा नौकरी रा.सुभाषनगर, किनवट ता.किनवट जि.नांदेड. अर्जदार. विरुध् शाखाधिकारी, गैरअर्जदार भारतीय जीवन विमा निगम लि (एल.आय.सी), शाखा कार्यालय, भोकर ता.भोकर जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः अर्जदारा तर्फे वकील - अड. ए.रामारेडडी. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष). 1. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे पॉलिसी क्र.983615636 क्रमांकाची 20 वर्षे मुदतीची असलेली रु.1,00,000/- ची माहे मार्च 2004 मध्ये काढलेली होती. सदरील पॉलिसीचा मासीक हप्ता रु.509/- प्रतीमहा याप्रमाणे अर्जदार नौकरीस असलेल्या श्री.बाबासाहेब मुखरे विद्यालय, किनवट या शाळेच्या मासीक वेतनातून हप्ता कपात करण्यात येत होता. मार्च 2009 मध्ये रक्कम रु.15,000/- कर्ज उचल केले होते, कर्जाचा व्याजाचा हप्ता म्हणुन एकुण रु.754/- भरलेले होते. अर्जदाराने जून 2010 मध्ये पॉलिसी बंद केली. शाखा कार्यालय भोकर यांनी अर्जदारास रु.8,272/- चा धनादेश क्र0039924 दि.01/07/2010 चा प्राप्त झाला. दि. 17/07/2010 व 04/08/2010 रोजी गैरअर्जदाराकडे अर्जदाराचे जमा असलेले रक्कमेचे विवरण मागविले होते. परंतु त्याकडे गैरअर्जदारांनी दुर्लक्ष केले. अर्जदारांनी परत दि.03/09/2010 रोजी वरिष्ठ मंडल प्रबंधक यांचेकडे तक्रार केल्यानंतर नांदेड एल.आय.सी.यांनी दि.15/09/2010 रोजी पॉलिसी विषयी पुढील कार्यवाहीस्तव आपला अर्ज भोकर शाखेकडे पाठविलेला आहे असे कळविले त्यानंतर दि.20/09/2010 रोजी वरिष्ठ मंडल प्रबंधक नांदेड यांच्या कार्यालयाने अर्जदारास आपल्या पॉलिसीची रक्कम देय केलेले आहे असे कळविले. गैरर्जदार यांनी दि.15/10/2010 रोजी अर्जदारास जमा रक्कमेचे विवरण इंग्रजी भाषेतून पाठवून दिले. गैरअर्जदाराने पाठविलेले जमा रक्कमेच्या विवरणावरुन अर्जदाराच्या असे निदर्शनास आले की, पॉलिसीचे एकुण हप्ते 74 महिने प्रिमीअम रु.509/- रु.मासीक हप्त्याप्रमाणे गैरअर्जदाराच्या कार्यालयाकडे रु.37,666/- भरण्यात आले होते. गैरअर्जदाराच्या कार्यालयाने अर्जदारास एकुण रक्कम रु.24,278/- कर्जासहीत अदा केले. उर्वरीत रक्कम रु.13,388/- अर्जदारास कमी आले म्हणुन अर्जदाराचे आर्थीक नुकसान झालेले आहे. अर्जदाराची मागणी आहे की, पॉलिसी क्र.983615636 रु.13,388/- मिळावेत अशी विनंती आहे. 2. गैरअर्जदार हे हजर झाले असून त्यांनी त्यांचा जाबाब दाखल केलेला आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने केलेली तक्रार ही बेकायदेशिर असून न्यायमंचात चालण्यास योग्य नाही. दि.17/03/2004 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे प्लॅन अण्ड टर्म 48/20/15 ही विमा पॉलिसी काढली व त्याचे हप्ते रु.509/- महिना हया प्रमाणे ठरले होते व अर्जदाराचे विमा पॉलिसीचे हप्ते बाबा साहेब मुखरे विद्यालय किनवट या शाळेतून कपात करण्यात येत होते हे बरोबर आहे. गैरअर्जदार हे मान्य करतात की, अर्जदार यांनी दि.05/03/2009 रोजी त्यांनी रु.15,000/- गैरअर्जदाराकडुन कर्ज उचलले होते हे मान्य आहे व तसेच अर्जदार यांनी दि.27/09/2009 पासुन ते 25/06/2010 पर्यंतचा व्याजाचा हप्ता भरलेला नाही?. अर्जदार यांनी दि.25/06/2010 रोजी त्यांची विमा पॉलिसी बंद केली हे म्हणणे खरे पण गैरअर्जदार यांनी कर्ज व त्यावरील व्याज कपात सरेंडर व्हॅल्यु प्रमाणे रु.8,273/- चा धनादेश अर्जदार यांना पाठविण्यात आला. अर्जदार यांनी एकुण 74 हप्ते 509 प्रतिमहिना प्रमाणे एकूण रु.37,666/- भरणा केलेले होते. अर्जदार यांनी पॉलिसी क्र. 283619689 व दुसरी पॉलिसी क्र. 983915631 ची माहीती मागीतली होती व ती त्यांना दिली होती. वारंवार विनंती करुनही रक्कम दिली नाही हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. अर्जदार यांनी पाठविलेले विवरण हे सत्य असून त्यात काही वाद नाही, अर्जदार यांनी रु.37,666/- एकुण हप्ते रु.74 महिना रु.509 रुपये प्रमाणे भरलेले आहे. परंतू या परीच्छेदामध्ये असे म्हटले आहे की, 24,278/- कर्जासह अदा केले आहे. व अर्जदाराचा पेडअप व्हॅल्यू रु.41,111/- असून त्यावर बोनस म्हणून रु.28,533.30 पैसे व एकुण रक्कम रु.69,644/- इतके होते. परंतु पॉलिसीच्या नियमाप्रमाणे सरेंडर व्हॅल्यूचा फॅक्टर 34.86 व पॉलिसी नियम क्र.7 प्रमाणे त्यांचे देय रक्कम एकूण रु.24,278/- रुपये व सरेंडर व्हॅल्यू फॅक्टर प्रमाणे होते त्यापैकी अर्जदाराने रु.15,000/- कर्ज घेतले होते त्यावरील व्याज 9 टक्के प्रमाणे लावण्यात आला व व्याजाची रक्कम रु.1,005/- इतकी व एकूण कर्जाची रक्कम रु.16,005/- झाली एकूण देय रक्कम रु.24,278/- मधून रु.16,005/- वजा जाता रु.8,273/- हे ‘सरेंडर व्हॅल्यु’ प्रमाणे देय आहे व पेड अप व्हॅल्यू रु.8,273/- चा धनादेश अर्जदारास दि.01/07/2010 रोजी मिळाला आहे. अर्जदाराचे म्हणणे की, उर्वरित रक्कम 13,388/- शिल्लक आहेत हे सुध्दा पुर्ण पणे चुकीचे आहे. कारण रु.13,388/- ‘पेड अप व्हॅल्यु’ नाही व शिल्लकही देय नाही. सदरील रक्कम देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. गैरअर्जदार यांनी पॉलिसीचे नियम क्र. 7 प्रमाणे पॉलिसीचे Surrender value and guaranted surrended value is less than special surrender value is calculated special surrender value whichever is more हया प्रकरणी रु.24,278/- देय आहे व अर्जदारास पॉलिसीचे नियम व अटी बंधनकारक असून गैरअर्जदार यांनी पॉलिसीचे नियम क्र.7 नुसार दिलेली आहे. त्यामुळे उर्वरित रु.13,388/- देणे बाकी आहे हे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदार यांनी पॉलिसीच्या नियमाप्रमाणे अर्जदारास पुर्ण रक्कम अदा केल्यामुळे त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर जे मुद्ये उपस्थित होतात ते मुद्ये व त्यावरील उत्तरे खालील प्रमाणे. मुद्ये. उत्तरे. 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय? होय. 2. अर्जदार त्यांनी केलेली मागणी पूर्ण करण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत काय? नाही. 3. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 4. अर्जदार यांने गैरअर्जदाराकडुन मार्च 2004 मध्ये 20 वर्ष मुदतीचे रु.1,00,000/- ची पॉलिसी क्र.983615636 घेतल्याची गैरअर्जदार यांनी मान्यच केलेले आहे व त्या पॉलिसी प्रित्यर्थ मासिक हप्ता रु.509/- चा अर्जदाराच्या मासिक वेतनातून श्री.बाबासाहेब मुखरे विद्यालय किनवट येथून कपात करण्यात येत असल्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, याबद्यल दुमत नाही. म्हणुन मुद्या क्र. 1 चे उत्तर होकारार्थीच देण्यात येत आहे. मुद्या क्र. 2 - 5. अर्जदाराने त्यांच्या अर्जातच परिच्छेद क्र. 2 मध्ये म्हटलेले आहे की, सदरील पॉलिसीवर त्यांनी माहे मार्च 2009 मध्ये रु.15,000/- चे कर्ज घेतले होते व कर्जाच्या व्याजाचा हप्ता म्हणुन रु.754/- प्रमाणे भरले होते. अर्जदाराचे परिच्छेद क्र. 3 मध्ये असेही म्हणणे आहे की, त्यानंतर त्यांनीच स्वतःहून माहे जून 2010 मध्ये ती पॉलिसी बंद केली. पॉलिसी बंद केल्यानंतर गैरअर्जदारांनी रु.8,272/- चा धनादेश क्र.00399242 दि.01/07/2010 चा मिळाल्याचेही कबुल केलेले आहे, याचा अर्थ असा की, अर्जदाराने सदरील चेक स्विकारते वेळेस कसलीही तक्रार केलेली नव्हती?. 6. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यातच सर्व गोष्टी स्वच्छ केलेल्या आहेत, त्यांचे लेखी म्हण्याचा परिच्छेद क्र. 7 मध्ये त्यांनी म्हटले आहे की, अर्जदाराचे पेडअप व्हॅल्यू रु.41,111/- असून त्यावर बोनस म्हणून रु.28,533.33 आहे म्हणजे रु.69,644 इतकी होते. गैरअर्जदारचे असेही म्हणणे आहे की, पॉलिसीच्या नियमानुसार “Surrender Value” चा फक्टर 34.86 व पॉलिसीमधील नियम क्र. 7 प्रमाणे त्यांची देय रक्कम एकुण रु.24,278/- ‘सरेंडर व्हॅल्यू’ फॅक्टरप्रमाणे होते. त्यांचे असेही म्हणणे आहे की, अर्जदाराने दि.06/03/2009 रोजी गैरअर्जदाराकडुन रु.15,000/- चे कर्ज घेतले व दि.27/09/2000 ते 25/06/2010 पर्यंत त्यावर 9 टक्के प्रमाणे व्याज लागले व व्याजाचा कालावधी 8 महीने 28 दिवस गृहीत धरण्यात आले होते व अशा प्रकारे एकुण व्याजाची रक्कम रु.1,005/- इतकी झाली. अशाप्रकारे कर्जाची एकुण रक्कम व्याजासहीत रु.16,005/- इतकी झाली. वर उल्लेख केल्याप्रमाणे सरेंडर व्हॅल्यू फॅक्टर प्रमाणे देय रक्कम रु.24,273/- होते, त्यामधुन कर्जाचे रु.16,005/- वजा केले असता सरेंडर व्हॅल्यू प्रमाणे देय रक्कम फक्त रु.8,273/- होते. अशा प्रकारे ‘पेडअप व्हॅल्यू’ रक्कम रुपये फक्त रु.8,273/- होत, ते गैरअर्जदारांनी अर्जदाराला धनादेशाद्वारे दिलेले आहे व अर्जदाराने ती रक्कम स्विकाल्याचे कबुल केले आहे. सदरील पेडअप व्हॅल्यू रक्कम रुद्य8,273/- चा धनादेशस अर्जदाराला दि.01/07/2010 रोजी मिळाला व त्यांनी तो तक्रार न करता स्विकारला.त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे की, आणखी रु.13,388/- शिल्लक राहतात हे पुर्णपणे चुकीचे आहे कारण रु.13,388/- हे पेडअप व्हॅल्यू होउच शकत नाही. त्यामुळे ती रक्कम अर्जदाराला देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. 7. गैरअर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, अर्जदाराने स्वतःहून दि.25/06/2010 रोजी ती पॉलिसी बंद करण्याचा अर्ज दिला व त्यानुसार त्यांनी पॉलिसी पेडअप डिस्चार्जवर सही केली ती सही जयंत कोतावार यांच्या समोर करुन सदरील सरेंडर व्हल्यूप्रमाणे रु.8,273/- चा धनादेश दि.01/07/2010 रोजी स्विकारले आहे, अशाप्रकारे सरेंडर व्हॅल्यू फॅक्टर विषयीची माहिती अर्जदाराला त्याच वेळी झाली होती व त्यामुळेच त्यांनी डिस्चार्ज व्हाऊचरवर विना तक्रार सही केली होती. 8. गैरअर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, जेंव्हा अर्जदाराने पॉलिसी घेण्याच्या वेळी प्रस्ताव अर्ज सादर केला त्या वेळी त्यांना पॉलिसी विषयीची संपुर्ण अटी, नियम मान्य केले होते, वरील नियम व अटी त्यांच्यावर बंधनकारक राहतील. पॉलिसीचे नियम क्र.7 Surrender value and guaranteed surrender value is less than special surrender value is calculated special surrender value whichever is more या नियमाप्रमाणे रु.24,278 च फक्त देय होते त्यामधून कर्जाची रक्कम वजा केली तर निव्वळ देय रक्कम फक्त रु.8,273/- रुपयेच होतात व ती रक्कम अर्जदाराने धनादेशाद्वारे स्विकारली आहे. त्यामुळे आता गैरअर्जदार सदरील रु.13,388/- देय लागतो हे म्हणणे सपसेल चुकीचे आहे. 9. एकंदरीत कागदपत्रावरुन असे दिसते की, अर्जदाराने काही तरी गैर समजाने ही केस दाखल केलेली असवी. एकंदतरी कागदपत्रावरुन असे दिसते की, अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडुन रु.13,388/- येणे आहेत, हे सिध्द करु शकले नाही. गैरअर्जदार यांनी सन्माननीय राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली, यांनी दिलेल्या I (1996) सी.पी.जे. 159, (एन.सी)एल.आय.सी. विरुध्द अनिल पी. ताडकलकर या केसचा निकालाची झेरॉक्स प्रत दाखल केली. सदरील रिट पिटीशन63/1994 निकाली काढते वेळेस सन्माननीय राष्ट्रीय आयोगांने असे लिहीले आहे की, “Moreover, we have not been able to understand how the complainant can claim refund of all the the premia paid by him during the period of the policies remained alive and LIC had covered the risk. If during this period the complainant had died (an event which did not occur) the insurer i.e. LIC would have had to pay the full amount due under the polices even though only some faction of the premia would have been realized by that time by the insurer. Hence on canceling the polices the complainant is only entitled to the surrender values of the two polices. It is immaterial what circumstances prompted him to cancel the polices.” वरील प्रमाणे ऑबझर्वेशन करुन त्या केस मधील मा.राज्य आयोगाचा निकाल व अर्जदाराचे मुळ फिर्याद ही रद्यबातल ठरवीली आहे. प्रस्तुत प्रकरण मध्ये देखील सरेंडर व्हॅल्यूची रक्कम अर्जदाराला धनादेशाद्वारे यापुर्वीच मिळालेली असल्यामुळे आता त्यांना कोणतीही रक्कम गैरअर्जदाराकडुन मागता येणार नाही. 10. गैरअर्जदारा तर्फे मा.राष्ट्रीय आयोगाचा निकालाचा इतरही केस मधील झेरॉक्स प्रती दाखल केली जी वरील निकालाशी पुरक आहे. सदरील इतर केसचा निकाल I(1996) CPJ69 (NC) 83,Brach manager, LIC of India and another Vs A.Paulraj , या केस मध्ये We, therefore, find that the State Commission has erred in construing the cash value to be the same as the accrued bonus, even when paid before the maturity. We therefore, accept this appeal and set aside the order of the DF and State Commission and dismiss the complaint. We hold that the surrender value as shown in the calculation sheet and for which the cheque of Rs.2,927.40 was sent to the insured is correct.” मा.राष्ट्रीय आयोगाचा वरील दोन्ही निकालावरुन असे सिध्द होते की, अर्जदार हा सरेंडर व्हॅल्यू च्या रक्कमेच्या व्यतिरिक्त इतर रक्कम मागू शकणार नाही कारण पॉलिसी मॅच्युअर झालेली नाही व अर्जदार यांनीच पॉलिसी अल्पावधीत बंद केलेली होती? वरील सर्व कथनावरुन प्रस्तुत अर्जदार गैरअर्जदाराकडुन सदरील रक्कम रु.13,388/- अथवा अतिरीक्त रक्कम मागण्यास हक्कदार नाही, असे या मंचाचे मत आहे. 11. वरील कारणावरुन अर्जदाराचा अर्ज खारीज करण्या योग्य आहे. वर म्हटल्याप्रमाणे अर्जदाराने ही तक्रार गैर समजापोटी दाखल केलेले दिसते. त्यामुळे त्यांच्यावर खर्चाचा बोजा बसवीणे उचित नाही, असे आमचे मत झाले आहे. वरील सर्व कारणावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात येते. 2. या तक्रारीचा खर्च पक्षकारांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |