निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 04/15/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 11/10/2010 तक्रार निकाल दिनांकः- 05/03/2011 कालावधी 04 महिने 22 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. विजयालक्ष्मी भ्र.गौतम कांबळे. अर्जदार वय 35 वर्षे.धंदा घरकाम. अड.डि.यु.दराडे. रा.व्दारा कजबे दत्तात्रय माणिकराव विकास नगर.कारेगाव रोड.परभणी. विरुध्द 1 भारतीय जीवन विमा निगम लि. गैरअर्जदार. तर्फे शाखा अधिकारी.हिंगोली. अड.आय.एम.शेख. हया दाव्यातील नोटीस करीता शाखा अधिकारी. जिवन ज्योती.नेहरु रोड.परभणी. 2 मुख्याध्यापक. मधुमती विद्यालय लाख. ता.औंढा जि.हिंगोली. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) पॉलिसी होल्डरच्या मृत्यू नंतर अर्जदार वारस पत्नीस पॉलिसीच्या रक्कमा देण्याच्या बाबतीत केलेल्या सेवात्रुटीची दाद मिळण्यासाठी प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदाराचा मयत पती गौतम नागोराव कांबळे हा औंढा जिल्हा हिंगोली येथे माध्यमिक शाळेत कनिष्ठ प्राध्यापक म्हणून नोकरी करीत असतांना त्याने त्याच्या हयातीत गैरअर्जदार महामंडळाच्या 4 आयुर्विमा पॉलिसी घेतल्या होत्या त्याचे हप्ते दरमहाच्या पगारातून गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या मार्फत कपात होवुन गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाठविले जात होते.पॉलिसी होल्डर गौतम कांबळे यांचा मृत्यू दिनांक 20/11/2008 रोजी झाला तो पर्यंत त्याचे हप्ते गैरअर्जदार क्रमांक 1 कडे वर्ग झाले होते.पतीच्या मृत्यू नंतर अर्जदाराने पॉलिसीच्या रक्कमा मिळण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे प्रस्ताव दाखल केल्यावर 1) रु.1,00,000/- ची पॉलिसी क्रमांक 983681234 पोटी फक्त रु.31,560/- दिले. 2) रु. 50,000/- ची पॉलिसी क्रमांक 983681238 पोटी फक्त 8,730/- दिले. 3) रु.1,00,000/- ची पॉलिसी क्रमांक 983572610 पोटी फक्त 1,19,621/- दिले. 4) रु.5,00,000/- ची पॉलिसी क्रमांक 982950982 पोटी फक्त 39,372/- दिले.अर्जदाराचे म्हणणे असे की, सर्व पॉलिसी एप्रिल 2004 पूर्वीच घेतलेल्या होत्या त्यामुळे पॉलिसीची पूर्ण रक्कम त्यांना बोनससह मिळायला पाहिजे. त्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे चौकशी केली असता वरील पॉलिसी पैकी क्रमांक 1 ते 3 चे हप्ते गैरअर्जदार क्रमांक 2 कडून मिळाले नव्हते असे 28/05/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ने कळविले. या संदर्भात अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे समक्ष भेटून चौकशी केली असता जुलै 2008 ते नोव्हेंबर 08 पर्यंत दरमहा रु.1167/- गैरअर्जदार यांनी कपात केली असल्याचे दिसले. अर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, गैरअर्जदार 1 यांना विम्याचे हप्ते मिळाले नाही त्या बद्दलची कसलीही पूर्व सुचना अगर नोटीस त्यांनी दिली नव्हती 3 वर्षां पेक्षा जास्त कालावधीचे हप्ते भरलेले होते व न भरलेल्या हप्त्यांची संख्या 5 पेक्षा जास्त नसल्यामुळे पॉलिसी बंद धरली जात नाही.तीची पूर्ण रक्कम मिळाली पाहिजे, परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी फक्त सरेंडर व्हॅल्यु इतकीच रक्कम देवुन आर्थिक नुकसान केले व मानसिकत्रास दिला आहे.म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन पॉलिसीच्या रिस्क प्रमाणे पूर्ण रक्कम बोनससह मिळावी व 20/11/2008 पासून त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज मिळावे आणि तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- आणि मानिकसत्रासापोटी रु.5,000/- मिळावे अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत एल.आय.सी.चे 28/05/2010 चे पत्र जुलै 2008 ते नोव्हेंबर 2008 पर्यंतचे पगारपत्रक आणि 4 ही पॉलिसींचे स्टेटस् रिपोर्टस् दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने तारीख 06/12/010 रोजी लेखी जबाब ( नि.11) आणि गैरअर्जदार क्रमांक 2 ने तारीख 19/11/2010 रोजी लेखी जबाब ( नि.8) दाखल केला आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपल्या लेखी जबाबात ( नि.11) तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन त्याचे विरुध्द तक्रार करण्यास कसलेही कायदेशिर कारण घडलेले नाही. तक्रार अर्जातील मजकूर साफ खोटा असल्याने तक्रार फेटाळण्यात यावी.असा आक्षेप घेतलेला आहे.त्यांचे पुढे म्हणणे असे की, अर्जदाराने घेतलेल्या पॉलिसी क्रमांक 982950982 बिमाकिरण पॉलिसी सोडून इतर 3 पॉलिसीचे हप्ते फक्त नोव्हेंबर 2007 पर्यंतचेच जमा झाले आहेत.पॉलिसी क्रमांक 983671238 मध्ये विमेदाराच्या मृत्यू पर्यंत 11 हप्ते थकीत होते. त्यामुळे पेडअप रक्कम रु.8,730/- अर्जदाराला दिली आहे.पॉलिसी क्रमांक 983572610 पोटी पॉलिसी होल्डरने कर्ज उचललेले असल्यामुळे कर्जाची रक्कम व्याज व थकीत हप्ते वजा करुन बोनस सहीत एकुण रु.1,19621/- दिली आहे.बिमाकिरण पॉलिसी क्रमांक 982950982 चे सप्टेंबर 2007 पर्यंतचे सहामाही हप्ते मिळाले होते म्हणून त्याची पेडअप रक्कम रु. 39,372/- दिली आहे.जिवन आनंद पॉलिसी क्रमांक 983681234 चे 11 हप्ते थकीत होते. त्यामुळे त्याचे पेडअप रक्कम रु.31,560/- दिली आहे.ज्या पॉलिसीला 5 वर्ष पूर्ण झाले नसतील तीला एका वर्षाची सुट मिळत नाही.अर्जदाराला दिलेली रक्कम तीने फुल अँड फायनल सेटलमेंट म्हणून स्वीकारलेली आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 ने पॉलिसीची रक्कम देण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी केलेली नाही.सबब तक्रार अर्ज रु.5,000/- च्या कॉंम्पेन्सेटरीकॉस्टसह फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र (नि.12) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.16 लगत 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्या लेखी जबाबात (नि.8) लेखी जबाबात गैरअर्जदार क्रमांक 1 चे ते एजंट आहे हा तक्रार अर्जातील मजकूर साफ नाकारला आहे.मयत गौतम कांबळे यांने घेतलेल्या पॉलिसी बद्दल असा खुलासा केला आहे की, रु.5,00,000/- ची पॉलिसी क्रमांक 982950982 हिचे हप्ते मासिक वेतनातून जात नव्हते मात्र इतर 3 पॉलिसीचे हप्ते मासिक पगारातून कपात केले जात होते. मयत गौतम कांबळे हा तारीख 05/01/2008 ते 30/06/2008 या कालावधीत विनावेतन रजेवर होता त्यामुळे त्या कालावधीतील तीन पॉलिसीच्या दरमहाच्या हप्त्यांची कपात करण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 2 ची नव्हती. गौतम कांबळे 01/07/2008 रोजी सेवेत रुजू झाला. शिक्षण अधिकारी यांनी तारीख 15/09/2008 रोजी शिक्षण उपसंचालक यांनी मान्यता दिल्यानंतर जुलै 2008 ते सप्टेंबर 2008 चे पगार ऑक्टोबर 2008 मध्ये अदा केले. एल.आय.सी. कडून प्राप्त झालेल्या स्लीप मध्ये अर्जदाराच्या पॉलिसीच्या हप्त्यांचा उल्लेख नव्हता त्यामुळे पॉलिसी होल्डरने एल.आय.सी.कडे चौकशी केली असता डिसेंबर 2007 पासून पॉलिसी बंद पडली असल्याचे कळाले त्या चालू करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करुन प्रमाणपत्र द्यावे लागेल असे सांगितले. म्हणून कर्मचारी कांबळे यांने कपातीची रक्कम परत मिळावी अशी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे मागणी केली त्याप्रमाणे त्यांना रु. 8,001/- परत केले.अर्जदाराला पॉलिसी क्रमांक 983572610 ची पूर्ण रक्कम एल.आय.सी. कडून मिळाली असतांनाही तीने त्याबाबत तक्रार करणे योग्य नाही.अर्जदाराने पॉलिसी पोटी रक्कम स्वीकारल्या नंतर दोन वर्षांनी प्रस्तुतची खोडसाडपणे तक्रार केली आहे.त्याबाबत तीला दंड आकारुन तक्रार खारीज करावी.अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 2 चे शपथपत्र नि.9 आणि पुराव्यातील कागदपत्र नि.10 लगत एकुण 17 कागदपत्रे तसेच नि.23 लगत 7 कागद पत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड.दराडे आणि गैरअर्जदार तर्फे अड.आय.एम.शेख. यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या मयत पतीने त्याच्या हयातीत घेतलेलया आयुर्विमा पॉलिसी क्रमांक 1) 982950982 2) 983572610 3) 983681234 व 4) 983681238 च्या मृत्यू दाव्याच्या रक्कमा कमी देवुन सेवात्रुटी केली आहे काय ? नाही. 2 निर्णय ? अंतिम आदेशा पमाणे.
कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2. अर्जदाराचा पती मयत गौतम नागोराव कांबळे माध्यमिक विद्यालयात कनिष्ठ प्राध्यापक म्हणून नोकरीस असतांना त्याच्या हयातीत मार्च 2002 ते एप्रिल 2004 या काळात गैरअर्जदार क्रमांक 1 एल. आय. सी. च्या एकुण 4 आयुर्विमा पॉलिसी पगार बचत योजने खाली घेतलेल्या होत्या असे तक्रार अर्जात तीने नमुद केलेले आहे, परंतु निशानी 3 लगत दाखल केलेल्या पॉलिसी स्टेटस् रिपोर्टस् ( नि.4/3 सी.) पाहता पॉलिसी क्रमांक 982950982 ही रु. 5,00,000/- ची 20 वर्ष मुदतीची पॉलिसी पगार योजने खालील नसुन तीचा हप्ता सहामाही असल्याचे दिसते.सदरची पॉलिसी 28/03/2002 रोजी चालु केलेली असुन अंतिम मुदत ( परिपक्व तारीख) मार्च 2028 अखेर असल्याचे दिसते.पॉलिसी सुरु झाल्यावर तीचे सप्टेंबर 2007 पर्यंतचे हप्ते गैरअर्जदार क्रमांक 1 कडे जमा झालेले होते ही अडमिटेड फॅक्ट आहे. विमेदाराचा मृत्यू तारीख 20/11/2008 आजारपणामुळे झाला होता ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे प्रकरणात सदर पॉलिसीची छायाप्रत पुराव्यात ( नि.21/3) दाखल केलेली आहे त्यातील पॉलिसी कंडीशन क्रमांक 4 नॉन फॉरफ्युचर रेग्युलेशन नुसार गैरअर्जदार कमांक 1 ने या पॉलिसी पोटी जे रु.39,372/- दिलेले आहेत त्याचे कारण पॉलिसीचा सप्टेंबर 2007 चा हप्ता न भरल्यामुळे ती लॅप्स झाली होती तथा बंद पडलेली होती पॉलिसीचा त्यानंतरचा सहामाही हप्ता मार्च 2008 मध्ये भरावयाचा होता तो ही हप्ता व त्यानंतर 20/11/2008 रोजी मृत्यू पर्यंतचे हप्ते देखील पॉलिसी होल्डरने भरलेले नव्हते.पॉलिसी बंद स्थितीत असल्यामुळे पॉलिसी होल्डरने ती पुनर्जिवीत ( Revive ) करण्याचाही प्रयत्न केलेला नव्हता त्याबाबत एल.आय.सी.कडे आवश्यक त्या कागदपत्रांची व व्याजासह थकीत हप्ते भरलेले नसल्यामुळे विमेदाराच्या मृत्यू नंतर पॉलिसी कंडीशन प्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास जी रु.39,372/- पेडअप व्हॅल्यु दिलेले आहे ती नियमानुसार दिलेली असून ती कमी दिली ही अर्जदाराची तक्रार चुकीची आहे या बाबतीत गैरअर्जदार क्रमांक 1 एल.आय.सी.कडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही. उरलेल्या तीन पॉलिसी बाबत निर्णय देतांना (1) पॉलिसी क्रमांक 983572610 (2) पॉलिसी क्रमांक 983681234 (3) पॉलिसी क्रमांक 983681238 या तिन्ही पॉलिसी सॅलेरी सेव्हींग तथा पगार बचत योजने खालील होत्या व वरील तिन्ही पॉलिसींचे दरमहाचे हप्ते गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत विमेदार मयत गौतम कांबळे याच्या दरमहाच्या पगारातून गैरअर्जदार क्रमांक 2 कडे परस्पर पाठवले जात होते ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे. वरील पॉलिसी पैकी मार्च 02 मध्ये सुरु केलेली 983572610 ही पॉलिसी (नि.21/2) विमा रक्कम रु.1,00,000/- तीचा मासिक हप्ता रु.429/- तीचे नोव्हेंबर 07 पर्यंतचे हप्ते गैरअर्जदार 1 कडे जमा झालेले होते हे नि.21 A वरील लेखी युक्तिवाद मध्ये मान्य केलेले आहे.विमेदारने या पॉलिसीवर कर्ज उचललेले होते त्या कर्जाची थकबाकी आणि मृत्यू पर्यंतचे न भरलेले हप्ते कपात करुन अर्जदाराला पॉलिसीची अट क्रमांक 4 मधील Notwithstanding प्रोव्हीजो 2 प्रमाणे 5 वर्षाचे हप्ते एल.आय.सी.कडे जमा झालेले होते त्यामुळे पॉलिसीची रक्कम बोनससह नि.16/4 वरील पावती प्रमाणे एकुण रु 1,19,621/- दिलेले होते.ते नियम अटी प्रमाणे मिळालेले असून त्या बद्दल वाद राहिलेला नाही असे अर्जदार तर्फे अड.दराडे यांनी युक्तिवादाच्या वेळी मंचासमोर निवेदन केलेले असल्यामुळे वरीले पॉलिसी पोटी अर्जदारला मिळालेली रक्कम योग्य व बरोबर तथा ( Undisputed) असल्याने तीचा प्रश्न मिटला आहे. पॉलिसी क्रमांक 983681234 (नि.21/1) जिवन आनंद विमा पॉलिसी रक्कम रु.1,00,000/- असून ती एप्रिल 04 मध्ये सुरु केलेली असून तिचा मासिक हप्ता रु.481/- होता तसेच पॉलिसी क्रमांक 983681238 ( नि.21/4) जिवनसाथी विमा पॉलिसी रक्कम 50,000/- असून ती देखील एप्रिल 04 मध्ये सुरु केलेली आहे तिचा मासिक हप्ता 257/- रु.होता वरील दोन्ही पॉलिसींचे माहे नोव्हेंबर 2007 पर्यंतचे दरमहाचे हप्ते गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे जमा झालेले होते असे गैरअर्जदार क्रमांक 1 ने नि.21- A वरील लेखी युक्तिवादात मान्य केलेले आहे.वरील दोन्ही पॉलिसी पोटी गैरअर्जदार क्रमांक 1 याने अर्जदाराला अनुक्रमें नि.16/13 पावती प्रमाणे रु.31,560/- आणि नि.16/10 वरील पावती प्रमाणे रु.8,730/- पेडअप रक्कमा दिलेल्या आहेत. पॉलिसी क्रमांक 983681238 पोटी एल.आय.सी.ने बोनस न देता फक्त् पेडअप व्हॅल्यु का दिली आहे याचे स्पष्टीकरण लेखी जबाबात दिलेले नाही व युक्तिवादाच्या वेळीही अड.शेख यांनी सांगितलेले नाही तरी परंतु अर्जदाराने सर्व पॉलिसी पोटी रक्कमा विना हरकत घेतलेल्या असल्यामुळे त्याबाबत दिर्घ कालावधी नंतर या बाबत वाद उपस्थित करता येणार नाही. मयत गौतम कांबळे हा माहे जानेवारी 08 ते जुन 08 या कालावधीत विनावेतन रजेवर असल्यामुळे त्याचा सहा महिन्याचा पगार निघाला नव्हता हे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पुराव्यात नि.23/3 वरील हजेरी पट व त्या कालावधीतील कर्मचा-यांच्या पगार कपाती संबंधी एल. आय. सी. ने गैरअर्जदार क्रमांक 2 यांना पाठवलेली यादी या कागदपत्रातून लक्षात येते. पुराव्यात दाखल केलेल्या अनुक्रमें नि.16/1, नि.16/4, नि.16/10 आणि नि.16/13 वरील डिस्चार्ज व्हाऊचर प्रमाणे संपूर्ण हक्क पूर्तीपोटी तथा फुल अँड फायनल सेटलमेंट म्हणून स्वीकारलेल्या असल्यामुळे व रक्कमा स्वीकारल्यानंतर त्याबाबत कसलाही आक्षेप घेतला नसल्याने किंवा त्या अंडर प्रोटेस्ट घेतले आहे असेही एल. आय. सी. ला कळवले नसल्यामुळे दिर्घ काळानंतर पुन्हा प्रस्तुतच्या प्रकरणाव्दारे ग्राहक मंचात जो वाद उपस्थित केलेला आहे तो करता येणार नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे या संदर्भात रिपोर्टेड केस 2008 (2) सी. पी. आर. ( राष्ट्रीय आयोग ) तसेच रिपोर्टेड केस 2001 (1) सी. पी. सी. पान 279 तसेच अपील क्रमांक 4492/2000 एल. आय.सी. विरुध्द श्रीमती सिंधू या केसलॉचा आधार घेतलेला आहे, त्यामध्ये वरिष्ठ न्यायालयांनी व्यक्त केलेली मते अर्जदाराच्या प्रस्तुत तक्रार अर्जासही तंतोतंत लागु पडतात.अर्जदार सुशिक्षीत आहे तीला तीच्या मयत पतीच्या निधना नतर एल.आय.सी.कडून तक्रार अर्जात नमुद केलेल्या पॉलिसी पोटी दिलेल्या रक्कमा कमी आहेत किंवा नियमानुसार नाही हे लक्षात आल्यानंतर तीने त्याबाबत लगेच तातडीने गैरअर्जदाराकडे तशी हरकत घेणे गरजेचे होते त्यासंबंधीचा कसलाही ठोस पुरावा मंचापुढे दाखल केलेला नसल्यामुळे एल.आय.सी.कडून स्वीकारलेली रक्कम पावतीमध्ये नमुद केले प्रमाणे संपूर्ण हक्कपूर्तीपोटी रक्कम स्वीकारली होती हे नि.16/1, नि.16/4 व नि.16/10 व नि.16/13 वरील रेव्हेन्युस्टँप पावतीवर सही करुन मान्य व कबुल केल्यामुळे तीला आता कसलाही हक्क राहिलेला नाही. सबब,मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |