उपस्थिती तक्रारकर्ती तर्फे ऍड.एस.बी.राजनकर
विरुध्द पक्षा तर्फे ऍड. सी.एन.तेलंग.
( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती आर.डी.कुंडले)
-- निकालपत्र --
( पारित दि. 27 एप्रिल 2012)
तक्रार विमा पॉलिसीचा दुहेरी हित-लाभ मिळण्याबाबत दाखल आहे.
1 तक्रार थोडक्यात
या प्रकरणात दोन्ही पक्षांनी हे मान्य केले आहे की, मृतक इन्श्युअर्ड अमरलाल जैतलाल मच्छिरके यांनी जीवनसाथी Double Cover Joint Life Plan/ with Profit/ With Accident Benefit अशी पॉलिसी नं. 975225079 रुपये 50,000/- गोंदिया येथून घेतली आहे. त्याचा कालावधी 28/12/2006 ते 28/12/2026 आहे. या पॉलिसीचे स्वरुप, पती पत्नी दोघांपैकी कोणाचाही "अपघाती मृत्यु" झाल्यास दुस-याला विमा रक्कम रुपये 50,000/- +अपघाताचा दुहेरी हित-लाभ रुपये 50,000/- मिळेल.+लाभ म्हणजेच जिवंत असणा-याच्या नांवे पॉलिसी सुरु राहील अशी आहे.
2 दिनांक 28/09/2008 रोजी सकाळी 11.30 वाजता इन्श्युअर्ड अमरलाल जैतलाल मच्छिरके पुणे येथील दुस-या मजल्यावर किचन टेरेसवर भिंतीला खाचा मारण्याचे काम करीत असतांना तोल जाऊन खाली पडला. त्याला त्वरित दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेची चौकशी करुन ‘अपघाती मृत्यु ’ म्हणून पुणे येथील उप-विभागीय दंडाधिकारी समोर समरी दाखल केली. त्यांनी दि. 9/8/2010 रोजी "मृत्युचे कारण" "शरीरास झालेल्या जखमांमुळे अपघाती मृत्यु" असे दिले आहे. दि. 28/09/2008 रोजीच्या शवविच्छेदन अहवालात मृत्युचे कारण अनेक जखमांमुळे (multiple injuries) असे दिले आहे.
3 तक्रारकर्तीने मुळ विमा पॉलिसी अंतर्गत रक्कम रुपये 50,000/- + अपघाताचे दुहेरी हित- लाभाची रक्कम रुपये 50,000/- असे एकूण 1,00,000/- रुपये मिळण्याबद्दल विरुध्द पक्ष इन्श्युरन्स कंपनीकडे संपूर्ण कागदपत्रांसहित दावा दाखल केला.
4 7 मे 2011 च्या पत्रान्वये विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला मुळ विमीत रक्कम रुपये50,000/- प्रदान केले व उर्वरित दुहेरी हित-लाभाची रक्कम कार्यालयीन औपचारिकता पूर्ण केल्यावर लवकरच देण्याचे तोंडी मान्य केले.
5 दि. 5.5.2011 रोजी विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला पत्र पाठवून उपरोक्त पॉलिसी पुढे सुरु राहील असे म्हटले आहे. यातच तक्रारकर्तीला पूर्ण विमीत रक्कम प्रदान केल्याचे म्हटले आहे.
6 उर्वरित दुहेरी हित-लाभाची रक्कम रुपये 50,000/- मिळण्याबद्दल तक्रारकर्तीने विरुध्द पक्षांना अनेक वेळा विनंती केली परंतु प्रकरण वरिष्ठांकडे विचारार्थ पाठविले आहे असे तिला तोंडी सांगितले.
7 डिसेंबर 2011 मध्ये तक्रारकर्तीला विरुध्द पक्षाने तोंडी सांगितले की, दुहेरी हित-लाभाची रक्कम मिळण्यास तक्रारकर्ती पात्र ठरत नाही. म्हणून तक्रारकर्तीनुसार तक्रारीस कारण डिसेंबर 2011 मध्ये जेव्हा विरुध्द पक्षाने दुहेरी हित-लाभाचे रुपये 50,000/- देण्याचे नाकारले तेव्हा घडले.
8 हीच गोष्ट विरुध्द पक्षाच्या ‘ सेवेतील त्रृटी ’ ठरते असे तक्रारकर्ती म्हणते.
9 तक्रारकर्तीची प्रार्थना
1. विरुध्द पक्षाच्या ‘ सेवेत त्रृटी ’ आहे असे जाहीर करावे.
2. रुपये 50,000/- अपघाताची दुहेरी हित-लाभाची रक्कम विरुध्द पक्षाने
12%व्याजासह इन्श्युअर्डच्या मृत्युच्या तारखेपासून (दि. 28/09/2008) द्यावे असा
आदेश व्हावा.
3. शारीरिक, मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- मिळावे.
4. तक्रार खर्च रुपये 5000/- मिळावा.
10 तक्रारकर्तीने तक्रारी सोबत 12 दस्त दाखल केले आहेत. सोबत केस लॉ दाखल केला आहे.
विरुध्द पक्षाच्या उत्तरानुसार
11 पॉलिसीचे स्वरुप, कालावधी, फायदे इत्यादी मान्य. ही पॉलिसी दि. 28/12/2026 पर्यंत म्हणजेच 20 वर्षापर्यंत सुरु राहणार आहे. पती-पत्नी दोघेही योजनेतील लाभासाठी पात्र आहेत. दोघांपैकी कोणाचाही अपघाती मृत्यु झाल्यास जिवंत असणा-या साथीदाराला मुळ रक्कम रुपये 50,000/- + अपघाताची दुहेरी हित-लाभाची रक्कम रुपये 50,000/- असे एकूण रुपये 1,00,000/- देय ठरतात व नंतरही पॉलिसी "Fully paid up policy" म्हणून दि. 28/12/2026 पर्यंत सुरु राहील.
12 इन्श्युअर्ड अमरलालचा मृत्यु दि. 28/09/2008 रोजी पुणे येथे किचन टेरेसवर भिंतीला खाचा मारण्याचे काम करीत असतांना दुस-या मजल्यावरुन पडून ‘‘ अपघाताने ’’ झाला ही बाब विरुध्द पक्ष मान्य करतात.
13 Post-mortem रिपोर्ट मध्ये पोटातील पदार्थांच्या नमुन्यात "Abnormal smell perceived" असे नमूद आहे असे विरुध्द पक्ष म्हणतात.
14 Post-mortem रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण " Multiple injuries " असे नमूद आहे हे विरुध्द पक्ष मान्य करतात.
15 तक्रारकर्तीला मुळ दावा रक्कम रुपये 50,000/- प्रदान केली आहे. परंतु अपघाताचा दुहेरी हित-लाभ रुपये 50,000/- मिळण्यास पात्र ठरण्यासाठी पॉलिसीच्या अटी व शर्तीचे पालन आवश्यक ठरते ते झालेले नाही असे विरुध्द पक्ष म्हणतात.
16 मृतक इन्श्युअर्ड अमरलालचा मृत्यु पॉलिसी घेतल्यानंतर 1 वर्ष 9 महिन्यात झाला. म्हणून नियमाप्रमाणे तपास केल्यानंतर तक्रारकर्तीला ताबडतोब मुळ दावा रुपये 50,000/- दि. 07/05/2011 रोजीच्या पत्रान्वये दिला. तक्रारकर्तीने त्याबद्दल तिला "संपूर्ण अंतिम रक्कम" प्राप्त झाल्याबद्दल Discharge Voucher भरुन दिले आहे.
17 विरुध्द पक्ष ही बाब अमान्य करतात की, त्यांनी उर्वरित दुहेरी हित-लाभाची रक्कम रुपये50,000/- नंतर देण्याचे मान्य केले.
18 दि. 7.5.2011 रोजीच्या पत्रात दुहेरी हित-लाभ मिळण्यास तक्रारकर्ती पात्र ठरते किंवा नाही हे ठरविण्यासाठी "केमिकल रिपोर्ट" सादर करण्यास तक्रारकर्तीला सांगितले होते. डिसेंबर 2011 मध्ये केमिकल रिपोर्ट विरुध्द पक्षाला प्राप्त झाल्यानंतर व तो तपासल्यानंतर
तक्रारकर्तीला कळविण्यात आले की, ती दुहेरी हित-लाभ मिळण्यास पात्र ठरत नाही. कारण Accident Benefit Clause No. 10 (b) (i) नुसार मृतक इन्श्युअर्ड नशेमध्ये असल्याने अपघातास व मृत्युस तो स्वतःच कारणीभूत होता म्हणून विरुध्द पक्ष अपघाताचा दुहेरी हित-लाभ देण्यास बाध्य ठरत नाही.
19 पुढे विरुध्द पक्ष म्हणतात की, केमिकल रिपोर्टमधील परिक्षणात मृतक इन्श्युअर्डच्या लिव्हर, किडनी, स्प्लीन व रक्तात इथाईल अल्कोहोलचे प्रमाणे आढळल्याचे नमूद आहे. रक्तात 50 mg ते 150 mg इथाईल अल्कोहोल आढळल्यास माणसाचा तोल जातो असे तज्ञ म्हणतात. मृतक इन्श्युअर्डच्या रक्तात 145 mg per 100 millitre इतके प्रमाण आढळले. तो बिल्डींगच्या दुस-या मजल्यावर काम करीत होता. नशेत असल्यामुळे त्याचा तोल गेला व तो खाली पडला आणि मरण पावला. अशा परिस्थितीत पॉलिसी अट 10 (b) (i)नुसार वि.प. अपघाताचा दुहेरी हित-लाभ देण्यास बाध्य ठरत नाहीत.
20 विरुध्द पक्षाने नियमानुसार तक्रारकर्तीला दुहेरी हित-लाभ नाकारला याला सेवेतील त्रृटी ठरविता येणार नाही.
21 पॉलिसी करार हा दोन्ही पक्षांना बंधनकारक असतांना कराराबाहेर जाऊन तक्रारकर्तीला लाभ देता येणार नाही.
22 तक्रारीत तथ्य नसल्यामुळे व तक्रारीस कारण घडले नसल्याने खारीज करण्याची विनंती विरुध्द पक्ष करतात.
23 विरुध्द पक्षाने तक्रारी सोबत एकूण 8 दस्त व 2 साहित्याबद्दलचे दस्त जोडले आहे.
24 मंचाने दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला व रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली.
मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष
25 तक्रारकर्तीनुसार, ती पॉलिसी अंतर्गत दुहेरी हित-लाभास (DAB) पात्र ठरते कारण इन्श्युअर्डचा मृत्यु अपघाताने झाला आणि पॉलिसी करारानुसार “अपघाती मृत्यु ” आल्यास दुहेरी हित-लाभ देय ठरतो.
26 विरुध्द पक्षाने इन्श्युअर्डचा मृत्यु अपघाताने झाला हे मान्य केले असले तरी या अपघातास स्वतः इन्श्युअर्ड जबाबदार होता. कारण तो नशेत होता म्हणून त्याचा तोल गेला व तो
दुस-या मजल्यावरुन खाली पडला व मरण पावला. केमिकल रिपोर्टमधील रक्तामध्ये इथाईल अल्कोहलच्या प्रमाणावरुन हे सिध्द होते. म्हणून पॉलिसीच्या अपवाद Clause No. 10 (b) (i) अन्वये तक्रारकर्ती हित-लाभास पात्र ठरत नाही.
27 मृतक इन्श्युअर्डचा मृत्यु कशाने झाला हे तपासण्यासाठी मंचाने या संदर्भात दोन्ही पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे तपासली.
28 दि. 7.5.2011 च्या पत्रान्वये विरुध्द पक्षाने मुळ दावा रुपये 50,000/- तक्रारकर्तीला दिला व दुहेरी हित-लाभ मिळण्याच्या संदर्भात केमिकल रिपोर्टची मागणी केली. दि. 20/12/2008 चा केमिकल रिपोर्ट रेकॉर्डवर आहे. त्यात खालीलप्रमाणे नमूद आहे की,....
281) Viscera in a bottle labeled - Stomach small intestine. With contents.
2) Viscera in a bottle labeled - Liver, Spleen, Kidney,
3) Blood in a bottle labeled - Blood
Exhibit Nos. (1) to (3) are also labeled as Amar Jaitlal Macchirake , M
C.M.No. 3954
Results of Analysis
Exhibit Nos. (1) and (2) contain 115 mgs and 87 mgs of ethyl alcohol per 100 grams respectively,---
Exhibit No. (3) contains 145 mgs of ethyl alcohol per 100 milliliters
29 विरुध्द पक्षाच्या वकिलानी जोरदार प्रतिपादन केले की, उपरोक्त केमिकल रिपोर्टनुसार इन्श्युअर्डच्या रक्तात अल्कोहलचे प्रमाण खूप जास्त आहे. यावरुन तो नशेत होता हे सिध्द होते. जास्त प्रमाणात दारु प्याल्याने काम करतांना तो स्वतःचा तोल सांभाळू शकला नाही व दुस-या मजल्यावरुन खाली पडला व दवाखान्यात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.
30 हा अपघात असला तरी इन्श्युअर्डने स्वतःच अपघाताला निमंत्रण देऊन मृत्यु ओढवून घेतला. जर तो दारु प्याला नसता तर हा अपघात झाला नसता. या सदंर्भात विरुध्द पक्षाने खालीलप्रमाणे अपवादाच्या संदर्भात हवाला दिला.
Exclusions in DAB Clause – 7
Double accident benefit (DAB) is not payable / considered , if death of life assured has occurred dueto following 5 sub- clause (a) to (e).
The details of exclusion clauses are as follows :-
(a) If death caused by intentional self – injury, suicide or attempted suicide, insanity or immorality or whilst the life assured is under the influence of intoxicating liquor, drug or narroctic Or
(b) -------------
(c) =-----------
(d) ------------
(e) --------------
31 अपवाद अट क्रं. 10 (b) (i) Clause (A) मध्ये Intentional Self Injury असे शब्द येतात. मृतक इन्श्युअर्डने हेतुपुरस्सर स्वतःला इजा व्हावी म्हणून नशा केला व उडी घेतली हे विरुध्द पक्षाने कोणत्याही स्वतंत्र पुराव्या द्वारे सिध्द केले नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे.
32 अपवादाबद्दल अधिक स्पष्टीकरण वि.प.च्या माहिती पत्रकात खालीलप्रमाणे
The Scope of the exclusion clause as per as influence of liquor, drug Or narcotic is concerned, is limited to cases where a person under the influence of liquor, drug or narcotics does certain acts giving rise to physical injury and death by such act. . The evidence to show that the accident was caused by any action of the life assured while he was under the influence of liquor will be statement of eyewitnesses police inquest report, Post-mortem report, chemical analyser’s report, magistrate final verdict , statement or case papers from doctor/hospital.
33 दुस-या मजल्यावर भिंतीला खाचा मारण्याचे काम करीत असतांना मृतक इन्श्युअर्ड अचानक पडला व त्याचा अपघाती मृत्यु झाला असे दि. 28.09.2008 चा पोलिस अहवाल व पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट इत्यादी सर्व दस्तात नमूद आहे. यापैकी एकाही दस्तात मृतक इन्श्युअर्ड नशेत होता हे नमूद नाही.
34 दि. 9.8.2010 रोजी उप-विभागीय दंडाधिका-यांनी मृत्युचे कारण ‘शरिरास झालेल्या जखमांमुळे अपघाती मृत्यु झाला असे दिले आहे’. या सर्वांवरुन इन्श्युअर्डचा मृत्यु अपघाती झाला व मृत्युचे कारण "शरिरास झालेल्या अनेक जखमा" आहेत हे सिध्द होते.
35 त्यामुळे इन्श्युअर्डच्या मृत्युचे कारण "नशा" हे नसून अपघाताने पडल्यामुळे शरीरावरील अनेक जखमा असे आहे. म्हणून अपवाद अट क्रं. 10 (b) (A) लागू होत नाही. सबब तक्रारकर्ती दुहेरी हित-लाभास पात्र ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे.
36 विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दुहेरी हित-लाभ नाकारल्याबद्दल रेकॉर्डवर लेखी स्वरुपात कोणतेही दस्त दाखल केले नाहीत. हा लाभ मिळण्यास तक्रारकर्ती पात्र नाही असे तोंडी सांगितले असे विरुध्द पक्ष म्हणतात. विरुध्द पक्षाची ही कृती अत्यंत दिशाभूल करणारी आहे. या संदर्भात दि. 5.5.2011 रोजीचे पत्र अत्यंत बारकाईने तपासले असता त्यावरुन असाच निष्कर्ष निघतो की, तक्रारकर्तीचा विमा दावा Full & final payment देऊन settle केला . म्हणजेच मुळ पॉलिसीचे रुपये 50,000/- व दुहेरी हित-लाभाचे रुपये 50,000/- देय ठरविले.
37 असे असले तरी तक्रारकर्तीला प्रत्यक्षात मात्र रुपये 50,000/- एवढीच रक्कम दिली.
38 लिखित स्वरुपात तक्रारकर्तीला दुहेरी हित लाभ रुपये 50,000/- नाकारल्याबद्दल आणि नाकारण्याच्या कारणाबद्दल तक्रारकर्तीला कधीही काहीही कळविले नाही. दुहेरी हित-लाभ नाकारणारे पत्र विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर दाखल केले नाही.
39 मृतक इन्श्युअर्ड हा दि. 28.09.2008 रोजी दुस-या मजल्यावरील टेरेसवर भिंतीला खाचा मारण्याचे काम करीत असतांना 30 फुटांवरुन खाली पडला. त्याच्या डोक्याला व मेंदुला
जबरदस्त मार बसल्याचे वैद्यकीय कागदपत्रात नमूद आहे. त्यामुळे तो तात्काळ घटनास्थळीच मृत झाला असे नंतरच्या वैद्यकीय व पोलिसांच्या कागदपत्रावरुन निष्पन्न होते.
40 मंचाला ही सर्व कागदपत्रे ग्राहय वाटतात. त्यांच्या आधारे इन्श्युअर्डचा मृत्यु हा अपघात होता व मृत्युचे कारण शरीरावरील अनेक जखमा होत्या. (नशा नव्हे) असा निष्कर्ष मंच नोंदविते.
41 सबब तक्रारकर्ती दुहेरी हित-लाभ मिळण्यास पात्र ठरते. हा निष्कर्ष मंच नोंदवित आहे.
42 नशेमुळे किंवा नशेत केलेल्या कृत्यामुळे मृत्यु येण्यासाठी (asphyxia) नशेचे प्रमाण 250 mg च्यावर आणि 300 ते 400 mg असावे लागते. या प्रकरणात नशेमुळे मृत्यु आलेला नाही किंवा नशा हे मृत्युचे कारण म्हणून वैद्यकीय किंवा पोलिसांकडील कोणत्याही कागदपत्रात नमूद नाही.
43 या संदर्भात तक्रारकर्त्याच्या वकिलांनी दाखल केलेला Case Law I (2002) CPJ 85 हा तत्वतः
लागू होतो.
44 विरुध्द पक्षाने रेकॉर्ड पेज 62 ते 76 इथाईल अल्कोहल आणि अल्कोहल "चॅप्टर 9" असे साहित्य रेकॉर्डवर दाखल केले आहे. परंतु हातातील केस मध्ये इन्श्युअर्डच्या मृत्युचे कारण इथाईल अल्कोहल हे नसल्याने हे साहित्य मंचाला येथे गैर लागू वाटते.
45 शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे वि.प.ने तक्रारकर्तीचा मुळ विमा दावा (रुपये 50,000/-) अधिक दुहेरी हित-लाभाचे रुपये 50,000/- --मंजूर केल्याचे – वि.प.च्याच दि. 05.05.2011 च्या पत्रावरुनच सिध्द होते. ते खालीलप्रमाणे.
“ LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA
BRANCH OFFICE GONDIA (976)
INDORCEMENT NO.-------------
1) The Life Insurance Corporation of India, having received satisfactory evidence that Shri/ Smt. Amarlal Jaitlal Machhirke (Dead) the within mentioned Male/ Female Life Assured died on 28/09/2008, has settled the claim for (Basic) Sum Assured (Plus Double Accident Benefit) on ---- in favour of Shri/Smt Nita Amarlal Machhirke.
2) ------------------------------------------------
3) -------------------------------
4) ---------------------------------
dated at Gondia this day of 05/05/2011”
46 मंच तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करतांना खालील केस लॉ चा आधारे घेते.
From Net.
S.No. 77
L.I.C. of India & Anr