Maharashtra

Satara

CC/14/75

madhuri m. anrde - Complainant(s)

Versus

lif EINSURANCE - Opp.Party(s)

brage

31 Jul 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/14/75
 
1. madhuri m. anrde
KOREGAON SATARA
SATARA
...........Complainant(s)
Versus
1. lif EINSURANCE
SATARA
SATARA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
 HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

           मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                          मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                तक्रार अर्ज क्र. 75/2014

                      तक्रार दाखल दि.07-06-2014.

                            तक्रार निकाली दि.31-07-2015. 

 

1.  श्रीमती माधुरी महेंद्र एरंडे,

   रा.अयोध्‍या कॉलनी, सुभाषनगर,

   कोरेगांव, ता. कोरेगांव,जि.सातारा.                ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

 

1. मा.प्रबंधकसो,

   लाईफ इन्‍श्‍युरन्‍स कार्पोरेशन ऑफ इंडिया,  

   शाखा सातारा (941),

   151, भवानी पेठ, सातारा

   ता.जि.सातारा.                                  ....  जाबदार

 

 

                                

                                 तक्रारदारातर्फे अँड.डी,एम बर्गे,

                                 जाबदार क्र.1 तर्फेअँड.एम.जे.तळवलकर.

                                                                  

 

-ः न्‍यायनिर्णय ः-

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                     

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

     तक्रारदार हे कोरेगांव, ता. कोरेगांव, जि.सातारा येथील रहिवाशी आहेत. त्‍यांचे पतीने जाबदार विमा कंपनीचे काही वर्षापूर्वी विमा योजनेमधून जीवनसरळ + लाभ (  Jivan Saral with profit )  ही  विमा पॉलीसी 18 वर्षे मुदतीसाठी उतरली होती.  त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदार विमाकंपनीचे ग्राहक आहेत.  तक्रारदाराने पतीर महेंद्र अनंत एरंडे हे डाक व टपाल खात्‍यात पोस्‍टमन म्‍हणून नोकरीस होते.  तक्रारदाराचे पतीने जीवनसरळ + लाभ ही विमा पॉलीसी रक्‍कम रु.2,50,000/- (रुपये दोन लाख पन्‍नास हजार फक्‍त) 18 वर्षे मुदतीसाठी उतरहवली होती.  त्‍याचे हप्‍ते तक्रारदार नियमीत भरत होते. तक्रारदाराचे पती महेंद्र एरंडे हे दिनांक 14/1/2012 रोजी दुपारी 12.00 वाजणेच्‍या सुमारास ऑफीसचे काम संपवून घरी येत असताना कोरेगांव-रहिमतपूर रोडवर हॉटेल राजधानी समोर रहिमतपूर बाजूकडून भरधाव वेगाने येणा-या दुचाकी हिरोहोंडा डिलक्‍स नं. एम.एच.-11-ए.वाय.5914 ने जोरदार धडक दिल्‍यामुळे ते गंभीररित्‍या जखमी झाले होते.  त्‍यांचे उजव्‍या मांडीला व खुब्‍याला चार ठिकाणी फ्रॅक्‍चर झाले होते.  त्‍यांना प्रथम कोरेगांव येथील ग्रामीण रुग्‍णालयात नेले व पुढील उपचारासाठी तेथील वैद्यकीय अधिका-यांनी सांगितलेप्रमाणे डॉ. अजित भोसले यांच्‍या भोसले  हॉस्पिटल, कोरेगांव येथे दाखल केले.  डॉक्‍टरांनी जखमीचे मांडी व खुब्‍याचे ऑपरेशन केले व

काही दिवस हॉस्पिटलमध्‍ये ठेऊन नंतर  त्‍यांना घरी सोडण्‍यात आले.  तक्रारदाराचे पती महेंद्र एरंडे यांच्‍या पायाला एक महिना प्‍लॅस्‍टर असलेमुळे विश्रांती घेत होते व अधून मधून तपासणीकरीता दवाखान्‍यात जात होते.  दि. 21/1/2012 रोजी महेंद्र एरंडे हे घरीच विज्ञांती घेत असताना त्‍यांना अस्‍वस्‍थ वाटू लागले व जखमांच्‍या वेदना सहन न झाल्‍याने त्‍यांचा त्‍याचदिवशी दुपारी 1.00 वाजणेचे दरम्‍यान मृत्‍यू झाला.   त्‍यांचे मृत्‍यूचेवेळी तक्रारदार व तिची 5 वर्षांची लहान मुलगी या दोघीच घरी होत्‍या.  त्‍यांचेनातेवाईक बडोदा, मुंबई, नाशिक या लांबच्‍या गावी असलेने तक्रारदार पतिचा मृतदेह पोस्‍टमार्टेमसाठी घेवून जाऊ शकल्‍या नाहीत व मयतावर सायंकाळी 6.30 वाजता अंत्‍यसंस्‍कार करणेत आले.  त्‍यानंतर कांही दिवसांनी तक्रारदार हीने पतीच्‍या विमापॉलीसीची रक्‍कम मिळावी म्‍हणून जाबदार विमा कंपनीकडे अर्ज दाखल केला व सर्व कागदपत्रांची पूर्तता केली.  त्‍यानंतर जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराला रक्‍कम रु.2,79,000/- (रुपये दोन लाख एकोणऐंशी हजार फक्‍त) चा चेक अदा केला.  एवढीच रक्‍कम जाबदारकडून तक्रारदाराला मिळाली आहे.

     विमा कंपनीने केवळ मयताचे पोस्‍टमार्टेम झालेले नाही त्‍यामुळे मृत्‍यूचे कारण अपघात हे स्‍पष्‍ट होत नाही. असे कारण दाखवून तक्रारदार यांना मिळणारा दुर्घटना हितलाभ/ डबल अँक्सिडेंट बेनीफीट (D.A.B.) तक्रारदाराला देणेस दि.6/3/2014 रोजी नकार दिला. म्‍हणून तक्रारदाराने जाबदाराला दि. 28/3/2014 रोजी नोटीस पाठवली. परंतु, तरीही सदरची रक्‍कम तक्रारदाराला जाबदाराने अदा केली नाही.  प्रस्‍तुत कामी दुचाकीस्‍वार आरोपी विरुध्‍द मे.जे.एम.एफ.सी कोर्टात IPC प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले होते.  त्‍यामुळे तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू अपघातामुळे झालेचे स्‍पष्‍ट होत असतानाही जाबदार विमा कंपनीने दुर्घटना हितलाभ DAB ची रक्‍कम तक्रारदाराला अदा केली नाही ही सेवात्रुटी असलेने प्रस्‍तुतची रक्‍कम जाबदार कंपनीकडून वसूल होवून मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रारअर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.

2.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार विमा कंपनीकडून दुर्घटना हितलाभाची (D.A.B.)  ची रक्‍कम रु.2,21,000/- (रुपये दोन लाख एकवीस हजार मात्र) + त्‍यावरील बोनस   + व्‍याज इत्‍यादी वसूल हाऊन मिळावी, तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- जाबदार यांचेकडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी केली आहे.

3.   तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी नि. 2 कडे अँफीडेव्‍हीट, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते 5/6 कडे अनुक्रमे तक्रारदाराने विमा हप्‍ते भरल्‍याच्‍या पावत्‍या, जाबदाराने दुर्घटना हितलाभ DAB ची रक्‍कम नाकारलेचे पत्र, तक्रारदाराचे पतीस औषधोपचार केलेचे भोसले हॉस्पिटल मधील कागदपत्रे, तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेली नोटीसची स्‍थळप्रत, तक्रारदाराचे पतीचे डिस्‍चार्ज कार्ड प्रत, नि.14 व 15 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 16 चे कागदयादीसोबत नि.16/1 कडे मे. जे.एम.एफ.सी., कोरेगांव कोर्टात दुचाकीस्‍वार निलेश शिंदे विरुध्‍द दाखल झालेला S.C.C.  142/12 ची सर्टिफाईड प्रत व नि.16/2 कडे आरोपपत्र, नि. 20 कडे तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद, नि.25 कडे जाबदाराने दाखल केले Case laws वरती तक्रारदाराचे म्‍हणणे वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.

4.    प्रस्‍तुत कामी जाबदार यांनी नि. 10 कडे म्‍हणणे नि. 11 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि. 19 कडे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 23 कडे जाबदाराचा लेखी युक्‍तीवाद, तसेच मे. राष्‍ट्रीय आयोगाचे पुढील न्‍यायनिवाडे दाखल केले आहेत.

  a.  2003 CPJ 2 – 644

   b. 2006 CPJ 1- 135

वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत. 

    जाबदाराने त्‍यांचे कैफियत/म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळले आहे.  त्‍यांनी प्रस्‍तुत कामी पुढीलप्रमाणे आक्षेप घेतलेले आहेत. 

     अ)  तक्रारदाराचे तक्रार अर्जातील मजकूर मान्‍य व कबूल नाही.  तक्रारदाराचे पतीचा अपघात झाला होता हे मान्‍य आहे.  परंतु तक्रारदाराचे पतीला दि.29/1/2012 रोजी घरीच विश्रांती घेत असताना अस्‍वस्‍थ वाटू लागले व जखमांच्‍या वेदना सहन न झालेने दुपारी 1.00 वाजता तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू झाला हे जाबदाराला मान्‍य नाही.  तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू अपघातातील जखमांमुळे झालेचे तक्रारदाराने स्‍पष्‍टपणे सिध्‍द केले पाहीजे. त्‍याखेरीज या विधानास कोणताही आधार नाही.  तक्रारदाराला जाबदार विमा कंपनीकडून विमा रक्‍कम रु. 2,79,000/- मिळालेचा मजकूर मान्‍य आहे.  खरी वस्‍तुस्थिती पुढीलप्रमाणे,- 

    विमा पॉलीसीतील अटी व शर्ती विमा धारकावर बंधनकारक असतात.  तक्रारदाराचे पतीने रक्‍कम रु. 2,50,000/- ची जीवन सरळ + लाभ ही विमापॉलीसी घेली होतीख्‍ त्‍याची मुदत 18 वर्षे होती.  प्रस्‍तुत तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू पॉलीसीची मुदत संपणेपूर्वी झालेने विमा पॉलीसीची रक्‍कम रु.2,79,000/- जाबदाराने तक्रारदाराला अदा केली आहे.   परंतु दुर्घटना हितलाभ DAB ची रक्‍कम तक्रारदाराला अदा केली नाही.  कारण- तक्रारदाराने तिचे पतीचे मृत्‍यूनंतर पोस्‍टमार्टेम केले नाही.  त्‍यामुळे तिचे पतीचा मृत्‍यू कशामुळे झाला/ अपघातामुळेच झाला हे सिध्‍द होत नाही.  मृत्‍यूचे कारण स्‍पष्‍ट होणेसाठी पोस्‍टमार्टेम होणे गरजेचे होते ते केलेले नसलेमुळे तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा अपघातातील जखमांमुळेच झाला आहे हे सिध्‍द होत नाही.  म्‍हणूनच जाबदाराने तक्रारदाराचे पतीच्‍या म़ृत्‍यूनंतर दुर्घटना हितलाभ DAB ची रक्‍कम तक्रारदाराला अदा केली नाही.  त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सदोष सेवा पुरविलेली नाही.  सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे म्‍हणणे/कैफीयत जाबदाराने याकामी दाखल केली आहे. 

5.    वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे व म्‍हणणे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुदद्यांचा विचार केला.

अ.क्र.                  मुद्दा                        उत्‍तर

1.  तक्रारदार हे जाबदारांचे  ग्राहक आहेत काय?                  होय.                                        

2.  जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा

    पुरवली आहे काय?                                      होय.

3.  तक्रारदार दुर्घटना हितलाभ (DAB) ची रक्‍कम

    मिळणेस पात्र आहेत काय ?                               होय.

4.   अंतिम आदेश काय?                                 खाली नमूद

                                                      आदेशाप्रमाणे.

 

विवेचन-

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराचे पती जाबदार विमा कंपनीकडे जीवनसरळ + लाभ ही विमा पॉलीसी रक्‍कम रु.2,50,000/- ची 18 वर्षे मुदतीसाठी उतरविली होती.  प्रस्‍तुत बाब जाबदाराने मान्‍य केली आहे.  प्रस्‍तुतचा विमा करार तक्रारदाराचे पति व जाबदार यांचे दरम्‍यान झालेला असल्‍याने तक्रारदार मयत वारस असलेने हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार हे सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवाद सिध्‍द होते. सबब आम्‍ही मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे..

7.    वर नमूद मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराचे पती यांचा दि. 14/1/2012 रोजी दुचाकी हिरोहोंडा-डिलक्‍स एम.एच.-11 ए.वाय..5914 या गाडीने जोरदार धडक दिलेने अपघात झाला.  प्रस्‍तुत  अपघातानंतर तक्रारदाराचे पति यांचेवर कोरेगांव येथील भोसले हॉस्पिटल मध्‍ये उजव्‍या मांडीला व खुब्‍याला 4 ठिकाणी फ्रॅक्‍चर असलेने ऑपरेशन करावे लागले.  प्रस्‍तुत ऑपरेशननंतर दि. 25/2/2012 रोजी तक्रारदाराचे पतिला डिस्‍चार्ज मिळाला व घरी असताना दुपारचे वेळी विश्रांती घेत असताना डिस्‍चार्ज नंतर चवथ्‍याचदिवशी दि.29/1/2012 रोजी दुपारी 1.00 वाजता अस्‍वस्‍थ वाटल्‍याने व जखमांच्‍या वेदना असळय झाल्‍याने तक्रारदाराचे पति मयत झाले.  प्रस्‍तुत मृत्‍यूनंतर तक्रारदाराने तक्रारदाराचा विमाक्‍लेम जाबदाराकडे सादर केला असता जाबदार तक्रारदाराला फक्‍त विमापॉलीसीची रक्‍कम रु.2,79,00/- (रुपये दोन लाख एकोणऐंशी हजार मात्र) या रकमेचा चेक दिला व एवढीच रक्‍कम जाबदाराला तक्रारदाराकडून मिळाली.  मात्र तक्रारदार यांना मिळणारी दुर्घटना हितलाभ (DAB) ची रक्‍कम तक्रारदाराचे मृत्‍यूचे कारण स्‍पष्‍ट होत नाही. (पोस्‍टमार्टेम केलेले नसलेने) म्‍हणून रक्‍कम देता येत नाही असे दि. 6/3/2014 तक्रारदाराला पत्राने कळविले.  कायद्याप्रमाणे व नियमानुसार जाबदाराने तक्रारदाराला वेळेत दुर्घटना हितलाभ (DAB) ची रक्‍कम अदा करणे आवश्‍यक होते.  कारण तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू अपघातानंतर ऑपरेशन झालेनंतर डिस्‍चार्ज मिळाले दिवसांपासून चवथ्‍याचदिवशी तक्रारदाराचा मृत्‍यू जखमांच्‍या वेदनांमुळे व अस्‍वस्‍थ झाल्‍याने झालेचे दिसून येते.  प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने तिचे पतीचे प्रताचे पोस्‍टमार्टेम केले नसल्‍याने मृत्‍यूचे कारण अपघाताने झाले ही बाब स्‍पष्‍ट होत नाही असे कारण दाखवून जाबदाराने दुर्घटना हितलाभ (DAB)  ची रक्‍कम तक्रारदाराला दिलेली नाही.  वास्‍तविक जाबदाराने प्रस्‍तुत दुर्घटना हितलाभाची रक्‍कम तक्रारदाराला देणे बंधनकारक होते. कारण मे. वरिष्‍ठ न्‍यायालयांच्‍या खालील नमूद न्‍यायनिवाडयानुसार एफ.आय.आर. व पोस्‍टमार्टेम करणेची गरज नाही असे स्‍पष्‍ट होत आहे.  प्रस्‍तुतचे काही न्‍यायनिवाडे खालीप्रमाणे,-  सदर न्‍यायनिवाडयांचा व त्‍यातील दंडकांचा आम्‍ही याकामी आधार घेत आहोत. 

  1.  Vol. 1 – 1 (2005) CPJ 523 Uttaranchal State Consumer Disputes Redressal Commission Deharadun   Narendra Singh Bhasin V/s. National Insurance Co. Ltd.,

Head Note-   Non lodging of FIR and not conducting Post Mortem not fatal for case.

   2. 1 (2009) CPJ 147 Maharashtra State Consumer Disputes Redressal Commission.  National Insurance Co. Ltd., V/s. Asha Jamadar Prasad.

Head note-  Delay in rejection of claim highly objectionable – No Post Mortem carried out insistence for Post Mortem report unjustified.  Voluminous  documentary evidence produced to show that insured met with accidental death.  Order of forum upheld Appeal dismissed.

3.  IV (2008) 312 Rajasthan State Consumer Disputes Redressal Commission Jaipur.   ICICI Lombard Insurance Co. V/s. Raju Kanchhawa

Sec. 2 (1)(9) & 15- Insurance-Accident death-Deceased-slipped in house-fell down on ground- Received head injury including brainstem haemorrhage – head injury direct result of slipping of deceased would be treated as mishap or untoward event not expected of designed – Death of deceased accidental proved – Non furnishing of EIR & Post Mortem report would not mean that no accident took place- no necessary of loadings FIR & Post Mortem Report.  Repudiation of claim unjustified- Insurer liable under policy.   

     वरील पूर्वाधारावरुन जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराला दुर्घटना हितलाभ (DAB) ची रक्‍कम व्‍याजासह अदा करणे न्‍यायोचीत होणार आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.      

9.    सबब आम्‍ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.    

                           -ः आदेश ः-

 

1.   तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2.  जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना दुर्घटना हितलाभाची (DAB) ची रक्‍कम रु.2,21,000/- (रुपये दोन लाख एकवीस हजार मात्र) त्‍यावरील बोनस व व्‍याज अदा करावे. प्रस्‍तुत एकूण रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज जाबदाराने तक्रारदाराला द्यावे.

3.   जाबदार यांनी  तक्रारदार यांना झाले मानसिक त्रासासाठी रक्‍कम

     रु.10,000/-(रुपये दहा हजार फक्‍त) अदा करावेत

4.   जाबदार यांनी  तक्रारदार यांना अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.3,000/-

     (रुपये तीन हजार फक्‍त) अदा  करावेत.

5.  वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45

    दिवसांचे आत करावे.  

6.  विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदाराला ग्राहक संरक्षण

    कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची  मुभा

    राहील.

7.  पस्‍तुत आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य द्याव्‍यात.

8.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

 

ठिकाण- सातारा.

दि. 31-7-2015.

 

            (सौ.सुरेखा हजारे)   (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या          सदस्‍य             अध्‍यक्षा

             जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.